DeviMahatmya Adhyay 6
DeviMahatmya Adhyay 6 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 6 which is in Sanskrit, very nicely done by Shri Rambaba Vernekar. Goddess Saraswati killed very dangerous demon Doomralochan. Doomralochan was with a very large army of dangerous demons but many were killed by Goddess and Lion.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (६) सहावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥
मेधा म्हणे सुरथासी । मार्कंडेय सांगे शिष्यासी ।
सूत सांगे शौनकासी । पुढील कथा श्रवण करा ॥ १ ॥
सिंहावलोकनेकरुन । पहा मागील अनुसंधान ।
महासरस्वतीनें प्रतिज्ञावचन । दूता सांगोन आज्ञापिले ॥ २ ॥
ऐकोनि देविच्या वाक्यासी । दूत क्रोधावला मानसीं ।
त्वरें येऊनि शुंभापाशीं । सांगता जाहला विस्तारें ॥ ३ ॥
म्हणे मी देवीपाशीं निश्र्चित । तुमचा महिमा वर्णिला बहुत ।
परी ती तुंम्हां नाहीं मानीत । युद्धावीण सर्वथा ॥ ४ ॥
ऐकोनि दूताचें वचन । दैत्यराज क्रोधावला दारुण ।
सेनापती धूम्रलोचन । यासी बोलता जाहला ॥ ५ ॥
शुंभ म्हणे धूम्रलोचना । घेऊनियां आपुली सेना ।
आणावी ती दुष्ट ललना । केशाकर्षणेंकरुनी ॥ ६ ॥
बळें टाका विव्हळ करुनी । तिचा पाठीराखा आलिया कोणी ।
त्यातेंही तत्काल वधावें शस्त्रांनी । देव अथवा गंधर्व ॥ ७ ॥
इंद्र अग्नि यम कुबेर । यक्ष किन्नर विद्याधर ।
पाठिराखा असेल साचार । तरी त्याचाही वध करावा ॥ ८ ॥
मेधा म्हणे सुरथालागून । ऐसा शुंभे आज्ञापिला जाण ।
तेव्हां तो धूम्रलोचन । त्वरेंकरुन निघाला ॥ ९ ॥
घेऊनि साठ सहस्त्र असुर । तो धूम्रलोचन महाक्रूर ।
हिमवंत पर्वत थोर । येता जाहला तयापरी ॥ १० ॥
पालाणोनि सर्व दळ । तो पर्वत वेढिला सकळ ।
तैं एकचि जाहला हलकल्लोळ । देव पाहती अंबरी ॥ ११ ॥
गुप्तरुपें तेथें राहून । इंद्रादि सर्व देवगण ।
जगदंबेचें कौतुक पूर्ण । पाहते जाहले ते काळीं ॥ १२ ॥
देवीसन्मुख धूम्रलोचन । येऊनि अट्टहास शब्द करुन ।
उच्चस्वरें देवीलागून । बोलतां जाहला तेधवां ॥ १३ ॥
म्हणे हो तूं लावण्यराशी । चालावें शुंभनिशुंभांपासीं ।
जरी प्रीतीनें तूं न येसी । तरी बळेंचि नेईन मी ॥ १४ ॥
केशाकर्षणेंकरुन । तूंते ओढूनि नेईन ।
आपुला स्वामी दाखवीन । तुजलागीं सुंदरी ॥ १५ ॥
तेव्हां जगदंबा बोले त्याला । दैत्येश्र्वरानें धाडिलें तुजला ।
बळवंत दिसतोसी भला । सैन्य घेऊनि आलासी ॥ १६ ॥
जरी बळेंकरुनि नेशील । तरी ही स्त्री काय करील ।
ऐसी चंडिका तये वेळ । ऋषि म्हणे बोलिली ॥ १७ ॥
ऐकोनि चंडिकेच्या बोला । धूम्रलोचन तेव्हां धांवला ।
तंव देवीनें भस्म केला । हुंकारमात्रेकरुनी ॥ १८ ॥
देवीच्या हुंकारेंकरुन । भस्म होतां धूम्रलोचन ।
असुरसैन्य कोपायमान । होतें जाहलें तें काळीं ॥ १९ ॥
साठ सहस्त्र असुर । भयंकर महाक्रूर ।
धांवते जाहले देवीवर । अट्टहासेंकरुनियां ॥ २० ॥
मारा मारा कोणी म्हणती । मेधाऐसी गर्जना करिती ।
कोणी वृक्ष पाषाण टाकिती । देवीवरी अतिक्रोधें ॥ २१ ॥
शस्त्रें टाकिते जाहले बहुत । देवीवरी असुर धांवत ।
यावरी चंडिका काय करीत । क्रोध पावूनि ते काळीं ॥ २२ ॥
धनुष्या जोडोनि तीव्र शर । निवारिला शस्त्रनिकर ।
वृक्ष पाषाण थोर थोर । छेदूनियां पाडिले ॥ २३ ॥
शक्तिपरशुपट्टीशांही । खंडविखंड करुनि सर्वही ।
असुरसैन्य पाडिलें पाहीं भूमीवरी तेधवां ॥ २४ ॥
तंव देवीवाहन अतुर्बळी । सिंह पिंजारी रोमावळी ।
गर्जना करुनि निराळीं । उरलियांतें मारीतसे ॥ २५ ॥
तेणें करप्रहारें देख । असुर मारिले कित्येक ।
पुच्छप्रहारें अनेक । मारुनि टाकिता जाहला ॥ २६ ॥
मुखें आणि वेगेंकरुन । तैसेचि अधरें घेतले प्राण ।
नखेंकरुनि उत्पाटण । करिता जाहला असुरांचे ॥ २७ ॥
मारुनि तलप्रहारासी । छेदिता होय असुरशिरांसी ।
छिन्नभिन्न अवयवांसी । करुनि रक्त प्राशीतसे ॥ २८ ॥
ऐसें सिंहाचें महाबळ । क्षया नेले असुर सकळ ।
हें श्रवण करोनि तत्काळ । शुंभ कोपातें पावला ॥ २९ ॥
देवीने वधिला धूम्रलोचन । केवळ हुंकारमात्रेकरुन ।
टाकिलें सर्व सैन्य मारुन । एकही क्षण न लागतां ॥ ३० ॥
ऐसें शुंभ-निशुंभीं ऐकूनी । क्रोधें संतप्त जाहले मनीं ।
रागें ओष्टपुटें चावूनी । विचार करिते जाहले ॥ ३१ ॥
चंड मुंड महाअसुर । त्यांते आज्ञापी शुंभासुर ।
तुम्ही सैन्य घेऊनि अपार । सिद्ध व्हावें आतांचि ॥ ३२ ॥
आणि हिमाचळीं जाऊन । देवीचे करा केषाकर्षण ।
ओढोनि आणावी बांधोन । मजपाशीं ये काळीं ॥ ३३ ॥
जरी युद्धाचे ठायीं जाण । तुम्हांसी संशय होईल पूर्ण ।
तरी त्याचि ठायी मारुन । टाकावी ही ममाज्ञा ॥ ३४ ॥
सर्वानीं शस्त्रास्त्रेंकरुनी । मारुनि टाकावी भवानी ।
माझा संशय कांहीं मनीं । धरुं नये सर्वथा ॥ ३५ ॥
करावें सिंहाचे हनन । जो असे देवीवाहन ।
तुम्ही सैन्यासहित जाण । देवी एकटी ते काय ॥ ३६ ॥
सिंहपशूचा बडिवार । कायसा तुम्हांहूनि थोर ।
तुम्ही देवादिकांसी अनिवार । क्षणें सिंह मारावा ॥ ३७ ॥
देवीसी मारिलिया स्पष्ट । सिंह वधिला असतां दुष्ट ।
आम्ही तुम्हांवरी संतुष्ट । होऊं हें जाणा निर्धारें ॥ ३८ ॥
ती धरिली अथवा मारिली तेथें । परी बांधोनि आणा तिज येथें ।
आम्ही पाहूं अंबिकेतें । कैसी स्त्री आहे ती ॥ ३९ ॥
धूम्रलोचन महावीर । हुंकारें मारिला जिनें सत्वर ।
तिचा देह कैसा दुर्धर । पाहूं आम्ही कौतुकें ॥ ४० ॥
श्रोती व्हावें सावधान । आतां पुढील अध्यायीं जाण ।
चंड-मुंडाचे हनन । तुम्हां सांगेन निर्धारे ॥ ४१ ॥
श्र्लोकश्र्लोकाचा अर्थ । येथें वर्णिला यथार्थ ।
श्रवण करितां होय स्वार्थ । सर्व पुरुषार्थ साधती ॥ ४२ ॥
तैसेचि भावें पठण करिता । सर्व सिद्धि होय तत्त्वतां ।
अंती पावे सायुज्यता । यासी संशय नसे पैं ॥ ४३ ॥
हें महासरस्वतीचें आख्यान । सुरथा सांगे मेधा ब्राह्मण ।
तीच कथा देवी आपण । राममुखे निरुपी ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये महासरस्वत्याख्याने षष्ठोऽध्यायः ॥
DeviMahatmya Adhyay 6
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (६) सहावा
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

Custom Search
No comments:
Post a Comment