Friday, September 9, 2022

SunderKanda Part 1 सुंदरकाण्ड भाग १

 

SunderKanda Part 1 
ShriRamCharitManas 
Sholak 1 to 3 and Doha 1 
सुंदरकाण्ड भाग १ 
श्रीरामचरितमानस 
श्र्लोक १ ते ३ आणि दोहा १

शान्तं शाश्र्वतमप्रमेयमनघं  निर्वाणशान्तिप्रदं

ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुम् ।

रामाख्यं जगदीश्र्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं

वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम् ॥ १ ॥

शांत, सनातन, अप्रमेय, निष्पाप, मोक्षरुप परमशांती देणारे, ब्रह्मदेव, महादेव व शेष यांनी निरंतर सेविलेले, वेदान्ताने जाणता येणारे, सर्वव्यापक, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेले, मायेमुळे मनुष्यरुपात दिसणारे, सर्व पापांचे हरण करणारे, करुणरची खाण, रघुकुळातील श्रेष्ठ व राजांमध्ये शिरोमणी असलेले आणि ज्यांना श्रीराम असे म्हटले जाते, अशा त्या जगदीश्वरांना मी वंदन करतो. ॥ १ ॥

नान्या स्पृहा रघुपते हृदयेऽस्मदीये

सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा ॥

भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गव निर्भरां मे

कामादिदोषरहितं कुरु मानसं च ॥ २ ॥

हे रघुनाथ, मी सत्य सांगतो आणि तुम्ही सर्वांचे अंतरात्मा असल्यामुळे सर्व जाणता की, माझ्यामनात कोणतीही इच्छा नाही. हे रघुकुलश्रेष्ठ, आपली प्रगाढ भक्ती मला द्या व माझे मन कामादी दोषांपासून रहित करा. ॥ २ ॥

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं

दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम् ।

सकलगुणनिधानं वानराणामधीशं

रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ॥ ३ ॥

अतुलनीय बळाचे धाम, सुमेरु सुवर्ण पर्वताप्रमाणे कांतियुक्त देहधारी, दैत्यरुप वनाचा नाश करण्यासाठीअग्निरुप, ज्ञानी पुरुषांमध्येअग्रगण्य, सर्व गुणांचे निधान, वानरांचा स्वामी आणि श्रीरघुनाथांचा आवडता भक्तअसलेल्या पवनपुत्र हनुमानाला मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥

जमवंत के बचन सुहाए । सुनि हनुमंत हृदय अति भाए ॥

तब लगि मोहि परिखेहु तुम्ह भाई । सहि दुख कंद मूल फल खाई ॥

जांबवंताचे सुंदर बोलणे हनुमानाला खूप आवडले. तो म्हणाला, ‘ मित्रा, तुम्ही सर्वजण दुःख सहन करुन कंद, मुळे व फळे खाऊन माझी तोपर्यंत वाट पाहा. ॥ १ ॥

जब लगि आवौं सीतहि देखी । होइहि काजु मोहि हरष बिसेषी ॥

यह कहि नाइ सबन्हि कहुँ माथा । चलेउ हरषि हियँ धरि रघुनाथा ॥

जोपर्यंत मी सीतेला पाहून परत येत नाही. हे काम निश्चिपणे होणार, कारण मला मनातून फार आनंद वाटत आहे. ‘ असे म्हणून सर्वांना नमस्कार करीत व हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना धारण करुन हनुमान आनंदाने निघाला. ॥ २ ॥

सिंधु तीर एक भूधर सुंदर । कौतुक कूदि चढ़ेउ ता ऊपर ॥

बार बार रघुबीर सँभारी । तरकेउ पवनतनय बल भारी ॥

समुद्रकाठी एक पर्वत होता. हनुमान मजेने उडी मारुन त्यावर चढला आणि वारंवार श्रीरामांचे स्मरण करीत अत्यंत बलवान असलेल्या हनुमानाने त्या पर्वतावरुन मोठ्या वेगाने उड्डाण केले. ॥ ३ ॥

जेहिं गिरि चरन देइ हनुमंता । चलेउ सो गा पाताल तुरंता ॥

जिमि अमोघ रघुपति कर बाना । एही भॉंति चलेउ हनुमाना ॥

हनुमानाने ज्या पर्वतावरुन उडी घेतली, तो पर्वत तत्काळ खचून पाताळात गेला. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण वेगाने जावा, त्याप्रमाणे हनुमान वेगाने निघाला. ॥ ४ ॥

जलनिधि रघुपति दूत बिचारी । तैं मैनाक होहि श्रमहारी ॥

हनुमान हा रघुनाथांचा दूत आहे, असे समजून समुद्र मैनाक पर्वताला म्हणाला, ‘ हे मैनाका, तू याचा श्रम-परिहार कर.’ ॥ ५ ॥    

दोहा—हनूमान तेहि परसा कर पुनि कीन्ह प्रनाम ।

राम काजु कीन्हें बिनु मोहि कहॉं बिश्राम ॥ १ ॥

हनुमानाने त्याला स्पर्श करुन प्रणाम केला आणि म्हटले, ‘ प्रभू श्रीरामांचे काम केल्याविना मला विश्रांती कुठली ? ‘ ॥ १ ॥

जात पवनसुत देवन्ह देखा । जानैं कहुँ बल बुद्धि बिसेषा ॥

सुरस नाम अहिन्ह कै माता । पठइन्हि आइ कही तेहिं बाता ॥

पवनकुमार जात असल्याचे देवांना दिसले. त्यांनी त्याच्या बल व बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी सर्पांची आई सुरसा हिला पाठविले. ती येऊन हनुमानाला म्हणाली, ॥ १ ॥

आजु सुरन्ह मोहि दीन्ह अहारा । सुनत बचन कह पवनकुमरा ॥

राम काजु करि फिरी मैं आवौं । सीता कइ सुधि प्रभुहि सुनावौं ॥

‘ आज देवांनी मला तुझ्या रुपाने भोजन दिले आहे. ‘ हे ऐकून हनुमान म्हणाला, ‘ श्रीरामांचे कार्य पूर्ण करुन मी परत येईन व सीतेची वार्ता प्रभूंना सांगेन, ॥ २ ॥

तब तव बदन पैठिहउँ आई । सत्य कहउँ मोहि जान दे माई ॥

कवनेहुँ जतन देइ नहिं जाना । ग्रससि न मोहि कहेउ हनुमाना ॥

मग मी तुझ्या तोंडात शिरेन, तेव्हा तू मला खा. हे माते ! सत्य सांगतो. आता मला जाऊ दे. ‘ काही केल्या सुरसेने त्याला जाऊ दिले नाही, तेव्हा तो म्हणाला, ‘ मला खाऊन का टाकीत नाहीस ? ‘ ॥ ३ ॥

जोजन भरि तेहिं बदनु पसारा । कपि तनु कीन्ह दुगुन बिस्तारा ॥

सोरह जोजन मुख तेहिं ठयऊ । तुरत पवनसुत बत्तिस भयऊ ॥

तिने आपले तोंड एक योजनाएवढे पसरले. तेव्हा हनुमंताने आपले शरीर त्याच्या दुप्पट मोठे केले. तिने सोळा योजनांएवढे मोठे तोंड पसरले, तेव्हा हनुमान तत्काळ बत्तीस योजनांएवढा मोठा झाला. ॥ ४ ॥

जस जस सुरसा बदनु बढ़ावा । तासु दून कपि रुप देखावा ॥

सत जोजन तेहिं आनन कीन्हा । अति लघु रुप पवनसुत लीन्हा ॥

सुरसा आपले तोंड जसजसे मोठे करीत होती, तसतसे हनुमानही त्याच्या दुप्पट आपले रुप दाखवीत होता. जेव्हा तिने आपले तोंड शंभर योजने मोठे केले, तेव्हा हनुमानाने ताबडतोब अत्यंत छोटे रुप घेतले. ॥ ५ ॥

बदन पइठि पुनि बाहेर आवा । मागा बिदा ताहि सिरु नावा ॥

मोहि सुरन्ह जेहि लागि पठावा । बुधि बल मरमु तोर मैं पावा ॥

तो तिच्या तोंडात शिरुन पटकन बाहेर आला आणि त्याने

 नमस्कार करुन निरोप मागितला. तेव्हा ती म्हणाली, ‘

 देवांनी ज्यासाठी मला पाठविले होते, ते तुझ्या बुद्धि-

सामर्थ्याचे रहस्य मला समजले. ‘ ॥ ६ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment