ShriRamcharitmans Part 23 श्रीरामचरितमानस भाग २३
दोहा १४८ ते १५२
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—बोले कृपानिधान पुनि अति प्रसन्न मोहि जानि ।
मागहु बर जोइ भाव मन महादानि अनुमानि ॥ १४८ ॥
नंतर कृपानिधान भगवान म्हणाले, ‘ मी मोठा उदार असून अत्यंत
प्रसन्न झालो आहे, म्हणून तुमच्या मनाला वाटेल ते मागा. ‘ ॥ १४८ ॥
सुनि प्रभु बचन जोरि जुग पानी । धरि धीरजु बोली मृदु बानी ।
नाथ देखि पद कमल तुम्हारे । अब पूरे सब काम हमारे ॥
प्रभूंचे बोलणे ऐकून राजा दोन्ही हात जोडून धैर्यपूर्वक
कोमल वाणीने म्हणाला, ‘ हे नाथ ! तुमच्या चरण-कमलांच्या दर्शनाने आता आमचे सर्व
मनोरथ पूर्ण झाले आहेत. ॥ १ ॥
एक लालसा बड़ि उर माहीं । सुगम अगम कहि जाति नाहीं ॥
तुम्हहि देत अति सुगम गोसाईं । अगम लाग मोहि निज कृपनाईं ॥
तरीही मनात एक मोठी लालसा आहे. ती पूर्ण होणे सोपीही आहे
आणि कठिणही आहे, त्यामुळे बोलून दाखविता येत नाही. हे स्वामी, ती पूर्ण करणे
तुम्हांला सहज शक्य आहे, परंतु मला स्वतःच्या दैन्यामुळे ती फार कठीण वाटते. ॥ २ ॥
जथा दरिद्र बिबुधतरु पाई । बहु संपति मागत सकुचाई ॥
तासु प्रभाउ जान नहिं सोई । तथा हृदयँ मम संसय होई ॥
ज्याप्रमाणे एखादा दरिद्री कल्पवृक्ष मिळाल्यावरही अधिक
द्रव्य मागण्यास संकोच करतो, कारण तो कल्पवृक्षाचा प्रभाव जाणत नाही, त्याप्रमाणेच
माझ्या मनात संशय येत आहे. ॥ ३ ॥
सो तुम्ह जानहु अंतरजामी । पुरवहु मोर मनोरथ स्वामी ॥
सकुच बिहाइ मागु नृप मोही । मोरें नहिं अदेय कछु तोही ॥
हे स्वामी, तुम्ही अंतर्यामी आहात, म्हणून तुम्ही माझे
मनोगत जाणताच. तरी ते पूर्ण करा.’ ( भगवान म्हणाले, ) ‘ हे राजा, निःसंशयपणें
माझ्याकडे माग. तुला देता येणार नाही, असे काहीही माझ्यापाशी नाही.’ ॥ ४ ॥
दोहा—दानि सिरोमनि कृपानिधि नाथ कहउँ सतिभाउ ।
चाहउँ तुम्हहि समान सुत प्रभु सन कवन दुराउ ॥ १४९ ॥
( राजा म्हणाला, ) ‘ हे दानशूर शिरोमणी, हे कृपानिधान ! हे
नाथ, मी मनातले खरेखुरे सांगतो की, मला तुमच्यासारखा पुत्र हवा. आपल्यापासून काय
लपवायचे ?’ ॥ १४९ ॥
देखि प्रीति सुनि बचन अमोले । एवमस्तु करुनानिधि बोले ॥
आपु सरिस खोजौं कहँ जाई । नृप तव तनय होब मैं आई ॥
राजाचे प्रेम पाहून आणि त्याचे अमोल बोल ऐकून करुणानिधान
भगवान म्हणाले, ‘ ठिक आहे. हे राजन मी स्वतःसारखा दुसरा कुठे जाऊन शोधू ? म्हणून
मी स्वतःच तुमचा पुत्र होईन.’ ॥ १ ॥
सतरुपहि बिलोकि कर जोरें । देबि मागु बरु जो रुचि तोरें ॥
जो बरु नाथ चतुर नृप मागा । सोइ कृपाल मोहि अति प्रिय लागा
॥
शरुपेने हात जोडलेले पाहून भगवंत म्हणाले, ‘ हे देवी, तुझी
जी इच्छा असेल ती मागून घे.’ शतरुपा म्हणाली, ’ हे नाथा, चतुर राजांनी जो वर
मागितला आहे, हे कृपाळू, तोच मला अतिशय आवडला. ॥ २ ॥
प्रभु परंतु सुठि होति ढिठाई । जदपि भगत हित तुम्हहि सोहाई
॥
तुम्ह ब्रह्मादि जनक जग स्वामी । ब्रह्म सकल उर अंतरजामी ॥
परंतु हे प्रभु, ( आमच्याकडून ) थोडा अतिरेक होत आहे. तरीही
भक्तांचे हित करणारे हे प्रभू, तुम्हांला हे आमचे धाष्टर्य बरेच वाटत आहे. तुम्ही
ब्रह्मदेव इत्यादिंचे पिता, जगाचे स्वामी आणि सर्वांचे मन जाणणारे ब्रह्म आहात. ॥
३ ॥
अस समुझत मन संसय होई । कहा जो प्रभु प्रवान पुनि सोई ॥
जे निज भगत नाथ तव अहहीं । जो सुख पावहिं जो गति लहहीं ॥
असे असल्यामुळे मनाला संदेह येतो, तरीही प्रभूंनी जे म्हटले
तेच प्रमाण होय. ( मी तर असे मागते की, ) हे नाथ तुमचे जे भक्त आहेत, ते जे (
अलौकिक ) अखंड सुख प्राप्त करतात आणि त्यांना जी परम गती मिळते, ॥ ४ ॥
दोहा—सोइ सुख सोइ गति सोइ भगति सोइ निज चरन सनेहु ।
सोइ बिबेक सोइ रहनि प्रभु हमहि कृपा करि देहु ॥ १५० ॥
हे प्रभो, तेच सुख, तीच गती, तीच भक्ती, तुमच्या चरणींचे
तेच प्रेम, तेच ज्ञान आणि तीच रहाणी कृपा करुन आम्हाला द्या’ ॥ १५० ॥
सुनि मृदु गूढ़ रुचिर बर रचना । कृपासिंधु बोले मृदु बचना ॥
जो कछु रुचि तुम्हरे मन माहीं । मैं सो दीन्ह सब संसय नाहीं
॥
( राणीची ) कोमल, गूढ आणि मनोहर अशी उत्कृष्ट वाणी ऐकून
कृपासागर भगवान कोमल शब्दांत म्हणाले, ‘ तुझ्या मनात जी काही इच्छा आहे, ती सर्व
मी पूर्ण केली, यात कोणताही संशय बाळगू नकोस. ॥ १ ॥
मातु बिबेक अलौकिक तोरें । कबहुँ न मिटिहि अनुग्रह मोरें ॥
बंदि चरन मनु कहेउ बहोरी । अवर एक बिनती प्रभु मोरी ॥
हे माते, माझ्या कृपेने तुझे अलौकिक ज्ञान कधी नष्ट होणार
नाही. ‘ तेव्हा मनूने भगवंतांच्या चरणांना वंदन करुन म्हटले, ‘ हे प्रभो, माझी
आणखी एक विनंती आहे. ॥ २ ॥
सुत बिषइक तव पद रति होऊ । मोहि बड़ मूढ़ कहै किन कोऊ ॥
मनि बिनु फनि जिमि जल बिनु मीना । मम जीवन तिमि तुम्हहि
अधीना ॥
जसे पुत्रावर पित्याचे प्रेम असते, तसेच माझे तुमच्या चरणी
प्रेम राहो. ( याबद्दल ) मला कोणीही कितीही मूर्ख समजेना का ! ज्याप्रमाणे मण्याविना
साप व पाण्याविना मासोळी ( राहू शकत नाही ) त्याप्रमाणे माझे जीवन तुमच्या विना न
राहो. ‘ ॥ ३ ॥
अस बरु मागि चरन गहि रहेऊ । एवमस्तु करुनानिधि कहेऊ ॥
अब तुम्ह मम अनुसासन मानी । बसहु जाइ सुरपति रजधानी ॥
असा वर मागून राजाने भगवंतांचे चरण धरले. तेव्हा दयानिधान
भगवान म्हणाले, ‘ असेच होवो. आता तुम्ही माझ्या आज्ञेने देवराज इंद्राच्या
राजधानीत ( अमरावतीत ) जाऊन राहा. ॥ ४ ॥
सो०-तहँ करि भोग बिसाल तात गएँ कछु काल पुनि ।
होइहहु अवध भुआल तब मैं होब तुम्हार सुत ॥ १५१ ॥
हे राजा, तेथे स्वर्गात पुष्कळसे भोग भोगल्यावर व काही काळ
लोटल्यावर तू अयोध्येचा राजा होशील, तेव्हा मी तुझा पुत्र होईन. ॥ १५१ ॥
इच्छामय नरबेष सँवारें । होइहउँ प्रगट निकेत तुम्हारें ॥
अंसन्ह सहित देह धरि ताता । करिहउँ चरित भगत सुखदाता ॥
स्वेच्छानिर्मित मनुष्यरुप घेऊन मी तुझ्या घरी प्रकट होईन.
हे राजा, मी आपल्या अंशांसह देह धरुन भक्तांना सुख देणारी लीला करीन. ॥ १ ॥
जे सुनि सादर नर बड़भागी । भव तरिहहिं ममता मद त्यागी ॥
आदिसक्ति जेहिं जग उपजाया । सोउ अवतरिहि मोरी यह माया ॥
मोठे भाग्यशाली मनुष्य आदराने जी चरित्रे ऐकून ममता आणि मद
यांचा त्याग करुन भवसागर तरुन जातील. जग उत्पन्न करणारी आदिशक्ती ही माझी (
स्वरुपभूत ) मायासुद्धा अवतार घेईल. ॥ २ ॥
पुरउब मैं अभिलाष तुम्हारा । सत्य
सत्य पन सत्य हमारा ॥
पुनि पुनि अस कहि कृपानिधाना ।
अंतरधान भए भगवाना ॥
अशा प्रकारे मी तुझी अभिलाषा पूर्ण
करीन. हे माझे वचन त्रिवार सत्य आहे, ‘ असे म्हणून कृपानिधान भगवान अंतर्धान
पावले. ॥ ३ ॥
दंपति उर धरि भगत कृपाला । तेहिं
आश्रम निवसे कछु काला ॥
समय पाइ तनु तजि अनयासा । जाइ
कीन्ह अमरावति बासा ॥
हे राजा-राणी भक्तांवर कृपा करणार्या
भगवंतांना हृदयात धारण करुन काही काळ आश्रमात राहिले. नंतर यथासमय त्यांनी सहजपणें
यातनेविना शरीर सोडले आणि इंद्राच्या अमरावतीत जाऊन वास केला. ॥ ४ ॥
दोहा—यह इतिहास पुनीत अति उमहि कही बृषकेतु ।
भरद्वाज सुनु अपर पुनि राम जनम कर हेतु ॥ १५२ ॥
( याज्ञवल्क्य म्हणतात--) ‘ हे भरद्वाज, हा अत्यंत पवित्र
इतिहास शिवांनी पार्वतीला सांगितला होता. आता श्रीरामांनी अवतार घेण्याचे दुसरे
कारण ऐका. ॥ १५२ ॥
मासपारायण तिसरा विश्राम
सुनु मुनि कथा पुनीत पुरानी । जो गिरिजा प्रति संभु बखानी ॥
बिस्व बिदित एक कैकय देसू । सत्यकेतु तहँ बसइ नरेसू ॥
हे मुनी, ही पवित्र व प्राचीन कथा ऐका. ही शिवांनी
पार्वतीला सांगितली होती. जगात कैकय नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तेथे सत्यकेतु नावाचा
राजा राज्य करीत होता. ॥ १ ॥
धरम धुरंधर नीति निधाना । तेज प्रताप सील बलवाना ॥
तेहि कें भए जुगल सुत बीरा । सब गुन धाम महा रनधीरा ॥
तो धर्मधुरीण, नीतीची खाण, तेजस्वी, प्रतापी, सुशील आणि
बलवान होता. त्याचे दिन वीर पुत्र होते. ते सर्व गुणांचे भांडार व मोठे रणधुरंधर होते.
॥ २ ॥
राज धनी जो जेठ सुत आही । नाम प्रतापभानु अस ताही ॥
अपर सुतहि अरिमर्दन नामा । भुजबल अतुल अचल संग्रामा ॥
राज्याचा उत्तराधिकारी असणार्या मोठ्या मुलाचे नाव
प्रतापभानू होते. दुसर्या मुलाचे नाव अरिमर्दन असे होते. त्याच्या बाहूंमध्ये
अपार बळ होते आणि युद्धामध्ये तो पर्वताप्रमाणे निश्र्चळ राहात असे. ॥ ३ ॥
भाइहि भाइहि परम समीती । सकल दोष छल बरजित प्रीती ॥
जेठे सुतहि राज नृप दीन्हा । हरि हित आपु गवन बन कीन्हा ॥
दोघा
भावांमध्ये परसपर सर्व प्रकारच्या दोषांपासून व कपटारहित असे खरेखुरे प्रेम होते. राजानें ज्येष्ठ पुत्राला
राज्य दिले आणि आपण भगवंतांचे भजन करण्यासाठी
वनात निघून गेला. ॥ ४ ॥
Custom Search
No comments:
Post a Comment