Tuesday, March 10, 2020

ShriRamCharitManas Part 2 श्रीरामचरितमानसस भाग २





ShriRamCharitManas Part 2
श्रीरामचरितमानसस भाग २
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—जड चेतन गुन दोषमय बिस्व कीन्ह करतार  ।
          संत हंस गुन गहहिं पय परिहरि बारि बिकार  ॥ ६ ॥
विधात्याने या जड-चेतन सृष्टीला गुण-दोषमय बनविले आहे. परंतु संतरुपी हंस हे दोषरुपी पाणी टाळून त्यातील गुणरुपी दूधच ग्रहण करतात.
अस बिबेक जब देइ बिधाता । तब तजि दोष गुनहिं मनु राता ॥
काल सुभाउ करम बरिआईं  । भलेउ प्रकृति बस चुकइ भलाईं 
विधाता जेव्हा हंसासारखा विवेक देतो, तेव्हा दोष सोडून देऊन मन गुणांमध्ये अनुरक्त होते. काळाचा स्वभाव व कर्माच्या प्राबल्यामुळे कधी कधी थोर लोकसुद्धा मायेमुळे चांगुलपणापासून दूर जातात.॥ १ ॥
सो सुधारि हरिजन जिमि लेहीं । दलि दुख दोष बिमल जसु देहीं 
खलउ करहिं भल पाइ सुसंगू  । मिटइ न मलिन सुभाउ अभंगू ॥
भगवंताचे भक्त ही चूक सुधारुन आणि दुःख-दोष नाहीसे करुन निर्मळ कीर्ती प्राप्त करतात; तसेच दुष्ट लोकसुद्धा कधी कधी उत्तम संगत लाभल्यावरही चांगले कार्य करतात. परंतु त्यांचा कधीही नाहीसा न होणारा मलिन स्वभाव नष्ट होत नाही. ॥ २ ॥
लखि सुबेष जग बंचक जेऊ । बेष प्रताप पूजिअहिं तेऊ 
उघरहिं अंत न होइ निबाहू । कालनेमि जिमि रावन राहू ॥
जे मूलतः ठक आहेत, पण साधूसारखा वेष धारण करतात, त्यांच्या वरवर सोज्ज्वळ दिसणार्‍या वेषामुळे जग त्यांची पूजा करते; परंतु केव्हा ना केव्हा ते उघडे पडतात. त्यांचे कपट शेवटपर्यंत टिकत नाही. जसे कालनेमी, रावण आणि राहू यांचे झाले. ॥ ३ ॥
किएहुँ कुबेषु साधु सनमानू । जिमि जग जामवंत हनुमानू 
हानि कुसंग सुसंगति लाहू  । लोकहुँ बेद बिदित सब काहू  
वाईट वेष धारण केला तरीही साधू-पुरुषाचा सन्मानच होतो, जसे जांबवान आणि हनुमानाचे झाले. वाईट संगतीमुळे नुकसान, तर चांगल्या संगतीमुळे लाभ होतो, ही गोष्ट जगामध्ये व वेदामध्ये सांगितली आहे आणि सर्वजण ती जाणतात. ॥ ४ ॥
गगन चढइ रज पवन प्रसंगा  । कीचहिं मिलइ नीच जल संगा ॥
साधु असाधु सदन सुक सारीं  । सुमिरहिं राम देहिं गनि गारीं 
वार्‍याच्या संगतीने धूळ उंच आकाशात पोहोचते आणि तीच नीच ( खाली वाहात जाणार्‍या ) पाण्याच्या संगतीमुळे चिखल बनते. साधू पुरुषाच्या घरातील पोपट-मैना या ‘ राम-राम ‘ असे स्मरण करतात, तर दुष्टांच्या घरातील पोपट-मैना मोजून शिव्या देतात. ॥ ५ ॥
धूम कुसंगति कारिख होई  । लिखिअ पुरान मंजु मसि सोई 
सोइ जल अनल अनिल संघाता । होइ जलद जग जीवन दाता ॥
वाईट संगतीमुळे धुराला काजळ म्हणतात, परंतु तोच धूर (सुसंगतीमुळे) सुंदर शाई होतो व पुराण लिहिण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि तोच धूर पाणी, अग्नि आणि वायू यांच्या संगतीने ढग बनून जगाला जीवन देणारा ठरतो. ॥ ६ ॥
दोहा—ग्रह भेषज जल पवन पट पाइ कुजोग सुजोग 
          होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग ॥ ७ क ॥
ग्रह, औषध, पाणी, वायू आणि वस्त्र हे सर्वच कुसंग आणि सुसंग लाभल्यामुळे वाईट वा चांगले बनतात. विचारी पुरुषच ही गोष्ट जाणू शकतात. ॥ ७ क ॥
सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि किन्ह ।
ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दीन्ह ॥ ७ ख ॥
महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यांत प्रकाश आणि अंधार दोन्हीही सारखेच असतात. परंतु विधात्याने यांच्या नावात फरक केला आहे. (एकाचे नाव शुक्लपक्ष आणि दुसर्‍याचे नाव कृष्णपक्ष असे ठेवले आहे.) एक पक्ष चंद्राला वाढविणारा आणि दुसरा चंद्राला घटविणारा समजून जगाने एकाला सुकीर्ती व दुसर्‍याला अपकीर्ती दिली आहे. ॥ ७ ख ॥
जड चेतन जग जीव जत सकल राममय जानि ।
बंदउँ सब के पद कमल सदा जोरि जुग पानि ॥ ७ ग ॥
जगामध्ये जितके जड व चेतन जीव आहेत, त्या सर्वांना राममय मानून मी त्या सर्वांच्या चरणी दोन्ही हात जोडून वंदन करतो. ॥ ७ ग ॥
देव दनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्ब ।
बंदउँ किंनर रजनिचर कृपा करहु अब सर्ब ॥ ७ घ ॥
देव, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर आणि निशाचर या सर्वांना मी प्रणाम करतो. या सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. ॥ ७ घ ॥
आकर चारि लाख चौरासी । जाति जीव जल थल नभ बासी ॥
सीय राममय सब जग जानी । करउँ प्रनाम जोरि जुग पानी ॥
चौर्‍याऐंशी लाख योनींमध्ये चार प्रकारचे ( स्वेदज, अंडज, उद्भिज्ज, जरायुज ) जीव आहेत. ते जल, पृथ्वी आणि आकाशांत राहातात. त्या सर्वांनी भरलेले संपूर्ण जग हे श्रीसीताराममय आहे. असे मानून मी दोन्ही हात जोडून त्यांना प्रणाम करतो. ॥ १ ॥
जानि कृपाकर किंकर मोहू । सब मिलि करहु छाडि छल छोहू ॥
निज बुधि बल भरोसा मोहि नाहीं । तातें बिनय करउँ सब पाहीं ॥
मला आपला सेवक मानून सर्व कृपेची खाण असलेल्या तुम्ही लोकांनी निष्कपट भावनेने माझ्यावर कृपा करावी. माझा माझ्या बुद्धि-बलावर विश्र्वास नाही, म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. ॥ २ ॥
करन चहउँ रघुपति गुन गाहा । लघु मति मोरि चरित अवगाहा ॥
सूझ न एकउ अंग उपाऊ  । मन मति रंक मनोरथ राऊ ॥
मी रघुनाथांच्या गुणांचे वर्णन करु इच्छितो, परंतु माझी बुद्धी अल्प आहे आणि श्रीरामचंद्रांचे चरित्र हे अथांग आहे. म्हणून या वर्णनासाठी मला कोणताही उपाय सुचत नाही. माझे मन आणि बुद्धी कंगाल आहे. मात्र मनोरथ हा राजा आहे. ॥ ३ ॥
मति अति नीच ऊँचि रुचि आछी । चहिअ अमिअ जग जुरइ न छाछी ॥
छमिहहिं सज्जन मोरि ढिटाई । सुनिहहिं बालबचन मन लाई ॥
माझी बुद्धी अत्यंत हीन आहे आणि इच्छा मात्र फार मोठी आहे. माझी इच्छा अमृत मिळविण्यासाठी आहे, परंतु या जगात मला ताकही मिळत नाही. सज्जन लोक माझ्या धृष्टतेबद्दल क्षमा करतील आणि माझे हे बाल-वचन (प्रेमाने) ऐकतील (अशी आशा आहे ).॥ ४ ॥
जौं बालक कह तोतरि बाता । सुनहिं मुदित मन पितु अरु माता ॥
हँसिहहिं कूर कुटिल कुबिचारी । जे पर दूषन भूषनधारी ॥
ज्याप्रमाणे बालक बोबडे बोल बोलते, तेव्हा त्याचे आई-वडिल ते प्रसन्न मनाने ऐकतात. परंतु जी क्रूर, कुटिल आणि वाईट विचारांची माणसे असतात, ती दुसर्‍यांच्या दोषांनाच भूषण मानून धारण करतात ( अर्थात ज्यांना दुसर्‍यांचे दोषच दिसतात ) ती हसतील. (हसेनात का ?) ॥ ५ ॥
निज कबित्त केहि लाग न नीका । सरस होउ अथवा अति फीका ॥
जे पर भनिति सुनत हरषाहीं । ते बर पुरुष बहुत जग नाहीं ॥
रसपूर्ण असो की नीरस, आपली कविता कुणाला आवडत नाही ? परंतु जे दुसर्‍याची कविता ऐकून आनंदित होतात, असे उत्तम रसिक पुरुष जगात फार नसतात. ॥ ६ ॥
जग बहुत नर सर सरि सम भाई । जे निज बाढि बढहिं जल पाई ॥
सज्जन सकृत सिंधु सम कोई । देखि पूर बिधु बाढइ जोई ॥
असे पाहा की, जगामध्ये तलाव व नद्यांसारखी माणसे फार आहेत. तलाव नद्या पाण्याने भरल्या की स्वतःच्या वाढीने फुगुन जातात. ( तशी ही माणसे गर्विष्ठ होतात. ) मात्र समुद्राप्रमाणे एखादा विरळाच सज्जन असतो, जसा समुद्र पूर्ण चंद्राला पाहून ( तसा हा दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून ) आनंदाने उसळू लागतो. ॥ ७ ॥
दोहा—भाग छोट अभिलाषु बड करउँ एक बिस्वास ।
          पैहहिं सुख सुनि सुजन सब खल करिहहिं उपहास ॥ ८ ॥
माझे भाग्य छोटे आहे आणि इच्छा मात्र मोठी आहे. परंतु माझी खात्री आहे की, ही कथा ऐकून सज्जन लोक सुखी होतील व दुष्ट लोक चेष्टा करतील. ॥ ८ ॥
खल परिहास होइ हित मोरा । काक कहहिं कलकंठ कठोरा ॥
परंतु दुष्ट हसल्यामुळे माझे हितच होईल. मधुर कंठाच्या कोकिलेला कावळे कर्कशच म्हणतात. बगळे जसे हंसाला व बेडूक जसे चातकाला हसतात, तसेच वाईट मनाचे दुष्ट लोक निर्मळ वाणीला हसतात. ॥ १ ॥
कबित रसिक न राम पद नेहू । तिन्ह कहँ सुखद हास रस एहू ॥
भाषा भनिति भोरि मति मोरी । हँसिबे जोग हॅंसें नहिं खोरी ॥
जे काव्याचे रसिकही नाहीत आणि ज्यांना प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेमही नाही, त्यांनासुद्धा हे काव्य सुखद हास्य-रसाचे वाटेल. अगोदर ही प्राकृत भाषेतील ( अवधीभाषेतील ) कृती आहे. दुसरे म्हणजे माझी बुद्धी भोळी भाबडी आहे. म्हणून ही रचना हसण्यासारखीच आहे. हसण्यामध्ये त्यांचा काही दोष नाही.॥ २ ॥
प्रभु पद प्रीति न सामुझि नीकी । तिन्हहि कथा सुनि लागिहि फीकी ॥
हरि हर पद रति मति न कुतरकी । तिन्ह कहुँ मधुर कथा रघुबर की ॥
ज्यांना प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रेम नाही व चांगली समजही नाही, त्यांना ही कथा ऐकताना नीरस वाटेल. ज्यांना श्रीहरिहरांच्या चरणी प्रेम आहे तसेच ज्यांची बुद्धी कुतर्क करणारी नाही, त्यांना  श्रीरघुनाथांची ही कथा ( खात्रीने ) गोड वाटेल. ॥ ३ ॥
राम भगति भूषित जियँ जानी । सुनिहहिं सुजन सराहि सुबानी ॥
कबि न होउँ नहिं बचन प्रबीनू । सकल कला सब बिद्या हीनू ॥
सज्जन लोक ही कथा आपल्या मनात श्रीरामांच्या भक्तीने सुशोभित मानून सुंदर वाणीने कौतुक करीत ऐकतील. मी काही कवी नाही, वाक्य-रचेनेमध्येही कुशल नाही. मी तर सर्व कला व सर्व विद्यांनी रहित आहे. ॥ ४ ॥
आखर अरथ अलंकृति नाना । छंद प्रबंध अनेक बिधाना ॥
भाव भेद रस भेद  अपारा । कबित दोष गुन बिबिध प्रकारा ॥
नाना प्रकारची अक्षरे, अर्थ, अलंकार, अनेक प्रकारची छंदरचना, भाव आणि रसांचे अपार भेद असतात आणि कवितेमध्ये तर्‍हेतर्‍हेचे गुण-दोष असतात. ॥ ५ ॥
कबित बिबेक एक नहिं मोरें । सत्य कहउँ लिखि कागद कोरें ॥
यापैकी काव्यविषयीच्या एकाही गोष्टीचे ज्ञान मला नाही, हे मी कोर्‍या कागदावर लिहून शपथेवर खरे-खरे सांगतो. ॥ ६ ॥
दोहा—भनिति मोरि सब गुन रहित बिस्व बिदित गुन एक ।
           सो बिचारि सुनिहहिं सुमति जिन्ह कें बिमल बिबेक ॥ ९ ॥
माझी ही कृती सर्व गुणांनी रहित आहे. पण यात फक्त जगप्रसिद्ध गुण आहे. त्याचा विचार करुन चांगल्या बुद्धीचे व निर्मळ ज्ञानाचे लोक ही कथा ऐकतील. ॥ ९ ॥
एहि महँ रघुपति नाम उदारा । अति पावन पुरान श्रुति सारा ॥
मंगल भवन अमंगल हारी । उमा सहित जेहि जपत पुरारी ॥
या कृतीमध्ये श्रीरघुनाथांचे उदार नाम आहे, जे अत्यंत पवित्र आहे, ते वेद-पुराणांचे सार आहे. कल्याणाचे धाम आहे. आणि अमंगलाचे हरण करणारे आहे. पार्वतीसह भगवान शंकर सदैव त्याचा जप करतात. ॥ १ ॥
भनिति बिचित्र सुकबि कृतजोऊ । राम नाम बिनु सोह न सोऊ ॥
बिधुबदनी सब भॉंति सँवारी । सोह न बसन बिना बर नारी ॥
एखाद्या चांगल्या कवीने रचलेली अप्रतिम कवितासुद्धा राम-नामाशिवाय शोभत नाही. ज्याप्रमाणे चंद्रासारख्या सुंदर मुखाची स्त्री सर्व प्रकारे विभूषत असली, तरी ती वस्त्राशिवाय शोभत नाही. ॥ २ ॥
सब गुन रहित कुकबि कृत बानी । राम नाम जस अंकित जानी ॥
सादर कहहिं सुनहिं बुध ताही । मधुकर सरिस संत गुनग्राही ॥
याउलट कुकवीने रचलेली व सर्व गुणांनी रहित अशी कवितासुद्धा श्रीरामांचे नाव व कीर्ती यांनी अंकित झालेली असेल, तर बुद्धिमान लोक ती आदरपूर्वक सांगतात आणि ऐकतात. कारण संतजन भ्रमराप्रमाणे गुणांचेच ग्रहण करतात. ॥ ३ ॥
जदपि कबित रस एकउ नाहीं । राम प्रताप प्रगट एहि माहीं ॥
सोइ भरोस मोरें मन आवा । केहिं न सुसंग बडप्पनु पावा ॥
जरी माझ्या यारचनेमध्ये कवितेमधील एकही रस नसला, तरी यामध्ये श्रीरामांचा प्रताप प्रगट झालेला आहे. माझ्या मनात हाच एक विश्र्वास आहे. चांगल्याच्या संगतीमुळे कुणाला मोठेपणा मिळत नाही बरे?
धूमउ तजइ सहज करुआई । अगरु प्रसंग सुगंध बसाई ॥
भनिति भदेस बस्तु भलि बरनी । राम कथा जग मंगल करनी ॥
धूरसुद्धा धुपाच्या संगतीमुळे सुगंधित बनून आपला कडवटपणा सोडून देतो. माझी कविता नक्की वाईट आहे, परंतु हिच्यामध्येच जगाचे कल्याण करणार्‍या रामकथारुपी उत्तम वस्तूचे वर्णन केलेले आहे. ( म्हणून हिलाही चांगलेच मानले जाईल. ) ॥ ५ ॥
 छं०—मंगल करनि कलिमल हरनि तुलसी कथा रघुनाथ की ।
          गति कूर कबिता सरित की ज्यों सरित पावन पाथ की ॥
          प्रभु सुजस संगति भनिति भलि होइहि सुजन मन भावनी ।
           भव अंग भूति मसान की सुमिरत सुहावनि पावनी ॥
तुलसीदास म्हणतात की, श्रीरघुनाथांची कथा कल्याण करणारी आणि कलियुगाच्या पापांचे हरण करणारी आहे. माझ्या या नीरस कवितारुपी नदीची चाल पवित्र जलाच्या ( गंगेच्या ) चालीप्रमाणे वेडीवाकडी आहे. प्रभू श्रीरामांच्या सुंदर कीर्तीच्या संगतीमुळे ही कविता सुंदर व सज्जन लोकांच्या मनाला आवडणारी होईल. स्मशानतली अपवित्र राखसुद्धा श्रीमहादेवांच्या अंगाच्या संगतीमळे सुशोभित वाटते आणि स्मरण करताच ती पवित्र करणारी बनते.
दोहा---प्रिय लागिहि अति सबहि मम भनिति राम जस संग ।
          दारु बिचारु कि करइ कोउ बंदिअ मलय प्रसंग ॥ १० (क) ॥
श्रीरामांच्या कीर्तीच्या संगतीमुळे माझी कविता सर्वांना अत्यंत आवडेल. ज्याप्रमाणे मलय पर्वताच्या सहवासामुळे कोणतेही लाकूड ( चंदन बनून ) वंदनीय ठरते, मग कोणी लाकूड म्हणून ते तुच्छ मानील काय ? ॥
          स्याम सुरभि पय बिसद अति गुनद करहिं सब पान ।
         गिरा ग्राम्य सिय राम जस गावहिं सुनहिं सुजान ॥ १० (ख) ॥
गाय जरी काळी असली तरी तिचे दूध शुभ्र व गुणकारी असते, असे समजून सर्व लोक ते पितात. त्याप्रमाणे लोकभाषेत असली तरी श्रीसिता-रामांची कीर्ती बुद्धिमान लोक मोठ्या आवडीने गातील व ऐकतील. ॥
 मनि मानिक मुकुता छबि जैसी । अहि गिरि गज सिर सोह न तैसी ॥    
 नृप किरीट तरनी तनु पाई । लहहिं सकल सोभा अधिकाई ॥
मणि, माणिक आणि मोती ही जशी राजाच्या मुकुटावर व नवयुवतीच्या अंगावर शोभतात, तशी साप, पर्वत व हत्तीच्या मस्तकावर शोभत नाहीत. ॥ १ ॥
तैसेहिं सुकबि कबित बुध कहहिं । उपजहिं अनत अनत छबि लहहिं ॥
भगति हेतु बिधि भवन बिहाई । सुमिरत सारद आवति धाई ॥
त्याचप्रमाणे सुकवीची कवितासुद्धा कुठेतरी उत्पन्न होते आणि इतर कुठेतरी तिला शोभा प्राप्त होते. ( अर्थात कवीच्या वाणीतून उत्पन्न झालेली कविता जेथे तिचा विचार, प्रचार आणि त्यात सांगितलेले आदर्श ग्रहण केले जातात व त्यांचे अनुसरण केले जाते तेथेच ती शोभते. ) कवीने स्मरण करताच त्याच्या भक्तीमुळे देवी सरस्वतीसुद्धा ब्रह्मलोक सोडून धावत येते. ॥ २ ॥
राम चरित सर बिनु अन्हवाएँ । सो श्रम जाइ न कोटि उपाएँ ॥
कबि कोबिद अस हृदयँ बिचारी । गावहिं हरि जस कलि मल हारी ॥
धावत आल्यामुळे सरस्वतीदेवीला आलेला थकवा, रामचरित्ररुपी सरोवरामध्ये स्नान केल्याशिवाय इतर कोट्यावधी उपाय केले तरी दूर होत नाही. कवि आणि पंडित आपल्या मनांत असा विचार करुन कलियुगांतील पापंचे हरण करणार्‍या श्रीहरीच्या कीर्तीचेच गायन करतात.
कीन्हें प्राकृत जन गुन गाना । सिर धुनि गिरा लगत पछिताना ॥
हृदय सिंधु मति सीप समाना । स्वाति सारदा कहहिं सुजाना ॥
संसारी मनुष्यांचे गुणगान केल्यामुळे देवी सरस्वती डोके बडवून घेऊन पश्र्चाताप करु लागते ( तिला वाटते की, कवीच्या बोलावण्यावर मी कोठून आले ? म्हणजेच मी नसते आले तरी चालले असते.) बुद्धिमान मनुष्य हृदयाला समुद्र, बुद्धीला शिंपला आणि सरस्वतीला स्वाती नक्षत्रासारखे मानतात. ॥ ४ ॥
जौं बरषइ बर बारि बिचारु । होहिं कबित मुकुतामनि चारु ॥
या प्रसंगी जर श्रेष्ठ विचाररुपी जलाचा वर्षाव झाला, तर कविता मोत्यासारखी सुंदर बनते. ॥ ५ ॥


Custom Search

No comments: