Sunday, July 19, 2020

ShriRamcharitmans Part 28 श्रीरामचरितमानस भाग २८


ShriRamcharitmans Part 28 
श्रीरामचरितमानस भाग २८ 
दोहा १७० ते १७३
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—रिपु तेजसी अकेल अपि 
लघु करि गनिअ न ताहु ।
अजहुँ देत दुख रबि ससिहि 
सिर अवसेषित राहु ॥ १७० ॥
तेजस्वी शत्रू एकटा असला, तरी त्याला लहान समजू नये. पाहा. ज्याचे फक्त शिर उरले आहे, तो राहू अजूनही सूर्य-चंद्राला छळत असतो. ॥ १७० ॥
तापस नृप निज सखहि निहारी । 
हरषि मिलेउ ऊठि भयउ सुखारी ॥
मित्रहि कहि सब कथा सुनाई । 
जातुधान बोला सुख पाई ॥
तपस्वी-राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला. उठून तो त्याला भेटला. त्याला फार आनंद झाला होता. त्याने आपल्या मित्राला ( कालकेतूला ) सर्व गोष्टी सांगितल्या, तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला, ॥ १ ॥
अब साधेउँ रिपु सुनहु नरेसा । 
जौं तुम्ह कीन्ह मोर उपदेसा ॥
परिहरि सोच रहहु तुम्ह सोई । 
बिनु औषध बिआधि बिधि खोई ॥
‘ हे राजा, जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस, तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच, असे समज. आता तू काळजी सोडून झोप. विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे. ॥ २ ॥
कुल समेत रिपु मूल बहाई । 
चौथें दिवस मिलब मैं आई ॥
तापस नृपहि बहुत परितोषी । 
चला महाकपटी अतिरोषी ॥
शत्रूला त्याच्या कुळासह मुळापासून उध्वस्त करुन आजपासून चौथ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन.’ ( अशा प्रकारे ) तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन महामायावी आणि अत्यंत रागीट राक्षस तेथून निघाला. ॥ ३ ॥
भानुप्रतापहि बाजि समेता । 
पहुँचाएसि छन माझ निकेता ॥
नृपहि नारि पहिं सयन कराई । 
हयगृहँ बाँधेसि बाजि बनाई ॥
त्याने राजा प्रतापभानूला घोड्यासह एका क्षणात घरी पोहोचविले आणि राजाला राणीजवळ झोपवून घोड्याला पागेत नीट बांधून ठेवले. ॥ ४ ॥
दोहा—राजा के उपरोहितहि 
हरि लै गयउ बहोरि ।
लै राखेसि गिरि खोह महुँ 
मायाँ करि मति भोरि ॥ १७१ ॥
नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला. आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करुन त्याने त्याला पर्वताच्या गुहेत आणून ठेवले. ॥ १७१ ॥
आपु बिरचि उपरोहित रुपा । 
परेउ जाइ तेहि सेज अनूपा ॥
जागेउ नृप अनभएँ बिहाना । 
देखि भवन अति अचरजु माना ॥
तो स्वतः पुरोहिताचे रुप घेऊन त्याच्या सुंदर अंथरुणावर जाऊन झोपला. राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला. ॥ १ ॥
मुनि महिमा मन महुँ अनुमानी । 
उठेउ गवँहिं जेहिं जान न रानी ॥
कानन गयउ बाजि चढ़ि तेहीं । 
पुर नर नारि न जानेउ केहीं ॥
मुनीच्या महिम्याचा अंदाज येऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला. नंतर त्याच्या घोड्यावर बसून वनात निघून गेला. नगरातील कोणाही स्त्री-पुरुषाला हे कळलेसुद्धा नाही. ॥ २ ॥
गएँ जाम जुग भूपति आवा । 
घर घर उत्सव बाज बधावा ॥
उपरोहितहि देख जब राजा । 
चकित बिलोक सुमिरि सोइ काजा ॥
दोन प्रहर उलटल्यावर राजा परत आला. घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगल गाणी गाइली जाऊ लागली. जेव्हा राजाने पुरोहिताला पाहिले, तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्र्चर्याने पाहू लागला. ॥ ३ ॥
जुग सम नृपहि गए दिन तीनी । 
कपटी मुनि पद रह मति लीनी ॥
समय जानि उपरोहित आवा । 
नृपहि मते सब कहि समुझावा ॥
राजाचे तीन दिवस जणू तीन युगांप्रमाणे गेले. त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती. ठरल्यावेळी पुरोहित ( बनलेल राक्षस ) आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले. ॥ ४ ॥
नृप हरषेउ पहिचानि गुरु 
भ्रम बस रहा न चेत ॥
बरे तुरत सत सहस 
बर बिप्र कुटुंब समेत ॥ १७२ ॥
( ठरल्याप्रमाणे ) गुरुला ( त्या रुपात ) ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला. तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की, हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस. त्याने लागलीच एक लाख उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले. ॥ १७२ ॥
उपरोहित जेवनार बनाई । 
छरस चारि बिधि जसि श्रुति गाई ॥
मायामय तेहिं कीन्हि रसोई । 
बिंजन बहु गनि सकइ न कोई ॥ 
कपटी पुरोहिताने वेदांत सांगितल्याप्रमाणे षड्रसपूर्ण ( भक्ष्य, भोज्य, लेह्य व चोष्य असे ) चार प्रकारचे भोजन बनविले. त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनविली की, त्यांची गणती करता येणार नाही. ॥ १ ॥
बिबिध मृगन्ह कर आमिष राँधा । 
तेहि महुँ बिप्र माँसु खल साँधा ॥
भोजन कहुँ सब बिप्र बोलाए । 
पद पखारि सादर बैठाए ॥
अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दुष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले. सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलाविले आणि त्यांचे पाय धुऊन त्यांना आदराने आसनावर बसविले. ॥ २ ॥       
परुसन जबहिं लाग महिपाला । 
भै अकासबानी तेहि काला ॥
बिप्रबृंद उठि उठि गृह जाहू । 
है बड़ि हानि अन्न जनि खाहू ॥
राजा वाढू लागला, इतक्यात ( कालकेतूने केलेली ) आकाशवाणी झाली, ‘ हे ब्राह्मणांनो, उठून आपापल्या घरी जा. हे अन्न खाऊ नका. हे खाल्ल्यास मोठा अनर्थ होईल. ॥ ३ ॥
भयउ रसोईं भूसुर माँसू । 
सब द्विज उठे मानि बिस्वासू ॥
भूप बिकल मति मोहँ भुलानी । 
भावी बस न आव मुख बानी ॥
स्वयंपाक घरात ब्राह्मणांचे मांस शिजविले आहे,’ आकाशवाणीवर विश्र्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले. राजा व्याकूळ झाला. त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती. भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. ॥ ४ ॥
दोहा—बोले बिप्र सकोप तब 
नहिं कछु कीन्ह बिचार ।
जाइ निसाचर होहु नृप 
मूढ़ सहित परिवार ॥ १७३ ॥
तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरुन उठून रागाने म्हणाले, ‘ मूर्ख राजा, तू कुटुंबासह राक्षस हो, ॥ १७३ ॥
छत्रबंधु तैं बिप्र बोलाई । 
घालै लिए सहित समुदाई ॥
ईस्वर राखा धरम हमारा । 
जैहसि तैं समेत परिवारा ॥
अरे नीच क्षत्रिया, तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करु इच्छित होतास. परमेश्र्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले. आता तू परिवारासह नष्ट होशील. ॥ १ ॥
संबत मध्य नास तव होऊ । 
जलदाता न रहिहि कुल कोऊ ॥
नृप सुनि श्राप बिकल अति त्रासा । 
भै बहोरि बर गिरा अकासा ॥
एक वर्षात तुझा नाश होईल. तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही. ‘ शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकूळ झाला. नंतर खरी आकाशवाणी झाली. ॥ २ ॥
बिप्रहु श्राप बिचारि न दीन्हा । 
नहिं अपराध भूप कछु कीन्हा ॥
चकित बिप्र सब सुनि नभबानी । 
भूप गयउ जहँ भोजन खानी ॥
‘ हे ब्राह्मणांनो, तुम्ही विचार करुन शाप दिला नाही. राजाने कोणताही अपराध केलेला नाही.’ ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले. तेव्हा राजा स्वतः भोजन बनविले होते, त्या ठिकाणी गेला. ॥ ३ ॥
तहँ न असन नहिं बिप्र सुआरा । 
फिरेउ राउ मन सोच अपारा ॥
सब प्रसंग महिसुरन्ह सुनाई । 
त्रसित परेउ अवनीं अकुलाई ॥

तेथे पाहिले तर स्वयमपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकीही नव्हता. राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला. त्याने ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकूळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: