Saturday, April 18, 2020

ShriRamCharitManas Part 9 श्रीरामचरितमानस भाग ९



ShriRamCharitManas Part 9 
श्रीरामचरितमानस भाग ९

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—श्रोता त्रिबिध समाज पुर ग्राम नगर दुहँ कूल ।
संतसभा अनुपम अवध सकल सुमंगल मूल ॥ ३९ ॥
तीन प्रकारच्या श्रोत्यांचा समाज हाच या नदीच्या दोन्ही तटांवर वसलेल्या वाड्या, गावे आणि नगर आहे आणि संतांची सभा हीच सर्व सुंदर मंगलांचे मूळ असलेली अनुपम अयोध्या आहे. ॥ ३९ ॥
रामभगति सुरसरितहि जाई । मिली सुकीरति सरजु सुहाई ॥
सानुज राम समर जसु पावन । मिलेउ महानदु सोन सुहावन ॥
सुंदर कीर्तिरुपी शरयू ही रामभक्तिरुपी गंगेला जाऊन मिलाली. धाकटा भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांनी केलेल्या युद्धाचा पवित्र कीर्तिरुपी सुशोभित महानद शोण हाही तिच्यामध्ये मिळाला. ॥ १ ॥
जुग बिच भगति देवधुनि धारा । सोहति सहित सुबिरति बिचारा ॥
त्रिबिध ताप त्रासक तिमुहानी । राम सरुप सिंधु समुहानी ॥
दोन्ही प्रवाहांच्यामध्ये भक्तिरुपी गंगेचा प्रवाह हा ज्ञान व वैराग्य यांच्यासह शोभून दिसत आहे. अशी ही त्रितापांना भयभीत करणारी त्रिमुखी प्रयागरुप नदी श्रीरामस्वरुपरुपी समुद्राकडे जात आहे. ॥ २ ॥
मानस मूल मिली सुरसरिही । सुनत सुजन मन पावन करिही ॥
बिच बिच कथा बिचित्र बिभागा । जनु सरि तीर तीर बन बागा ॥
कीर्तिरुपी शरयूचे मूळ ( श्रीरामचरित्र ) ‘ मानस ‘ आहे आणि ही ( रामभक्तिरुपी ) गंगेस मिळाली आहे. म्हणून ही श्रवण करणार्‍या सज्जनांच्या मनास पवित्र करील. मधून-मधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर कथा आलेल्या आहेत, त्या जणू नदीतटाच्या आजूबाजूची वने व बागा आहेत. ॥ ३ ॥
उमा महेस बिबाह बराती । ते जलचर अगनित बहुभॉती ॥
रघुबर जनम अनंद बधाई । भवँर तरंग मनोहरताई ॥
पार्वती व शिव यांच्या विवाहातील वर्‍हाडी हे या नदीतील अनेक प्रकारचे असंख्य जलचर प्राणी आहेत. श्रीरामांच्या जन्माच्यावेळी आनंदाने केलेली अभिनंदने हीच या नदीतील भोवरे आणि तरंग यांची मनोहरता आहे. ॥ ४ ॥
दोहा—बालचरित चहु बंधु के बनज बिपुल बहुरंग ।
नृप रानी परिजन सुकृत मधुकर बारि बिहंग ॥ ४० ॥
चारही भावांची जी बालचरित्रे आहेत, तीच यातील रंगीबेरंगी विपुल कमल-पुष्पे आहेत. महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांची आणि कुटुंबियांची सत्कर्मे हेच भ्रमर व जल-पक्षी आहेत. ॥ ४० ॥
सीय स्वयंबर कथा सुहाई । सरित सुहावनि सो छबि छाई ॥
नदी नाव पटु प्रस्न अनेका । केवट कुसल उतर सबिबेका ॥
सीतेच्या स्वयंवराची जी सुंदर कथा आहे, तीच या नदीची सुंदर पसरलेली शोभा आहे. अनेक सुंदर विचारपूर्ण प्रश्न हेच नदीतील नौका आहेत आणि त्या प्रश्नांची विवेकयुक्त उत्तरे हे चतुर नावाडी होत. ॥ १ ॥
सुनि अनुकथन परस्पर होई । पथिक समाज सोह सरि सोई ॥
घोर धार भृगुनाथ रिसानी । घाट सुबद्ध राम बर बानी ॥
ही कथा श्रवण केल्यावर जी परस्पर चर्चा होते, ती म्हणजे या कडेकडेने चाललेल्या यात्रेकरुंचा समाज शोभून दिसत आहे. परशुरामांचा क्रोध या नदीमधील भयानक धार आहे आणि श्रीरामांची श्रेष्ठ वचने हे बांधलेले सुंदर घाट आहेत. ॥ २ ॥
सानुज राम बिबाह उछाहू । सो सुभ उमग सुखद सब काहू ॥
कहत सुनत हरषहिं पुलकाहीं । ते सुकृती मन मुदित नहाहीं ॥
भावांच्यासह श्रीरामचंद्रांच्या विवाहाचा उत्साह हाच या कथा-सरितेतील कल्याणकारक पूर आहे. तो सर्वांना सुख देणारा आहे. याचे कथन व श्रवण केल्याने जे हर्षित व पुलकित होतात, तेच पुण्यात्मे होत. तेच प्रसन्न चित्ताने या नदीमध्ये स्नान करतात. ॥ ३ ॥
राम तिलक हित मंगल साजा । परब जोग जनु जुरे समाजा ॥
काई कुमति केकई केरी । परी जासु फल बिपति घनेरी ॥
श्रीरामचंद्रांच्या राजतिलकासाठी जी सजावट केली होती, ती जणू पर्वाच्या प्रसंगी या नदीवर जमलेली यात्रेकरुंची गर्दी होय. कैकयीची कुबुद्धी ही या नदीतील साचलेले शेवाळ होय. त्यामुळे फार मोठे संकट कोसळले. ॥ ४ ॥
दोहा—समन अमित उतपात सब भरतचरित जपजाग ॥
कलि अघ खल अवगुन कथन ते जलमल बग काग ॥ ४१ ॥
सर्व असंख्य उत्पातांना शांत करणारे भरताचे चरित्र हा नदीतटावर केला जाणारा जप-यज्ञ होय. कलियुगातील पापांचे आणि दुष्टांच्या अवगुणांचे जे वर्णन आहे, तेच या नदीच्या जलातील चिखल आणि बगळे-कावळे होत. ॥ ४१ ॥
कीरति सरित छहूँ रितु रुरी । समय सुहावनि पावनि भूरी ॥
हिम हिमसैलसुता सिव ब्याहू । सिसिर सुखद प्रभु जनम उछाहू ॥
ही कीर्तिरुपी नदी सहाही ऋतूंमध्ये सुंदर असते. सर्व काळी ही परम शोभिवंत आणि अत्यंत पवित्र असते. यातील शिव-पार्वतीचा विवाह हा हेमंत ऋतू आहे. श्रीरामचंद्रांच्या जन्माचा उत्सव हा सुखदायक शिशिर ऋतु आहे. ॥ १ ॥
बरनब राम बिबाह समाजू । सो मुद मंगलमय रितुराजू ॥
ग्रीषम दुसह राम बनगवनू । पंथकथा खर आतप पवनू ॥
श्रीरामचंद्रांच्या विवाहप्रसंगी जमलेला समाज हाच आनंदमय व मंगलमय ऋतुराज वसंत आहे. श्रीरामांचे वनगमन हा असह्य ग्रीष्म ऋतू आहे आणि वनमार्गातील कथा हीच कडक ऊन व गरम हवा आहे.  ॥ २ ॥
बरषा घोर निसाचर रारी । सुरकुल सालि सुमंगलकारी ॥
राम राज सुख बिनय बडाई । बिसद सुखद सोइ सरद सुहाई ॥
राक्षसांबरोबर झालेले घोर युद्ध हाच वर्षा ऋतू आहे. तो देवकुलरुपी पिकासाठी सुंदर कल्याण करणारा आहे. श्रीरामांच्या राज्यकाळातील जे सुख, विनम्रता आणि महिमा आहे, तोच निर्मळ सुख देणारा सुशोभित शरद ऋतू होय. ॥ ३ ॥
सति सिरोमनि सिय गुन गाथा । सोइ गुन अमल अनूपम पाथा ॥
भरत सुभाउ सुसीतलताई । सदा एकरस बरनि न जाई ॥
पतिव्रता-शिरोमणी सीतेच्या गुणांची जी कथा आहे, तेच या जलाचा निर्मळ व अनुपमेय गुण आहे. भरताचा स्वभाव ही या नदीची सुंदर शीतलता आहे, ती नित्य एकसारखी असते आणि तिचे वर्णन करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा—अवलोकनि बोलनि मिलनि प्रीति परसपर हास ।
भायप भलि चहु बंधु की जल माधुरी सुबास ॥ ४२ ॥
चारी भावांनी परस्परांना पाहणे, बोलणे, भेटणे, एकमेकांवर प्रेम करणे, हसणे आणि त्यांचा सुंदर बंधु-भाव हे या जलाची गोडी आणि सुगंध होत. ॥ ४२ ॥
आरति बिनय दीनता मोरी । लघुता ललित सुबारि न थोरी ॥
अद्भुत सलिल सुनत गुनकारी । आस पिआस मनोमल हारी ॥
माझा आर्तभाव, विनय आणि दीनता हा या सुंदरव निर्मळ जळाचा काही कमी हलकेपणा नाही ! हे जल मोठे विलक्षण आहे. त्याचे ( माहात्म्य ) ऐकल्यानेच त्याचा गुण येतो आणि आशारुपी तहान व मनाची मलिनता ते दूर करते. ॥ १ ॥
राम सुप्रेमहि पोषत पानी । हरत सकल कलि कलुष गलनी ॥
भव श्रम सोषक तोषक तोषा । समन दुरित दुख दारिद दोषा ॥
हे जल श्रीरामचंद्रांचे सुंदर प्रेम पुष्ट करते. कलियुगातील सर्व पापे आणि त्यापासून होणारी पीडा हरण करते. ते संसाराचे ( जन्म-मृत्यु ) श्रम शोषून टाकते. संतोषालाही ते संतुष्ट करते आणि पाप, ताप, दारिद्र्य व दोष यांना नष्ट करते. ॥ २ ॥
काम कोह मद मोह नसावन । बिमल बिबेक बिराग बढावन ॥
सादर मज्जन पान किए तें । मिटहिं पाप परिताप हिए तें ॥
हे जल काम. क्रोध, मद आणि मोह यांचा नाश करणारे आणि निर्मल ज्ञान व वैराग्य वृद्धिंगत करणारे आहे. आदराने यामध्ये स्नान केल्याने आणि हे जल प्राशन केल्याने मनातील सर्व पाप-ताप नाहीसे होतात. ॥ ३ ॥   
जिन्ह एहिं बारि न मानस धोए । ते कायर कलिकाल बिगोए ॥
तृषित निरखि रबि कर भव बारी । फिरिहहिं  मृग जिमि जीव दुखारी ॥
ज्यांनी या ( रामकीर्तिरुपी ) जलाने आपले हृदय धुतले नाही, त्या भित्र्या लोकांना कलिकाळाने ठकविले. ज्याप्रमाणे तहानने व्याकूळ झालेले हरीण हे सूर्यकिरणे वाळूवर पडल्याने भासणार्‍या खोट्या पाण्याला खरे जल समजून पाणी पिण्यासाठी धावत जाते आणि पाणी न मिळाल्याने दुःखी होते, त्याप्रमाणे ते ( कलिकाळाद्वारे ठकविलेले ) जीवसुद्धा ( विषयांच्या मागे भटकून ) दुःखी होतील. ॥ ४ ॥
दोहा—मति अनुहारि सुबारि गुन गन गनि मन अन्हवाइ ।
सुमिरि भवानी संकरहि कह कबि कथा सुहाइ ॥ ४३ (क) ॥
आपल्या बुद्धीनुसार या सुंदर जलाच्या गुणांचा विचार करुन, त्याने आपल्या मनास स्नान घालून आणि भवानी-शंकर यांचे स्मरण करुन कवी ( तुलसीदास ) ही सुंदर कथा सांगत आहे. ॥ ४३ (क) ॥
अब रघुपति पद पंकरुह हियँ धरि पाइ प्रसाद ।
कहउँ जुगल मुनिबर्य कर मिलन सुभग संबाद ॥ ४३ (ख) ॥
मी आता श्रीरघुनाथांच्या चरण-कमलांना हृदयी धारण करुन आणि त्यांचा प्रसाद मिळवून दोन्ही श्रेष्ठ मुनींच्या भेटीतील सुंदर संवाद वर्णन करीत आहे. ॥ ४३ (ख) ॥
भरद्वाज मुनि बसहिं प्रयागा । तिन्हहि राम पद अति अनुरागा ॥
तापस सम दम दया निधाना । परमारथ पथ परम सुजाना ॥
भरद्वाज मुनी प्रयाग क्षेत्री राहात होते. त्यांची श्रीरामांच्या चरणी अत्यंत भक्ती होती. ते तपस्वी, मनोनिग्रही, जितेंद्रिय, दयेचे निधान आणि परमार्थ मार्गामध्ये अत्यंत निष्णात होते. ॥ १ ॥
माघ मकरगत रबि जब होई । तीरथपतिहिं आव कोई ॥
देव दनुज किंनर नर श्रेनीं । सादर मज्जहिं सकल त्रिबेनीं ॥
माघ महिन्यांत सूर्य जेव्हा मकर राशीत येतो, तेव्हा असंख्य लोक तीर्थराज प्रयाग क्षेत्री येत असत. देव, दैत्य, किन्नर आणि मानव हे सर्वजण येऊन आदराने त्रिवेणीमध्ये स्नान करीत असत. ॥ २ ॥
पूजहिं माधव पद जलजाता । परसि अखया बटु हरषहिं गाता ॥
भरद्वाज आश्रम अति पावन । परम रम्य मुनिबर मन भावन ॥
ते श्रीवेणीमाधवाचे पूजन करीत आणि अक्षयवटाला स्पर्श करीत. त्यामुळे त्यांचे शरीर रोमांचित होत असे. भरद्वाज मुनींचा आश्रम फारच पवित्र, अत्यंत रमणीय आणि थोर मुनींच्या मनाला आवडणरा होता. ॥ ३ ॥
तहॉ होइ मुनि रिषय समाजा । जाहिं जे मज्जन तीरथ राजा ॥
मज्जहिं प्रात समेत उछाहा । कहहिं परसपर हरि गुन गाहा ॥
त्या आश्रमात प्रयाग तीर्थात स्नान करणार्‍या ऋषि-मुनींचा मेळावा भरत असे.प्रातःकाळी सर्वजण उत्साहाने स्नान करीत आणि मग हरींच्या गुणांचे कथन परस्परांना करीत. ॥ ४ ॥
  दोहा—ब्रह्म निरुपन धरम बिधि बरनहिं तत्त्व बिभाग ।
कहहिं भगति भगवंत कै संजुत ग्यान बिराग ॥ ४४ ॥
ते सर्वजण ब्रह्म-निरुपण धर्माचे विधान आणि तत्त्वांचे विभाग यांचे वर्णन, विवेचन करीत व ज्ञान वैराग्ययुक्त भगवद्भक्ती सांगत ॥
एहि प्रकार भरि माघ नहाहीं । पुनि सब निज निज आश्रम जाहीं ॥
प्रति संबत अति होइ अनंदा । मकर मज्जि गवनहिं मुनिबृंदा ॥
अशाप्रकारे माघ महिनाभर सर्वजण स्नान करीत आणि आपापल्या आश्रमाकडे परतत. प्रत्येक वर्षी तेथे असा आनंदोत्सव चाले. मकर-संक्रांतीस स्नान करुन सर्वजण परत जात. ॥ १ ॥      
एक बार भरि मकर नहाए । सब मुनीस आश्रममन्ह सिधाए ॥
जागबलिक मुनि परम बिबेकी । भरद्वाज राखे पद टेकी ॥
एकदा पूर्ण मकर-संक्रांतीच्या पर्वातील स्नाने झाल्यावर सर्व मुनी आपआपल्या आश्रमाकडे परतले. मात्र भरद्वाजांनी परमज्ञानी याज्ञवल्क्यांचे चरण धरुन मोठ्या आग्रहाने त्यांना ठेवून घेतले. ॥ २ ॥
सादर चरन सरोज पखारे । अति पुनीत आसन बैठारे ॥
करि पूजा मुनि सुजसु बखानी । बोले अति पुनीत मृदु बानी ॥
त्यांनी आदराने त्यांची पाद्य-पूजा केली आणि त्यांना पवित्र आसन दिले. पूजा केल्यावर त्यांनी याज्ञवल्क्य मुनींच्या कीर्तीची वाखाणणी केली आणि अत्यंत पवित्र व गोड शब्दांत भरद्वाज मुनी त्यांना म्हणाले, ॥ ३ ॥
नाथ एक संसउ बड मोरें । करगत बेदतत्त्व सबु तोरें ॥
कहत सो मोहि लागत भय लाजा । जौं न कहउँ बड होइ अकाजा ॥
महाराज ! माझ्या मनात एक मोठा संशय आहे. वेदांची सर्व तत्त्वे आपल्याला करतलामलवत आहेत. पण माझ्या मनातला हा संशय आपल्यापुढे सांगताना मला भय आणि लाज वाटते. ( तुम्हांला असे वाटू नये की, मी तुमची परीक्षा घेत आहे, म्हणून भय वाटते आणि इतके आयुष्य सरले तरी ज्ञान झाले नाही, म्हणून लाज वाटते. ) मी जर विचारले नाही, तर माझे मोठे नुकसान होईल. ( कारण मी अज्ञानीच राहीन. ) ॥ ४ ॥
दोहा—संत कहहिं असि नीति प्रभु श्रुति पुरान मुनि गाव ।
होइ न बिमल बिबेक उर गुर सन किएँ दुराव ॥ ४५ ॥
हे प्रभो ! संत, वेद, पुराणे आणि मुनिजन असा उपदेश करतात की, गुरुपासून मनातले लपविले तर हृदयात सत्य ज्ञान प्रकट होत नाही. ॥ ४५ ॥
अस बिचारि प्रगटउँ निज मोहू । हरहु नाथ करि जन पर छोहू ॥
राम नाम कर अमित प्रभावा । संत पुरान उपनिषद गावा ॥
हाच विचार करुन मी आपले अज्ञान आपल्यासमोर मांडत आहे. आपण या सेवकावर कृपा करुन त्याचे निरसन करावे. रामनामाचा अपार प्रभाव आहे, असे संत, पुराणे, उपनिषदे यांनी म्हटले आहे. ॥ १ ॥
संतत जपत संभु अबिनासी । सिव भगवान ग्यान गुन रासी ॥
आकर चारि जीव जग अहहिं । कासीं मरत परम पद लहहीं ॥
कल्याणस्वरुपी ज्ञान आणि गुण यांचे भांडार असलेले अविनाशी भगवान शंकर हे रामनामाचा निरंतर जप करीत असतात. जगात चार प्रकारचे जीव आहेत. त्यातील जे जीव काशीत मृत्यू पावतात, त्यांना मोक्षाचीच प्राप्ती होते. ॥ २ ॥
सोपि राम महिमान मुनिराया । सिव उपदेसु करत करि दाया ॥
रामु कवन प्रभु पूछउँ तोही । कहिअ बुझाइ कृपानिधि मोही ॥
हे मुनिराज ! हाही रामनामाचाच महिमा आहे. कारण भगवान शंकर हे ( काशीमध्ये मरणार्‍याला ) दया करुन रामनामाचा उपदेश करीत असतात. ( त्यामुळे त्यांना परमपद मिळाले. ) तेव्हा हे महाराज ! मला विचारावेसे वाटते की, हे राम कोण आहेत ? हे कृपानिधान, हे मला समजावून सांगा ॥ ३ ॥
एक राम अवधेस कुमारा । तिन्ह कर चरित बिदित संसारा ॥
नारि बिरहँ दुखु लहेउ अपारा । भयउ रोषु रन रावनु मारा ॥
एक अयोध्यापती दशरथाचे पुत्र राम आहेत. त्यांचे चरित्र सर्व जगाला माहीत आहे. पत्नीच्या विरहामुळे त्यांनी अपार दुःख सहन केले आणि संतप्त झाल्यावर युद्धात रावणाला ठार मारले. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: