KikshindhaKanda Part 7
दोहा—तब अनुजहि समुझावा रघुपति करुना सींव ।
भय देखाइ लै आवहु तात सखा
सुग्रीव ॥ १८ ॥
तेव्हा दयेची परिसीमा
असलेल्या श्रीरघुनाथांनी लक्ष्मणाला समजावले की, हे वत्सा, सुग्रीव आपला मित्र
आहे. म्हणून त्याला केवळ भीती दाखवून घेऊन ये. ॥ १८ ॥
इहॉं पवनसुत हृदयँ बिचारा ।
राम काजु सुग्रीवँ बिसारा ॥
निकट जाइ चरनन्हि सिरु नावा
। चारिहु बिधि तेहिकहि समुझावा ॥
इकडे किष्किंधानगरीमध्ये
पवनकुमार हनुमानाने विचार केला की, सुग्रीव श्रीरामांचे कार्य विसरुन गेला आहे.
त्याने सुग्रीवापाशी जाऊन चरणांवर मस्तक नमविले आणि साम, दाम, भेद, दंड या चारी
प्रकारच्या नीती सांगून त्याला समजाविले. ॥ १ ॥
सुनि सुग्रीवँ परम भय माना
। बिषयँ मोर हरि लीन्हेउ ग्याना ॥
अब मारुतसुत दूत समूहा ।
पठवहु जहँ तहँ बानर जूहा ॥
हनुमानाचे बोलणे ऐकून
सुग्रीवाला फार भीती वाटली. तो म्हणाला, ‘ विषयांनी माझे ज्ञान हरण केले. आता हे
पवनपुत्रा, जिथे जिथे वानरांचे कळप आहेत, तिथे तिथे तूं दूतांना पाठव. ॥ २ ॥
कहहु पाख महुँ आव न जोई ।
मोरें कर ता कर बध होई ॥
तब हनुमंत बोलाए दूता । सब
कर करि सनमान बहूता ॥
आणि निरोप पाठव की, एका
पंधरवड्यात जो येणार नाही, त्याचा माझ्या हातून वध होईल.’ हनुमानाने दूतांना
बोलावले आणि सर्वांचा मान राखत, ॥ ३ ॥
भय अरु प्रीति नीति देखराई
। चले सकल चरनन्हि सिर नाई ॥
एहि अवसर लछिमन पुर आए ।
क्रोध देखि जहँ तहँ कपि धाए ॥
सर्वांना भय, प्रेम आणि
नीती दाखवून दिली. सर्व वानर नतमस्तक होऊन निघाले. त्याचवेळी लक्ष्मण नगरात
पोहोचला. त्याचा राग पाहून वानर जिकडे तिकडे पळाले. ॥ ४ ॥
दोहा—धनुष चढ़ाइ कहा तब जारि
करउँ पुर छार ।
ब्याकुल नगर देखि तब आयउ
बालिकुमार ॥ १९ ॥
नंतर लक्ष्मणाने धनुष्य
सज्ज करुन म्हटले की, ‘ मी आताच नगराची
राखरांगोळी करुन टाकतो.’ तेव्हा संपूर्ण नगर व्याकूळ झाल्याचे पाहून वालीपुत्र
अंगद त्याच्याजवळ आला. ॥ १९ ॥
चरन नाइ सिरु बिनती कीन्ही
। लछिमन अभय बॉंह तेहि दीन्ही ॥
क्रोधवंत लछिमन सुनि काना ।
कह कपीस अति भयँ अकुलाना ॥
अंगदाने त्याच्यासमोर
नतमस्तक होऊन क्षमायाचना केली. तेव्हा लक्ष्मणाने त्याला भिऊ नकोस असे म्हणून अभय
दिले. सुग्रीवाने स्वतःच्या कानांनी लक्ष्मणाचे रागाचे बोलणे ऐकून भयाने खूप
व्याकूळ होऊन म्हटले, ॥ १ ॥
सुनु हनुमंत संग लै तारा ।
करि बिनती समुझाउ कुमारा ॥
तारा सहित जाइ हनुमाना ।
चरन बंदि प्रभु सुजस बखाना ॥
‘ हे हनुमाना ! ऐकून
घे. तू तारेला सोबत घेऊन जा व राजकुमाराला समजावून शांत कर.’ हनुमानाने तारेसह
जाऊन लक्ष्मणाच्या चरणी वंदन केले व प्रभूंच्या सुंदर कीर्तीची वाखाणणी केली. ॥ २
॥
करि बिनती मंदिर लै आए ।
चरन पखारि पलँग बैठाए ॥
तब कपीस चरनन्हि सिरु नावा
। गहि भुज लछिमन कंठ लगावा ॥
विनंती करुन ते
लक्ष्मणाला महालात घेऊन आले आणि त्याचे चरण धुऊन त्याला पलंगावर बसविले.मग वानरराज
सुग्रीव त्याच्या पाया पडू लागला, तेव्हा लक्ष्मणाने त्याचा हात धरुन त्याला मिठी
मारली. ॥ ३ ॥
नाथ बिषय सम मद कछु नाहीं ।
मुनि मन मोह करइ छन माहीं ॥
सुनत बिनीत बचन सुख पावा ।
लछिमन तेहि बहु बिधि समुझावा ॥
सुग्रीव म्हणाला, ‘ हे
नाथ, विषयासारखा इतर कोणताही मद नाही. तो मुनींच्या मनांतही एका क्षणात मोह
उत्पन्न करतो. मग मी तर विषयी जीव. ’ सुग्रीवाचे नम्र बोलणे ऐकून लक्ष्मणाला आनंद
झाला आणि त्याने सुग्रीवाला खूप समजावून धीर दिला. ॥ ४ ॥
पवन तनय सब कथा सुनाई ।
जेहि बिधि गए दूत समुदाई ॥
तेवढ्यात पवनसुत
हनुमानाने कशाप्रकारे सर्व दिशांना दूतांचे समूह गेले आहेत, ते सर्व सांगितले. ॥ ५
॥
दोहा—हरषि चले सुग्रीव तब
अंगदादि कपि साथ ।
रामानुज आगें करि आए जहँ
रघुनाथ ॥ २० ॥
मग अंगद इत्यादी
वानरांना सोबत घेऊन आणि लक्ष्मणाला पुढे घालून सुग्रीव आनंदाने श्रीरामांच्याकडे
आला. ॥ २० ॥
नाइ चरन सिरु कह कर जोरी ।
नाथ मोहि कछु नाहिन खोरी ॥
अतिसय प्रबल देव तव माया ।
छूटइ राम करहु जौं दाया ॥
श्रीरघुनाथांच्या चरणी
नतमस्तक होऊन व हात जोडून सुग्रीव म्हणाला, ‘ हे नाथ, यात माझा काही दोष नाही. हे
देव, तुमची माया ही अत्यंत प्रबळ आहे. हे राम, तुम्ही जेव्हा दया करता, तेव्हाच ती
सुटते. ॥ १ ॥
बिषय बस्य सुर नर मुनि
स्वामी । मैं पावँर पसु कपि अति कामी ॥
नारि नयन सर जाहि न लागा ।
घोर क्रोध तम निसि जो जागा ॥
हे स्वामी, देव, मनुष्य
आणि मुनी हे सर्व विषयांना वश असतात. मग मी तर पामर पशू आणि पशूंच्यामध्ये अत्यंत
कामी वानर आहे. स्त्रीचा नयन-बाण ज्याला लागत नाही, जो भयंकर क्रोधरुपी अंधार्या
रात्रीही जागत असतो, जो क्रोधाने आंधळा होत नाही, ॥ २ ॥
लोभ पॉंस जेहिं गर न बँधाया
। सो नर तुम्ह समान रघुराया ॥
यह गुन साधन तें नहिं होई ।
तुम्हरी कृपॉं पाव कोइ कोई ॥
आणि लोभाच्या दोरीमध्ये
ज्याने आपला गळा अडकविला नाही, हे रघुनाथा, तो मनुष्य तुमच्यासमान होय, हे गुण
साधनाने प्राप्त होत नाहीत. तुमच्या कृपेमुळेच एखाद्यालाच हे प्राप्त होतात.’ ॥ ३
॥
तब रघुपति बोले मुसुकाई ।
तुम्ह प्रिय मोहि भरत जिमि भाई ॥
अब सोइ जतनु करहु मन लाई ।
जेहि बिधि सीता कै सुधि पाई ॥
तेव्हा रघुनाथ हसत म्हणाले, ‘ हे बंधू, तू मला
भरतासारखा प्रिय आहेस. आता मन लावून सीतेची वार्ता
काढण्याचाच उपाय कर. ‘ ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment