ShriRamCharitManas
दोहा—महिसुर मंत्री मातु
गुर गने लोग लिए साथ ।
पावन आश्रम गवनु किय भरत
लखन रघुनाथ ॥ २४५ ॥
ब्राह्मण, मंत्री,
माता, गुरु इत्यादी निवडक लोकांना घेऊन भरत, लक्ष्मण व श्रीराम हे पवित्र
आश्रमाकडे निघाले.॥ २४५ ॥
सीय आइ मुनिबर पग लागी ।
उचित असीस लही मन मागी ॥
गुरपतिनिहि मुनितियन्ह
समेता । मिली पेमु कहि जाइ न जेता ॥
सीतेने येऊन
मुनिश्रेष्ठ वसिष्ठांचे चरण धरले आणि मनोवांछित आशीर्वाद प्राप्त केला. नंतर ती
मुनींच्या पत्नी व गुरुपत्नी अरुंधतीला भेटली. त्यांच्या मनात जे प्रेम होते, ते
सांगणे कठीण. ॥ १ ॥
बंदि बंदि पग सिय सबही के ।
आसिरबचन लहे प्रिय जी के ॥
सासु सकल जब सीयँ निहारीं ।
मूदे नयन सहमि सुकुमारीं ॥
सीतेने सर्वांच्या
चरणांना वेगवेगळे वंदन केले आणि आपल्याला मनोनुकूल असे आशीर्वाद प्राप्त केले.
जेव्हा सुकुमार सीतेने आपल्या सासूंना पाहिले, तेव्हा तिने घाबरुन आपले डोळे बंद करुन
घेतले. ॥ २ ॥
परीं बधिक बस मनहुँ मरालीं
। काह कीन्ह करतार कुचालीं ॥
तिन्ह सिय निरखि निपट दुखु
पावा । सो सबु सहिअ जो दैउ सहावा ॥
आपल्या सासूंची वाईट
दशा पाहून सीतेला असे वाटले की, जणू राजहंसी शिकार्याच्या तावडीत सापडल्या आहेत.
तिला वाटले की, दुष्ट विधात्याने हे काय केले ? सीतेला पाहून त्यानांही फार वाईट
वाटले. त्यांनी विचार केला की, दैव जे काही सोसायला लावते, ते सोसावेच लागते. ॥ ३
॥‘
जनकसुता तब उर धरि धीरा ।
नील नलिन लोयन भरि नीरा ॥
मिली सकल सासुन्ह सिय जाई ।
तेहि अवसर करुना महि छाई ॥
मग जानकी मन आवरुन,
आपल्या नीलकमलांसारख्या नेत्रांमध्ये पाणी आणून सर्व सासूंना जाऊन भेटली. त्यावेळी
चहूकडे करुणरस पसरला. ॥ ४ ॥
दोहा—लागि लागि पग सबनि सिय
भेंटति अति अनुराग ।
हृदयँ असीसहिं पेम बस
रहिअहु भरी सोहाग ॥ २४६ ॥
सीता सर्वांच्या पायी लागून
अत्यंत प्रेमाने त्यांना भेटत होती आणि त्या सर्व सासवा स्नेहपूर्ण मनाने आशीर्वाद
देत होत्या की, “ तुझे सौभाग्य अखंड राहो. “ ॥ २४६ ॥
बिकल सनेहँ सीय सब रानीं ।
बैठन सबहि कहेउ गुर ग्यानीं ॥
कहि जग गति मायिक मुनिनाथा
। कहे कछुक परमारथ गाथा ॥
सीता व सर्व राण्या
स्नेहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. मग ज्ञानी गुरुंनी सर्वांना बसण्यास सांगितले.
नंतर मुनिवर्य वसिष्ठांनी जगाची गती मायिक आहे, असे म्हणून काही पारमार्थिक गोष्टी
सांगितल्या. ॥ १ ॥
नृप कर सुरपुर गवनु सुनावा
। सुनि रघुनाथ दुसह दुखु पावा ॥
मरन हेतु निज नेहु बिचारी ।
भे अति बिकल धीर धुर धारी ॥
मग वसिष्ठांनी, राजा
दशरथांनी स्वर्गलोकी प्रयाण केल्याचे सांगितले. ते ऐकून श्रीराम ‘ हाय बाबा ! ‘
असे म्हणून अत्यंत शोकाकुल झाले. आपल्यावरील प्रेमामुळे त्यांना मरण आले, या
विचाराने श्रीरामचंद्र अत्यंत व्याकूळ झाले. ॥ २ ॥
कुलिस कठोर सुनत कटु बानी ।
बिलपत लखन सीय सब रानी ॥
सोक बिकल अति सकल समाजू ।
मानहुँ राजु अकाजेउ आजू ॥
ती वज्रासारखी कठोर व
कटू वाणी ऐकून लक्ष्मण, सीता व सर्व राण्या विलाप करु लागल्या. सारा समाज शोकाने
फार व्याकूळ झाला. जणू राजा नुकताच गेला असावा. ॥ ३ ॥
मुनिबर बहुरि राम समुझाए ।
सहित समाज सुसरित नहाए ॥
ब्रत निरंबु तेहि दिन प्रभु
कीन्हा । मुनिहु कहें जलु काहुँ न लीन्हा ॥
नंतर वसिष्ठांनी
श्रीरामांना समजावले. तेव्हा त्यांनी व सर्व समाजाने श्रेष्ठ नदी मंदाकिनीत जाऊन
स्नान केले. त्या दिवशी श्रीरामचंद्रांनी निर्जल व्रत केले. वसिष्ठ मुनींनी
सांगितले, तरी त्यांनी पाणीही ग्रहण केले नाही. ॥ ४ ॥
दोहा—भोरु भएँ रघुनंदनहि जो
मुनि आयसु दीन्ह ।
श्रद्धा भगति समेत प्रभु सो सबु सादरु कीन्ह ॥ २४७ ॥
दुसर्या दिवशी सकाळ झाल्यावर श्रीरघुनाथांना वसिष्ठांनी जी
जी सांगितली, ती ती सर्व धार्मिक कार्ये प्रभूंनी श्रद्धेने व भक्तीने पूर्ण केली.
॥ २४७ ॥
करि पितु क्रिया बेद जसि बरनी । भे पुनीत पातक तम तरनी ॥
जासु नाम पावक अघ तूला । सुमिरत सकल सुमंगल मूला ॥
वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पित्याची क्रिया-कर्मे करुन
पापरुप अंधकार नष्ट करणारे सूर्यरुप श्रीरामचंद्र शुद्ध झाले. ज्यांचे नाम पापरुपी
कापसाला लगेच जाळून टाकणारा अग्नी आहे आणि ज्यांचे स्मरण हे सर्व मांगल्याचे मूळ
आहे, ॥ १ ॥
सुद्ध सो भयउ साधु संमतअस । तीरथ आवाहन सुरसरि जस ॥
सुद्ध भएँ दुइ बासर बीते । बोले गुर सन राम पिरीते ॥
ते नित्य शुद्ध बुद्ध भगवान श्रीराम शुद्ध झाले. साधूंच्या
मते त्यांनी शुद्ध होणे म्हणजे तीर्थांचे आवाहन केल्याने ‘ गंगा ‘ शुद्ध
होण्यासारखे आहे. शुद्ध होऊन दोन दिवस उलटल्यावर श्रीराम प्रेमाने गुरुजींना
म्हणाले, ॥ २ ॥
नाथ लोग सब निपट दुखारी । कंद मूल फल अंबु अहारी ॥
सानुज भरतु सचिव सब माता । देखि मोहि पल जिमि जुग जाता ॥
‘ हे नाथ, इथे सर्वजणांना दुःख सोसावे लागत आहे. कंद, मुळे,
फळे व जल यांचाच आहार आहे. शत्रुघ्नासह भरत, मंत्री व सर्व मातांना येथे पाहाताना
मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. ॥ ३ ॥
सब समेत पुर धारिअ पाऊ । आपु इहाँ अमरावति राऊ ॥
बहुत कहेउँ सब कियउँ ढिठाई । उचित होइ तस करिअ गोसाँई ॥
म्हणून तुम्ही सर्वांबरोबर अयोध्येला परत जा. तुम्ही येथे
आहात व राजे स्वर्गात आहेत. त्यामुळे अयोध्या ओसाड झाली आहे. मी जास्त बोललो, हे
माझे धारिष्ट्य आहे. हे गुरुवर्य ! जे योग्य असेल तेच आपण करा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—धर्म सेतु करुनायतन कस न कहहु अस राम ।
लोग दुखित दिन दुइ दरस देखि लहहुँ बिश्राम ॥ २४८ ॥
वसिष्ठ म्हणाले, ‘ हे राम, तुम्ही धर्माचे सेतु व दयेचे धाम
आहात, मग असे का सांगणार नाही ? या दुःखी दीनांना दोन दिवस तुमचे दर्शन घेऊन
त्यांना शांती लाभू दे. ‘ ॥ २४८ ॥
राम बचन सुनि सभय समाजू । जनुजलनिधि महुँ बिकल जहाजू ॥
सुनि गुर गिरा सुमंगल मूला । भयउ मनहुँ मारुत अनुकूला ॥
श्रीरामांचे बोलणे ऐकून सर्व लोक घाबरले. समुद्रामध्ये जहाज
हेलकावू लागते, त्याप्रमाणे. परंतु जेव्हा त्यांनी वसिष्ठांचे बोलणे ऐकले, तेव्हा
त्या जहाजाला जणू अनुकूल वारे मिळाले.॥ १ ॥
पावन पयँ तिहुँ काल नहाहीं । जो बिलोकि अघ ओघ नसाहीं ॥
मंगलमूरति लोचन भरि भरि । निरखहिं हरषि दंडवत करि करि ॥
सर्व लोक जिच्या दर्शनाने पापांच्या राशी नाहीशा होतात, अशा
पवित्र पयस्विनी नदीत त्रिकाल स्नान करीत होते आणि मंगलमूर्ती श्रीरामचंद्रांना
दंडवत घालून प्रणाम करुन त्यांना डोळे भरुन पाहात होते. ॥ २ ॥
राम सैल बन देखन जाहीं । जहँ सुख सकल सकल दुख नाहीं ॥
झरना झरहिं सुधासम बारी । त्रिबिध तापहर त्रिबिध बयारी ॥
सर्वजण श्रीरामांचा कामदगिरी पर्वत व वन पाहण्यास जात. तिथे
सर्व
सुखे होती व सर्व दुःखांचा अभाव होता. झरे अमृतासारखे गोड
पाणी घेऊन वाहात होते आणि शीतल, मंद, सुगंधित हवा आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक
अशा त्रितापांचे हरण करीत होती. ॥ ३ ॥
बिटप बेलि तृन अगनित जाती । फल प्रसून पल्लव बहु भॉंती ॥
सुंदर सिला सुखद तरु छाहीं । जाइ बरनि बन छबि केहि पाहीं ॥
तेथे असंख्य जातीचे वृक्ष, वेजी व गवत होते आणि अनेक
प्रकारची फळे, फुले, पाने होती. सुंदर शिळा होत्या. वृक्षांची सुखद सावली होती.
त्या वनाची शोभा कोण वर्णन करु शकेल ? ॥ ४ ॥
दोहा—सरनि सरोरह जल बिहग कूजत गुंजत भृगं ।
बैर बिगत बिहरत बिपिन मृग बिहंग बहुरंग ॥ २४९ ॥
तलावांमधून कमळे उमललेली होती, पाण्यात राहणारे पक्षी कूजन
करीत होते, भ्रमर गुंजारव करीत होते आणि अनेक रंगांचे पक्षी आणि पशू परस्पर वैरभाव
सोडून वनात विहार करीत होते. ॥ २४९ ॥
कोल किरात भिल्ल बनबासी । मधु सुचि सुंदर स्वादु सुधा सी ॥
भरि भरि परन पुटीं रचि रुरी । कंद मूल फल अंकुर जूरी ॥
कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोक
सुंदर द्रोण बनवून त्यांतून अमृतासारखा स्वादिष्ट मध भरभरुन आणत होते आणि कंदमूळे,
फळे आणि अंकुर यांचे ढीग आणत होते. ॥ १ ॥
सबहि देहिं करि बिनय
प्रनामा । कहि कहि स्वाद भेद गुन नामा ॥
देहिं लोग बहु मोल न लेहीं । फेरत राम दोहाई देहीं ॥
मग सर्वांना विनवणी व प्रणाम करुन त्या वस्तूंचे निरनिराळे
स्वाद, प्रकार, गुण व नावे सांगसांगून देत. लोक त्याचे पुष्कळ मूल्य देत, परंतु ते
घेत नसत. परत करीत व श्रीरामांची शपथ घालीत. ॥ २ ॥
कहहिं सनेह मगन मृदु बानी । मानत साधु पेम पहिचानी ॥
तुम्ह सुकृती हम नीच निषादा । पावा दरसनु राम प्रसादा ॥
प्रेम-मग्न होऊन ते कोमल वाणीने म्हणत, ‘ साधू लोक प्रेम
ओळखून त्याचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे आहात, आम्ही हलके निषाद आहोत.
श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हांला तुमचे दर्शन घडले. ॥ ३ ॥
हमहि अगम अति दरसु तुम्हारा । जस मरु धरनि देवधुनि धारा ॥
राम कृपाल निषाद नेवाजा । परिजन प्रजउ चहिअ जस राजा ॥
ज्याप्रमाणे मरुभूमीमध्ये गंगेचे दर्शन होणे दुर्लभ आहे,
त्याप्रमाणे आम्हा लोकांना तुमचे दर्शन दुर्लभ आहे. पाहा, श्रीरामांनी निषादांवर
कशी कृपा केली आहे. जसा राजा असतो, त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच असले
पाहिजे, ॥ ४ ॥
दोहा—यह जियँ जानि सँकोचु तजि करिअ छोहु लखि नेहु ।
हमहि कृतारथ करन लगि फल तृन अंकुर लेहु ॥ २५० ॥
असे मनात समजून, संकोच सोडून आणि आमचे प्रेम पाहून कृपा करा
आणि आम्हांला कृतार्थ करण्यासाठी ही फळे, तृण व अंकुर घ्या. ॥ २५० ॥
तुम्ह प्रिय पाहुने बन पगु धारे । सेवा जोगु न भाग हमारे ॥
देब काह हम तुम्हहि गोसॉंई । ईंधनु पात किरात मिताई ॥
तुम्ही प्रिय पाहुणे
म्हणून वनात आला आहात. तुमची सेवा करण्याजोगे आमचे भाग्य नाही. हे स्वामी, आम्ही
तुम्हांला काय देणार ? भिल्लांची मैत्री फक्त सर्पण व पानांशी असते. ॥ १ ॥
यह हमारि अति बड़ि सेवकाई । लेहिं
न बासन बसन चोराई ॥
हम जड़ जीव जीव गन घाती ।
कुटिल कुचाली कुमति कुजाती ॥
आम्ही तुमचे कपडे,
भांडी चोरत नाही, हीच आमची मोठी सेवा होय. आम्ही अज्ञानी जीव आहोत. प्राण्यांची
हिंसा करणारे आहोत, कुटिल, दुष्ट चालीचे, दुर्बद्धीचे आणि हलक्या जातीचे आहोत. ॥ २
॥‘
पाप करत निसि बासर जाहीं ।
नहिं पट कटि नहिं पेट अघाहीं ॥
सपनेहुँ धरमबुद्धि कस काउ ।
यह रघुनंदन दरस प्रभाऊ ॥
आमचे दिवस व रात्री हे
पाप करणयातच जातात. तरीही आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आपले पोटही भरु शकत
नाही. मग स्वप्नातही कधी धर्मबुद्धी आम्हांला कशा येणार ? हा सर्व श्रीरघुनाथांचा
दर्शनाचा प्रभाव आहे. ॥ ३ ॥
जब तें प्रभु पद पदुम
निहारे । मिटे दुसह दुख दोष हमारे ॥
बचन सुनत पुरजन अनुरागे ।
तिन्ह के भाग सराहन लागे ॥
प्रभूंचे चरण-कमल जेव्हापासून पाहातो, तेव्हापासून आमची असह्य दुःखे व पापे नाहीशी झाली आहेत. ‘ वनवासींचे ते बोलणे ऐकून अयोध्येच्या लोकांचे मन प्रेमाने भरुन आले आणि ते त्या वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करु लागले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment