Showing posts with label बालकाण्ड. Show all posts
Showing posts with label बालकाण्ड. Show all posts

Sunday, July 12, 2020

ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७


ShriRamcharitmans Part 27 श्रीरामचरितमानस भाग २७ 
दोहा १६६ ते १६९ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—होहिं बिप्र बस कवन बिधि कहहु कृपा करि सोउ ।
तुम्ह तजि दीनदयाल निज हितू न देखउँ कोउ ॥ १६६ ॥
ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील, तेही कृपा करुन मला सांगा. हे दीनदयाळू, तुम्हांला सोडून दुसर्‍या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही,’ ॥ १६६ ॥
सुनु नृप बिबिध जतन जग माहीं । कष्टसाध्य पुनि होहिं कि नाहीं ॥
अहइ एक अति सुगम उपाई ॥ तहाँ परंतु एक कठिनाई ॥
( तपस्वी म्हणाला, ) ‘ हे राजा, जगात अनेक उपाय आहेत, परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील ( सांगता येत नाहीं. ) एक उपाय फार सोपा आहे, परंतु त्यातही एक अडचण आहे. ॥ १ ॥
मम आधीन जुगुति नृप सोई । मोर जाब तव नगर न होई ॥
आजु लगें अरु जब तें भयउँ । काहू के गृह ग्राम न गयऊँ ॥
हे राजा, ती युक्ती माझ्याजवळ आहे. पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही. जेव्हापासून मी उत्पन्न झालो, तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही. ॥ २ ॥
जौं न जाउँ तव होइ अकाजू । बन आइ असमंजस आजू ॥
सुनि महीस बोलेउ मृदु बानी । नाथ निगम असि नीति बखानी ॥
परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल. आज मी मोठ्या पेचांत सापडलो आहे.’ हे ऐकून राजा मृदु स्वरात म्हणाला, ‘ हे नाथ, वेदांमध्ये असे सांगितले आहे की, ॥ ३ ॥
बड़े सनेह लघुन्ह पर करहीं । गिरि निज सिरनि सदा तृन धरहीं ॥
जलधि अगाध मौलि बह फेनू । संतत धरनि धरत सिर रेनू ॥
मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच. पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात. खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते.’ ॥ ४ ॥
दोहा—अस कहि गहे नरेस पद स्वामी होहु कृपाल ।
मोहि लागि दुख सहिअ प्रभु सज्जन दीनदयाल ॥ १६७ ॥
असे म्हणून राजाने  मुनीचे पाय धरले. ( आणि म्हटले, ) ‘ हे स्वामी, कृपा करा. तुम्ही संत आहात. दीनदयाळ आहात. म्हणून हे प्रभो, माझ्यासाठी एवढा त्रास जरुर सोसा. ॥ १६७ ॥
 जानि नृपहि आपन आधीन । बोला तापस कपट प्रबीना ॥
सत्य कहउँ भूपति सुनु तोही । जग नाहिन दुर्लभ कछु मोही ॥
राजा आपल्या पूर्ण अधीन झाला आहे, हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला, ‘ हे राजा ! ऐक. मी तुला खरे सांगतो. या जगात मला काहीही कठीण नाही. ॥ १ ॥
अवसि काज मैं करिहउँ तोरा । मन तन बचन भगत तैं मोरा ॥
जोग जुगुति तप मंत्र प्रभाऊ । फलइ तबहिं जब करिअ दुराऊ ॥
मी तुझे काम नक्की करीन. कारण तू कायावाचामनाने माझा भक्त झाला आहेस. परंतु योग, युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो. ॥ २ ॥
जौं नरेस मैं करौं रसोई । तुम्ह परुसहु मोहि जान न कोई ॥
अन्न सो जोइ जोइ भोजन करई । सोइ सोइ तव आयसु अनुसरई ॥
हे राजा ! मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला, पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही, तर मग ते अन्न जो खाईल, तो तो तुमचा आज्ञाधारक होईल. ॥ ३ ॥
पुनि तिन्ह के गृह जेवँइ जोऊ । तव बस होइ भूप सुनु सोऊ ॥
जाइ उपाय रचहु नृप एहू । संबत भरि संकलप करेहू ॥
एवढेच नव्हे, तर त्यांच्या घरीसुद्धा जो कोणी हे भोजन करील, हे राजा, तो सुद्धा तुझ्या अधीन होईल. हे राजा, जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर. ॥ ४ ॥
दोहा—नित नूतन द्विज सहस सत बरेहु सहित परिवार ।
मैं तुम्हरे संकलप लगि दिनहिं करबि जेवनार ॥ १६८ ॥
नित्य नव्या एक लाख ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर. मी तुझ्या संकल्पापर्यंत ( वर्षभर ) रोज स्वयंपाक करीन. ॥ १६८ ॥
एहि बिधि भूप कष्ट अति थोरें । होइहहिं सकल बिप्र बस तोरें ॥
करिहहिं बिप्र होम मख सेवा । तेहिं प्रसंग सहजेहिं बस देवा ॥
हे राजा,अशा प्रकारे फार थोड्या श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील. ब्राह्मण हवन, यज्ञ आणि सेवा-पूजा करतील, त्यामुळे देवसुद्धा सहजपणे वश होतील. ॥ १ ॥
और एक तोहि कहउँ लखाऊ । मैं एहि बेष न आउब काऊ ॥
तुम्हरे उपरोहित कहुँ राया । हरि आनब मैं करि निज माया ॥
मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो. मी या रुपात कधीही येणार नाही. हे राजा, मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन. ॥ २ ॥
तपबल तेहि करि आपु समाना । रखिहउँ इहाँ बरष परवाना ॥
मैं धरि तासु बेषु सुनु राजा । सब बिधि तोर सँवारब काजा ॥
तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून एक वर्ष येथे ठेवून घेईन आणि हे राजा, मी त्याचे रुप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन. ॥ ३ ॥
गै निसि बहुत सयन अब कीजे । मोहि तोहि भूप भेंट दिन तीजे ॥
मैं तपबल तोहि तुरग समेता । पहुँचैहउँ सोवतहि निकेता ॥
हे राजा, रात्र फार झाली आहे, आता झोप. आजपासून तिसर्‍या दिवशी माझी-तुझी भेट होईल. तपोबलाने मी तुला घोड्यासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन. ॥ ४ ॥
दोहा—मैं आउब सोइ बेषु धरि पहिचानेहु तब मोहि ।
जब एकांत बोलाइ सब कथा सुनावौं तोहि ॥ १६९ ॥
मी तो पुरोहिताचा वेष घेऊन येईन. जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्टी सांगेन, तेव्हा तू मला ओळखशील.’ ॥ १६९ ॥
सयन कीन्ह नृप आयसु मानी । आसन जाइ बैठ छलग्यानी ॥
श्रमित भूप निद्रा अति आई । सो किमि सोव सोच अधिकाई ॥
राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला. राजा थकला होता, त्याला फार गाढ झोप आली. पण तो कपटी कसा झोपणार ? त्याला फार काळजी वाटत होती. ॥ १ ॥
कालकेतु निसिचर तहँ आवा । जेहिं सूकर होइ नृपहि भुलावा ॥
परम मित्र तापस नृप केरा । जानइ सो अति कपट घनेरा ॥
त्याच वेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला. त्याने डुक्कराचे रुप घेऊन राजाची दमछाक केली होती. तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपट विद्येत निष्णात होता. ॥ २ ॥
तेहि के सत सुत अरु दस भाई । खल अति अजय देव दुखदाई ॥
प्रथमहिं भूप समर सब मारे । बिप्र संत सुर देखि दुखारे ॥
त्याला शंभर मुले आणि दहा भाऊ होते. ते फार दुष्ट व अजिंक्य होते. देवांना दुःख देणारे होते. ब्राह्मण, संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रतापभानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारुन टाकले होते. ॥ ३ ॥
तेहिं खल पाछिल बयरु सँभारा । तापस नृप मिलि मंत्र बिचारा ॥
जेहिं रिपु छय सोइ रचेन्हि उपाऊ । भावी बस न जान कछु राऊ ॥
त्या दुष्टाने पूर्वींचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी-

राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि

 शत्रूचा नाश ज्याप्रमाणे होईल, तो उपाय योजला.

 भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा ( प्रतापभानू ) 

काहीही समजू शकला नाही. ॥ ४ ॥


Custom Search

ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६


ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६ 
दोहा १६२ ते १६५ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—आदिसृष्टि उपजी जबहिं तब उतपति भै मोरि ।
नाम एकतनु हेतु तेहि देह न धरी बहोरि ॥ १६२ ॥
तो कपटी मुनी म्हणाला, ‘ जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती, तेव्हा माझी उत्पत्ती झाली होती. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही. म्हणून माझे नाव ‘ एकतनू ‘ असे आहे. ॥ १६२ ॥
जनि आचरजु करहु मन माहीं । सुत तप तें दुर्लभ कछु नाहीं ॥
तपबल तें जग सृजइ बिधाता । तपबल बिष्नु भए परित्राता ॥
हे पुत्रा, मनात आश्र्चर्य करु नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत. ॥ १ ॥
तपबल संभु करहिं संघारा । तप तें अगम न कछु संसारा ॥
भयउ नृपहि सुनि अति अनुरागा । कथा पुरातन कहै सो लागा ॥
तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष् नाही. ‘ हे ऐकून राजाला ( त्याच्याविषयी अतिशय ) प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला. ॥ २ ॥
करम धरम इतिहास अनेका । करइ निरुपन बिरति बिबेका ॥
उदभव पालन प्रलय कहानी । कहेसि अमित आचरज बखानी ॥
कर्म, धर्म आणि अनेक तर्‍हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरुपण करु लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्र्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या. ॥ ३ ॥
सुनि महीप तापस बस भयऊ । आपन नाम कहन तब लयऊ ॥
कह तापस नृप जानउँ तोही । कीन्हेहु कपट लाग भल मोही ॥
त्या ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग त्याला तो आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, ‘ राजा मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले. ॥ ४ ॥
सो—सुनु महीस असि नीति जहँ तहँ नाम न कहहिं नृप ।
मोहि तोहि पर अति प्रीति सोइ चतुरता बिचारि तव ॥ १६३ ॥
हे राजन, ऐक. नीती असे सांगते की, राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. ॥ १६३ ॥
नाम तुम्हार प्रताप दिनेसा । सत्यकेतु तव पिता नरेसा ॥
गुर प्रसाद सब जानिअ राजा । कहिअ न आपन जानि अकाजा ॥
तुझे नाव प्रतापभानू आहे. महाराज सत्यकेतू तुझे वडील होते. हे राजन, गुरुंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही. ॥ १ ॥
देखि ताततव सहज सुधाई । प्रीति प्रतीति नीति निपुनाई ॥
उपजि परी ममता मन मोरें । कहउँ कथा निज पूछे तोरें ॥
 हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीति-निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो. ॥ २ ॥
अब प्रसन्न मैं संसय नाहीं । मागु जो भूप भाव मन माहीं ॥
सुनि सुबचन भूपति हरषाना । गहि पद बिनय कीन्हि बिधि नाना ॥
आता मी खूष आहे, यात शंका बाळगू नकोस. ‘ हे राजन, मनात जे येईल, ते मागून घे. ‘ हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली. ॥ ३ ॥
कृपासिंधु मुनि दरसन तोरें । चारि पदारथ करतल मोरें ॥
प्रभुहि तथापि प्रसन्न बिलोकी । मागि अगम बर होउँ असोकी ॥
‘ हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनानेच चारी पुरुषार्थ ( धर्म, अर्थ, काम, मोक्ष ) माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की, मी शोकरहित व्हावे. ॥ ४॥
दोहा—जरा मरन दुख रहित तनु समर जितै जनि कोउ ।
एकछत्र रिपुहीन महि राज कलप सत होउ ॥ १६४ ॥
माझे शरीर वृद्धावस्था, मृत्यु आणि दुःखाने रहित होवो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे शंभर कल्प एकछत्री राज्य असावे.’ ॥ १६४ ॥
कह तापस नृप ऐसेइ होऊ । कारन एक कठिन सुनु सोऊ ॥
कालउ तुअ पद नाइहि सीसा । एक बिप्रकुल छाड़ि महीसा ॥
तपस्वी म्हणाला, ‘ हे राजन, ‘ तथास्तु ‘ परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीच्या स्वामी, फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील. ॥ १ ॥
तपबल बिप्र सदा बरिआरा । तिन्ह के कोप न कोउ रखवारा ॥
जौं बिप्रन्ह बस करहु नरेसा । तौ तुअ बस बिधि बिष्नु महेसा ॥
तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस, तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील. ॥ २ ॥
चल न ब्रह्मकुल सन बरिआई । सत्य कहउँ दोउ भुजा उठाई ॥
बिप्र श्राप बिनु सुनु महिपाला । तोर नास नहिं कवनेहुँ काला ॥
ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारुन सत्य सांगतो. हे राजा, ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही.’ ॥ ३ ॥
हरषेउ राउ बचन सुनि तासू । नाथ न होइ मोर अब नासू ॥
तव प्रसाद प्रभु कृपानिधाना । मो कहुँ सर्ब काल कल्याना ॥
राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘ हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल.’ ॥ ४ ॥
एवमस्तु कहि कपटमुनि बोला कुटिल बहोरि ।
मिलब हमार भुलाब निज कहहु त हमहि न खोरि ॥ १६५ ॥
‘ असेच होईल ‘, असे म्हणून तो कुटिल मुनी म्हणाला, ‘ परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास, ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस, तर मग ( वर सफल न झाल्यास ) आमचा दोष नाही. ॥ १६५ ॥
तातें मैं तोहि बरजउँ राजा । कहें कथा तव परम अकाजा ॥
छठें श्रवन यह परत कहानी । नास तुम्हार सत्य मम बानी ॥
हे राजा, मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की, हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्य वचन समज. ॥ १ ॥
यह प्रगटें अथवा द्विजश्रापा । नास तोर सुनु भानुप्रतापा ॥
आन उपायँ निधन तव नाहीं । जौं हरि हर कोपहिं मन माहीं ॥
हे प्रतापभानू, ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी (ब्रह्मदेव ), विष्णू, शंकर हेसुद्धा तुझ्यावर रागावले, तरी तुला मृत्यु येणार नाही.’ ॥ २ ॥स
सत्य नाथ पद गहि नृप भाषा । द्विज गुर कोप कहहु को राखा ॥
राखइ गुर जौं कोप बिधाता । गुर बिरोध नहिं कोउ जग त्राता ॥
राजाने मुनीचे पाय धरुन म्हटले, ‘ हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरुच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार ? सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले, तरी गुरु वाचवितो, पण गुरु रागावले, तर जगात कोणीही वाचविणारा नाही. ॥ ३ ॥
जौं न चलब हम कहे तुम्हारें । होउ नास नहिं सोच हमारें ॥
एकहिं डर डरपत मन मोरा । प्रभु महिदेव श्राप अति घोरा ॥
जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही, तर 

खुशाल 

मला मृत्यु येवो. मला त्याची काळजी नाही. पण माझ्या 

मनात एकच भीती आहे. ती म्हणजे ब्राह्नणांचा शाप 

भयंकर असतो. ॥ ४ ॥


Custom Search

Saturday, July 11, 2020

ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५


ShriRamcharitmans Part 25 श्रीरामचरितमानस भाग २५ 
दोहा १५८ ते १६१ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—भूपति तृषित बिलोकि तेहिं सरबरु दीन्ह देखाइ ।
मज्जन पान समेत हय कीन्ह नृपति हरषाइ ॥ १५८ ॥
राजा तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करुन पाणी पिऊन घेतले. ॥ १५८ ॥
गै श्रम सकल सुखी नृप भयऊ । निज आश्रम तापस लै गयऊ ॥
आसन दीन्ह अस्त रबि जानी । पुनि तापस बोलेउ मृदु बानी ॥
त्याचा थकवा दूर झाला, त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दांत त्याला विचारले, ॥ १ ॥
को तुम्ह कस बन फिरहु अकेलें । सुंदर जुबा जीव परहेलें ॥
चक्रबर्ति के लच्छन तोरें । देखत दया लागि अति मोरें ॥
‘ तुम्ही कोण आहात ? सुंदर तरुण असतांना जिवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहत ? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते.’ ॥ २ ॥
नाम प्रतापभानु अवनीसा । तासु सचिव मैं सुनहु मुनीसा ॥
फिरत अहेरें परेउँ भुलाई । बड़ें भाग देखेउँ पद आई ॥
राजा म्हणाला, ‘ हे मुनीश्र्वरा. ऐका. प्रतापभानू नावाचा एक राजा आहे, त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले. ॥ ३ ॥
हम कहँ दुर्लभ दरस तुम्हारा । जानत हौं कछु भल होनिहारा ॥
कह मुनि तात भयउ अँधिआरा । जोजन सत्तरि नगरु तुम्हारा ॥
मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की, आता काही चांगले घडणार आहे. ‘ मुनी म्हणाला, ‘ अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून सत्तर योजने दूर आहे. ॥ ४ ॥
दोहा—निसा घोर गंभीर बन पंथ न सुनहु सुजान ।
बसहु आजु अस जानि तुम्ह जाएहु होत बिहान ॥ १५९ ( क) ॥
हे शहाण्या गृहस्था ! माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे. जंगल घनदाट आहे, वाट नाही, म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा.’ ॥ १५९ ( क ) ॥
तुलसी जसि भवतब्यता तैसी मिलइ सहाइ ।
आपुनु आवइ ताहि पहिं ताहि तहाँ लै जाइ ॥ १५९ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, नशिबात जसे घडणार असते, तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणहून तिच्याजवळ जाता, किंवा ती तुम्हांला तेथे घेऊन जाते. ॥ १५९ ( ख ) ॥
भलेहिं नाथ आयसु धरि सीसा । बाँधि तुरग तरु बैठ महीसा ॥
नृप बहु भाँति प्रसंसेउ ताही । चरन बंदि निज भाग्य सराही ॥
( राजा म्हणाला, ) ‘ हे स्वामी ! फार छान. ‘ असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करुन तो आपल्या भाग्याची वाखाणणी करु लागला. ॥ १ ॥
पुनि बोलेउ गिरा सुहाई । जानि पिता प्रभु करउँ ढिठाई ॥
मोहि मुनीस सुत सेवक जानी । नाथ नाम निज कहहु बखानी ॥
नंतर तो गोड वाणीने म्हणाला की, ‘ हे प्रभो, मी तुम्हांला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्र्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव, गाव सविस्तर सांगा. ‘ ॥ २ ॥
तेहि न जान नृप नृपहि सो जाना । भूप सुहृद सो कपट सयाना ॥
बैरी पुनि छत्री पुनि राजा । छल बल कीन्ह चहइ निज काजा ॥
राजाने त्या कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने ( मुनीने ) राजाला ओळखले होते. राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यात क्षत्रिय जातीचा, शिवाय राजा. तो कपटाने आपले काम करु पाहात होता. ॥ ३ ॥
समुझि राजसुख दुखित अराती । अवाँ अनल इव सुलगइ छाती ॥
सरल बचन नृप के सुनि काना । बयर सँभारि हृदयँ हरषाना ॥
तो ( मुनिवेषधारी ) शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधे-भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरुन तो आनंदात होता. ॥ ४ ॥
दोहा—कपट बोरि बानी मृदुल बोलेउ जुगुति समेत ।
नाम हमार भिखारि अब निर्धन रहित निकेत ॥ १६० ॥
तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, ‘ आता आमचे नाव ‘ भिकारी ‘ आहे, कारण आम्ही निर्धन व घर-दार नसलेले आहोत.’ ॥ १६० ॥
कह नृप जे बिग्यान निधाना । तुम्ह सारिखे गलित अभिमाना ॥
सदा रहहिं अपनपौ दुराएँ । सब बिधि कुसल कुबेष बनाएँ ॥
राजा म्हणाला, ‘ तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात, ते आपले खरे स्वरुप नेहमी लपवून ठेवतात. कारण दीन वेष धारण करुन राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे. ( प्रकटपणे संतवेष असल्यास मान-सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची ) ॥ १ ॥
तेहि तें कहहिं संत श्रुति टेरें । परम अकिंचन प्रिय हरि केरें ॥
तुम्ह सम अधन भिखारि अगेहा । होत बिरंचि सिवहि संदेहा ॥
यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की, परम अकिंचन ( पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित ) लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो ( की हे खरे संत आहेत की भिकारी. ॥ २ ॥
जोसि सोसि तव चरन नमामी । मो पर कृपा करिअ अब स्वामी ॥
सहज प्रीति भूपति कै देखी । आपु बिषय बिस्वास बिसेषी ॥
तुम्ही जे असाल ते असा. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा. ‘ आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्याविषयीचा त्याचा विश्र्वास पाहून, ॥ ३ ॥
सब प्रकार राजहि अपनाई । बोलेउ अधिक सनेह जनाई ॥
सुनु सतिभाउ कहउँ महिपाला । इहाँ बसत बीते बहु काला ॥
सर्व प्रकारे राजाला आपल्या वश करुन घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो ( कपटी तपस्वी ) म्हणाला, ‘ हे राजा, ऐक. मी तुला खरे सांगतो. की, मला येथे राहून बराच काळ लोटला. ॥ ४ ॥
दोहा—अब लगि मोहि न मिलेउ कोउ मैं न जनावउँ काहु ।
लोकमान्यता अनल सम कर तप कानन दाहु ॥ १६१ ( क ) ॥
आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही. कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरुपी वन भस्म करुन टाकले,’ ॥ १६१ ( क ) ॥
सो०—तुलसी देखि सुबेषु भूलहिं मूढ़ न चतुर नर ।
सुंदर केकिहि पेखु बचन सुधा सम असन अहि ॥ १६१ ( ख ) ॥
तुलसीदास म्हणतात की, ‘ सुंदर वेष पाहून मूर्खच नव्हे, तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना ! त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो.’ ॥ १६१ ( ख ) ॥
तातें गुपुत रहउँ जग माहीं । हरि तजि किमपि प्रयोजन नाहीं ॥
प्रभु जानत सब बिनहिं जनाएँ । कहहु कवनि सिधि लोक रिझाएँ ॥
कपट-स्वामी म्हणाला की,’ यासाठी मी जगापासून लपून राहातो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग. जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार ? ॥ १ ॥
तुम्ह सुचि सुमति परम प्रिय मोरें । प्रीति प्रतीति मोहि पर तोरें ॥
अब जौं तात दुरावउँ तोही । दारुन दोष घटइ अति मोही ॥
तू पवित्र व सद्बुद्धिचा आहेस. त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे ! आता जर  मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन, तर मला भयंकर पाप लागेल. ‘ ॥ २ ॥
जिमि जिमि तापसु कथइ उदासा । तिमि तिमि नृपहि उपज बिस्वासा ॥
देखा स्वबस कर्म मन बानी । तब बोला तापस बगध्यानी ॥
तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता, तसातसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणार्‍या ( कपटी ) मुनीने राजाला कायावाचामनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, ॥ ३ ॥
नाम हमार एकतनु भाई । सुनि नृप बोलेउ पुनि सिरु नाई ॥
कहहु नाम कर अरथ बखानी । मोहि सेवक अति आपन जानी ॥
‘ हे बंधो, आमचे नांव एकतनू आहे. ‘ हे ऐकून राजाने 

मस्तक नम्र करुन म्हटले, ‘ मला आपला अत्यंत प्रेमी 

सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा.

॥ ४ ॥


Custom Search

ShriRamcharitmans Part 24 श्रीरामचरितमानस भाग २४


ShriRamcharitmans Part 24 श्रीरामचरितमानस भाग २४
दोहा १५३ ते १५७ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—जब प्रतापरबि भयउ नृप फिरी दोहाई देस ।
प्रजा पाल अति बेदबिधि कतहुँ नहीं अघ लेस ॥ १५३ ॥
जेव्हा प्रतापभानू राजा झाला, तेव्हा देशामध्ये त्याच्या नावाने द्वाही फिरवली गेली. वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे उत्तम रीतीने प्रजेचे पालन करु लागला. त्याच्या राज्यात पापाचा लवलेश उरला नाही. ॥ १५३ ॥
नृप हितकारक सचिव सयाना । नाम धरमरुचि सुक्र समाना ॥
सचिव सयान बंधु बलबीरा । आपु प्रतापपुंज रनधीरा ॥
धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री राजाचे हित करणारा आणि शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता. अशाप्रकारचा बुद्धिमान मंत्री व बलवान आणि वीर भावाप्रमाणेच स्वतः राजाही मोठा प्रतापी व रणधीर होता. ॥ १ ॥
सेन संग चतुरंग अपारा । अमित सुभट सब समर जुझारा ॥
सेन बिलोकि राउ हरषाना । अरु बाजे गहगहे निसाना ॥
त्याच्याजवळ अपार चतुरंग सेना होती. तिच्यामध्ये असंख्य योद्धे होते. ते सर्व रणांगणामध्ये झुंज देताना प्राणांची बाजी लावणारे होते. आपली सेना पाहून राजा खूष झाला आणि दुंदुभी वाजू लागल्या. ॥ २ ॥
बिजय हेतु कटकई बनाई । सुदिन साधि नृप चलेउ बजाई ॥
जहँ तहँ परीं अनेक लराईं । जीते सकल भूप बरिआईं ॥
राजा एक शुभ मुहूर्तावर दिग्विजयासाठी सेना सज्ज करुन रणभेरी वाजवत निघाला. जिकडे तिकडे पुष्कळ लढाया झाल्या. त्यांमध्ये सर्व राजांना त्याने पराक्रमाने जिंकून घेतले. ॥ ३ ॥
सप्त दीप भुजबल बस कीन्हे । लै लै दंड छाड़ि नृप दीन्हे ॥
सकल अवनि मंडल तेहि काला । एक प्रतापभानु महिपाला ॥
त्याने आपल्या बाहुबलाने सप्तदीप अधीन केले आणि राजांकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. प्रतापभानू त्या काळी संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र चक्रवर्ती राजा होता. ॥ ४ ॥
दोहा—स्वबस बिस्व करि बाहुबल निज पुर कीन्ह प्रबेसु ।
अरथ धरम कामादि सुख सेवइ समयँ नरेसु ॥ १५४ ॥
संपूर्ण पृथ्वीला आपल्या बाहुबलाने अधीन करुन राजाने आपल्या नगरात प्रवेश केला. राजा धर्म, अर्थ आणि काम इत्यादि सुखांचा काळानुसार उपभोग घेत राहीला. ॥ १५४ ॥
भूप प्रतापभानु बल पाई । कामधेनु भै भूमि सुहाई ॥
सब दुख बरजित प्रजा सुखारी । धरमसील सुंदर नर नारी ॥
राजा प्रतापभानूच्या पराक्रमामुळे भूमी सुंदर कामधेनू बनली. त्याच्या राज्यात प्रजा सर्व दुःखांनी रहित व सुखी झाली. सर्व स्त्री-पुरुष सुंदर धर्मात्मे होते. ॥ १ ॥      
सचिव धरमरुचि हरि पद प्रीती । नृप हित हेतु सिखव नित नीती ॥
गुर सुर संत पितर महिदेवा । करइ सदा नृप सब कै सेवा ॥
धर्मरुची मंत्र्याची श्रीहरींच्या चरणी भक्ती होती. तो राजाच्या हितासाठी नेहमी त्याला नीतीचा उपदेश करीत असे. राजा गुरु, देव, संत, पितर व ब्राह्मण या सर्वांची नित्य सेवा करीत असे. ॥ २ ॥
भूप धरम जे बेद बखाने । सकल करइ सादर सुख माने ॥
दिन प्रति देइ बिबिध बिधि दाना । सुनइ सास्त्र बर बेद पुराना ॥
वेदांमध्ये राजांची जी कर्तव्ये सांगितली आहेत, त्या सर्वांचे पालन राजा नेहमी आदराने व आनंदाने करीत असे. प्रत्येक दिवशी तो नाना प्रकारची दाने देत असे आणि उत्तम शास्त्रे, वेद व पुराणांचे श्रवण करीत असे. ॥ ३ ॥
नाना बापीं कूप तड़ागा । सुमन बाटिका सुंदर बागा ॥
बिप्रभवन सुरभवन सुहाए । सब तीरथन्ह बिचित्र बनाए ॥
त्याने पुष्कळ आड, विहिरी, तलाव, फुलबागा, सुंदर बागा, ब्राह्मणांसाठी घरे आणि देवांसाठी सुंदर मंदिरे सर्व तीर्थ क्षेत्रांमध्ये बनविली. ॥ ४ ॥
 दोहा—जहँ लगि कहे पुरान श्रुति एक एक सब जागा ।
बार सहस्त्र सहस्त्र नृप किए सहित अनुराग ॥ १५५ ॥
वेद आणि पुराणांमध्ये जितक्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, ते सर्व एक-एक करुन राजाने मोठ्या श्रद्धेने हजार-हजार वेळा केले. ॥ १५५ ॥
हृदयँ न कछु फल अनुसंधाना । भूप बिबेकी परम सुजाना ॥
करइ जे धरम करम मन बानी । बासुदेव अर्पित नृप ग्यानी ॥
राज्याच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती. राजा हा मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता. तो ज्ञानी राजा कर्म, मन आणि वाणी यांनी जो काही धर्म करीत होता, तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे. ॥ १ ॥
चढ़ि बर बाजि बार एक राजा । मृगया कर सब साजि समाजा ॥
बिंध्याचल गभीर बन गयऊ । मृग पुनीत बहु मारत भयऊ ॥
एकदा तो राजा एका  वेगवान घोड्यावर बसून शिकारीचे साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम उत्तम हरणे मारली. ॥ २ ॥
फिरत बिपिन नृप दीख बराहू । जनु बन दुरेउ ससिहि ग्रसि राहू ॥
बड़ बिधु नहिं समात मुख माहीं । मनहुँ क्रोध बस उगिलत नाहीं ॥
राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले. ( दातांमुळे ते असे दिसत होते की ) जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे. चंद्र मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही शकत नव्हता. ॥ ३ ॥
कोल कराल दसन छबि गाई । तनु बिसाल पीवर अधिकाई ॥
घुरुघुरात हय आरौ पाएँ । चकित बिलोकत कान उठाएँ ॥
ही झाली डुकराच्या भयानक दातांची गोष्ट. त्याचे शरीर मोठे व गलेलठ्ठ होते. घोड्याची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारुन पाहात होते. ॥ ४ ॥
दोहा—नील महीधर सिखर सम देखि बिसाल बराहु ।
चपरि चलेउ हय सुटुकि नृप हाँकि न होइ निबाहु ॥ १५६ ॥
नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा घोड्याला चाबूक मारुन वेगाने निघाला. त्याने ( मनात ) डुकराला म्हटले की, आता तुझी धडगत नाही. ॥ १५६ ॥
आवत देखि अधिक रव बाजी । चलेउ बराह मरुत गति भाजी ॥
तुरत कीन्ह नृप सर संधाना । महि मिलि गयउ बिलोकत बाना ॥
जोताचा आवाज करीत घोडा ( आपल्याकडे ) येत असल्याचे पाहून डुक्कर वायुवेगाने पळाले. राजाने लागलीच बाण धनुश्याला लावला. बाण पाहताच डुक्कर जमिनीत दडून बसले. ॥ १ ॥
तकि तकि तीर महीस चलावा । करि छल सुअर सरीर बचावा ॥
प्रगटत दुरत जाइ मृग भागा । रिस बस भूप चलेउ सँग लागा ॥
राजा नेम धरुन बाण मारत होता, परंतु डुक्कर फसवून आपले शरीर वाचवित होता. तो पशू कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा. राजाही रागाने त्याच्या मागे लागला होता. ॥ २ ॥
गयउ दूरि घन गहन बराहू । जहँ नाहिन गज बाजि निबाहू ॥
अति अकेल बन बिपुल कलेसू । तदपि न मृग मग तजइ नरेसू ॥
डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले. तेथे हत्ती-घोड्यांचा निभाव लागत नव्हता. राजा अगदी एकटा होता, परंतु राजाने त्या पशूचा पिच्छा सोडला नाही. ॥ ३ ॥           
कोल बिलोकि भूप बड़ धीरा । भागि पैठ गिरिगुहाँ गभीरा ॥
अगम देखि नृप अति पछिताई । फिरेउ महाबन परेउ भुलाई ॥
राजा मोठा धीराचा आहे, असे पाहून डुक्कर पळून पर्वतातील एका खोल गुहेत घुसले. त्यात शिरणे कठीण आहे, असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे लागले. परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला. ॥ ४ ॥
दोहा—खेद खिन्न छुद्धित तृषित राजा बाजि समेत ।
खोजत ब्याकुल सरित सर जल बिनु भयउ अचेत ॥ १५७ ॥
फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोड्यासह तहान-भूकेने व्याकूळ झालेला राजा नदी-तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला. ॥ १५७ ॥
फिरत बिपिन आश्रम एक देखा । तहँ बस नृपति कपट मुनिबेषा ॥
जासु देस नृप लीन्ह छड़ाई । समर सेन तजि गयउ पराई ॥
वनात फिरता-फिरता त्याला एक आश्रम दिसला. तेथे एक कपटी राजा मुनीच्या वेषात राहात होता. त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता. ॥ १ ॥
समय प्रतापभानु कर जानी । आपन अति असमय अनुमानी ॥
गयउ न गृह मन बहुत गलानी । मिला न राजहि नृप अभिमानी ॥
प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत, असे पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले. त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी असल्यामुळे त्याने प्रतापभानूशी सख्यही केले नाही. ॥ २ ॥            
रिस उर मारि रंक जिमि राजा । बिपिन बसइ तापस कें साजा ॥
तासु समीप गवन नृप कीन्हा । यह प्रतापरबि तेहिं तब चीन्हा ॥
दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा तपस्व्याच्या वेषात वनात राहात होता. राजा प्रतापभानू त्याच्याजवळ गेला. कपटी राजाने ओळखले की, हा प्रतापभानू आहे. ॥ ३ ॥
राउ तृषित नहिं सो पहिचाना । देखि सुबेष महामुनि जाना ॥
उतरि तुरग तें कीन्ह प्रनामा । परम चतुर न कहेउ निज नामा ॥
राजा प्रतापभानू तहानेने व्याकूळ असल्यामुळे त्या 

कपट्याला मात्र ओळखू शकला नाही. त्याचा तो सुंदर 

मुनि-वेष पाहून राजाला तो महामुनी वाटला आणि 

घोड्यावरुन उतरुन त्याने त्याला प्रणाम केला. परंतु 

अतिशय चतुर असल्यामुळे राजाने त्याला आपले नाव

मात्र सांगितले नाही. ॥ ४ ॥


Custom Search