KikshindhaKanda Part 10
दोहा—मैं देखउँ तुम्ह नाहीं
गीधहि दृष्टि अपार ।
बूढ़ भयउँ न त करतेउँ कछुक
सहाय तुम्हार ॥ २८ ॥
मी तिला पाहू शकतो,
तुम्ही पाहू शकणार नाही, कारण गिधाडाची नजर फार लांब जाते. काय करु ? मी म्हातारा
झालो आहे, नाही तर तुम्हांला थोडीशी तरी मदत नक्की केली असती. ॥ २८ ॥
जो नाघइ सत जोजन सागर । करइ
सो राम काज मति आगर ॥
मोहि बिलोकि धरहु मन धीरा ।
राम कृपॉं कस भयउ सरीरा ॥
जो शंभर योजने- ( चारशे
कोस ) विस्तार असलेला समुद्र उल्लंघन करु शकेल आणि बुद्धिमान असेल, तोच
श्रीरामांचे कार्य पार पाडू शकेल. निराश न होता माझ्याकडे पाहून धीर धरा. बघा,
श्रीरामांच्या कृपेमुळे पाहता पाहता माझे शरीर कसे झाले. ‘ ॥ १ ॥
पापिउ जा कर नाम सुमिरहीं ।
अति अपार भवसागर तरहीं ॥
तासु दूत तुम्ह तजि कदराई ।
राम हृदयँ धरि करहु उपाई ॥
पापीसुद्धा ज्तांचे
नामस्मरण करताच अत्यंत अपार भवसगर तरुन जातात, त्यांचे तुम्ही दूत आहात. म्हणून भय
सोडून श्रीरामांना हृदयात ठेवून काम करा. ॥ २ ॥
अस कहि गरुड़ गीध जब गयऊ ।
तिन्हकेंमन अति बिसमय भयऊ ॥
निज निज बल सब काहूँ भाषा ।
पार जाइ कर संसय राखा ॥
काकभुशुंडी म्हणतात, ‘
हे गरुडा, असे सांगून जेव्हा संपाती निघून गेला, तेव्हा वानरांना फार आश्चर्य
वाटले. सर्वजणांनी आपापले सामर्थ्य सांगितले परंतु सर्वांनी समुद्र उल्लंघून
जाण्याविषयी संशय प्रगट केला.’ ॥ ३ ॥
जरठ भयउँ अब कहइ रिछेसा ।
नहिं तन रहा प्रथम बल लेसा ॥
जबहिं त्रिबिक्रम भए खरारी
। तब मैं तरुन रहेउँ बल भारी ॥
ॠक्षराज जांबवान म्हणू
लागला, ‘ मी आता म्हातारा झालो आहे. शरीरामध्ये पूर्वींचे बळ थोडेसुद्धा राहिले
नाही. जेव्हा श्रीराम यांनी वामनावतार घेतला होता, तेव्हा मी तरुण होतो व
माझ्यामध्ये पुष्कळ बळ होते. ॥ ४ ॥
दोहा—बलि बॉंधत प्रभु बाढ़ेउ
सो तनु बरनि न जाइ ।
उभय घरी महँ दीन्हीं सात
प्रदच्छिन धाइ ॥ २९ ॥
बळीला बांधून घालताना
प्रभू एवढे वाढले की, त्या शरीराचे वर्णन करता येत नाही. परंतु मी दोन घटकातच धावत
धावत त्यांच्या देहाला सात प्रदक्षिणा घातल्या. ‘ ॥ २९ ॥
अंगद कहइ जाउँ मैं पारा ।
जियँ संसय कछु फिरती बारा ।
जामवंत कह तुम्ह सब लायक ।
पठइअ किमि सबही कर नायक ॥
अंगद म्हणाला, ‘ मी
पलीकडे जाईन, परंतु परत येता येईल की नाही, अशी मनात शंका आहे. ‘ जांबवान म्हणाला,
‘ तू सर्व प्रकारे योग्य आहेस, परंतु तू सर्वांचा नेता आहेस. तुला कसे पाठविता
येईल ? ॥ १ ॥
कहइ रीछपति सुनु हनुमाना ।
का चुप साधि रहेहु बलवाना ॥
पवन तनय बल पवन समाना ।
बुधि बिबेक बिग्यान निधाना ॥
ॠक्षराज जांबवानाने
हनुमानाला म्हटले, ‘ हे हनुमाना, हे बलवाना, तू का गप्प आहेस ? तू पवनाचा पुत्र
आहेस आणि बळामध्ये पवनासमान आहेस. तू बुद्धी, विवेक व विज्ञानाची खाण आहेस. ॥ २ ॥
कवन सो काज कठिन जग माहीं ।
जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं ॥
राम काज लगि तव अवतारा ।
सुनतहिं भयउ पर्बताकारा ॥
जगात असे कोणते कठीण
काम आहे की, बाबा रे, जे तुझ्याकडून होऊ शकणार नाही ? श्रीरामांच्या कार्यासाठीच
तुझा अवतार झाला आहे.’ हे ऐकताच हनुमान पर्वताच्या आकारासारखा विशाल झाला. ॥ ३ ॥
कनक बरन तन तेज बिराजा ।
मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा ॥
सिंहनाद करि बारहिं बारा ।
लीलहिं नाघउँ जलनिधि खारा ॥
त्याचा सोन्यासारखा रंग होता.
शरीरावर तेज शोभत होते, जणू दुसरा पर्वतांचा राजा सुमेरु होता. हनुमानाने वारंवार
सिंहनाद करुन म्हटले, ‘ मी या खार्या समुद्राला लीलया उल्लंघून जाईन. ॥ ४ ॥
सहित सहाय रावनहि मारी ।
आनउँ इहॉं त्रिकूट उपारी ॥
जामवंत मैं पूँछउँ तोही ।
उचित सिखावनु दीजहु मोही ॥
मी रावणाला त्याच्या
सहाय्यकांसह ठार मारुन त्रिकूट पर्वत उपटून येथे घेऊन येऊ शकतो. हे जांबुवाना, मी
तुला विचारतो की, मला काय करायचे आहे, ते सांग.’ ॥ ५ ॥
एतना करहु तात तुम्ह जाई ।
सीतहि देखि कहहु सुधि आई ॥
तब निज भुज बल राजिवनैना ।
कौतुक लागि संग कपि सेना ॥
जांबवान म्हणाला, ‘ हे
हनुमंता, तू इतकेच कर की, सीतेला पाहून परत ये आणि बातमी सांग. नंतर कमलनयन
श्रीराम आपल्या बाहुबलाने राक्षसांचा संहार करुन सीतेला घेऊन येतील. लीला म्हणून
ते वानरांची सेना बरोबर घेतील.॥ ६ ॥
छंद—कपि सेन संग सँघारि निसिचर रामु सीतहि आनिहैं
।
त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि नारदादि बखानिहैं ॥
जो सुनत गावत कहत समुझत परम पद नर पावई ।
रघुबीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गावई ॥
वानरांची सेना बरोबर घेऊन, राक्षसांचा संहार
करुन श्रीराम सीतेला घेऊन येतील. मग देव आणि नारदादी मुनी तिन्ही लोकांना पवित्र
करणार्या त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करतील. ते ऐकून, गाऊन, सांगून व समजून
घेऊन मनुष्य परम पद प्राप्त करतील. श्रीरघुवीरांच्या चरण-कमलांवरील भ्रमर बनून
तुलसीदास ती कीर्ती गात आहे.
दोहा—भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि ।
तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं त्रिसिरारि ॥ ३०
( क) ॥
श्रीरघुवीरांची कीर्ती ही जन्म-मरणरुप
भव-रोगाची अचूक औषधी आहे. जे स्त्री-पुरुष ती ऐकतील, त्यांचे मनोरथ श्रीराम पूर्ण
करतील. ॥ ३० ( क ) ॥
सो० नीलोत्पल तन स्याम काम कोटि सोभा अधिक ।
सुनिअ तासु गुन ग्राम जासु नाम अघ खग बधिक ॥ ३० (
ख ) ॥
ज्यांचे नील कमलाप्रमाणे श्यामल शरीर आहे.
ज्यांची शोभा कोट्यावधी कामदेवांहून अधिक आहे आणि ज्यांचे नाम हे पापरुपी
पक्ष्यांना मारण्यासाठी पारध्यासारखे आहे, त्या श्रीरामांच्या लीलांच्या समूहांचे
वर्णन ऐकावे. ॥ ३० ( ख ) ॥
मासपारायण, तेविसावा विश्राम
इति श्रीमत् रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने
चतुर्थः सोपानः समाप्तः
कलियुगातील समस्त पापांचा नाश करणार्या
श्रीरामचरितमानसाचा हा चौथा सोपान समाप्त झाला.
॥किष्किन्धाकाण्ड समाप्त ॥
No comments:
Post a Comment