ShriRamCharitManas
मूळ श्लोक
मूलं धर्मतरोर्विवेकजलधेः
पूर्णेन्दामानन्ददं
वैराग्याम्बुजभास्करं
ह्यघघनध्वान्तापहम् ।
मोहाम्भोधरपूगपाटनविधौ
स्वःसम्भवं शङ्करं
वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं
श्रीरामभूपप्रियम् ॥
धर्मरुपी वृक्षाचे मूळ,
विवेकरुपी समुद्राला आनंदित करणारे पूर्णचंद्र, वैराग्यरुपी कमळाला विकसित करणारे
सूर्य, पापरुपी घोर अंधकार समूळ नष्ट करणारे, तिन्ही ताप हरण करणारे, मोहरुपी
मेघांच्या समूहाला छिन्न-भिन्न करण्याच्या क्रियेमध्ये आकाशात उत्पन्न होणार्या
वार्यासारखे ब्रह्मदेवांचे आत्मज, कलंकनाशक आणि महाराज श्रीरामचंद्रांना प्रिय
अशा श्रीशंकरांना मी वंदन करतो. ॥ १ ॥
सान्द्रानन्दपयोदसौभगतनुं
पीताम्बरं सुन्दरं
पाणौ बाणशरासनं
कटिलसत्तूणीरभारं वरम् ॥
राजीवायतलोचनं धृतजटाजूटेन
संशोभितं
सीतालक्ष्मणसंयुतं पथिगतं
रामाभिरामं भजे ॥
ज्यांचे शरीर सजल
मेघांसारखे सुंदर, श्यामल आणि आनंदघन आहे, ज्यांनी सुंदर वल्कलाचे पीतांबर धारण
केले आहे, ज्यांच्या हातांमध्ये धनुष्य-बाण आहेत, ज्यांच्या कमरेला उत्तम भाले
शोभून दिसत आहेत, ज्यांचे कमलासमान विशाल नेत्र आहेत आणि ज्यांनी मस्तकावर जटाजूट
धारण केला आहे, त्या अत्यंत शोभायमान श्रीसीता व लक्ष्मण यांच्यासह मार्गाने
निघालेल्या आनंद देणार्या श्रीरामचंद्रांना मी भजतो. ॥ २ ॥
सोपान १
सो०—उमा राम गुन गूढ़ पंडित मुनि पावहिं बिरति ।
पावहिं मोह बिमूढ़ जे हरि बिमुख न धर्म रति ॥
श्रीशंकर म्हणतात, ‘ हे पार्वती, श्रीरामांचे गुण गूढ आहेत.
पंडित व मुनी ते जाणून वैराग्य प्राप्त करतात. परंतु जे लोक भगवंताशी विन्मुख
असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नाही, ते महामूर्ख लोक त्यांची लीला ऐकून
त्यावर विश्र्वास ठेवत नाहीत. ॥ १ ॥
पुर नर भरत प्रीति मैं गाई । मति अनुरुप अनूप सुहाई ॥
अब प्रभु चरित सुनहु अति पावन । करत जे बन सुर नर मुनि भावन
॥
अयोध्या व मिथिलावासींच्या तसेच भरताच्या अनुपम आणि सुंदर
प्रेमाचे गायन मी आपल्या बुद्धीप्रमाणे केले. आता देव, मनुष्य आणि मुनी यांच्या
मनाला आवडणारे प्रभू श्रीरामचंद्रांचे वनात घडलेले अत्यंत पवित्र चरित्र ऐक. ॥ १ ॥
एक बार चुनि कुसुम सुहाए । निज कर भूषन राम बनाए ॥
सीतहि पहिराए प्रभु सादर । बैठे फटिक सिला पर सुंदर ॥
एकदा सुंदर फुले वेचून श्रीरामांनी आपल्या हातांनी तर्हेतर्हेचे
अलंकार बनविले आणि सुंदर स्फटिक शिळेवर बसलेल्या प्रभूंनी मोठ्या प्रेमाने ते
सीतेला घातले. ॥ २ ॥
सुरपति सुत धरि बायस बेषा । सठ चाहत रघुपति बल देखा ॥
जिमि पिपीलिका सागर थाहा । महा मंदमति पावन चाहा ॥
देवराज इंद्राचा नीच मूर्ख पुत्र जयंत हा कावळ्याचे रुप
घेऊन श्रीरघुनाथांचे सामर्थ्य पाहू इच्छित होता, ज्याप्रमाणे निर्बुद्ध मुंगी
समुद्राचा थांग पाहू इच्छिते. ॥ ३ ॥
सीता चरन चोंच हति भागा । मूढ़ मंदमति कारन कागा ॥
चला रुधिर रघुनायक जाना । सींक धनुष सायक संधाना ॥
तो मूर्ख व मंदबुद्धीमुळे भगवंतांच्या बळाची परीक्षा
घेण्यासाठी बनलेला कावळा सीतेच्या चरणांवर चोच मारुन पळाला. जेव्हा रक्त वाहू
लागले, तेव्हा श्रीरामांनी ते पाहिले व धनुष्यावर बोरुचा बाण लावून सोडला. ॥ ४ ॥
दोहा—अति कृपाल रघुनायक सदा दीन पर नेह ।
ता सन आइ कीन्ह छलु मूरख अवगुन गेह ॥ १ ॥
श्रीरघुनाथ हे अत्यंत कृपाळू आहेत आणि त्यांचे
दीनांवर नेहमी प्रेम असते, त्यांच्याशीही अवगुणांचे घर असलेल्या त्या मूर्ख
जयंताने कपट केले. ॥ १ ॥
प्रेरित मंत्र ब्रह्मसर धावा । चला भाजि बायस भय
पावा ॥
धरि निज रुप गयउ पितु पाहीं । राम बिमुख राखा
तेहि नाहीं ॥
मंत्राने प्रेरित असलेला तो ब्रह्मबाण सुसाट
निघाला. कावळा घाबरुन पळू लागला. तो आपले खरे रुप घेऊन इंद्राकडे गेला, परंतु
श्रीरामांचा तो विरोधी असल्याचे पाहून इंद्राने त्याला जवळ केले नाही. ॥ १ ॥
भा निरास उपजी मन त्रासा । जथा चक्र भय रिषि
दुर्बासा ॥
ब्रह्मधाम सिवपुर सब लोका । फिरा श्रमित ब्याकुल
भय सोका ॥
तेव्हा तो निराश झाला. ज्याप्रमाणे दुर्वास
ऋषीला चक्र पाठीमागे लागल्यामुळे भीती वाटली, त्याप्रमाणे जयंताच्या मनाला भय वाटू
लागले. तो ब्रह्मलोक, शिवलोक इत्यादी सर्व लोकांमध्ये थकून व भय-शोकाने व्याकूळ
होऊन पळत निघाला. ॥ २ ॥
काहूँ बैठन कहा न ओही । राखि को सकइ राम कर
द्रोही ॥
मातु मृत्यु पितु समन समाना । सुधा होइ बिष सुनु
हरिजाना ॥
परंतु कुणी त्याला बसायलाही सांगितले नाही.
श्रीरामांच्या शत्रूला कोण जवळ करणार ? काकभुशुंडी म्हणाले, ‘ हे गरुडा, अशा
व्यक्तीला माता ही मृत्यु सारखी, पिता हा यमासारखा आणि अमृत हे विषासारखे बनते. ॥
३ ॥
मित्र करइ सत रिपु कै करनी । ता कहँ बिबुधनदी
बैतरनी ॥
सब जगु ताहि अनलहु ते ताता । जो रघुबीर बिमुख
सुनु भ्राता ॥
मित्र त्याच्याशी शेकडो शत्रूंप्रमाणे वागू
लागले. देवनदी गंगा ही त्याच्यासाठी यमपुरीची वैतरणी नदी बनते. हे बंधू, ऐक. जो
श्रीरघुनाथांशी विन्मुख होतो, त्याला संपूर्ण जग हे अग्नीपेक्षाही अधिक होरपळवणारे
होते.’ ॥ ४ ॥
नारद देखा बिकल जयंता । लागि दया कोमल चित संता ॥
पठवा तुरत राम पहिं ताही । कहेसि पुकारि प्रनत
हित पाही ॥
नारदांनी जेव्हा व्याकूळ जयंताला पाहिले,
तेव्हा त्यांना दया आली. कारण संतांचे मन मोठे कोमल असते. त्यांनी त्याची समजूत
घालून त्याला तत्काळ श्रीरामांच्याकड़े पाठविले. त्यांनी त्याला सांगितले की, तू
श्रीरामांना जाऊन असे म्हण की, ‘ हे शरणागतांचे हितकारी, मला वाचवा.’ ॥ ५ ॥
आतुर सभय गहेसि पद जाई । त्राहि त्राहि दयाल
रघुराई ॥
अतुलित बल अतुलित प्रभुताई । मैं मतिमंद जानि
नहिं पाई ॥
व्याकूळ व भयभीत झालेल्या जयंताने जाऊन
श्रीरामांचे पाय धरले व म्हटले, ‘ हे दयाळू रघुनाथा, रक्षण करा. तुमचे अतुल्य बळ व
अतुल्य सत्ता माझ्या मंदबुद्धीला ओळखता आली नाही. ॥ ६ ॥
निज कृत कर्म जनित फल पायउँ । अब प्रभु पाहि सरन
तकि आयउँ ॥
सुनि कृपाल अति आरत बानी । एकनयन करि तजा भवानी ॥
आपल्या कर्माचे फळ मला मिळाले. आता हे प्रभू.
माझे रक्षण करा. मी केवळ तुमचाच आश्रय पाहून आलो आहे.’ श्रीशिव म्हणतात, हे
पार्वती, कृपाळू श्रीरघुनाथांनी त्याचे अत्यंत दुःखाचे बोलणे ऐकून त्याला एकाक्ष करुन
सोडून दिले. ॥ ७ ॥
कीन्ह मोह बस द्रोह जद्यपि तेहि कर बध उचित ।
प्रभु छाड़ेउ करि
छोह को कृपाल रघुबीर सम ॥ २ ॥
त्याने मूर्खपणाने खोडी काढली होती, म्हणून
त्याचा वध करणेच योग्य होते; परंतु प्रभूंनी कृपा करुन त्याला सोडून दिले.
श्रीरामांच्यासारखा कृपाळू दुसरा कोण असणार ? ॥ २ ॥
रघुपति चित्रकूट बसि नाना । चरित किए श्रुति सुधा
समाना ॥
बहुरि राम अस मन अनुमाना । होइहि भीर सबहिं मोहि
जाना ॥
चित्रकूटामध्ये राहून श्रीरघुनाथांनी अनेक
लीला केल्या, त्या कानांनी ऐकण्यास अमृतासारख्या गोड आहेत. काही काळांनंतर
श्रीरामांना वाटले की, सर्व लोकांना मी कळून आलो आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी
होईल. ॥ १ ॥स
सकल मुनिन्ह सन बिदा कराई । सीता सहित चले द्वौ
भाई ॥
अत्रि के आश्रम जब प्रभु गयऊ । सुनत महामुनि
हरषित भयऊ ॥
म्हणून सर्व मुनींचा निरोप घेऊन व सीतेला
बरोबर घेऊन दोघे बंधू निघाले. जेव्हा प्रभू अत्रिमुनींच्या आश्रमात आले, तेव्हा
त्यांच्या आगमनाची वार्ता ऐकून महामुनींना आनंद झाला. ॥ २ ॥
पुलकित गात अत्रि उठि धाए । देखि रामु आतुर चलि
आए ।
करत दंडवत मुनि उर लाए । प्रेम बारि द्वौ जन
अन्हवाए ॥
त्यांचे शरीर पुलकित झाले. अत्री मुनि उठून धावत गेले. ते धावत येत
असल्याचे पाहून श्रीराम आणखी वेगाने पुढे गेले दंडवत करीत असतानाच मुनींनी
श्रीरामांना उठवून हृदयाशी धरले आणि प्रेमाश्रूंनी दोघा बंधूंना न्हाऊ घातले. ॥ ३
॥
देखि राम छबि नयन जुड़ाने । सादर निज आश्रम तब आने
॥
करि पूजा कहि बचन सुहाए । दिए मूल फल प्रभु मन
भाए ॥
श्रीरामांचे सौंदर्य पाहून मुनींचे नेत्र
तृप्त झाले. ते त्यांना आदराने आश्रमात घेऊन आले. पूजा केल्यावर सुंदर बोलून
मुनींनी मुळे-फळे दिली, ती प्रभूंना खूप आवडली. ॥ ४ ॥
सो०—प्रभु आसन आसीन भरि लोचन सोभा निरखि ।
मुनिबर परम प्रबीन जोरि पानि अस्तुति करत ॥ ३ ॥
प्रभू आसनावर विराजमान झाले. डोळे भरुन त्यांचे
लावण्य पाहून ज्ञानी मुनिश्रेष्ठ हात जोडून स्तुती करु
लागले. ॥ ३ ॥
No comments:
Post a Comment