Wednesday, January 18, 2023

SunderKanda Part 21 Doha 59 to Doha 60 सुंदरकाण्ड भाग २१ दोहा ५९ ते दोहा ६०

SunderKanda Part 21 
ShriRamCharitManas 
Doha 59 to Doha 60 
सुंदरकाण्ड भाग २१ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५९ ते दोहा ६०

दोहा---सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुसुकाइ ।

जेहि बिधि उतरै कपि कटकु तात सो कहहु उपाइ ॥ ५९ ॥

समुद्राची अत्यंत विनीत वचने ऐकून कृपाळू श्रीरामांनी हसून म्हटले, ‘ बाबा रे, ज्या रीतीने वानरांची सेना पार उतरुन जाईल असा उपाय सांग. ‘ ॥ ५९ ॥

नाथ नील नल कपि द्वौ भाई । लरिकाईं रिषि आसिष पाई ॥

तिन्ह कें परस किएँ गिरि भारे । तरिहहिं जलधि प्रताप तुम्हारे ॥

समुद्र म्हणाला, ‘ हे नाथ, नील व नल हे दोघे वानर बंधू आहेत. त्यांना लहानपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला होता, त्यांनी स्पर्श केल्यास मोठमोठे पर्वतसुद्धा तुमच्या प्रतापाने समुद्रात तरंगू लागतील. ॥ १ ॥

मैं पुनि उर धरि प्रभु प्रभुताई । करिहउँ बल अनुमान सहाई ॥

एहि बिधि नाथ पयोधि बँधाइअ । जेहिं यह सुजसु लोक तिहुँ गाइअ ॥

मी प्रभूंची सत्ता ध्यानात ठेवून आपल्या बळानुसार जी शक्य होईल, ती मदत करतो. अशाप्रकारे समुद्राला बांध घाला की, त्यामुळे त्रैलोक्यामध्ये तुमची सुंदर कीर्ती गाइली जाईल. ॥ २ ॥

एहिं सर मम उत्तर तट बासी । हतहु नाथ खल नर अघ रासी ॥

सुनि कृपाल सागर मन पीरा । तुरतहिं हरी राम रनधीरा ॥

या बाणाने माझ्या उत्तरेकडील तटावर राहाणारे जे अत्यंत पापी व दुष्ट मनुष्य आहेत, त्यांचा वध करा. ‘ कृपाळू आणि रणधीर रामांनी समुद्राच्या मनातील दुःख ऐकून, ते त्वरित दूर केले व त्या दुष्टांना बाणाने टाकले. ॥ ३ ॥

देखि राम बल पौरुष भारी । हरषि पयोनिधि भयउ सुखारी ॥

सकल चरित कहि प्रभुहि सुनावा । चरन बंदि पाथोधि सिधावा ॥

श्रीरामांचा प्रचंड पराक्रम पाहून समुद्र आनंदित झाला. त्याने त्या दुष्टांची सारी हकीगत प्रभूंना सांगितली. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करुन समुद्र निघून गेला. ॥ ४ ॥

छंद---निज भवन गवनेउ सिंधु श्रीरघुपतिहि यह मत भायऊ ।

यह चरित कलि मलहर जथामति दास तुलसी गायऊ ॥

सुख भवन संसय समन दवन बिषाद रघुपति गुन गना ।

तजि सकल आस भरोस गावहि सुनहि संतत सठ मना ॥

समुद्र आपल्या घरी गेला. श्रीरघुनाथांना त्याचा विचार आवडला. हे चरित्र कलियुगातील पापांचे हरण करणारे आहे, आणि तुलसीदासाने आपल्या बुद्धीप्रमाणे ते गाइले आहे. श्रीरघुनाथ हे गुण-निधी, सुख-धाम, संशयाचा नाश करणारे आणि विषादाचे दमन करणारे आहेत. अरे मूर्ख मना, तू संसारातील सर्व आशा व विश्र्वास सोडून निरंतर त्यांचे गायन कर व त्यांचे चरित्र ऐक.

दोहा—सकल सुमंगल दायक रघुनायक गुन गान ।

सादर सुनहिं ते तरहिं भव सिंधु बिना जलजान ॥ ६० ॥

श्रीरघुनाथांचे गुणगान हे संपूर्ण मांगल्य देणारे आहे. जे

 आदरपूर्वक हे ऐकतील, ते कोणत्याही जहाजाविना-

साधनाविना भवसागरातून तरुन जातील. ॥ ६० ॥

मासपारायण, चोविसावा विश्राम

इति श्रीमद्रामचरित्रमानसे सकलकलिकलुषविध्वंसने पञ्चम: सोपानः समाप्तः

कलियुगाच्या संपूर्ण पापांचा नाश करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा पाचवा सोपान समाप्त झाला. ( सुन्दरकाण्ड समाप्त )  



Custom Search

No comments:

Post a Comment