There are many Stotras in this blog of many Gods. Stotra is a blog for the people who have faith in God. If your are reading a devi stotra then for having more devi storas please click on Title.It's a link. If you recite any of the stotras you like, then results will be good and make your life happy and prosperous.I myself have experienced it and there are many people like me.The stotra is to be recited with full concentration daily.
Showing posts with label Goddess Lakshmi. Show all posts
Showing posts with label Goddess Lakshmi. Show all posts
Hence I am uploading Lakshmya Dhyanam for the worship
of Dhan, (Money and Money means Goddess Lakshmi) on Dhantrayodashi.
Lakshmi Dhyanam is in Sanskrit. It is from
Brahmavaivart purana, Prakruti Khanda.
Bhagavati Lakshmi is standing on a pink Lotus
which has got thousand petals. Her sari is so beautiful that it is shining like
thousands of Moon on full moon night in Sharad Rutu. She has got her own
brightness. My mind is dancing with joy by looking at pleasant appearance of
Goddess. Her body is appearing yellowish bright as hot gold. Ornaments on her
body are making her more beautiful. She has worn a yellow sari. Goddess Lakshmi
is looking very pleasant with her smiling face. She looks always young and
rich. Goddess Lakshmi gives all type of wealth to her devotees. I am worshiping
Goddess Lakshmi.
लक्ष्म्या ध्यानम्
सहस्त्रदलपद्मस्य कर्णिकावासिनीं पराम् ।
शरत्पार्वणकोटीन्दुप्रभाजुष्टवराम्बराम् ॥ १ ॥
स्वतेजसा प्रज्वलन्तीं सुखदृश्यां मनोहराम् ।
प्रतप्तकाञ्चननिभां शोभां मूर्तिमतीं सतीम् ॥ २ ॥
रत्नभूषणभूषाढ्यां शोभितां पीतवाससा ।
ईषद्धास्यप्रसन्नास्यां शश्र्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ ३ ॥
लक्ष्म्या ध्यानम् चा मराठी अर्थ परम पूज्य भगवती महालक्ष्मी सहस्र पाकळ्या असलेल्या कमल कर्णिकांवर विराजमान आहे. तीची सुंदर साडी शरद् ऋतूंतील पौर्णिमेच्या करोडो चंद्रांच्या प्रकाशाने शोभायमान झाली आहे. ही परम साध्वी देवी स्वतःच्या तेजाने प्रकाशित होत आहे. या परम मनोहर देवीच्या दर्शनाने मन आनंदाने प्रफुल्लीत होत आहे. हीची अंगकांती तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसत आहे. मढविलेल्या रत्नांनी हीचे सौन्दर्यांत भर पडली आहे. तीने पीतांबर नेसले आहे. या प्रसन्न चेहर्याच्या भगवती महालक्ष्मीच्या चेहर्यावर हास्य उमलेले आहे. ही नेहमी युवावस्थेंत संपन्न दिसते. ही सर्व प्रकारची संपत्ती देते. अशा
कल्याणस्वरूप असलेल्या भगवती महालक्ष्मीची मी उपासना करतो.
This is a very beautiful stotra of Goddess Lakshmi. It is created by Param Poojya Adi Shankaracharya. It is in Sanskrit and it is a praise of Goddess Lakshmi. We know that Adi Shankaracharya was sanyasi. He has nothing to ask for himself from Goddess Lakshmi. This stotra was created by him for the people who were very poor. They can’t afford to purchase even food. Adi Shankaracharya was very much moved when he saw such poverty and he created this beautiful KanakaDhara Stotra. It may be a myth but it is said that after completion and listening of this stotra, Goddess Lakshmi poured a shower of Gold coins.
We know that in India when we praise a person in front of his wife, Wife becomes very pleased. The same way Adi in this stotra first praised God Vishnu with all his names Narayan, Mukund, Keshav, Hari, Madhusudan and by many other names.
He also is calling Goddess Lakshmi as Vakdevata, Shakambhari, Parvati and Lakshmi. He is also saying that Goddess is ShrutiRupa, RatiRupa, Shaktiswarupa and Purushottam priya Pushti.
Finally he says that “I bow to Kamala who is having a beautiful face like a beautiful lotus. I bow to Shri Devi who is a daughter of an Ocean or who is came out of an Ocean. I bow to the sister of Moon and Sudha. I bow to the wife of Bhagwan Narayan.”
He further says that when we worship Goddess Lakshmi, we receive her blessings which fulfill our desires, we become wealthy. Hence he worship Goddess Lakshmi with his mind, words (Praise) and body.
He says to Goddess that you are looking very beautiful. You have worn a very nice saree, Chandan and Garlands of beautiful flowers.
Whosoever the devotee of the Goddess praises Goddess Lakshmi by this stotra every day becomes very fortunate and famous by the blessings of Goddess Lakshmi.
The above is not a stanza to stanza translation of KanakaDhara Stotra which is not so easy for me but I have tried to explain as per my limited knowledge of Sanskrit.
१) ज्याप्रमाणे भुंगे अर्धोन्मिलीत फुलांनी बहरलेल्या तमाल वृक्षाचा आसरा घेतात, त्याचप्रमाणे श्रीहरीच्या रोमांच्यानी सुशोभित अंगावर जी नेहमी पहुडलेली असते, तसेच जिच्यामध्ये संपूर्ण ऐश्वर्याचा निवास आहे, त्या सर्व मंगल करणार्या अधिष्ठात्री भगवती महालक्ष्मीचा कृपाकटाक्ष माझे मंगल करो. २) ज्याप्रमाणे भुंगे येजा करुन कमलदलावर सारखे भ्रमण करतात, त्याचप्रमाणे मुर राक्षसाचा शत्रु जो श्रीहरि त्याच्या मुखाकडे जी वारंवार जाते आणि लज्जेमुळे परत माघारी फिरते, त्या समुद्रकन्या लक्ष्मीची मनोहर मुग्ध दृष्टि माला धन, संपत्ती देवो. ३) जी देवतांचा अधिपती इंद्राच्या पदाचा वैभव विलास देण्यास समर्थ आहे, जी मुरारि श्रीहरिला अत्यंत आनंदित करणारी आहे आणि जी नीलकमलाच्या आंतील भागाप्रमाणे अत्यंत मनोहर दिसते, त्या लक्ष्मीची अर्धोन्मिलीत दृष्टि एकक्षणभर तरी माझ्यावर पडो. ४) शेषशायी भगवान श्रीविष्णुची धर्मपत्नी श्रीलक्ष्मीचा जो डोळा आनंदित श्रीमुकुन्दाला आपल्या निकट पाहुन तिरळा होतो तो डोळा मला ऐश्वर्य देणारा होवो. ५) भगवान मधुसुदनाच्या कौस्तुभमण्याने आच्छादिलेल्या वक्षःस्थळावर इंद्रनील मण्यांच्या हारा प्रमाणे शोभणार्या आणि त्याच्याही मनांत प्रेम जागवणार्या कमलकुंजवासिनी कमलाची कटाक्षमाला माझे कल्याण करो. ६) जशी काळ्यामेघांच्या दाटीमध्ये वीज चमकते, त्याचप्रमाणे जी कैटभशत्रु श्रीविष्णुच्या काळ्या ढगांप्रमाणे श्यामसुंदर वक्षःस्थलावर जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदी केले आहे आणि जी सर्व लोकांची माता आहे अशी भगवती लक्ष्मीची मूर्ती माझे कल्याण करो. ७) समुद्रकन्या कमलेची ती मंद, अस्थिर आणि अर्धोन्मिलीत दृष्टि की, जिच्या प्रभावाने कामदेवाने मंगलमयी भगवान मधुसुदनाच्या ह्रदयांत प्रथम प्रवेश केला ती माझ्यावर पडो. ८) भगवान नारायणाची प्रेयसी लक्ष्मीचा डोळेरुपी ढग दयेने भरलेल्या वार्याने प्रेरीत होऊन दुष्कर्मरुपी घामाला कायमचा हटवून विषादांत पडलेल्या माझ्यासारख्या दीनरुपी चातकावर धनरुपी जलधारांची वृष्टि करो. ९) काही विशिष्ट कुशाग्र बुद्धीची माणसे जीच्या प्रीतिस पात्र होऊन, जीच्या दयार्द दृष्टिच्या प्रभावाने स्वर्गपदासारखे पद सहज मिळवतात, त्या पद्मासना पद्माची कमलगर्भाप्रमाणे पुष्ट कांतीवान दृष्टि, माझी मनोवांछित पुष्टि मला देवो. १०)जी सृष्टि लीलेच्यावेळी वाग्देवता (ब्रह्मशक्ति)च्या रुपांत असते. जी पालनाचे कार्य करतांना भगवान गरुडध्वजाची पत्नी लक्ष्मी (वैष्णवी शक्ति)च्या रुपांत विराजमान असते. जी प्रलयकाळी शाकम्भरी (भगवती दुर्गा) किंवा चंद्रशेखराची पत्नी पार्वती (रुद्र शक्ति)च्या रुपांत असते. त्या त्रिभुवनांतील एकमात्र गुरु जो भगवान नारायण त्याची नित्ययौवना प्रेयसी श्रीलक्ष्मीला माझा नमस्कार. ११) माते, शुभकर्मांचे फळ देणार्या श्रुतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. रमणीय सिन्धुरुप रतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. कमलवनांत निवास करणार्या शक्तिस्वरुपा लक्ष्मीला मी नमस्कार करतो. तसेच पुरुषोत्तमप्रिया पुष्टिला मी नमस्कार करतो. १२) कमळासारखे मुख असलेल्या कमलेला मी नमस्कार करतो. क्षीरसागरांतून उत्पन्न झालेल्या देविला मी नमस्कार करतो. चंद्र आणि सुधा यांची सख्खी बहिण असलेलीला मी नमस्कार करतो. भगवान नारायणाच्या वल्लभेला मी नमस्कार करतो. १३) कमलासारखे डोळे असलेल्या आदरणीय माते, आपल्या चरणांवर नतमस्तक होऊन तुला केलेला नमस्कार, सर्व संपत्ती देणारा, सर्व इंद्रियांना आनंद देणारा, साम्राज्य देणारा आणि सर्व पापांचे हरण करण्यास सर्वथा समर्थ आहे. तसा नमस्कार करण्याचे भाग्य मलाच नेहमी प्राप्त होवो. १४) जीच्या कृपाकटाक्षासाठी केलेली उपासना उपासकाला त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करुन देणारी आणि त्याची संपत्ती वृद्धिंगत करणारी होते त्या श्रीहरिच्या ह्रदयेश्वरी लक्ष्मीदेवीचे मी मन, वाणी आणि शरीराने भजन, गुणगान करतो. १५) हे भगवती हरिप्रिये! तू कमलवनामध्ये निवास करणारी आहेस. तुझ्या हातांत लीलाकमल शोभून दिसत आहे. तू अतिशय सुंदर वस्त्र, गन्ध आणि माळांनी सुशोभित आहेस. तूझे रुप अत्यंत मनोरम दिसत आहे. हे त्रिभुवनाचे ऐश्वर्य देऊ शकणार्या देवि, माझ्यावर प्रसन्न हो. १६) दिग्गजांकडून सुवर्णकलशाच्या मुखांतून ओतलेल्या आकाशगंगेच्या निर्मळ आणि स्वच्छ, सुंदर पाण्याने ज्याच्या पवित्र अंगावर अभिषेक केला जातो, त्या सर्व लोकांच्या अधीश्वर भगवान श्रीविष्णुची गृहिणी आणि क्षीरसागराची कन्या अशा त्या जगज्जननी लक्ष्मीला मी प्रातःकाळी नमस्कार करतो. १७) हे कमलनयन असलेल्या केशवाच्या कमनीय कामिनी कमले, मी दरिद्री लोकांमध्ये अति दरिद्री आहे. त्यामुळे तुझ्या कृपेस नक्कीच पात्र आहे. तू करुणारुपी सागराच्या उसळणार्या लाटांप्रमाणे असलेल्या अशा तुझ्या दृष्टि कटाक्षाने माझ्याकडे बघ. १८) जे लोक अशाप्रकारे केलेल्या स्तुतिने प्रत्येक दिवशी वेदत्रयीस्वरुप आणि त्रिभुवनाची जननी भगवती लक्ष्मीची स्तुति करतात, ते या भूतलावर महान गुणवान आणि अत्यंत सौभाग्यशाली होतात. तसेच विद्वान लोकसुद्धा त्यांची मनोभावना जाणून घेण्याची ईच्छा करतात. अशा रीतीने श्री परम पूज्य आदिशंकराचार्यांनी केलेले हे कनकधारा स्तोत्र पुरे झाले.
Shri Mahalakshmi Aarti is a wonderful creation of Shri Mukteshvar Naagar Kshirasaagar. This Aarati is in Marathi. Aarti is also a praise of the God. This Aarti
is of Mahalakshmi hence it is a praise of Goddess Lakshmi. Shri Mukteshvar is telling O Goddess ! You are present everywhere and in every form. You live in Karavirpur. You give blessings to the devotees and you are wife of God Hari. In the last stanza Mukteshvar is telling Goddess that God Brahma had written my future on my forehead which may be bad; please wipe out my bad future and bless me with all good in my life.