ShivPanchakshari Mantra
शिवपंचाक्षरी मंत्र
शिवपंचाक्षरी मंत्र
शिवपंचाक्षरी मंत्र हा " ॐ नमः शिवाय " असा आहे.
जप कसा करावा.
मंत्रांतील सर्व बीजाक्षरे एका श्वासोच्छ्वासांत व्हायला पाहिजे. नंतर पुढील ॐ लगेच जोडून यावा. जप करतांना मध्येच उठायचे नाही. एकाच माळेवर
दुसरा जप करु नये. तसेच दोन मंत्र एकाच बैठकींत करु नये.
शिवपंचाक्षरी मंत्र जप कसा करावा.
ॐ श्रीगणेशाय नमः । ॐ अस्य श्रीशिवपंचाक्षरी मंत्रस्य वामदेव ऋषिः ।
पंक्तिछंदः । श्रीसांबसदाशिवो देवता । नं बीजं । मं शक्तिः । शिं कीलकं ।
श्रीसदाशिवप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।
अथ न्यासः
ॐ नं अंगुष्ठाभ्यां नमः । ॐ मं तर्जनीभ्यां नमः । ॐ शिं मध्यमाभ्यां नमः ।
ॐ वां अनामिकाभ्यां नमः । ॐ यं कनिष्ठिकाभ्यां नमः ।
ॐ नमः शिवाय करतलपृष्ठाभ्यां नमः ।
एवं हृदयादि
ॐ नं हृदयाय नमः । ॐ मं शिरसे स्वाहा । ॐ शिं शिखायै वौषट् ।
ॐ वां कवचाय हुं । ॐ यं नेत्रत्रयाय वौषट् । ॐ नमः शिवाय अस्त्राय फट् ।
अथ ध्यानम्
शान्तं पद्मासनस्थं शशिधरममलं पंचवक्त्रं त्रिनेत्रं ।
शूलं वज्रं च खड्गं परशु मृगवराभीति हस्तं प्रसन्नम् ।
नागं पाशं च घंटां प्रलयहुतवहं सांकुशं वामभागे ।
नानालंकारयुक्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि ॥ १ ॥
इति ध्यात्वा मानसोपचारैः संपूज्य ।
तद्यथा
१) अंगुष्ठकनिष्ठिकायोगे लं पृथव्यात्मनेपरमात्मने गंधतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने
श्रीसांबाय गंधं परिकल्पयामि ।
२) तर्जन्यंगुष्ठयोगे हं आकाशात्मने परमात्मने शब्दतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने श्रीसांबाय पुष्पं परिकल्पयामि ।
३) अंगुष्ठतर्जनीयोगे यं वाय्वात्मने परमात्मने स्पर्शतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने श्रीसांबाय धूपं परिकल्पयामि ।
४) अंगुष्ठमध्यमायोगे रं वश्यात्मने (रुपात्मने) परमात्मने रुपतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने श्रीसांबाय दीपं परिकल्पयामि ।
५) अंगुष्ठानामिकायोगे वं अमृतात्मने परमात्मने रसतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने श्रीसांबाय नैवेद्यं परिकल्पयामि ।
६) सर्वांगुलीभिः शं सर्वात्मने परमात्मने सर्वतन्मात्रप्रकृत्यानंदात्मने श्रीसांबसदाशिवाय मंत्रपुष्पाञ्जलिं परिकल्पयामि ।
इति पूजनं ॥
नंतर जप " ॐ नमः शिवाय " करावा.
पुनः पूर्वीप्रमाणे न्यासादि करुन जप समर्पण करावा.
खालील श्लोक म्हणावेत.
गुह्यातिगुह्यगोप्तात्वं गृहाणास्मत्कृतं जपं ।
सिद्धिर्भवतु मे देवत्वत्प्रसादान्महेश्वरम् ॥ १ ॥
यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु ।
न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम् ॥ २ ॥
नंतर गुरुंचे ध्यान करावे व नमस्कार करावा.
शिवपुराण आणि पंचाक्षरी व षडाक्षरी मंत्र:
शिवपुराणांत या मंत्राचे माहात्म्य वर्णिले आहे.
" नमः शिवाय " अथवा ॐ हे पल्लव लावून होणार्या षडाक्षरी मंत्राचे माहात्म्य शिवपुरानांत वर्णिले आहे.
कोणी कसा जप करावा.
ब्राह्मनांनी " ॐ नमः शिवाय "
द्विज व स्रियांनी नुसताच " नमः शिवाय "
तर द्विजेतरांनी " शिवाय नमः " असा जप करावा.
जपाची सुरवात कधी करावी:
गुरुमुखाने हा मंत्र घेतला तर फार उत्तम.
ह्या मंत्र जपाचा आरंभ
शुद्ध प्रतिपदेपासून करावा, व कृष्णचतुर्दशीस पूर्ण करावा. माघ व भाद्रपद हे महिने विशेष महत्वाचे व यांत केलेला जप विशेष फलदायक आहे.
जप करत असतांना साधकाने कसे वागावे:
जपात मध्ये बोलू नये.
मानसिक जप उत्तम, उपांशु मध्यम, व वाचिक हा कनिष्ठ जप समजतात.
जपाची माळ शंख, प्रवाळ, स्फटिक, मोती किंवा रुद्राक्षाची असावी.
माळेचे मणी जप करतानाआंगठा व तर्जनीने ओढावेत. कारण ते अनुक्रमे मोक्षदायक व शत्रुनाशक समजतात.
सूर्य, अग्नी, ब्राह्मण व वडिल यांच्याकडे पाठ करुन जप करु नये. कपडे घालून अगर अमंगळ अवस्थेंत, स्नान न करता, शोकावस्थेंत जप करु नये.
जप जमिनीवर बसून करु नये. मांडी घालून पवित्र जागी बसून जप करावा.
साधकाने जप काळांत एकच वेळेस मोजके जेवावे. जितेन्द्रिय असावे. मौन पाळावे. सदाशिवाचे चिंतन करीत असावे.
जप संख्या:
संकल्पित पंचाक्षरी मंत्राचा पाच लक्ष जप सांगितलेला आहे.
रोजचा जप:
ध्यानांतील मूर्ती, जप व आपले मन या तिघांचा अगदी एकलय व्हायला हवा. तसेच जप अगदी शुद्ध, स्पष्ट व स्वच्छ म्हणायला हवा. त्यांत मन एकाग्र व्हावे व जपाचा अर्थ ध्यानी यावा. असे सगळे जमवून रोज किमान १०८ वेळा तरी मंत्र जपावा. १०८ मध्यें १०० मणी जपाचे, पुढचे ८ हे अष्टदेवतांचे व मेरुमणी हा गणेशाचा असतो. तो ओलांडत नाहीत. रोज १०८ पेक्षा जास्त जप करतांना मेरु मणी आला की माळ फिरवून परत सुरवात करावी.
जप संपल्यावर माळ पवित्र जागी ठेवावी.
संकल्पित जप समाप्ती:
समाप्तीच्या दिवशी म्हणजे कृष्ण चतुर्दशीस स्नानसंध्या करावी. श्रीसांबसदाशिवाचे पूजन करावे. बारा हजार जप करावा. नंतर ध्यान करावे.
नंतर देवास पंचारती करुन आरती म्हणावी
पांच ब्राह्मण-दांपत्यांना सुग्रास भोजन घालावे. त्यांचे पूजन करुन दक्षणा द्यावी.
हे ब्राह्मण शैव असल्यास फार उत्तम.
शंकराला अभिषेक फार आवडतो. तो पुरुषसूक्ताने, महिम्नाने अथवा रुद्रसूक्ताने करावा. महामृत्युंजय मंत्राने किंवा गायत्री मंत्रानेही करता येतो असे शिवपुराणांत सांगितले आहे.
याने आपण केलेली सर्व पातके नष्ट होतात. आपल्याला झालेले रोग नाहीसे होउन उत्तम आरोग्य लाभते. सर्व संकटे समूळ नाश पावतात. याशिवाय जप जेव्हां अधिक अधिक होउ लागतो तेव्हां आपण आंतून व बाहेरुनही अधिकअधिकशुद्ध होउ लागतो. आपली वृत्ति, स्वभाव व वागणे हे सात्तिक होउ लागते. हे आपले आपणास जास्त समजून येते.
असा हा पवित्र जप करुन सर्व शिवभक्तांनाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या व त्यांच्या जीवनांत शिव कृपेने सुख, शांती व समृद्धी यांची वृद्धी व्हावी हीच शिवचरणी प्रार्थना.
ShivManas Pooja
Shivshadakshara Stotram
ShivPanchakshara Stotram
Custom Search
No comments:
Post a Comment