Showing posts with label ShriRamCharitManas Part 12. Show all posts
Showing posts with label ShriRamCharitManas Part 12. Show all posts

Friday, May 15, 2020

ShriRamCharitManas Part 13 श्रीरामचरितमानस भाग १३


ShriRamCharitManas Part 13 
श्रीरामचरितमानस भाग १३
ShriRamCharitManas Part 13
श्रीरामचरितमानस भाग १३
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—सुनत बचन बिहसे रिषय गिरिसंभव तव देह ।
नारद कर उपदेसु सुनि कहहु बसेउ किसु गेह ॥ ७८ ॥
पार्वतीचे बोलणे ऐकून ऋषी हसले आणि म्हणाले, ‘ तुझा देह पर्वतापासून उत्पन्न झाला आहे, ( म्हणूनच तू अशी मंदबुद्धी आहेस. ) सांग, नारदांचा उपदेश ऐकून आजवर कुणाचे घर नांदले आहे बरे ? ॥ ७८ ॥
दच्छसुतन्ह उपदेसेन्हि जाई । तिन्ह फिरि भवनु न देखा आई ॥
चित्रकेतु कर घरु उन घाला । कनककसिपु कर पुनि अस हाला ॥
त्यांनी जाऊन दक्षाच्या मुलांना उपदेश दिला होता, त्यामुळे पुन्हा कधी परत येऊन त्यांनी घराचे तोंडही पाहिले नाही. चित्रकेतूचे घर नारदानेच उध्वस्त केले. नंतर हीच परिस्थिती हिरण्यकशिपूची झाली. ॥ १ ॥
नारद सिख जे सुनहिं नर नारी । अवसि होहिं तजि भवनु भिखारी ॥
मन कपटी तन सज्जन चीन्हा । आपु सरिस सबही चह कीन्हा ॥
जे स्री-पुरुष नारदांचे म्हणणे ऐकतात, ते घरदार सोडून नक्कीच भिकारी होतात. त्यांचे मन कपटी आहे, मात्र शरीरावर सज्जनपणाची चिन्हे ते मिरवतात. ते सर्वांना आपल्यासारखे बनवू इच्छितात. ॥ २ ॥
तेहि कें बचन मानि बिस्वासा । तुम्ह चाहहु पति सहज उदासा ॥
निर्गुन निलज कुबेष कपाली । अकुल अगेह दिगंबर ब्याली ॥
त्यांच्या ( नारदांच्या ) बोलण्यावर विश्र्वास ठेवून तुला असा पती   वाटला की जो स्वभावाने उदासीन, गुणहीन, निर्लज्ज, अशोभनीय वेश धारण करणारा, नर-कपालांची माला धारण करणारा, केलहीन, घर-दार नसलेला, नग्न आणि शरीरावर साप लपेटून घेणारा आहे. ॥ ३ ॥
कहहु कवन सुखु अस बरु पाएँ । भल भूलिहु ठग के बौराएँ ॥
पंच कहें सिवँ सती बिबाही । पुनि अवडेरि मराएन्हि ताही ॥
असा वर मिळाल्यावर तुला सुख मिळेल काय ? ते सांग. तू त्या लबाडाच्या ( नारदाच्या ) बहकण्यावर चांगली फसलीस. पूर्वी पंचांनी सांगितल्यामुळे शिवांनी सतीशी विवाह केला, परंतु नंतर तिला त्याग करुन मारुन टाकले. ॥ ४ ॥
दोहा—अब सुख सोवत सोचु नहिं भीख मागि भव खाहिं ।
सहज एकाकिन्ह के भवन कबहुँ कि नारि खटाहिं ॥ ७९ ॥
आता शिवांना काही काळजी उरली नाही. भीक मागून खातात, आणि सुखाने झोपतात. अशा स्वभावाच्या एकट्या राहणार्‍यांच्या घरात कधी कुणीहिं स्री टिकेल काय बरे ? ॥ ७९ ॥
अजहूँ मानहु कहा हमारा । हम तुम्ह कहुँ बरु नीक बिचारा ॥
अति सुंदर सुचि सुखद सुसीला । गावहिं बेद जासु जस लीला ॥
अजुन आमचे म्हणणे मान. आम्ही तुझ्यासाठी चांगला वर पाहिला आहे. तो फारच सुंदर, पवित्र, सुखदायक आणि सुशील आहे. त्याचे यशोगान व लीलागान वेद करतात. ॥ १ ॥
दूषन रहित सकल गुन रासी । श्रीपति पुर बैकुंठ निवासी ॥
अस बरु तुम्हहि मिलाउब आनी । सुनत बिहसि कह बचन भवानी ॥
तो दोषरहित आहे, सर्व गुणांचे भांडार आहे, लक्ष्मीचा स्वामी आहे आणि वैकुंठपुरात राहाणारा आहे, आम्ही अशा वराशी तुझी भेट घालून देतो. ‘ हे ऐकताच पार्वती हसून म्हणाली, ॥ २ ॥
सत्य कहेहु गिरिभव तनु एहा । हठ न छूट छूटै बरु देहा ॥
कनकउ पुनि पषान तें होई । जारेहुँ सहजु न परिहर सोई ॥
माझे शरीर पर्वतापासून उत्पन्न झाले आहे, हे तुम्ही बरोबर सांगितले आहे. म्हणून शरीर सुटले तरी माझा हट्ट सुटणार नाही. सोने हे सुद्धा पाषाणापासून बनते. म्हणून ते जाळल्यावर देखील आपला स्वभाव ( उजळपणा ) सोडत नाही. ॥ ३ ॥
नारद बचन न मैं परिहरऊँ । बसउ भवनु उजरउ नहिं डरऊँ ॥
गुर कें बचन प्रतीति न जेही । सपनेहुँ सुगम न सुख सिधि तेही ॥
म्हणून नारदांचे वचन मी मोडणार नाही. मग घर नांदो अगर उध्वस्त होवो, त्याला मी भीत नाही. ज्याचा गुरुंच्या वचनांवर विश्र्वास नसतो, त्याला सुख व सिद्धि स्वप्नांतही लाभत नाही. ॥ ४ ॥
महादेव अवगुन भवन बिष्नु सकल गुन धाम ।
जेहि कर मनु रम जाहि सन तेहि तेहि सन काम ॥ ८० ॥
महादेव अवगुणांचे माहेर आहेत आणि विष्णु सर्व सद्गुणांचे धाम आहेत, असे जरी मानले, तरी ज्याचे मन ज्याच्या ठिकाणी रमते, त्याला त्याच्याशीच कर्तव्य असते. ॥ ८० ॥
जौं तुम्ह मिलतेहु प्रथम मुनीसा । सुनतिउँ सिख तुम्हारि धरि सीसा ॥
अब मैं जन्मु संभु हित हारा । को गुन दूषन करै बिचारा ॥
हे मुनीश्र्वरांनो, तुम्ही जर मला पूर्वी भेटला असता, तर मी तुमचा उपदेश ( कदाचित ) शिरोधार्य मानला असता. परंतु आता मी आपला जन्म शिवांना अर्पण केलेला आहे. मग गुण-दोषांचा विचार कोण करणार ? ॥ १ ॥
जौं तुम्हरे हठ हृदयँ बिसेषी । रहि न जाइ बिनु किएँ बरेषी ॥
तौ कौतुकिअन्ह आलसु नाहीं । बर कन्या अनेक जग माहीं ॥
जर तुमचा फारच हट्ट असेल आणि विवाहाविषयीं बोलण्याविना तुम्हांला चैन पडत नसेल, तर जगात वर व कन्या पुष्कळ आहेत. गंमत करणार्‍यांना आळस नसतो. (म्हणून ही गंमत आणखी कुठेतरी जाऊन करा. ) ॥ २ ॥
जन्म कोटि लगि रगर हमारी । बरउँ संभु न त रहउँ कुआरी ॥
तजउँ न नारद कर उपदेसु । आपु कहहिं सत बार महेसू ॥  
वरायचे तर श्रीशिवांनाच वरीन, हाच माझा कोट्यावधी जन्मांपर्यंत आग्रह राहील. नाहीतर मी कुमारीच राहीन. स्वतः शिवांनी शंभर वेळा जरी मला सांगितले, तरी मी नारदांचा उपदेश सोडून देणार नाही. ‘ ॥ ३ ॥
मैं पा परउँ कहइ जगदंबा । तुम्ह गृह गवनहु भयउ बिलंबा ॥
देखि प्रेमु बोले मुनि ग्यानी । जय जय जगदंबिके भवानी ॥
जगज्जननी पार्वती पुढे म्हणाली की , ‘ मी तुमच्या पाया पडते. तुम्ही आपल्या घरी परत जा. खूप उशीर झाला आहे. ‘ ( शिवांच्याविषयी पार्वतीचे असे ) अढळ प्रेम पाहून ज्ञानी मुनी म्हणाले की, ‘ हे जगज्जननी, हे भवानी, तुझा विजय असो, विजय असो. ॥ ४ ॥
दोहा—तुम्ह माया भगवान सिव सकल जगत पितु मातु ॥
नाइ चरन सिर मुनि चले पुनि पुनि हरषत गातु ॥ ८१ ॥
तू माया असून शिव हे परमात्मा आहेत. तुम्ही दोघे संपूर्ण विश्वाचे माता-पिता आहात. ‘ ( असे म्हणून ) मुनी पार्वतीच्या पाया पडून निघाले. ( पार्वतीचा भाव पाहून ) त्यांचे देह वारंवार रोमांचित होत होते. ॥ ८१ ॥
जाइ मुनिन्ह हिमवंतु पठाए । करि बिनती गिरजहिं गृह ल्याए ॥
बहुरि सप्तरिषि सिव पहिं जाई । कथा उमा कै सकल सुनाई ॥
मुनींनी जाऊन हिमवानाला पार्वतीकडे पाठविले आणि त्याला सांगितले की, पार्वतीची समजूत घालून तिला घरी घेऊन या. नंतर सप्तर्षी शंकरांच्याजवळ गेले आणि त्यांनी पार्वतीची सगळी कथा त्यांना सांगितली. ॥ १ ॥
भए मगन सिव सुनत सनेहा । हरषि सप्तरिषि गवने गेहा ॥
मनु थिर करि तब संभु सुजाना । लगे करन रघुनायक ध्याना ॥
पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमग्न झाले. सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले. तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करुन श्रीरामांचे ध्यान करुं लागले. ॥ २ ॥
तारकु असुर भयउ तेहि काला । भुज प्रताप बल तेज बिसाला ॥
तेहिं सब लोक लोकपति जीते । भए देव सुख संपति रीते ॥
त्याच सुमारास तारकासुर उत्पन्न झाला होता. त्याचे बाहुबल, प्रताप व तेज प्रचंड होते. त्याने सर्व लोक आणि लोकपालांना जिंकले. त्यामुळे सर्व देव सुख-संपत्तिहीन झाले. ॥ ३ ॥
अजर अमर सो जीति न जाई । हारे सुर करि बिबिध लराई ॥
तब बिरंचि सन जाइ पुकारे । देखे बिधि सब देव दुखारे ॥
तारकासुर अजरामर होता, म्हणून त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते. देवांनी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्धे केली, पण ते पराभूत झाले. तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी जाऊन गार्‍हाणे सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सर्व देवांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले. ॥ ४ ॥          
दोहा—सब सन कहा बुझाइ बिधि दनुज निधन तब होइ ।
संभु सुक्र संभूत सुत एहि जीतइ रन सोइ ॥ ८२ ॥
ब्रह्मदेवांनी सर्वांना समजावून सांगितले की, ‘ भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल, तेव्हा तो या दैत्याला युद्धात जिंकेल व त्यात त्याचा मृत्यु होईल. ॥ ८२ ॥
मोर कहा सुनि करहु उपाई । होइहि ईस्वर करिहि सहाई ॥
सतीं जो तजी दच्छ मख देहा । जनमी जाइ हिमाचल गेहा ॥
मी सांगतो, तो उपाय करा. ईश्र्वराचे साहाय्य लाभेल व तुमचे काम होईल. सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता, तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे. ॥ १ ॥
तेहिं तपु कीन्ह संभु पति लागी । सिव समाधि बैठे सबु त्यागी ॥
जदपि अहइ असमंजस भारी । तदपि बात एक सुनहु हमारी ॥
तिने भगवान शिव पती व्हावे, म्हणून तप केले आहे आणि इकडे शिव हे सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले आहेत. ही मोठी घोटाळ्याची स्थिती आहे, परंतु मी सांगतो ते ऐका. ॥ २ ॥
पठवहु कामु जाइ सिव पाहीं । करै छोभु संकर मन माहीं ॥
तब हम जाइ सिवहि सिर नाई । करवाउब बिबाहु बरिआई ॥
तुम्ही जाऊन कामदेवाला शिवांच्याकडे पाठवून द्या. तो शिवांच्या मनांत क्षोभ उत्पन्न करील. ( त्यांची समाधी भंग करील. ) तेव्हा आपण जाऊन शिवांच्या चरणी मस्तक ठेवू आणि हट्ट धरुन ( त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करुन ) त्यांचे लग्न करु. ‘ ॥ ३ ॥
एहि बिधि भलेहिं देवहित होई । मत अति नीक कहइ सबु कोई ॥
अस्तुति सुरन्ह कीन्हि अति हेतू । प्रगटेउ बिषमबान झषकेतू ॥
असे झाले तरच देवांचे कल्याण होईल. सर्वजण म्हणाले, ‘ हा विचार चांगला आहे. ‘ नंतर देवांनी मोठ्या प्रेमाने कामदेवाची स्तुती केली, तेव्हा माशाचा ध्वज असणारा पंचबाण कामदेव प्रकट झाला. ॥ ४ ॥
दोहा—सुरन्ह कही निज बिपति सब सुनि मन कीन्ह बिचार ।
संभु बिरोध न कुसल मोहि बिहसि कहेउ अस मार ॥ ८३ ॥
देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले, ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले, ‘ शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही. ॥ ८३ ॥
तदपि करब मैं काजु तुम्हारा । श्रुति कह परम धरम उपकारा ॥
पर हित लागि तजइ जो देही । संतत संत प्रसंसहिं तेही ॥
तरीही तुमचे काम मी करीन, कारण वेद दुसर्‍यावर केलेल्या उपकारास परमधर्म म्हणतात. जो दुसर्‍याच्या हितासाठी आपल्या शरीराचाही त्याग करतो, त्याची संत प्रशंसा करतात. ‘ ॥ १ ॥
अस कहि चलेउ सबहि सिरु नाई । सुमन धनुष कर सहित सहाई ॥
चलत मार अस हृदयँ बिचारा । सिव बिरोध ध्रुव मरनु हमारा ॥
असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करुन कामदेव आपले पुष्प-धनुष्य हाती घेऊन वसंतादी सहायकांबरोबर निघाला. जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की, शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढवणार आहे. ॥ २ ॥
तब आपन प्रभाउ बिस्तारा । निज बस कीन्ह सकल संसारा ॥
कोपेउ जबहिं बारिचरकेतू । छन महुँ मिटे सकल श्रुति सेतू ॥
तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले. ज्यावेळी कामदेव संतापला, तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली. ॥ ३ ॥
ब्रह्मचर्ज ब्रत संजम नाना । धीरज धरम ग्यान बिग्याना ॥
सदाचार जप जोग बिरागा । सभय बिबेक कटकु सबु भागा ॥
ब्रह्मचर्य, व्रत, नाना प्रकारचे संयम, धैर्य, धर्म, ज्ञान, विज्ञान, सदाचार, जप, योग, वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरुन पळून गेली. ॥ ४ ॥
छं—भागेउ बिबेकु सहाय सहित सो सुभट संजुग महि मुरे ।
सदग्रंथ पर्बत कंदरन्हि महुँ जाइ तेहि अवसर दुरे ॥
होनिहार का करतार को रखवार जग खरभरु परा ।
दुइ माथ केहि रतिनाथ जेहि कहुँ कोपि कर धनु सरु धरा ॥
विवेक आपल्या सहाय्यकांच्यासह पळून गेला. त्याचे योद्धे युद्ध-भूमीवरुन पाठ फिरवून निघाले. त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरुपी पर्वतांच्या कडे-कपार्‍यात जाऊन लपून बसले. ( अर्थात ज्ञान, वैराग्य, संयम, नियम, सदाचार इत्यादी फक्त ग्रंथामध्ये उरले, त्यांचे आचरण संपले. ) संपूर्ण जगात खळबळ माजली. ( सर्वजण म्हणू लागले, ) हे विधात्या ! आता काय होणार ? आमचे रक्षण कोण करणार ? असा दोन शिरांचा कोण आहे की, ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरुन हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे ?
दोहा—जे सजीव जग अचर चर नारि पुरुष अस नाम ।
ते निज निज मरजाद तजि भए सकल बस काम ॥ ८४ ॥
जगामध्ये जे स्री-पुरुष जितके चराचर प्राणी होते, ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले. ॥ ८४ ॥
सब के हृदयँ मदन अभिलाषा । लता निहारि नवहिं तरु साखा ॥
नदीं उमगि अंबुधि कहुं धाईं । संगम करहिं तलाव तलाईं ॥
सर्वांच्या मनांत कामाची इच्छा उत्पन्न झाली. लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकु लागल्या. नद्या चेकाळून समुद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करु लागल्या. ॥ १ ॥
जहँ असि दसा जडन्ह कै बरनी । को कहि सकइ सचेतन करनी ॥
पसु पच्छी नभ जल थल चारी । भए कामबस समय बिसारी ॥
जर अचेतन ( वृक्ष, नदी इत्यादी ) पदार्थांची अशी अवस्था झाली तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे ? आकाश, जल, आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशु-पक्षी ( आपल्या संयोगाचा ) काळ विसरुन काम-वश झाले. ॥ २ ॥
मदन अंध ब्याकुल सब लोका । निसि दिनु नहिं अवलोकहिं कोका ॥
देव दनुज नर किंनर ब्याला । प्रेत पिसाच भूत बेताला ॥
सर्वजण कामांध होऊन व्याकूळ झाले. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्र-दिवस पाहिला नाही. देव, दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत, वेताळ,
इन्ह कै दसा न कहेउँ बखानी । सदा काम के चेरे जानी ॥
सिद्ध बिरक्त महामुनि जोगी । तेपि कामबस भए बियोगी ॥
हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात. म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही. सिद्ध, विरक्त, महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्रीच्या विरहाने पीडित झाले. ॥ ४ ॥
छं—भए कामबस जोगीस तापस पावँरन्हि की को कहै ।
देखहिं चराचर नारिमय जे ब्रह्ममय देखत रहे ॥
अबला बिलोकहिं पुरुषमय जगु पुरुष सब अबलामयं ।
दुइ दंड भरि ब्रह्मांड भीतर कामकृत कौतुक अयं ॥
जेव्हा योगीश्र्वर व तपस्वीसुद्धा कामाला वश झाले, मग बिचार्‍या मनुष्यांबद्दल काय सांगायचे ? ज्या लोकांना संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय दिसत होती, त्यांना आता सर्व जग स्रीमय दिसू लागले. स्रीयांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले, तर पुरुषांना ते स्रीमय दिसू लागले. दोन घटिका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले.
सो—धरी न काहूँ धीर सब के मन मनसिज हरे ।
जे राखे रघुबीर ते उबरे तेहि काल महुँ ॥ ८५ ॥
कुणालाही मन आवरता येईल. कामदेवाने सर्वांचे मन हरण केले. श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले, फक्त तेवढेच भक्त ( कामदेवाच्या प्रभावापासून ) त्यावेळी वाचले. ॥ ८५ ॥
उभय घरी अस कौतुक भयऊ । जौ लगि कामु संभु पहिं गयऊ ॥
सिवहि बिलोकि ससंकेउ मारु । भयउ जथाथिति सबु संसारु ॥
दोन घटिका असा तमाशा झाला. तोपर्यंत कामदेव श्रीशिवांच्या जवळ पोहोचला. त्यांना पाहून कामदेव चपापला, तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणें स्थिर झाले. ॥ १ ॥
भए तुरत सब जीव सुखारे । जिमि मद उतारि गएँ मतवारे ॥
रुद्रहि देखि मदन भय माना । दुराधरष दुर्गम भगवाना ॥
ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात. त्याप्रमाणे सर्व जीव शांत झाले. अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला. ॥ २ ॥
फिरत लाज कछु करि नहिं जाई । मरनु ठानि मन रचेसि उपाई ॥
प्रगटेसि तुरत रुचिर रितुराजा । कुसुमित नव तरु राजि बिराजा ॥
त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि काही करताही येत नव्हते. शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला. त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला. फुललेल्या वृक्षांच्या रांगा शोभून दिसू लागल्या. ॥ ३ ॥
बन उपबन बापिका तडागा । परम सुभग सब दिसा बिभागा ॥
जहँ तहँ जनु उमगत अनुरागा । देखि मुएहुँ मन मनसिज जागा ॥
वने-उपवने, विहिरी-तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले. जिकडे-तिकडे जणू प्रेम उसळू लागले. ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला. ॥ ४ ॥
छं—जागइ मनोभव मुएहुँ मन बन सुभगता न परै कही ।
सीतल सुगंध सुमंद मारुत मदन अनल सखा सही ॥
बिकसे सरन्हि बहु कंज गुंजत पुंज मंजुल मधुकरा ।
कलहंस पिक सुक सरस रव करि गान नाचहिं अपछरा ॥
मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला, वनाचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते. कामरुपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल-मंद-सुगंधित पवन वाहु लागला. सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यांवर भ्रमरसमूह मधुर गुंजारव करु लागले. राजहंस, कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गात-गात नाचू लागल्या.
दोहा—सकल कला करि कोटि बिधि हारेउ सेन समेत ।
चली न अचल समाधि सिव कोपेउ हृदयनिकेत ॥ ८६ ॥
कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोट्यावधी कळा दाखवूनही तो हरला. कारण श्रीशिवांची अढळ समाधी भंग पावली नाही. तेव्हा कामदेव संतापला. ॥ ८६ ॥
देखि रसाल बिटप बर साखा । तेहि पर चढेउ मदनु मन माखा ॥
सुमन चाप निज सर संधाने । अति रिस ताकि श्रवन लगि ताने ॥
त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहीली आणि मनांत चिडलेला मदन तिच्यावर चढला. त्याने पुष्प-धनुष्यावर आपले पाचही बाण चढविले आणि मोठ्या त्वेषाने लक्ष्य पाहून धनुष्य आकर्ण ताणले. ॥ १ ॥
छाडे बिषम बिसिख उर लागे । छूटि समाधि संभु तब जागे ॥
भयउ ईस मन छोभु बिसेषी । नयन उधारि सकल दिसि देखी ॥
आणि कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले. ते शिवांच्या हृदयाला लागले. त्यांची समाधि भंग झाली आणि ते जागे झाले. शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले. ॥ २ ॥
सौरभ पल्लव मदनु बिलोका । भयउ कोपु कंपेउ त्रैलोका ॥
तब सिवँ तीसर नयन उधारा । चितवत कामु भयउ जरि छारा ॥
आंब्याच्या पानांत दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांनी पाहताच कामदेव भस्म होऊन गेला. ॥ ३ ॥
हाहाकार भयउ जग भारी । डरपे सुर भए असुर सुखारी ॥
समुझि कामसुखु सोचहिं भोगी । भए अकंटक साधक जोगी ॥
जगामध्ये मोठा हाहाकार उडाला. देव घाबरुन गेले तर दैत्य आनंदित झाले. भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला. ॥ ४ ॥
छं—जोगी अकंटक भए पति गति सुनत रति मुरुछित भई ।
रोदति बदति बहु भॉंति करुना करति संकर पहिं गई ॥
अति प्रेम करि बिनति बिबिध बिधि जोरि कर सन्मुख रही ।
प्रभु आसुतोष कृपाल सिव अबला निरखि बोले सही ॥
योगी लोक निर्भय झाले, परंतु कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली. ती आक्रोश करीत करुणा भाकीत भगवान शिवांच्याजवळ गेली. अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली. त्या अबलेला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले.
दोहा—अब तें रति तव नाथ कर होइहि नामु अनंगु ।
बिनु बपु ब्यापिहि सबहि पुनि सुनु निज मिलन प्रसंगु ॥ ८७ ॥
हे रती, यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल. तो शरीराविना सर्वांना व्यापून टाकील. आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक. ॥ ८७ ॥
जब जदुबंस कृष्न अवतारा । होइहि हरन महा महिभारा ॥
कृष्न तनय होइहि पति तोरा । बचनु अन्यथा होइ न मोरा ॥
जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतार होईल, तेव्हा तुझा पती कृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. हे माझे वचन असत्य होणार नाही.’ ॥ १ ॥
रति गवनी सुनि संकर बानी । कथा अपर अब कहउँ बखानी ॥
देवन्ह समाचार सब पाए । ब्रह्मादिक बैकुंठ सिधाए ॥
शिवांचे वचन ऐकून रती निघपपन गेली. आता दुसरी कथा विस्ताराने वर्णन करुन सांगतो. ब्रह्मादी देवांनी ही वार्ता ऐकली, तेव्हा ते वैकुंठाला गेले. ॥ २ ॥
सब सुर बिष्नु बिरंचि समेता । गए जहॉं सिव कृपानिकेता ॥
पृथक पृथक तिन्ह कीन्हि प्रसंसा । भए प्रसन्न चंद्र अवतंसा ॥
नंतर तेथून विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव कृपासागर शिवांच्याकडे गेले. त्या सर्वांनी शिवांची वेगवेगळी स्तुती केली. तेव्हा शशिभूषण शिव प्रसन्न झाले. ॥ ३ ॥
बोले कृपासिंधु बृषकेतू । कहहु अमर आए केहि हेतू ॥
कह बिधि तुम्ह प्रभु अंतरजामी । तदपि भगति बस बिनवउँ स्वामी ॥
कृपासागर शिव म्हणाले, ‘ हे देवांनो, बोला. तुम्ही कशासाठी आला आहात ? ‘ ब्रह्मदेव म्हणाले, ‘ हे प्रभो, तुम्ही अंतर्यामी आहात, तरीही हे स्वामी, भक्तिपूर्वक मी विनंती करतो. ॥ ४ ॥
दोहा—सकल सुरन्ह के हृदयँ अस संकर परम उछाहु ।
निज नयनन्हि देखा चहहिं नाथ तुम्हार बिबाहु ॥ ८८ ॥
हे भगवान शंकर, आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा, अशी खूप इच्छा सर्व देवांच्या मनात आहे. ॥ ८८ ॥
यह उत्सव देखिअ भरि लोचन । सोइ कछु करहु मदन मद मोचन ॥
कामु जारि रति कहुँ बरु दीन्हा । कृपासिंधु यह भला कीन्हा ॥
हे कामदेवाचा मद नष्ट करणारे प्रभू, सर्वजणांना असा उत्सव डोळे भरुन पाहाता यावा, असे काही करा. हे कृपासागर, कामदेवाला भस्म करुन रतीला वरदान दिलेत हे फारच चांगले झाले. ॥ १ ॥
सासति करि पुनि करहिं पसाऊ । नाथ प्रभुन्ह कर सहज सुभाऊ ॥
पारबतीं तपु कीन्ह अपारा । करहु तासु अब अंगीकारा ॥
हे नाथा, श्रेष्ठ स्वामींचा असा सहज स्वभावच असतो की, ते प्रथम शासन करतात आणि नंतर कृपा करतात. पार्वतीने अपार तप केलेले आहे, तेव्हा आता तिचा अंगीकार करा. ‘ ॥ २ ॥
सुनि बिधि बिनय समुझि प्रभु बानी । ऐसेइ होउ कहा सुखु मानी ॥
तब देवन्ह दुंदुभीं बजाईं । बरषि सुमन जय जय सुर साईं ॥
ब्रह्मदेवांची ही प्रार्थना ऐकून आणि प्रभू रामचंद्रांची वाणी स्मरण करुन शिवांनी प्रसन्नतेने म्हटले की, ’ ठिक आहे. मग देवांनी नगारे वाजविले आणि फुलांचा वर्षाव करीत ते म्हणू लागले, ‘ विजय असो, देवाधिदेवांचा विजय असो. ‘ ॥ ३ ॥
अवसरु जानि सप्तरिषि आए । तुरतहिं बिधि गिरिभवन पठाए ॥
प्रथम गए जहँ रहीं भवानी । बोले मधुर बचन छल सानी ॥
योग्यवेळ साधून सप्तर्षी आले आणि ब्रह्मदेवांनी लगेच त्यांना हिमालयाच्या घरी पाठविले. सप्तर्षी प्रथम पार्वतीकडे गेले आणि तिची थट्टा करीत म्हणाले-॥ ४ ॥


Custom Search

Wednesday, May 13, 2020

ShriRamCharitManas Part 12 श्रीरामचरितमानस भाग १२


ShriRamCharitManas Part 12 
श्रीरामचरितमानस भाग १२

श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—जोगी जटिल अकाम मन नगन अमंगल बेष ।
अस स्वामी एहि कहँ मिलिहि परी हस्त असि रेख ॥ ६७ ॥
संशयरहित, योगी, जटाधारी, निष्कामहृदय, नग्न व अमंगल वेषधारी असा पति हिला मिळेल. हिच्या हातावरील रेषा अशाच आहेत. ॥ ६७ ॥
सुनि मुनि गिरा सत्य जियँ जानी । दुख दंपतिहि उमा हरषानी ॥
नारदहूँ यह भेदु न जाना । दसा एक समुझब बिलगाना ॥
नारदमुनींची वाणी ऐकून आणि ती खरी वाटून पति-पत्नी ( हिमवान आणि मैना ) या दोघांनाही वाईट वाटले. परंतु पार्वती आनंदित झाली. नारदांनाही त्याचे रहस्य उमजले नाही.कारण सर्वांची बाह्य दशा एकसारखी असली तरी आंतरिक भाव भिन्न होते. ॥ १ ॥
सकल सखीं गिरिजा गिरि मैना । पुलक सरीर भरे जल नैना ॥
होइ न मृषा देवरिषि भाषा । उमा सो बचनु हृदयँ धरि राखा ॥
सर्व सख्या, पार्वती, पर्वतराज हिमवान आणि मैना या सर्वांचे अंग पुलकित झाले आणि सर्वांचे नेत्र सजल झाले. देवर्षींचे वचन असत्य होणार नाही, ( हा विचार करुन ) पार्वतीने ते वचन आपल्या मनात कोरुन ठेवले. ॥ २ ॥
उपजेउ सिव पद कमल सनेहू । मिलन कठिन मन भा संदेहू ॥
जानि कुअवसरु प्रीति दुराई । सखी उछँग बैठी पुनि जाई ॥
तिला शंकरांच्या चरणी प्रेम उपजले, परंतु मनात संशय वाटत होता की, ते भेटणे कठीण आहे. वेळ-काळ पाहून उमेने आपले प्रेम लपवून ठेवले आणि ती सखीच्या मांडीवर जाऊन बसली. ॥ ३ ॥
झूठि न होइ देवरिषि बानी । सोचहिं दंपति सखीं सयानी ॥
उर धरि धीर कहइ गिरिराऊ । कहहु नाथ का करिअ उपाऊ ॥
देवर्षींची वाणी खोटी ठरणार नाही या विचाराने हिमवान, मैना आणि सर्व चतुर सख्यांना काळजी पडली. मग धीर धरुन पर्वतराजाने म्हटले की, ‘ हे नाथ, यावर उपाय काय करावा, ते सांगा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—कह मुनीस हिमवंत सुनु जो बिधि लिख लिलार ।
देव दनुज नर नाग मुनि कोउ न मेटनिहार ॥ ६८ ॥
मुनीश्वर नारद म्हणाले, ‘ हे हिमवान ! ऐक. ब्रह्मदेवाने ललाटावर जे टाकू शकत नाही. ॥ ६८ ॥
तदपि एक मैं कहउँ उपाई । होइ करै जौं दैउ सहाई ॥
जस बरु मैं बरनेउँ तुम्ह पाहीं । मिलिहि उमहि तस संसय नाहीं ॥
तरीही मी एक उपाय सांगतो. दैवाची साथ मिळाली तर यश येईल. तुझ्यासमोर मी जसे वर्णन केले आहे, तसाच वर उमेला नक्की मिळेल. ॥ १ ॥
जे जे बर के दोष बखाने । ते सब सिव पहिं मैं अनुमाने ॥ 
जौं बिबाहु संकर सन होई । दोषउ गुन सम कह सबु कोई ॥
मी जे वराचे दोष सांगितले, ते सर्व माझ्या अंदाजाप्रमाणे श्रीशिवांमध्ये आहेत. जर शिवांच्या बरोबर लग्न झाले, तर लोक दोषांनाच गुणांप्रमाणे मानतील. ॥ २ ॥
जौं अहि सेज सयन हरि करहीं । बुध कछु तिन्ह कर दोषु न धरहीं ॥
भानु कृसानु सर्ब रस खाहीं । तिन्ह कहँ मंद कहत कोउ नाहीं ॥
ज्याप्रमाणे भगवान विष्णु हे शेषनागाच्या शय्येवर शयन करतात, तरीही पंडित त्यांना काही दोष देत नाहीत. सूर्य व अग्निदेव बर्‍या-वाईट सर्व रसांचे सेवन करतात, म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणत नाही. ॥ ३ ॥
सुभअरु असुभसलिल सब बहई । सुरसरि कोउ अपुनीत न कहई ॥
समरथ कहुँ नहिं दोषु गोसाईं । रबि पावक सुरसरि की नाईं ॥
गंगेमध्ये शुद्ध व अशुद्ध सर्व पाणी वाहाते, परंतु गंगेला कोणी अपवित्र म्हणत नाही. सूर्य, अग्नी आणि गंगा यांच्याप्रमाणे समर्थाला कोणताही दोष लागत नाही. ॥ ४ ॥
दोहा—जौं अस हिसिषा करहिं नर जड बिबेक अभिमान ।
परहिं कलप भरि नरक महुँ जीव कि ईस समान ॥ ६९ ॥
जेव्हा मूर्ख माणसे ज्ञानाच्या घमेंडीमुळे अशा प्रकारचे वर्तन करतात, तेव्हा ती कल्पांतापर्यंत नरकात पडतात. जीव हा ईश्वरासारखा ( सर्वथा स्वतंत्र ) होऊ शकेल काय ? ॥ ६९ ॥
सुरसरि जल कृत बारुनि जाना । कबहुँ न संत करहिं तेहि पाना ॥
सुरसरि मिलें सो पावन जैसें । ईस अनीसहि अंतरु तैसें ॥
गंगेच्या पाण्यापासून बनविलेली मदिरा असते, तरी संतजन काही ती पीत नाहीत. पण तीच ( मदिरा ) गंगेच्या प्रवाहांत मिसळल्यावर पवित्र बनते. ईश्र्वर व जीव यांच्यामध्ये असाच फरक आहे. ॥ १ ॥
संभु सहज समरथ भगवाना । एहि बिबाहँ सब बिधि कल्याना ॥
दुराराध्य पै अहहिं महेसु । आसुतोष पुनि किएँ कलेसू ॥
शिव जे स्वभावतःच समर्थ आहेत, कारण ते भगवान आहेत. म्हणून या विवाहामध्ये सर्व प्रकारे कल्याण आहे. महादेवांची आराधना करणे मोठे कठीण आहे, तरीही तपाचे क्लेश सहन केल्यावर ते लगेच संतुष्ट होतात. ॥ २ ॥
जौं तपु करै कुमारि तुम्हारी । भाविउ मेटि सकहिं त्रिपुरारी ॥
जद्यपि बर अनेक जग माहीं । एहि कहँ सिव तजि दूसर नाहीं ॥
जर तुमच्या कन्येने तप केले, तर महादेव अनिष्ट प्रारब्ध नष्ट करु शकतील. जगात जरी अनेक वर असले, तरी हिच्यासाठी शिवांखेरीज दुसरा वर नाही. ॥ ३ ॥
बर दायक प्रनतारति भंजन । कृपासिंधु सेवक मन रंजन ॥
इच्छित फल बिनु सिव अवराधें । लहिअ न कोटि जोग जप साधें ॥
शिव हे वरदान देणारे, शरणागतांची दुःखे नाहीशी करणारे, कृपासागर आणि सेवकांचे मन प्रसन्न करणारे आहेत. शिवांची आराधना केल्याविना कोट्यावधी योग आणि जप करुनही इच्छित फल मिळत नाही. ॥ ४ ॥
दोहा—अस कहि नारद सुमिरि हरि गिरिजहि दीन्हि असीस ।
होइहि यह कल्यान अब संसय तजहु गिरीस ॥ ७० ॥
असे म्हणून भगवंतांचे स्मरण करीत नारदांनी पार्वतीला आशीर्वाद दिला. ( आणी ते म्हणाले, ) ‘ हे पर्वतराज, तुम्ही मनातला संशय काढून टाका.आता हे कल्याणच होईल. ॥ ७० ॥
कहि अस ब्रह्मभवन मुनि गयऊ । आगिल चरित सुनहु जस भयऊ ॥
पतिहि एकांत पाइ कह मैना । नाथ न मैं समुझे मुनि बैना ॥
असे म्हणून नारदमुनी ब्रह्मलोकी निघून गेले. आता पुढे जे झाले, ते ऐका, एकांत मिळाल्यावर मैनाने पतीला म्हटले, हे नाथ, मुनींच्या वचनांचा अर्थ मला कळला नाही. ॥ १ ॥
जौं घरु बरु कुलु होइ अनूपा । करिअ बिबाहु सुता अनुरुपा ॥
न त कन्या बरु रहउ कुआरी । कंत उमा मम प्रानपिआरी ॥
जर आपल्या मुलीसाठी अनुकूल घर, वर व कुळ उत्तम असेल तर विवाह करा. नाहीतर मुलगी कुमारी राहिली तरी चालेल. ( अयोग्य वराशी तिचा विवाह करण्याची माझी इच्छा नाही. ), कारण हे स्वामी ! पार्वती मला प्राणासारखी आवडती आहे. ॥ २ ॥
जौं न मिलिहि बरु गिरिजहि जोगू । गिरि जड सहज कहिहि सबु लोगू ॥
सोइ बिचारि पति करेहु बिबाहू । जेहिं न बहोरि होइ उर दाहू ॥
जर पार्वतीला योग्य वर मिळाला नाही तर सर्व लोक म्हणतील की, पर्वत स्वभावतः जड ( मूर्ख ) असतात. हे स्वामी ! या गोष्टीचा पूर्ण विचार करुन विवाह करा. नंतर मनात पश्चात्ताप व्हायला नको. ॥ ३ ॥
अस कहि परी चरन धरि सीसा । बोले सहित सनेह गिरीसा ॥
बरु पावक प्रगटै ससि माहीं । नारद बचनु अन्यथा नाहीं ॥
असे म्हणत मैनाने पतीच्या चरणी लोळण घेतली. तेव्हा हिमवानाने प्रेमाने म्हटले, ‘ चंद्रामधून एखादे वेळी अग्नी प्रकट होईल, पण नारदांचे वचन खोटे ठरणार नाही. ॥ ४ ॥
दोहा—प्रिया सोचु परिहरहु सबु सुमिरहु श्रीभगवान ।
पारबतिहि निरमयउ जेहिं सोइ करिहि कल्यान ॥ ७१ ॥
हे प्रिये सर्व काळजी सोडून भगवंताचे स्मरण कर. ज्यांनी पार्वतीला निर्मिले आहे. तेच तिचे कल्याण करतील. ॥ ७१ ॥
अब जौं तुम्हहि सुता पर नेहू । तौ अस जाइ सिखावनु देहू ॥
करै सो तपु जेहिं मिलहिं महेसू । आन उपायँ न मिटिहि कलेसू ॥
तुझे कन्येवर प्रेम आहे, तेव्हा जाऊन तिला उपदेश कर की, शिव मिळतील, असे तप कर. दुसर्‍या कोणत्याही उपायाने हे क्लेश दूर होणार नाहीत. ॥ १ ॥
नारद बचन सगर्भ सहेतु । सुंदर सब गुन निधि बृषकेतू ॥
अस बिचारि तुम्ह तजहु असंका । सबहि भॉंति संकरु अकलंका ॥
नारदांचे बोलणे रहस्यपूर्ण आणि सकारण आहे. भगवान शिव हे सर्व गुणांचे भांडार आहेत. असा विचार करुन तू ( मिथ्या ) संशय टाकून दे. शिव हे सर्वप्रकारे निष्कलंक आहेत. ॥ २ ॥
सुनि पति बचन हरषि मन माहीं । गई तुरत उठि गिरिजा पाहीं ॥
उमहि बिलोकि नयन भरे बारी । सहित सनेह गोद बैठारी ॥
पतीचे बोलणे ऐकून मैना प्रसन्न झाली आणि उठून लगेच पार्वतीजवळ गेली. पार्वतीला पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने तिला आपल्या मांडीवर प्रेमाने बसविले. ॥ ३ ॥
बारहिं बार लेति उर लाई । गदगद कंठ न कछु कहि जाई ॥
जगत मातु सर्बग्य भवानी । मातु सुखद बोलीं मृदु बानी ॥
मग वारंवार ती पार्वतीला हृदयाशी कवटाळू लागली. प्रेमामुळे मैनेचा गळा भरुन आला. त्यामुळे तिला काही बोलता येत नव्हते. जगज्जननी भवानी ही तर सर्वज्ञ होती. ( आईच्या मनाची स्थिती ओळखून ) ती आईला सुख देणार्‍या कोमल वाणीने म्हणाली, ॥ ४ ॥
दोहा--सुनहि मातु मैं दीख अस सपन सुनावउँ तोहि ।
सुंदर गौर सुबिप्रबर अस उपदेसेउ मोहि ॥ ७२ ॥
आई, ऐक. मी तुला सांगते की, मी एक स्वप्न पाहिले. मला एका सुंदर गौरवर्ण श्रेष्ठ ब्राह्मणाने असा उपदेश दिला आहे, ॥ ७२ ॥
करहि जाइ तपु सैलकुमारी । नारद कहा सो सत्य बिचारी ॥
मातु पितहि पुनि यह मत भावा । तपु सुखप्रद दुख दोष नसावा ॥
‘ हे पार्वती, नारदांनी जे सांगितले आहे, ते खरे मानून तू जाऊन तप कर. शिवाय ही गोष्ट तुझ्या माता-पित्यालाही आवडली आहे. तप हे सुख देणारे आणि दुःख-दोषांचा नाश करणारे आहे. ॥ १ ॥
तपबल रचइ प्रपंचु बिधाता । तपबल बिष्नु सकल जग त्राता ॥
तपबल संभु करहिं संघारा । तपबल सेषु धरइ महिभारा ॥
तपाच्या बळानेच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात. तपाच्या बळावरच विष्णू सर्व जगाचे पालन करतात. तपाच्या बळानेच शंभू ( रुद्ररुपाने जगाचा ) संहार करतात आणि तपानेच शेष पृथ्वीचा भार धारण करतो. ॥ २ ॥
तप अधार सब सृष्टि भवानी । करहि जाइ तपु अस जियँ जानी ॥
सुनत बचन बिसमित महतारी । सपन सुनायउ गिरिहि हँकारी ॥
हे भवानी, संपूर्ण सृष्टी ही तपाच्या आधारे उभी आहे, हे मनात ओळखून तू जाऊन तप कर.’ ही गोष्ट ऐकून माता मैनेला आश्र्चर्य वाटले आणि तिने हिमवानास बोलावून ते स्वप्न सांगितले. ॥ ३ ॥
मातु पितहि बहुबिधि समुझाई । चलीं उमा तप हित हरषाई ॥
प्रिय परिवार पिता अरु माता । भए बिकल मुख आव न बाता ॥
माता-पिता यांना पुष्कळ प्रकारे समजावून मोठ्या आनंदाने पार्वती तप करण्यास निघाली. प्रिय कुटुंबीय, पिता आणि माता सर्व व्याकूळ झाले. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. ॥ ४ ॥
दोहा—बेदसिरा मुनि आइ तब सबहि कहा समुझाइ ।
पारबती महिमा सुनत रहे प्रबोधहि पाइ ॥ ७३ ॥
त्यावेळी वेदशिरा मुनींनी येऊन सर्वांना समजावले. पार्वतीचा महिमा ऐकल्यावर सर्वांना समाधान वाटले. ॥ ७३ ॥
उर धरि उमा प्रानपति चरना । जाइ बिपिन लागीं तपु करना ॥
अति सुकुमार न तनु तप जोगू । पति पद सुमिरि तजेउ सबु भोगु ॥
पार्वती प्राणप्रिय पतीचे चरण हृदयामध्ये धारण करुन वनामध्ये जाऊन तप करु लागली. पार्वतीचे अत्यंत सुकुमार शरीर तपासाठी योग्य नव्हते, तरीही पतीच्या चरणांचे स्मरण करीत, तिने सर्व भोग सोडून दिले. ॥ १ ॥
नित नव चरन उपज अनुरागा । बिसरी देह तपहिं मनु लागा ॥
संबत सहस मूल फल खाए । सागु खाइ सत बरष गवॉंए ॥
( तिच्या मनात ) पतीच्या चरणी नित्य नवे प्रेम उपजू लागले आणि तपामध्ये तिचे मन असे गुंतले की, ती देहभान विसरुन गेली. एक हजार वर्षे तिने कंदमुळे व फळे खाल्ली आणि नंतर शंभर वर्षे तिने भाजीपाला खाऊन घालविली. ॥ २ ॥
कछु दिन भोजनु बारि बतासा । किए कठिन कछु दिन उपबासा ॥
बेल पाती महि परइ सुखाई । तीनि सहस संबत सोइ खाई ॥
काही दिवस तिने जल आणि वायूचे सेवन केले. नंतर काही दिवस कठोर उपवास केला. बेलाची पाने सुकून जी जमिनीवर पडत, ती तिने तीन हजार वर्षे भक्षण केली. ॥ ३ ॥
पुनि परिहरे सुखानेउ परना । उमहि नामु तब भयउ अपरना ॥
देखि उमहि तप खीन सरीरा । ब्रह्मगिरा भै गगन गभीरा ॥
नंतर सुकलेली पानेसुद्धा खाणे तिने सोडून दिले. त्यामुळे पार्वतीचे नाव ‘ अपर्णा ‘ पडले. तपामुळे उमेचे शरीर क्षीण झाल्याचे पाहून आकाशातून गंभीर ब्रह्मवाणी झाली. ॥ ४ ॥                   
दोहा—भयउ मनोरथ सुफल तव सुनु गिरिराजकुमारि ।
परिहरु दुसह कलेस सब अब मिलिहहिं त्रिपुरारि ॥ ७४ ॥
‘ हे पर्वतराज-कुमारी, ऐक. तुझे मनोरथ पूर्ण झाले. आता तू सर्व कठीण तपाचे क्लेश सोडून दे. आता तुला शिव भेटतील. ॥ ७४ ॥
अस तपु काहुँ न कीन्ह भवानी । भए अनेक धीर मुनि ग्यानी ॥
अब उर धरहु ब्रह्म बर बानी । सत्य सदा संतत सुचि जानी ॥
हे भवानी, धैर्यवान मुनी आणि ज्ञानी पुष्कळ होऊन गेले, परंतु असे ( कठोर ) तप कुणी केले नाही. आता तू या श्रेष्ठ ब्रह्मदेवाची वाणी सदा सत्य व निरंतर पवित्र मानून आपल्या मनात बाळग. ॥ १ ॥
आवै पिता बोलावन जबहीं । हठ परिहरि घर जाएहु तबहीं ॥
मिलहिं तुम्हहि जब सप्त रिषीसा । जानेहु तब प्रमान बागीसा ॥
जेव्हा तुझे वडील तुला बोलवायला येतील, तेव्हा हट्ट सोडून घरी जा. जेव्हा तुला सप्तर्षी भेटतील , तेव्हा ही वाणी खरी समज. ॥ २ ॥
सुनत गिरा बिधि गगन बखानी । पुलक गात गिरिजा हरषानी ॥
उमा चरित सुंदर मैं गावा । सुनहु संभु कर चरित सुहावा ॥
आकाशातून सांगितली गेलेली ही ब्रह्मदेवांची वाणी ऐकून पार्वती प्रसन्न झाली आणि हर्षामुळे तिचे शरीर रोमांचित झाले. ( याज्ञवल्क्य मुनी भरद्वाज मुनींना म्हणाले की, ) मी पार्वतीचे सुंदर चरित्र ऐकविले. आता श्रीशिवांचे सुंदर चरित्र ऐका. ॥ ३ ॥
जब तें सतीं जाइ तनु त्यागा । तब तें सिव मन भयउ बिरागा ॥
जपहिं सदा रघुनायक नामा । जहँ तहँ सुनहिं राम गुन ग्रामा ॥    
जेव्हा सतीने ( दक्षाच्या यज्ञात ) जाऊन शरीर त्याग केला, तेव्हापासून श्रीशिवांच्या मनांत वैराग्य उत्पन्न झाले होते. ते नेहमी श्रीरामांचे नाम जपू लागले आणि जिकडे-तिकडे जाऊन श्रीरामांच्या गुणांच्या कथा श्रवण करु लागले. ॥ ४ ॥
दोहा—चिदानंद सुखधाम सिव बिगत मोह मद काम ।
 बिचरहिं महि धरि हृदयँ हरि सकल लोक अभिराम ॥ ७५ ॥
चिदानंद, सुख-धाम, मोह-मद—कामरहित भगवान शंकर सर्व लोकांना आनंद देणार्‍या भगवान श्रीरामांना हृदयामध्ये धारण करुन ( ध्यानमग्न अवस्थवस्थेंत ) पृथ्वीवर संचार करु लागले. ॥ ७५ ॥
कतहुँ मुनिन्ह उपदेसहिं ग्याना । कतहुँ राम गुन करहिं बखाना ॥
जदपि अकाम तदपि भगवाना । भगत बिरह दुख दुखित सुजाना ॥
कुठे ते मुनींना ज्ञानाचा उपदेश करीत, तर कुठे श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करीत होते. जरी ज्ञानी शिव हे निष्काम आहेत, तरीही ते आपल्या भक्ताला ( सतीला ) झालेल्या वियोगाच्या दुःखामुळे दुःखी होते. ॥ १ ॥
एहि बिधि गयउ कालु बहु बीती । नित नै होइ राम पद प्रीती ॥
नेमु प्रेमु संकर कर देखा । अबिचल हृदयँ भगति कै रेखा ॥
अशा रीतीने बराच काळ लोटला. श्रीरामचरणांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. श्रीशंकरांचे कठोर नियम, अनन्य प्रेम व अंतःकरणातील अढळ भक्ती जेव्हा श्रीरामांनी पाहिली, ॥ २ ॥
प्रगटे रामु कृतग्य कृपाला । रुप सील निधि तेज बिसाला ॥
बहु प्रकार संकरहि सराहा । तुम्ह बिनु अस ब्रतु को निरबाहा ॥
तेव्हा कृतज्ञ, कृपाळु, रुप-शीलाचे भांडार, अत्यंत तेजःपुंज भगवान श्रीराम प्रगट झाले. त्यांनी पुष्कळ प्रकारे श्रीशिवांची वाखाणणी केली आणि म्हटले, ‘ तुमच्याशिवाय असे ( कठीण ) व्रत कोण करु शकणार ? ॥ ३ ॥
बहुबिधि राम सिवहि समुझावा । पारबती कर जन्मु सुनावा ॥
अति पुनीत गिरिजा कै करनी । बिस्तर सहित कृपानिधि बरनी ॥
श्रीरामांनी अनेक प्रकारे शिवांचे सांत्वन केले आणि पार्वतीच्या जन्माची वार्ता सांगितली. कृपानिधान श्रीरामांनी पार्वतीच्या अत्यंत पवित्र कृतीचे विस्ताराने वर्णन केले. ॥ ४ ॥
दोहा—अब बिनती मम सुनहु सिव जौं मो पर निज नेहु ।
जाइ बिबाहहु सैलजहि यह मोहि मागें देहु ॥ ७६ ॥
नंतर ते शिवांना म्हणाले, ‘ हे शंकरा, जर तुमचे माझ्यावर ( खरेच ) प्रेम असेल तर आता माझी विनंती ऐका. माझी इच्छा आहे की, तुम्ही जाऊन पार्वतीचे पाणीग्रहण करावे.’ ॥ ७६ ॥
कह सिव जदपि उचित अस नाहीं । नाथ बचन पुनि मेटि न जाहीं ॥
सिर धरि आयसु करिअ तुम्हारा । परम धरमु यह नाथ हमारा ॥
शिव म्हणाले, ‘ जर हे योग्य नाही, तरी स्वामींचे म्हणणे मला टाळता येणार नाही. हे नाथ ! तुमची आज्ञा शिरसावंद्य करणे, हाच माझा परम धर्म आहे. ॥ १ ॥
मातु पिता गुर प्रभु कै बानी । बिनहिं बिचार करिअ सुभ जानी ॥
तुम्ह सब भॉंति परम हितकारी । अग्या सिर पर नाथ तुम्हारी ॥
माता, पिता, गुरु आणि स्वामी यांचे सांगणे काहीही विचार न करता कल्याणकारक समजून मान्य करायला हवे. शिवाय तुम्ही तर माझे परम हितकारी आहात. म्हणून हे नाथ ! तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. ॥ २ ॥
प्रभु तोषेउ सुनि संकर बचना । भक्ति बिबेक धर्म जुत रचना ॥
कह प्रभु हर तुम्हार पन रहेऊ । अब उर राखेहु जो हम कहेऊ ॥
शंकरांची भक्ती, ज्ञान व धर्म यांनी युक्त असे बोलणे ऐकून श्रीराम प्रसन्न झाले. प्रभु म्हणाले, ‘ हे हरा, तुमची प्रतिज्ञा पूर्ण झाली. आता मी जे सांगितले आहे, ते लक्षांत ठेवा.’ ॥ ३ ॥
अंतरधान भए अस भाषी । संकर सोइ मूरति उर राखी ॥
तबहिं सप्तरिषि सिव पहिं आए । बोले प्रभु अति बचन सुहाए ॥
असे म्हणून श्रीराम अंतर्धान पावले. शिवांनी त्यांची ती मूर्ती आपल्या हृदयांत धारण करुन ठेवली. त्याचवेळी सप्तर्षी शिवांच्याकडे आले. प्रभु महादेवांनी त्यांना गोड शब्दात सांगितले, ॥ ४ ॥
दोहा—पारबती पहिं जाइ तुम्ह प्रेम परिच्छा लेहु ।
गिरिहि प्रेरि पठएहु भवन दूरि करेहु संदेहु ॥ ७७ ॥
तुम्ही पारवतीकडे जाऊन तिच्या प्रेमाची पारख करुन घ्या आणि हिमाचलाला सांगून ( त्यांना पार्वतीस आणण्यास पाठवा व ) पार्वतीला घरी पाठवून द्या आणि त्यांच्या मनांतील संशय दूर करा. ॥ ७७ ॥
रिषिन्ह गौरि देखी तहँ कैसी । मूरतिमंत तपस्या जैसी ॥
बोले मुनि सुनु सैलकुमारी । करहु कवन कारन तपु भारी ॥
सप्तर्षींनी ( तेथे जाऊन पाहिले ) तर पार्वती जणू मूर्तिमंत तपस्याच होती. मुनी म्हणाले, हे शैलकुमारी, ऐक. तू कशासाठी इतके कठोर तप करीत आहेस ? ॥ १ ॥
केहि अवराधहु का तुम्ह चहहू । हम सन सत्य मरमु किन कहहू ॥
कहत बचन मनु अति सकुचाई । हँसिहहु सुनि हमारि जडताई ॥
तू कोणाची आराधना करीत आहेस आणि तुझी इच्छा काय आहे ? आम्हाला आपले गुपित खरे खरे का सांगत नाहीस ? ( पार्वती म्हणाली, ) ‘ सांगताना मनात मोठा संकोच वाटतो. तुम्ही माझा मूर्खपणा ऐकून हसाल. ॥ २ ॥
मनु हठ परा न सुनइ सिखावा । चहत बारि पर भीति उठावा ॥
नारद कहा सत्य सोइ जाना । बिनु पंखन्ह हम चहहिं उडाना ॥
माझ्या मनाने हट्ट धरला आहे, काही केल्या ते ऐकत नाही आणि पाण्यावर भिंत उभी करावी, असे त्याला वाटते. नारदांनी जे सांगितले होते, ते खरे मानून मी पंखाविना उडू इच्छिते. ॥ ३ ॥
देखहु मुनि अबिबेकु हमारा । चाहिअ सदा सिवहि भरतारा ॥
मुनींनो, तुम्ही माझा वेडेपणा पाहा की, शिवांना आपला पती बनविण्याची माझी कामना आहे. ‘ ॥ ४ ॥


Custom Search