Showing posts with label BrahmaVaivart purana. Show all posts
Showing posts with label BrahmaVaivart purana. Show all posts

Monday, October 3, 2016

Laxmyaha Stotram लक्ष्म्याः स्तोत्रम्


Laxmyaha Stotram
Laxmyaha Stotram is in Sanskrit. It is from Brahmavaivarta Purana Ganapati Khanda Adhyay 22/27-39. This Stotra is told by God Narayan/Hari to God Indra. It is the Praise of Goddess MahaLaxmi.
लक्ष्म्याः स्तोत्रम्  
नारायण उवाच
देवि त्वां स्तोतुमिच्छामि न क्षमाः स्तोतुमीश्र्वराः ।
बुद्धेरगोचरां सूक्ष्मां तेजोरुपां सनातनीम् ।
अत्यनिर्वचनीयां च को वा निर्वक्तुमीश्र्वरः ॥ १ ॥
स्वेच्छामयीं निराकारां भक्तानुग्रहविग्रहाम् । 
स्तौमि वाङ्मनसोः पारां किं वाहं जगदम्बिके ॥ २ ॥
परां चतुर्णां वेदानां पारबीजं भवार्णवे ।
सर्वशस्याधिदेवीं च सर्वासामपि सम्पदाम् ॥ ३ ॥
योगिनां चैव योगानां ज्ञानानां ज्ञानिनां तथा ।
वेदानां च वेदविदां जननीं वर्णयामि किम् ॥ ४ ॥
यया विना जगत् सर्वमवस्तु निष्फलं ध्रुवम् ।
यथा स्तनान्धबालानां विना मात्रासुखं भवेत् ॥ ५ ॥
प्रसीद जगतां माता रक्षास्मानतिकातरान् ।
वयं त्वच्चरणाम्भोजे प्रपन्नाः शरणं गताः ॥ ६ ॥
नमः शक्तिस्वरुपायै जगन्मात्रे नमो नमः ।
ज्ञानदायै बुद्धिदायै सर्वदायै नमो नमः ॥ ७ ॥
हरिभक्तिप्रदायिन्यै मुक्तिदायै नमो नमः ।
सर्वज्ञायै सर्वदायै महालक्ष्म्यै नमो नमः ॥ ८ ॥
कुपुत्राः कुत्रचित् सन्ति न कुत्रचित् कुमातरः ।
कुत्र माता पुत्रदोषे तं विहाय च गच्छति ॥ ९ ॥
हे मातर्दर्शनं देहित स्तनान्धान् बालकानिव ।
कृपां कुरु कृपासिन्धुप्रियेऽस्मान् भक्तवत्सले ॥ १० ॥
इत्येवं कथितं वत्स पद्मायाश्र्च शुभावहम् ।
सुखदं मोक्षदं सारं शुभदं सम्पदः पदम् ॥ ११ ॥
इदं स्तोत्रं महापुण्यं पूजाकाले च यः पठेत् ।
महालक्ष्मीर्गृहं तस्य न जहाति कदाचन ॥ १२ ॥
इत्युक्त्वा श्रीहरिस्तं च तत्रैवान्तरधीयत । 
देवो जगाम क्षीरोदं सुरैः सार्धं तदाज्ञया ॥ १३ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते गणपतिखण्डे लक्ष्म्याः स्तोत्रं सम्पूर्णम् ॥ 
(गणपतिखण्ड २२/२७-३९)     
मराठी अर्थ
नारायण म्हणाले
देवि ! जिचे स्तवन मोठे मोठे देव करु शकले नाहीत, त्या तुझी मी स्तुति करु इच्छितो. आपण बुद्धिच्या (आकलनाच्या) पलीकडे, सूक्ष्म, तेजोरुप, सनातन आणि अनिर्वचनीय आहात. मग आपले वर्णन कोण कसे बरे करु शकेल? जगदम्बिके ! आपण स्वेच्छामयी, निराकार भक्तांसाठी मूर्तिमान व अनुग्रहस्वरुप आणि मन व वाणीच्या पलीकडे आहात. मग मी आपली काय स्तुति करु? आपण चार वेदांच्या (आकलनाच्या) पलीकडे, भवसागर पार करण्यासाठी (भक्तांना) वाट, उपाय दाखविणार्‍या, सर्व अन्न व सम्पदेची अधिदेवी आहात. योग्यासाठी योग, ज्ञान्यानसाठी ज्ञान व वेद जाणणार्‍यासाठी वेद असणार्‍या आपले मी कसे वर्णन करु? आपल्याशिवाय हे जग निष्फल आहे जसे की दूध पिणार्‍या बालकाला आईशिवाय सुख नाही मिळत तसेच आहे. आपण जगाची आई आहात आपण प्रसन्न व्हा आणि भयभित असलेल्या आमचे रक्षण करा. आम्ही आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन आपल्याला शरण आलो आहोत. शक्तिस्वरुप जगत्जननीला आपल्याला वारंवार नमस्कार आहे. ज्ञान, बुद्धि तसेच आम्हाला सर्वस्व देणार्‍या आपल्याला पुनः पुनः प्रणाम आहे. महालक्ष्मी ! आपण हरि-भक्ति देणार्‍या, मुक्ति देणार्‍या, सर्व ज्ञान देणार्‍या, बुद्धि देणार्‍या व सर्व देणार्‍या आहात. आपल्याला माझा वारंवार नमस्कार आहे. हे मॉं कुपुत्र तर कधी कधी आढळतात पण कुमाता मात्र कधीच नसते. मुलगा दुष्ट असला तर आई त्यााला कधी सोडून जाते कां?  हे माते ! आपण कृपाळु श्रीहरिंची प्राणप्रिया आहात. भक्तांवर कृपा करण्याचा आपला स्वभाव आहे. म्हणून दूध पिणारी मुले समजुन आमच्यावर कृपा करा व आम्हाला दर्शन द्या. 

वत्सा ! याप्रकारे लक्ष्मीचे ते शुभकारक स्तोत्र, जे सुख देणारे, मोक्ष देणारे, साररुप, शुभद, आणि सम्पत्तीचे आश्रयस्थान आहे ते तुला सांगितले. जो मनुष्य पूजाकाली या महान् पुण्यकारक स्तोत्राचा पाठ करतो, महालक्ष्मी त्याच्या घराचा कधीही त्याग करत नाही. इन्द्राला एवढे सांगुन श्रीहरि तेथेच अंतर्धान झाले. त्यानंतर त्यांच्या आज्ञेप्रमाणे देवराज इन्द्र इतर देवांबरोबर क्षीरसागराकडे गेले.      
Laxmyaha Stotram
लक्ष्म्याः स्तोत्रम्  




Custom Search

Wednesday, August 24, 2016

VipraPatniKrutam ShriKrishna Stotram विप्रपत्नीकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्


VipraPatniKrutam ShriKrishna Stotram 
VipraPatniKrutam ShriKrishna Stotram is in Sanskrit. It is from ShreeBrhmavaivart Purana, ShriKrishna JanmaKhanda Adhyay 18/36-48.
विप्रपत्नीकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्   
विप्रपत्न्य ऊचुः  
त्वं ब्रह्म परमं धाम निरीहो निरहंकृतिः ।
निर्गुणश्र्च निराकारः साकारः सगुणः स्वयम् ॥ १ ॥
साक्षिरुपश्र्च निर्लिप्तः परमात्मा निराकृतिः ।
प्रकृतिः पुरुषस्त्वं च कारणं च तयोः परम् ॥ २ ॥ 
सृष्टिस्थित्यन्तविषये ये च देवास्त्रयः स्मृताः ।
ते त्वदंशाः सर्वबीजा ब्रह्मविष्णुमहेश्र्वराः ॥ ३ ॥
यस्य लोम्नां च विवरे चाखिलं विश्र्वमीश्र्वर ।
महाविराड् महाविष्णुस्त्वं तस्य जनको विभो ॥ ४ ॥
तेजस्त्वं चापि तेजस्वी ज्ञानं ज्ञानी च तत्परः ।
वेदेऽनिर्वचनीयस्त्वं कस्त्वां स्तोतुमिहेश्र्वरः ॥ ५ ॥
महदादि सृष्टिसूत्रं पञ्चतन्मात्रमेव च ।
बीजं त्वं सर्वशक्तीनां सर्वशक्तिस्वरुपकः ॥ ६ ॥
सर्वशक्तिश्र्वरः सर्वः सर्वशक्त्याश्रयः सदा ।
त्वमनीहः स्वयंज्योतिः सर्वानन्दः सनातनः ॥ ७ ॥
अहोऽप्याकारहीनस्त्वं सर्वविग्रहवानपि ।
सर्वेन्द्रियाणां विषयं जानासि नेन्द्रियी भवान् ॥ ८ ॥
सरस्वती जडीभूता यत्स्तोत्रे यन्निरुपणे ।
जडीभूतो महेशश्र्च शेषो धर्मो विधिः स्वयम् ॥ ९ ॥
पार्वती कमला राधा सावित्री वेदसूरपि ।
वेदश्र्च जडतां याति के वा शक्ता विपश्र्चितः ॥ १० ॥
वयं किं स्तवनं कुर्मः स्त्रियः प्राणेश्र्वरेश्र्वर ।
प्रसन्नो भव नो देव दीनबन्धो कृपां कुरु ॥ ११ ॥
इति पेतुश्र्च ता विप्रपत्न्यस्तच्चरणाम्बुजे ।
अभयं प्रददौ ताभ्यः प्रसन्नवदनेक्षणः ॥ १२ ॥
विप्रपत्नीकृतं स्तोत्रं पूजाकाले च यः पठेत् ।
स गतिं विप्रपत्नीनां लभते नात्र संशयः ॥ १३ ॥
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते श्रीकृष्णजन्मखंडे विप्रपत्नीकृतं श्रीकृष्णस्तोत्रं संपूर्णम् ॥
मराठी अर्थ
ब्राह्मणस्त्रिया म्हणाल्या
भगवान ! आपण स्वतः परब्रह्म, परमधाम, निरीह, अहंकाररहीत, निर्गुण-निराकार तसेच सगुण-साकार आहात. आपण सर्वसाक्षी,निर्लेप म्हणजेच आकाररहित, परमात्मा आहात. प्रकृति व पुरुष आपणच आहात. तसेच त्या दोन्हीचे परम कारण आहात. सृष्टी निर्मिती, पालन व संहार यासाठी नियुक्त जे ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवता सांगितल्या आहेत, त्या पण आपल्या सर्व बीजमय अंशरुपी आहेत. परमेश्र्वरा ! ज्या रोमकूपामध्ये संपूर्ण विश्र्व आहे ते महाविराट् महाविष्णु यांचे पिता आपणच आहात. 
आपणच तेज व तेजस्वी, ज्ञान व ज्ञानी आहात, व त्यापलीकडे आहात. वेदामध्ये आपण अनिर्वचनीय आहात असे म्हटले आहे. मग आपली स्तुती कोण बरे करु शकेल? सृष्टीचे सूत्रभूत जे तत्व, पाच तन्नमात्रा आहेत त्या आपल्यापासून भन्न नाहीत. आपण सर्व शक्तिंचे बीज व सर्वशक्तिस्वरुप आहात. सर्वशक्तिंचे ईश्र्वर, सर्वरुप, तसेच सर्वशक्तींचे आश्रयस्थान आहात. आपण निरीह, स्वयंप्रकाश, सर्वानन्दमय तसेच सनातन आहात. 
अहो आकारहीन असूनही आपण सर्व आकारांनीयुक्त आहात, सर्व आकार आपलेच आहेत. आपण सर्व इन्द्रियांचे विषय जाणता तरीसुद्धा इंद्रियवान नाही. ज्यांची स्तुती करण्यास सरस्वती दमते, महेश्र्वर, शेषनाग, धर्म व स्वतः विधाता दमतात, पार्वती, लक्ष्मी, राधा तसेच वेदमाता सावित्री आपली स्तुती करता करता मुक झाल्या मग दुसरा कोण विद्वान आपली स्तुती करु शकेल. हे प्राणेश्र्वरा ! तेथेआम्ही स्त्रीया आपली काय स्तुती करु शकणार ? देवा आमच्यावर प्रसन्न व्हा. दिनबंधो ! आमच्यावर कृपा करा.    
असे म्हणून ब्राह्मणस्त्रीया श्रीकृष्णाच्या पदकमलावर पडून राहील्या. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना प्रसन्नमुखाने व डोळ्यांनी अभय दिले. 

जो पूजेच्यावेळी ब्राह्मणस्त्रीयांनी केलेल्या या स्तोत्राचा पाठ करतो त्याला त्या स्त्रीयांना मिळालेली गती म्हणजेच मोक्ष मिळतो. यांत संशय नाही.       
VipraPatniKrutam ShriKrishna Stotram
विप्रपत्नीकृतं श्रीकृष्णस्तोत्रम्   


Custom Search

Wednesday, February 8, 2012

Radha Nam Mahatmya Stotram

Radha Nam Mahatmya Stotram 

Radha Nam Mahatmya Stotram is in Sanskrit and it is from BrahmaVaivart Purana ShriKrishna JanmaKhanda. “Refo” in the name “Radha” makes us free from sins of many births. It also gives us moksha thus makes us free from further births and deaths. “Aakar’ in the name of “Radha” removes the pains arising before birth and after birth from diseases and death. “Dhakar’ in the name “Radha” makes us free the loss of life. “Aakar” in the name “Radha” makes us free from the bindings of the life. There is no doubt that when we hear, recite or remember the name “Radha” all the above sorrows are removed from our life. “Refo” in the name “Radha” gives us devotion of God ShriKrishna to concentrate our mind at the feet of the God ShriKrishna. “Aakar’ in the name of “Radha” connects us with God ShriKrishna who is ever happy and desired by everybody and who is siddhi-swaroop. “Dhakar’ in the name “Radha” gives us the pleasure of to be in the company of God Hari for a very long period, as prosperous, as knowledgeable as him and makes one with him. “Aakar’ in the name of “Radha” gives us yoga-shakti, donor and lustrous like God ShriKrishna and yoga-mati to remember God ShriKrishna forever. There is no doubt that when we hear, recite or remember the name “Radha” all our sin, greediness, diseases, sorrow, death and fear of YamaRaja are removed from our life.

श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र 

रेफो हि कोटी जन्माघं कर्मभोगं शुभाशुभम् I 
आकारो गर्भवासं च मृत्युं च रोगमुत्सृजेत् I 
धकार आयुषो हानिमाकारो भवबन्धनम् I 
श्रवणस्मरणोक्तिभ्यः प्रणश्यति न संशयः I 
रेफ़ो हि निश्चलां भक्तिं दास्यं कृष्णपदाम्बुजे II 
सर्वेप्सितं सदानन्दं सर्वसिद्धौघमीश्वरम् I 
धकारः सहवासं च तत्तुल्यकालमेव च I 
ददाति सार्ष्टिसारूप्यं तत्त्वज्ञानं हरेः समम् I 
आकरस्तेजसां राशिं दानशक्तिं हरौ यथा I 
योगशक्तिं योगमतिं सर्वकालं हरिस्मृतिम् I 
श्रुत्युक्तिस्मरणाद्योगान्मोहजालं च किल्बिषम् I 
रोगशोक मृत्युयमा वेपन्ते नात्र संशयः I 
II इति श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र संपूर्णं II 
श्री राधा नाम महात्म्य स्तोत्राचा मराठी अर्थ: 
राधा या शब्दाची व्युत्पत्ति देवाना, असुराना आणि मुनिना अभीष्ट, सर्वांत उत्कृष्ट व मोक्षदायिनी आहे. राधा नावांतील 'रेफ' कोटी जन्मांचे पाप आणि शुभाशुभ कर्मभोगांपासून मुक्त करणारा आहे. 'आकार' हा गर्भवासांतील दुःख, मृत्यु आणि रोग दूर करणारा आहे. 'धकार' आयुष्याची हानी निवारण करणारा व 'आकार' हा संसार बंधनाचे निवारण करणारा आहे. राधा नावाचे श्रवण, स्मरण आणि कीर्तन केल्यावर वरील सर्व दोषांचा नाश होतो, हे निःसंशय आहे. राधा नावांतील 'रेफ' श्रीकृष्णाच्या पदारविन्दात अविचल भक्ती आणि दास्य प्रदान करणारा आहे. 'आकार' सर्ववाञ्छित, सदानन्दस्वरूप, संपूर्ण सिद्धसमुदायरूप म्हणजेच ईश्वराची प्राप्ती करून देतो. 'धकार' श्रीहरी बरोबर त्यांच्याच सारखे अनंत काळ सहवासाचे सुख, तसेच ऐश्वर्य, सारुप्य व तत्त्वज्ञान देणारा आहे. 'आकार' हा श्रीहरी प्रमाणे तेजोराशी, दानशक्ति, योगशक्ति व योगमति तसेच नेहमी श्रीहरीच्या स्मरणाची आठवण करून देणारा आहे. श्रीराधा नावाचे श्रवण, स्मरण आणि कीर्तन या तिन्हीचा सुयोग मोहजाल, पाप, रोग, शोक, मृत्यु आणि यमराज यांचा थरकाप उडवितो यांत काही संशय नाही. अशा रीतीने श्री राधा नाम महात्म्य स्तोत्र संपूर्ण झाले. हे स्तोत्र ब्रह्मवैवर्त पुराणांतील श्री कृष्णजन्मखंडातील अध्याय १३ मधील श्लोक १०५ ते १११ मध्ये आले आहे.

Radha Nam Mahatmya Stotram

Custom Search