ShriRamcharitmans Part 24 श्रीरामचरितमानस भाग २४
दोहा १५३ ते १५७
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—जब प्रतापरबि भयउ नृप फिरी दोहाई देस ।
प्रजा पाल अति बेदबिधि कतहुँ नहीं अघ लेस ॥ १५३ ॥
जेव्हा प्रतापभानू राजा झाला, तेव्हा देशामध्ये त्याच्या
नावाने द्वाही फिरवली गेली. वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे उत्तम रीतीने
प्रजेचे पालन करु लागला. त्याच्या राज्यात पापाचा लवलेश उरला नाही. ॥ १५३ ॥
नृप हितकारक सचिव सयाना । नाम धरमरुचि सुक्र समाना ॥
सचिव सयान बंधु बलबीरा । आपु प्रतापपुंज रनधीरा ॥
धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री राजाचे हित करणारा आणि
शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता. अशाप्रकारचा बुद्धिमान मंत्री व बलवान आणि वीर
भावाप्रमाणेच स्वतः राजाही मोठा प्रतापी व रणधीर होता. ॥ १ ॥
सेन संग चतुरंग अपारा । अमित सुभट सब समर जुझारा ॥
सेन बिलोकि राउ हरषाना । अरु बाजे गहगहे निसाना ॥
त्याच्याजवळ अपार चतुरंग सेना होती. तिच्यामध्ये असंख्य
योद्धे होते. ते सर्व रणांगणामध्ये झुंज देताना प्राणांची बाजी लावणारे होते. आपली
सेना पाहून राजा खूष झाला आणि दुंदुभी वाजू लागल्या. ॥ २ ॥
बिजय हेतु कटकई बनाई । सुदिन साधि नृप चलेउ बजाई ॥
जहँ तहँ परीं अनेक लराईं । जीते सकल भूप बरिआईं ॥
राजा एक शुभ मुहूर्तावर दिग्विजयासाठी सेना सज्ज करुन
रणभेरी वाजवत निघाला. जिकडे तिकडे पुष्कळ लढाया झाल्या. त्यांमध्ये सर्व राजांना
त्याने पराक्रमाने जिंकून घेतले. ॥ ३ ॥
सप्त दीप भुजबल बस कीन्हे । लै लै दंड छाड़ि नृप दीन्हे ॥
सकल अवनि मंडल तेहि काला । एक प्रतापभानु महिपाला ॥
त्याने आपल्या बाहुबलाने सप्तदीप अधीन केले आणि राजांकडून
खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. प्रतापभानू त्या काळी संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र
चक्रवर्ती राजा होता. ॥ ४ ॥
दोहा—स्वबस बिस्व करि बाहुबल निज पुर कीन्ह प्रबेसु ।
अरथ धरम कामादि सुख सेवइ समयँ नरेसु ॥ १५४ ॥
संपूर्ण पृथ्वीला आपल्या बाहुबलाने अधीन करुन राजाने आपल्या
नगरात प्रवेश केला. राजा धर्म, अर्थ आणि काम इत्यादि सुखांचा काळानुसार उपभोग घेत
राहीला. ॥ १५४ ॥
भूप प्रतापभानु बल पाई । कामधेनु भै भूमि सुहाई ॥
सब दुख बरजित प्रजा सुखारी । धरमसील सुंदर नर नारी ॥
राजा प्रतापभानूच्या पराक्रमामुळे भूमी सुंदर कामधेनू बनली.
त्याच्या राज्यात प्रजा सर्व दुःखांनी रहित व सुखी झाली. सर्व स्त्री-पुरुष सुंदर
धर्मात्मे होते. ॥ १ ॥
सचिव धरमरुचि हरि पद प्रीती । नृप हित हेतु सिखव नित नीती ॥
गुर सुर संत पितर महिदेवा । करइ सदा नृप सब कै सेवा ॥
धर्मरुची मंत्र्याची श्रीहरींच्या चरणी भक्ती होती. तो
राजाच्या हितासाठी नेहमी त्याला नीतीचा उपदेश करीत असे. राजा गुरु, देव, संत, पितर
व ब्राह्मण या सर्वांची नित्य सेवा करीत असे. ॥ २ ॥
भूप धरम जे बेद बखाने । सकल करइ सादर सुख माने ॥
दिन प्रति देइ बिबिध बिधि दाना । सुनइ सास्त्र बर बेद
पुराना ॥
वेदांमध्ये राजांची जी कर्तव्ये सांगितली आहेत, त्या
सर्वांचे पालन राजा नेहमी आदराने व आनंदाने करीत असे. प्रत्येक दिवशी तो नाना
प्रकारची दाने देत असे आणि उत्तम शास्त्रे, वेद व पुराणांचे श्रवण करीत असे. ॥ ३ ॥
नाना बापीं कूप तड़ागा । सुमन बाटिका सुंदर बागा ॥
बिप्रभवन सुरभवन सुहाए । सब तीरथन्ह बिचित्र बनाए ॥
त्याने पुष्कळ आड, विहिरी, तलाव, फुलबागा, सुंदर बागा,
ब्राह्मणांसाठी घरे आणि देवांसाठी सुंदर मंदिरे सर्व तीर्थ क्षेत्रांमध्ये बनविली.
॥ ४ ॥
दोहा—जहँ लगि कहे
पुरान श्रुति एक एक सब जागा ।
बार सहस्त्र सहस्त्र नृप किए सहित अनुराग ॥ १५५ ॥
वेद आणि पुराणांमध्ये जितक्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत,
ते सर्व एक-एक करुन राजाने मोठ्या श्रद्धेने हजार-हजार वेळा केले. ॥ १५५ ॥
हृदयँ न कछु फल अनुसंधाना । भूप बिबेकी परम सुजाना ॥
करइ जे धरम करम मन बानी । बासुदेव अर्पित नृप ग्यानी ॥
राज्याच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती. राजा हा
मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता. तो ज्ञानी राजा कर्म, मन आणि वाणी यांनी जो काही
धर्म करीत होता, तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे. ॥ १ ॥
चढ़ि बर बाजि बार एक राजा । मृगया कर सब साजि समाजा ॥
बिंध्याचल गभीर बन गयऊ । मृग पुनीत बहु मारत भयऊ ॥
एकदा तो राजा एका
वेगवान घोड्यावर बसून शिकारीचे साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात
गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम उत्तम हरणे मारली. ॥ २ ॥
फिरत बिपिन नृप दीख बराहू । जनु बन दुरेउ ससिहि ग्रसि राहू
॥
बड़ बिधु नहिं समात मुख माहीं । मनहुँ क्रोध बस उगिलत नाहीं
॥
राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले. ( दातांमुळे ते असे
दिसत होते की ) जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे. चंद्र मोठा
असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही
शकत नव्हता. ॥ ३ ॥
कोल कराल दसन छबि गाई । तनु बिसाल पीवर अधिकाई ॥
घुरुघुरात हय आरौ पाएँ । चकित बिलोकत कान उठाएँ ॥
ही झाली डुकराच्या भयानक दातांची गोष्ट. त्याचे शरीर मोठे व
गलेलठ्ठ होते. घोड्याची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारुन पाहात होते. ॥ ४
॥
दोहा—नील महीधर सिखर सम देखि बिसाल बराहु ।
चपरि चलेउ हय सुटुकि नृप हाँकि न होइ निबाहु ॥ १५६ ॥
नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा
घोड्याला चाबूक मारुन वेगाने निघाला. त्याने ( मनात ) डुकराला म्हटले की, आता तुझी
धडगत नाही. ॥ १५६ ॥
आवत देखि अधिक रव बाजी । चलेउ बराह मरुत गति भाजी ॥
तुरत कीन्ह नृप सर संधाना । महि मिलि गयउ बिलोकत बाना ॥
जोताचा आवाज करीत घोडा ( आपल्याकडे ) येत असल्याचे पाहून
डुक्कर वायुवेगाने पळाले. राजाने लागलीच बाण धनुश्याला लावला. बाण पाहताच डुक्कर
जमिनीत दडून बसले. ॥ १ ॥
तकि तकि तीर महीस चलावा । करि छल सुअर सरीर बचावा ॥
प्रगटत दुरत जाइ मृग भागा । रिस बस भूप चलेउ सँग लागा ॥
राजा नेम धरुन बाण मारत होता, परंतु डुक्कर फसवून आपले शरीर
वाचवित होता. तो पशू कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा. राजाही रागाने त्याच्या
मागे लागला होता. ॥ २ ॥
गयउ दूरि घन गहन बराहू । जहँ नाहिन गज बाजि निबाहू ॥
अति अकेल बन बिपुल कलेसू । तदपि न मृग मग तजइ नरेसू ॥
डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले. तेथे हत्ती-घोड्यांचा
निभाव लागत नव्हता. राजा अगदी एकटा होता, परंतु राजाने त्या पशूचा पिच्छा सोडला
नाही. ॥ ३ ॥
कोल बिलोकि भूप बड़ धीरा । भागि पैठ गिरिगुहाँ गभीरा ॥
अगम देखि नृप अति पछिताई । फिरेउ महाबन परेउ भुलाई ॥
राजा मोठा धीराचा आहे, असे पाहून डुक्कर पळून पर्वतातील एका
खोल गुहेत घुसले. त्यात शिरणे कठीण आहे, असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे
लागले. परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला. ॥ ४ ॥
दोहा—खेद खिन्न छुद्धित तृषित राजा बाजि समेत ।
खोजत ब्याकुल सरित सर जल बिनु भयउ अचेत ॥ १५७ ॥
फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोड्यासह तहान-भूकेने
व्याकूळ झालेला राजा नदी-तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला. ॥ १५७ ॥
फिरत बिपिन आश्रम एक देखा । तहँ बस नृपति कपट मुनिबेषा ॥
जासु देस नृप लीन्ह छड़ाई । समर सेन तजि गयउ पराई ॥
वनात फिरता-फिरता त्याला एक आश्रम दिसला. तेथे एक कपटी राजा
मुनीच्या वेषात राहात होता. त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून
घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता. ॥ १ ॥
समय प्रतापभानु कर जानी । आपन अति असमय अनुमानी ॥
गयउ न गृह मन बहुत गलानी । मिला न राजहि नृप अभिमानी ॥
प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत, असे
पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले. त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी
असल्यामुळे त्याने प्रतापभानूशी सख्यही केले नाही. ॥ २ ॥
रिस उर मारि रंक जिमि राजा । बिपिन बसइ तापस कें साजा ॥
तासु समीप गवन नृप कीन्हा । यह प्रतापरबि तेहिं तब चीन्हा ॥
दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा
तपस्व्याच्या वेषात वनात राहात होता. राजा प्रतापभानू त्याच्याजवळ गेला. कपटी
राजाने ओळखले की, हा प्रतापभानू आहे. ॥ ३ ॥
राउ तृषित नहिं सो पहिचाना । देखि सुबेष महामुनि जाना ॥
उतरि तुरग तें कीन्ह प्रनामा । परम चतुर न कहेउ निज नामा ॥
राजा प्रतापभानू तहानेने व्याकूळ असल्यामुळे त्या
कपट्याला
मात्र ओळखू शकला नाही. त्याचा तो सुंदर
मुनि-वेष पाहून राजाला तो महामुनी वाटला
आणि
घोड्यावरुन उतरुन त्याने त्याला प्रणाम केला. परंतु
अतिशय चतुर असल्यामुळे
राजाने त्याला आपले नाव
मात्र सांगितले नाही. ॥ ४ ॥
Custom Search
No comments:
Post a Comment