Shri Dnyaneshwari
इये चराचरीं समस्ते । अखंडित देखे तयांते ।
आणि पुढती म्हणे नमस्ते ।
नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥
५२६) या सर्व
स्थावर-जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभु त्याला त्यानें पाहिले आणि पुन्हां
म्हणाला, प्रभो, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो.
ऐसीं रुपें तियें अद्भुतें
। आश्र्चर्ये स्फुरती अनंतें ।
तंव तंव नमस्ते । नमस्तेचि
म्हणे ॥ ५२७ ॥
५२७) अशी ही अनंत व
अद्भुत रुपें जों जों आश्र्चर्यकारक रीतीनें अर्जुनाच्या पुढें प्रकट होत होतीं,
तों तों अर्जुन प्रभो, तुला नमस्कार असो, नमस्कार असो, असेंच म्हणत होता.
आणिक स्तुति नाठवे । आणि
निवांताही नसवे ।
नेणों कैसा प्रेमभावें ।
गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥
५२८) ‘ नमस्ते, नमस्ते
‘ याहून दुसरी स्तुति त्याला आठवेना, आणि निवांतपणानें राहावें हेंहि सहन होईना.
कशा प्रेमभावानें तों ( अर्जुन ) ‘ नमस्ते नमस्ते ‘ अशीच गर्जना करीत होता, ते कळत
नाहीं !
किंबहुना इयापरी । नमन केले
सहस्रावरी ।
कीं पुढती म्हणे श्रीहरी ।
तुज सन्मुखा नमो ॥ ५२९॥
५२९) फार काय सांगावें
! याप्रमाणें अर्जुनानें हजारों नमस्कार केले व पुन्हा म्हणाला कीं, हें
माझ्यासमोर असणार्या श्रीहरि , तुला नमस्कार असो.
देवासि पाठी पोट आथी कीं
नाहीं । येणे उपयोगु आम्हा काई
तरी तुज पाठिमोरेयाही । नमो
स्वामी ॥ ५३० ॥
५३०) देवाला पाठ व पोट
आहे का नाही, याचा विचार करुन आम्हांला काय प्रयोजन आहे ? परंतु महाराज, पाठमोरा जो तूं, त्याला नमस्कार असो.
उभा माझिये पाठीसीं ।
म्हणोनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी ।
सन्मुख विन्मुख जगेंसी । न
घडे तुज ॥ ५३१ ॥
५३१) माझ्या पाठीमागे
तूं जसा आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो; परंतु हे परमेश्र्वरा, जगाशीं
समोर अथवा पाठमोरें होणें हे तुझ्या ठिकाणी संभवत नाहीं. ( कारण जगद्रूप तूंच आहेस
).
आतां वेगळालिया अवेवां । नेणें रुप करुं देवा ।
म्हणोनि नमो तुज सर्वा ।
सर्वात्मका ॥ ५३२ ॥
५३२) आतां वेगवेगळ्या
अवयवांचे वर्णन करण्याचे, देवा, मला कळत नाही याकरितां सर्व चराचर बनून सर्वांच्या
आंत आत्मेरुपानें तूंच आहेस त्या तुला नमस्कार असो.
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो
अमितविक्रमा ।
सकळकाळीं समा । सर्वदेवा ॥
५३३ ॥
५३३) देवा, अनंत
बलाच्या आवेशाचे तूं ठिकाण आहेस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही; तूं तिन्ही
काळीं सारखा ( एकरुप ) असतोस; आणि सर्व देवांच्या रुपानें तूंच आहेस, त्या तुला
नमस्कार असो.
आघवां अवकाशीं जैसें ।
अवकाशचि होऊनि आकाश असे ।
तूं सर्वपणें तैसें ।
पातलासि सर्व ॥ ५३४ ॥
५३४) ज्याप्रमाणें सर्व
पोकळींत आकाश हें पोकळी होऊन असतें, त्याप्रमाणें तूं सर्वांना व्यापून सर्व झाला
आहेस.
किंबहुना केवळ । सर्व हें
तूंचि निखिळ ।
परि क्षीरार्णवीं कल्लोळ ।
पयाचे जैसे ॥ ५३५ ॥
५३५) फार काय सांगावें
! हें सर्व त्रिभुवन केवळ तूंच आहेस;
परंतु क्षीरसमुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात, ( त्याप्रमाणें त्रिभुवन हें
तुझ्या ठिकाणीं आहे.)
म्हणोनियां देवा । तूं
वेगळा नव्हसी सर्वां ।
हें आलें मज सद्भावा । आतां
तूंचि सर्व ॥ ५३६ ॥
५३६) म्हणूनादेवा, तूं
या सर्व जगाहून वेगळा नाहींस, हें माझ्या खरोखर अनुभवाला आलें. तर आतां देवा, सर्व
तूंच आहेस.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि
॥ ४१ ॥
४१) तुझा हा महिमा न जाणणारा मी,
प्रमादामुळें अथवा प्रेमामुळें मित्र समजून, तुच्छतापूर्वक, अरे कृष्णा, अरे
यादवा, अरे सख्या, इत्यादि जें तुला बोललों;
परि ऐसिया तूंतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही
।
म्हणोनि सोयरे संबंधधर्मी । रहाटलों तुजसीं ॥ ५३७
॥
५३७) परंतु एवढा मोठा तूं असूनहि हे प्रभो,
आम्हीं तुला केव्हांच जाणलें नाही आणि त्यामुळें आम्ही तुझ्याशीं असलेले
आप्तसंबंधाचें नातें लक्षांत घेऊन, त्या दृष्टीनें तुझ्याशीं वागणूक ठेवली,
अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां
केलें ।
वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥
५३८) अरे अरे ! ही फारच अनुचित गोष्ट झाली
कीं मी सडा घालण्याच्या कामीं अमृताचा उपयोग केला ! आणि लहानसें शिंगरुं घेऊन
त्याच्या मोबदल्यांत कामधेनूच देऊन टाकली.
परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि गाडोरा आम्हीं
घातला ।
कल्पतरु तोडोनि केला । कुंपु शेता ॥ ५३९ ॥
५३९) तूं म्हणजे आम्हांला प्रत्यक्ष परिसाचा
खडकच लाभला होतास. पण तो फोडृन आम्ही त्याचा उपयोग भिंतीच्या पाया भरण्ताच्या
कामीं केला; अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून शेत राखण्याकरितां कुंपण केले !
चिंतामणीची खाणी लागली । तेणेंवरी वोढाळें
वोल्हांटिली ।
तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥
५४०) मला तूं ( म्हणजे, चिंतामणि नामक
रत्नांच्या खाणीचा लाभ झालास; परंतु मी त्या रत्नांचा उपयोग ओढाळ गुरांना
हांकण्याकडे केला. या तर्हेनें तुझी प्राप्ति झाली असतांनाहि, ती प्राप्ति, तूं
स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली.
हें आजिचेंचि पाहे पां रोंकडें । कवण झुंज हें
केवढें ।
परि परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥
५४१) ( मागच्या सर्व गोष्टी असूं दे. ) आजचीच
प्रत्यक्ष गोष्ट पाहा कीं, हें युद्ध कसलें व काय किंमतीचें आहे ! पण तूं
मूर्तिमंत परब्रह्म असतांहि तुला या युद्धांत मी सारथी केलें आहे !
ययां कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।
ऐसा वणिजेसाठी जागेश्र्वरा । विकलासि आम्हीं ॥
५४२ ॥
५४२) हे दातारा, तडजोड करण्याकरितां
कौरवांच्या घरीं आम्हीं तुला पाठविलें. अशा प्रकारें देवा, तूं प्रत्यक्ष जागृत
दैवत असूनदेखील, तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहारांकरिता खर्ची घातलें.
तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी
मूर्ख ।
उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करुं ॥ ५४३ ॥
५४३) तूं योग्यांचें समाधिसुख आहेस; मी कसा मूर्ख कीं, हें
मी जाणलें नाहीं व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल, असें
भाषण
करीत होतों.
No comments:
Post a Comment