Saturday, July 11, 2020

ShriRamcharitmans Part 22 श्रीरामचरितमानस भाग २२


ShriRamcharitmans Part 22 
श्रीरामचरितमानस भाग २२ दोहा १४१ ते १४७

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—सो मैं तुम्ह सन कहउँ सबु सुनु मुनीस मन लाइ ।
राम कथा कलि मल हरनि मंगल करनि सुहाइ ॥ १४१ ॥
हे मुनीश्र्वर भरद्वाज, मी ते सर्व तुम्हांला सांगतो. लक्ष देऊन ऐका. श्रीरामांची कथा ही कलियुगातील पापांचे हरण करणारी आणि फार सुंदर आहे. ॥ १४१ ॥
स्वायंभूव मनू आणि त्यांची पत्नी शतरुपा, यांच्यापासून मनुष्यांची ही अनुपम सृष्टी निर्माण झाली. या दोघा पति-पत्नींचे धर्म व आचरण हे फार चांगले होते. वेद आजसुद्धा त्यांची प्रशंसा करतात. ॥ १ ॥
नृप उत्तानपाद सुत तासू । ध्रुव हरिभगत भयउ सुत जासू ॥
लघु सुत नाम प्रियब्रत ताही । बेद पुरान प्रसंसहिं जाही ॥
राजा उत्तानपाद त्यांचा पुत्र होता. त्यांचाच पुत्र प्रसिद्ध हरिभक्त ध्रुव झाला. त्या मनूच्या धाकट्या मुलाचे नाव प्रियव्रत होते. त्याची प्रशंसा वेद आणि पुराणांनी केलेली आहे. ॥ २ ॥
देवहूति पुनि तासु कुमारी । जो मुनि कर्दम कै प्रिय नारी ॥
आदिदेव प्रभु दीनदयाला । जठर धरेउ जेहिं कपिल कृपाला ॥
तसेच देवहूती ही त्या मनूची कन्या होती. ती कर्दम मुनींची आवडती पत्नी होती. तिने आदिदेव, दीनांवर दया करणारे समर्थ व कृपाळू भगवान कपिल यांना गर्भात धारण केले. ॥ ३ ॥      
सांख्य सास्त्र जिन्ह प्रगट बखाना । तत्त्व बिचार निपुन भगवाना ॥
तेहिं मनु राज कीन्ह बहु काला । प्रभु आयसु सब बिधि प्रतिपाला ॥
तत्त्वांचा विचार करण्यामध्ये अत्यंत निपुण असलेल्या भगवान कपिल मुनीनीं सांख्यशास्त्राचे प्रकट वर्णन केले. स्वायंभुव मनूंनीं बराच काळ राज्य केले आणि सर्व प्रकारे भगवंतांच्या आज्ञारुप शास्त्रांच्या मर्यादेचे पालन केले. ॥ ४ ॥
सो—होइ न बिषय बिराग भवन बसत भा चौथपन ।
हृदयँ बहुत दुख लाग जनम गयउ हरिभगति बिनु ॥ १४२ ॥
राजप्रसादात राहाता-राहता म्हातारपण आले, परंतु विषयांबद्दल वैराग्य येत नव्हते. ( असा विचार करुन ) त्यांच्या मनात अतिशय दुःख झाले की, श्रीहरींच्या भक्तीविना जन्म फुकट गेला. ॥ १४२ ॥
बरबस राज सुतहि तब दीन्हा । नारि समेत गवन बन कीन्हा ॥
तीरथ बर नैमिष बिख्याता । अति पुनीत साधक सिधि दाता ॥
तेव्हा मनूंनी आपल्या मुलाला आग्रहाने राज्य दिले आणि स्वतः पत्नीसह वनगमन केले. अत्यंत पवित्र व साधकांना सिद्धी देणार्‍या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले नैमिषारण्य प्रसिद्ध आहे. ॥ १ ॥
बसहिं तहाँ मुनि सिद्ध समाजा । तहँ हियँ हरषि चलेउ मनु राजा ॥
पंथ जात सोहहिं मतिधीरा । ग्यान भगति जनु धरें सरीरा ॥
तेथे मुनींचे व सिद्धांचे समुदाय राहातात. राजा मनू आनंदित मनाने तेथे गेला. ते धीर बुद्धीचे राजा-राणी वाटेने जाताना असे शोभत होते की, जणू ज्ञान आणि भक्ती शरीर धारण करुन निघाले आहेत. ॥ २ ॥
पहुँचे जाइ धेनुमति तीरा । हरषि नहाने निरमल नीरा ॥
आए मिलन सिद्ध मुनि ग्यानी । धरम धुरंधर नृपरिषि जानी ॥
( जाता-जाता ) ते गोमतीच्या किनारी पोहोचले, त्यांनी आनंदाने निर्मल जळात स्नान केले. त्यांना धर्मधुरंधर राजर्षी समजून सिद्ध व ज्ञानी मुनी त्यांना भेटण्यास आले. ॥ ३ ॥
जहँ जहँ तीरथ रहे सुहाए । मुनिन्ह सकल सादर करवाए ॥
कृस सरीर मुनिपट परिधाना । सत समाज नित सुनहिं पुराना ॥
जेथे जेथे सुंदर तीर्थे होती ती सर्व तीर्थे मुनींनी मोठ्या आदराने मनूंना घडविली. त्यांचे शरीर दुर्बल झाले होते. ते मुनींच्यासारखी वल्कले धारण करीत आणि संत मंडळीत बसून नित्य पुराण श्रवण करीत होते. ॥ ४ ॥         
 दोहा—द्वादस अच्छर मंत्र पुनि जपहिं सहित अनुराग ।
बासुदेव पद पंकरुह दंपति मन अति लाग ॥ १४३ ॥
तसेच द्वादशाक्षरी मंत्र ‘ ॐ नमो भगवते वासुदेवाय ‘ याचा अत्यंत भक्तिभावाने जप करीत असत. भगवान वासुदेवांच्या चरणकमली राजा-राणीचे मन खूप रमले होते. ॥ १४३ ॥
करहिं अहार साक फल कंदा । सुमिरहिं ब्रह्म सच्चिदानंदा ॥
पुनि हरि हेतु करन जप लागे । बारि अधार मूल फल त्यागे ॥
ते पालेभाज्या, फळे व कंदमुळे यांचा आहार घेत आणि सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करीत असत. नंतर श्रीहरिंसाठी तप करु लागले आणि मुळे-फळे यांचा त्याग करुन फक्त पाण्यावर राहू लागले. ॥ १ ॥
उर अभिलाष निरंतर होई । देखिअ नयन परम प्रभु सोई ॥
अगुन अखंड अनंत अनादी । जेहि चिंतहिं परमारथबादी ॥
जे निर्गुण, अखंड, अनादी आहेत आणि ब्रह्मज्ञानी लोक ज्यांचे चिंतन करतात, त्या परम प्रभूंचे आपल्या डोळ्यांनी दर्शन घ्यावे. हीच अभिलाषा त्यांच्या मनात निरंतर होती. ॥ २ ॥
नेति नेति जेहि बेद निरुपा । निजानंद निरुपाधि अनूपा ॥
संभु बिरंचि बिष्नु भगवाना । उपजहिं जासु अंस तें नाना ॥
वेद ज्यांचे ‘ नेति, नेति ‘ ( हेही नाही, तेही नाही ) असे म्हणून निरुपण करतात, जे आनंदस्वरुप, उपाधिरहित आणि अनुपम आहेत, आणि ज्यांच्या अंशाने अनेक शिव, ब्रह्मदेव व भगवान विष्णू प्रकट होतात. ॥ ३ ॥
ऐसेउ प्रभु सेवक बस अहई । भगत हेतु लीलातनु गहई ॥
जौं यह बचन सत्य श्रुति भाषा । तौं हमार पूजिहि अभिलाषा ॥
असे महान प्रभू हे सुद्धा सेवकाच्या अधीन आहेत व भक्तांसाठी ( दिव्य ) लीला-विग्रह धारण करतात. हे जर वेदांनी सत्य प्रतिपादन केले असेल, तर आमची अभिलाषा नक्की पूर्ण होईल.’ ॥ ४ ॥
दोहा—एहि बिधि बीते बरष षट सहस बारि आहार ।
संबत सप्त सहस्त्र पुनि रहे समीर अधार ॥ १४४ ॥
अशाप्रकारे जलाचा आहार घेत सहा हजार वर्षे निघून गेली. नंतर सात हजार वर्षे ते वायूभक्षण करुन राहिले. ॥ १४४ ॥
बरष सहस दस त्यागेउ सोऊ । ठाढ़े रहे एक पद दोऊ ॥
बिधि हरि हर तप देखि अपारा । मनु समीप आए बहु बारा ॥
त्यानंतर दहा हजार वर्षे त्यांनी वायूचा आहारही सोडला आणि दोघे एका पायावर उभे राहिले. त्यांचे अपार तप पाहून ब्रह्मदेव, विष्णू व शिव हे अनेक वेळा मनूजवळ आले. ॥ १ ॥
मागहु बर बहु भाँति लोभाए । परम धीर नहिं चलहिं चलाए ॥
अस्थिमात्र होइ रहे सरीरा । तदपि मनाग मनहिं नहिं पीरा ॥
त्यांनी त्या दोघांना अनेक प्रकारे प्रलोभन दाखविले आणि वर मागण्यास सांगितले. परंतु ते परम धैर्यवान राजा-राणी आपल्या हाडांचा सापळाच उरले होते, तरीही त्यांना जराही दुःख नव्हते. ॥ २ ॥
प्रभु सर्बग्य दास निज जानी । गति अनन्य तापस नृप रानी ॥
मागु मागु बरु भै नभ बानी । परम गभीर कृपामृत सानी ॥
सर्वज्ञ प्रभूंनी अनन्य गती ( आश्रय ) असणार्‍या त्या तपस्वी राजा-राणी यांना ‘ निजदास ‘ असल्याचे ओळखले. तेव्हा परम गंभीर आणि कृपारुपी अमृताने भरलेली आकाशवाणी झाली की, ‘ वर मागा ‘ ॥ ३ ॥
मृतक जिआवनि गिरा सुहाई । श्रवन रंध्र होइ उर जब आई ॥
हृष्ट पुष्ट तन भए सुहाए । मानहुँ अबहिं भवन ते आए ॥
प्रेताला जिवंत करणारी ती सुंदर वाणी कानांच्या छिद्रांतून जेव्हा हृदयात पोहोचली, तेव्हा राजा-राणी यांची शरीरे इतकी सुंदर व हृष्ट-
पुष्ट झाली की, जणू नुकतेच ते घरुन आले आहेत. ॥ ४ ॥
दोहा—श्रवन सुधा सम बचन सुनि पुलक प्रफिल्लित गात ।
बोले मनु करि दंडवत प्रेम न हृदयँ समात ॥ १४५ ॥
कानांमध्ये अमृतासमान वाटणारे ते शब्द ऐकून त्यांचे शरीर पुलकित आणि प्रफुल्लित झाले. त्यांच्या मनात प्रेम सामावत नव्हते. तेव्हा मनूंनी दंडवत घालून म्हटले, ॥ १४५ ॥
सुनु सेवक सुरतरु सुरधेनू । बिधि हरि हर बंदित पद रेनू ॥
सेवत सुलभ सकल सुखदायक । प्रनतपाल सचराचर नायक ॥
हे प्रभो, ऐका. तुम्ही सेवकांच्यासाठी कल्पवृक्ष आणि कामधेनू आहात. तुमच्या चरण धुळीला ब्रह्मा, विष्णू व शिव हे सुद्धा वंदन करतात. तुमची सेवा करण्यास सुलभ असून तुम्हीं सर्वांना सुख देणारे आहात. तुम्ही शरणागताचे रक्षक आणि चराचराचे स्वामी आहात. ॥ १ ॥
जौं अनाथ हित हम पर नेहू । तौ प्रसन्न होइ यह बर देहू ॥
जो सरुप बस सिव मन माहीं । जेहिं कारन मुनि जतन कराहीं ॥
हे अनाथांचे कल्याण करणार्‍या प्रभो, जर आम्हांवर तुमचे प्रेम असेल, तर प्रसन्न होऊन असा वर द्या की, तुमचे जे स्वरुप शिवांच्या मनात वसते आणि ज्याच्या प्राप्तीसाठी मुनिजन प्रयत्न करीत असतात, ॥ २ ॥
जो भुसुंडि मन मानस हंसा । सगुन अगुन जेहि निगम प्रशंसा ॥
देखहिं हम सो रुप भरि लोचन । कृपा करहु प्ननतारति मोचन ॥
जे काकभुशुंडी ऋषींच्या मनरुपी मानस सरोवरात विहार करणारे हंस आहेत. सगुण आणि निर्गुण म्हणून वेद ज्यांची प्रशंसा करतात, हे शरणगताचे दुःख दूर करणारे प्रभू, ते रुप आम्ही डोळे भरुन पाहावे, अशी कृपा करा. ॥ ३ ॥
दंपति बचन परम प्रिय लागे । मृदुल बिनीत प्रेम रस पागे ॥
भगत बछल प्रभु कृपानिधाना । बिस्वबास प्रगटे भगवाना ॥
राजा-राणीचे हे कोमल, विनययुक्त, प्रेमरसाने ओथंबलेले वचन भगवंतांना फारच आवडले. त्यामुळे भक्तवत्सल, कृपानिधान, संपूर्ण विश्वाचे निवासस्थान सर्वसमर्थ भगवान प्रगट झाले. ॥ ४ ॥
दोहा—नील सरोरुह नील मनि नील नीरधर स्याम ।
लाजहिं तन सोभा निरखि कोटि कोटि सत काम ॥ १४६ ॥
भगवंतांचे नीलकमल, नीलमणी आणि जलयुक्त निळ्या मेघांप्रमाणे ( कोमल, प्रकाशमय आणि सरस ) श्यामवर्ण ( चिन्मय ) शरीराचे सौंदर्य पाहून कोट्यावधी कमदेवसुद्धा लज्जित होत. ॥ १४६ ॥
सरद मयंकर बदन छबि सींवा । चारु कपोल चिबुक दर ग्रीवा ॥
अधर अरुन रद सुंदर नासा । बिधु कर निकर बिनिंदक हासा ॥
त्यांचे मुख शरदातील पौर्णिमेच्या चंद्रासारखे सौंदर्याची परिसीमा होते. गाल आणि हनुवटी फार सुंदर होते. गळा शंखासारखा त्रिरेखायुक्त-( चढ-उतार असणारा ) होता. लाल ओठ, दात आणि नाक फारच सुंदर होते. त्यांचे हास्य चंद्र-किरणांना लाजविणारे होते. ॥ १ ॥                                
नव अंबुज अंबक छबि नीकी । चितवनि ललित भावँती जी की ॥
भृकुटि मनोज चाप छबि हारी । तिलक ललाट पटल दुतिकारी ॥
नेत्रांचे सौंदर्य ताज्या कमळाप्रमाणे होते. मनोहर दृष्टी अत्यंत सुंदर वाटत होती. कमानदार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभा हरण करणार्‍या होत्या. ललाटावर प्रकाशमय तिलक होता. ॥ २ ॥
कुंडल मकर मुकुट सिर भ्राजा । कुटिल केस जनु मधुप समाज ॥
उर श्रीबत्स रुचिर बनमाला । पदिक हार भूषन मनिजाला ॥
कानांमध्ये मकराकृती कुंडले आणि शिरावर मुकुट शोभत होता. कुरळे व काळे केस असे दाट होते की, जणूम भ्रमरांच्या झुंडी असाव्यात. हृदयावर श्रीवत्स, सुंदर वनमाला, रत्नजडित हार आणि रत्नांची आभूषणे शोभून दिसत होती. ॥ ३ ॥
केहरि कंधर चारु जनेऊ । बाहु बिभूषन सुंदर तेऊ ॥
करि कर सरिस सुभग भुजदंडा । कटि निषंग कर सर कोदंडा ॥
सिंहासारखी मान होती, सुंदर यज्ञोपवीत होते. भुजांमध्ये घातलेले दागिनेही सुंदर होते. हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर बाहु होते. कमरेला भाता आणि हातात धनुष्य-बाण शोभत होते. ॥ ४ ॥
तड़ित बिनिंदक पीत पट उदर रेख बर तीनि ।
नाभि मनोहर लेति जनु जमुन भवँर छबि छीनि ॥ १४७ ॥
सुवर्ण वर्णाचा प्रकाशमय पीतांबर विद्दुल्लतेला लाजविणारा होता. उदरावर सुंदर तीन वळ्या होत्या. यमुनेतील भोवर्‍याचे सौंदर्य हिरावून घेणारी नाभी होती. ॥ १४७ ॥
पद राजीव बरनि नहिं जाहीं । मुनि मन मधुप बसहिं जेन्ह माहीं ॥
बाम भाग सोभति अनुकूला । आदिसक्ति छबिनिधि जगमूला ॥
मुनींचे मनरुपी भ्रमर जिथे रमतात, त्या भगवंतांच्या चरण-कमलांचे वर्णन करता येणे कठीण होते. भगवंतांच्या डाव्या बाजूस, त्यांना नित्य अनुकूल असणारी, शोभेची खाण अशी, जगाची मूलकारणरुप आदिशक्ती जानकी शोभत होती. ॥ १ ॥
जासु अंस उपजहिं गुनखानी । अगनित लच्छि उमा ब्रह्मानी ॥
भृकुटि बिलास जासु जग होई । राम बाम दिसि सीता सोई ॥
जिच्या अंशाने गुणांची खाण असलेल्या अगणित लक्ष्मी, पार्वती आणि ब्रह्माणी ( त्रिदेवांच्या शक्ती ) उत्पन्न होतात, तसेच जिच्या भुवयांच्या विलासानेच जगताची रचना होते, तीच ( भगवंतांची स्वरुपशक्ती ) श्रीसीता श्रीरामांच्या वामांगी होती. ॥ २ ॥
छबिसमुद्र हरि रुप बिलोकी । एकटक रहे नयन पट रोकी ॥
चितवहिं सादर रुप अनूपा । तृप्ति न मानहिं मनु सतरुपा ॥
सौंदर्याचे सागर असलेल्या श्रीहरींचे रुप पाहून मनू व शतरुपा यांच्या पापण्या स्तब्ध होऊन एकटक पाहात राहिल्या. ते मोठ्या आदराने ते अनुपम सौंदर्य पाहात होते आणि पाहून त्यांचे मन तृप्त होत नव्हते. ॥ ३ ॥
हरष बिबस तन दसा भुलानी । परे दंड इव गहि पद पानी ॥
सिर परसे प्रभु निर कर कंजा । तुरत उठाए करुनापुंजा ॥
आनंदाच्या अतिरेकामुळे ती दोघे देहभान विसरुन गेली. आपल्या हातांनी भगवंतांचे चरण धरुन त्यांनी दंडवत लोटांगण घातले. कृपा-राशी प्रभूंनी आपल्या करकमलांनी त्यांच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यांना त्वरित वर उठविले. ॥ ४ ॥

Custom Search

No comments: