Monday, November 14, 2022

SunderKanda Part 10 Doha 25 to Doha 27 सुंदरकाण्ड भाग १० दोहा २५ ते दोहा २७

 

SunderKanda Part 10 
ShriRamCharitManas 
Doha 25 to Doha 27 
सुंदरकाण्ड भाग १० 
श्रीरामचरितमानस 
दोहा २५ ते दोहा २७

दोहा—हरि प्रेरित तेहि अवसर चले मरुत उनचास ।

अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि लाग अकास ॥ २५ ॥

त्यावेळी भगवंतांच्या प्रेरणेने एकोणपन्नासही वारे वाहू लागले. हनुमानाने खदखदा हसून गर्जना केली आणि आकार वाढवून तो आकाशाला टेकला. ॥ २५ ॥

देह बिसाल परम हरुआई । मंदिर तें मंदिर चढ़ धाई ॥

जरइ नगर भा लोग बिहाला । झटपट लपट बहु कोटि कराला ॥

देह मोठा विशाल, पण फारच चपळ होता. तो धावत-धावत एका महालावरुन दुसर्‍या महालावर चढत होता. नगर जळू लागले, लोकांचे हाल होऊ लागले. आगीच्या कोट्यावधी भयंकर ज्वाळा अंगावर येऊ लागल्या. ॥ १ ॥

तात मातु हा सुनिअ पुकारा । एहिं अवसर को हमहि उबारा ॥

हम जो कहा यह कपि नहिं होई । बानर रुप धरें सुर कोई ॥

‘ अरे बाप रे, अग आई, यावेळी आम्हांला कोण वाचवणार ?’ चोहीकडे असाच ओरडा ऐकू येत होता. ‘  आम्ही पूर्वीच सांगितले होते की हा वानर नसून वानराचे रुप घेतलेला कुणी देव आहे. ॥ २ ॥

साधु अवग्या कर फलु ऐसा । जरइ नगर अनाथ कर जैसा ॥

जारा नगरु निमिष एक माहीं । एक बिभीषन कर गृह नाहीं ॥

साधूच्या अपमानाचे असेच फळ असते. नगर अनाथांच्या नगराप्रमाणें जळत आहे. ‘ हनुमानाने एकाच क्षणात संपूर्ण नगर जाळून टाकले.  फक्त बिभीषणाचे घर जाळले नाही. ॥ ३ ॥

ता कर दूत अनल जेहिं सिरिजा । जरा न सो तेहि कारन गिरिजा ॥

उलटि पलटि लंका सब जारी । कूदि परा पुनि सिंधु मझारी ॥

शिव म्हणतात, ‘ हे पार्वती, ज्यांनी अग्नी निर्माण केला, त्यांचाच दूत हनुमान आहे. म्हणून तो अग्नीमुळे भाजला नाही. हनुमानाने आलटून-पालटून सर्व लंका जाळून टाकली. मग त्याने समुद्रात उडी घेतली. ॥ ४ ॥   -

दोहा—पूँछ बुझाड खोइ श्रम धरि लघु रुप बहोरि ।

जनकसुता कें आगें ठाढ़ भयउ कर जोरि ॥ २६ ॥

शेपूट विझवून, श्रमपरिहार करुन मग लहान रुप घेतले व हनुमान जानकीपुढे हात जोडून उभा राहिला. ॥ २६ ॥

मातु मोहि दीजे कछु चीन्हा । जैसें रघुनायक मोहि दीन्हा ॥

चूड़ामनि उतारि तब दयऊ । हरष समेत पवनसुत लयऊ ॥

हनुमान म्हणाला, ‘ हे माते, रघुनाथांनी जशी मला खूण दिली होती, तशी ओळखीची वस्तु मला दे.’ तेव्हा सीतेने केसातून चूडामणी काढून दिला. हनुमानाने मोठ्या आनंदाने तो घेतला. ॥ १ ॥

कहेहु तात अस मोर प्रनामा । सब प्रकार प्रभु पूरनकामा ॥

दीन दयाल बिरिदु संभारी । हरहु नाथ मम संकट भारी ॥

जानकी म्हणाली, ‘ हे वत्सा ! प्रभूंना माझा प्रणाम निवेदन कर व असे सांग की, हे प्रभू, जरी तुम्ही सर्वप्रकारे पूर्णकाम आहात, तरी दीन-दुःखी लोकांवर दया करणे हे तुमचे ब्रीद आहे. मी दीन आहे, म्हणून ते ब्रीद आठवून हे नाथ, माझ्यावरील हे मोठे संकट दूर करा. ॥ २ ॥

तात सक्रसुत कथा सुनएहु । बान प्रताप प्रभुहि समुझाएहु ॥

मास दिवस महुँ नाथु न आवा । तौ पुनि मोहि जिअत नहिं पावा ॥

हनुमंता ! इंद्रपुत्र जयंताची घटना सांगून प्रभूंना आपल्या बाणाच्या प्रतापाची आठवण करुन दे. जर महिन्याभरात नाथ आले नाहीत, तर मग मी जिवंत सापडणार नाही. ॥ ३ ॥

कहु कपि केहि बिधि राखौं प्राना । तुम्हहू तात कहत अब जाना ॥

तोहि देखि सीतलि भइ छाती । पुनि मो कहुँ सोइ दिनु सो राती ॥

हे हनुमाना, मी आपला प्राण कसा ठेवू ? तूही आता जातो असे म्हणतोस. तुला पाहून मनाला शांतता लाभली होती. मला आता तेच दुःखाचे दिवस व रात्र. ‘ ॥ ४ ॥

दोहा—जनकसुतहि समुझाइ करि बहु बिधि धीरजु दीन्ह ।

चरन कमल सिरु नाइ कपि गवनु राम पहिं कीन्ह ॥ २७ ॥

हनुमानाने जानकीला समजावून धीर दिला आणि तिच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन तो श्रीरामांच्याकडे निघाला. ॥ २७ ॥

चलत महाधुनि गर्जेसि भारी । गर्भ स्रवहिं सुनि निसिचर नारी ॥

नाघि सिंधु एहि पारहि आवा । सबद किलिकिला कपिन्ह सुनावा ॥

जाताना त्याने प्रचंड गर्जना केली, ती ऐकून राक्षसी गर्भगळित झाल्या. समुद्र ओलांडून तो पलीकडच्या तीरावा पोहोचला. त्याने वानरांना हर्षध्वनी ऐकविला. ॥ १ ॥

हरषे सब बिलोकि हनुमाना । नूतन जन्म कपिन्ह तब जाना ॥

मुख प्रसन्न तन तेज बिराजा । कीन्हेसि रामचंद्र कर काजा ॥

हनुमानाला पाहून सर्वजण हर्षभरित झाले आणि तेव्हा वानरांना जणू नवा जन्म मिळाला. हनुमानाचे मुख प्रसन्न होते आणि शरीर सतेज होते. त्यामुळे त्यांना समजले की, याने श्रीरामचंद्रांचे काम पूर्ण केले आहे. ॥ २ ॥

मिले सकल अति भए सुखारी । तलफत मीन पाव जिमि बारी ॥

चले हरषि रघुनायक पासा । पूँछत कहत नवल इतिहासा ॥

सर्वजण हनुमानाला भेटले आणि सर्वांना समाधान झाले, जणू तडफडणार्‍या माशांना पाणी मिळाले. सर्वजण नवीन वृत्तांत विचारत-सांगत श्रीरघुनाथांच्या जवळ गेले. ॥ ३ ॥

तब मधुबन भीतर सब आए । अंगद संमत मधु फल खाए ॥

रखवारे जब बरजन लागे । मुष्टि प्रहार हनत सब भागे ॥

मग सर्वजण मधुवनात गेले आणि अंगदाच्या अनुमतीने

 त्या सर्वांनी मध व फळे खाल्ली. जेव्हा रखवालदार

 त्यांना मनाई करु लागले, तेव्हा ठोसे मारताच ते पळून

 गेले. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment