Adhyay Aathava Vishwarup Darshan
Ganesh Geeta Adhyay Aathava Vishwarup Darshan is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय आठवा विश्र्वरुपदर्शन
वरेण्य उवाच
भगवन्नारदो मह्यं तव नानाविभूतयः ।
उक्तवांस्ता अहं वेद न सर्वाः सोऽपि वेत्ति ततः ॥ १ ॥
१) वरेण्य म्हणाला, भगवान् नारदांनीं पूर्वीं मला तुझ्या अनेक विभुति सांगितल्या त्या सर्व मला त्या वेळी कळल्या नाहीत. व त्या मुनींनाही सर्व समजल्या नव्हत्या.
त्वमेव तत्त्वतः सर्वा वेत्सि ता द्विरदानन ।
निजं रुपभिदानीं मे व्यापकं चारु दर्शय ॥ २ ॥
२) त्या सर्व विभूति, हे गजानना, तूंच जाणतोस. आतां सर्वव्यापक सुन्दर असे तुझें रुप मला दाखव.
श्रीगजानन उवाच
एकस्मिन्मयि पश्य त्वं विश्र्वमेतच्चराचरम् ।
नानाश्र्चर्याणि दिव्यानि पुरा दृष्टानि केनचित् ॥ ३ ॥
३) श्रीगजानन म्हणले, राजा, माझ्या एकातच तूं चराचर पहा. अशीं अनेक प्रकारची दिव्य आश्र्चर्यें पूर्वीं क्वचित् एखाड्यानें पाहिली असतील.
ज्ञानचक्षुरहं तेऽद्य सृजामि स्वप्रभावतः ।
चर्मचक्षुः कथं पश्येद्विभुं मामजमव्ययम् ॥ ४ ॥
४) हे राजा, मी स्वप्रभावानें आज तुला दिव्य नेत्र देतो. कारण सर्वव्यापक अज व अव्यय अशा मला चर्मचक्षूंनीं कसें पहातां येईल ?
क उवाच
ततो राजा वरेण्यः स दिव्यचक्षुरवैक्षत ।
ईशितुः परमं रुपं गजास्यस्य महाद्भुतम् ॥ ५ ॥
५) ब्रह्मदेव म्हणाले, हे व्यास ! वरेण्य राजाला दिव्य दृष्टि प्राप्त झाली व त्या दृष्टीनें श्रीगजाननाचें अत्यंत अद्भुत असें रुप तो पाहूं लागला.
असंख्यवक्त्रं ललितमसंख्यांघ्रिकरं महत् ।
अनुलिप्तं सुगन्धेन दिव्यभूषाम्बरस्त्रजम् ॥ ६ ॥
६) ज्याला असंख्य मुखें, अगणित हातपाय असून जें सुंदर व विशाल होते. सुगंधि द्रव्यांनीं लिप्त असलेलें, दिव्य अलंकार, वस्त्रे व माला ज्यावर दिसत आहेत.
असंख्यनयनं कोटिसूर्यरश्मि धृतायुधम् ।
तदूर्ष्मणि ततो लोका दृष्टास्तेन पृथग्विधा ॥ ७ ॥
७) असंख्य नयनांनी युक्त, कोटिसूर्याप्रमाणें ज्याची कांती आहे, अनेक आयुधें धारण केलेलें, असें रुप वरेण्यानें पाहिलें. ( ते इतकें विशाल होते ) कीं त्यावर भूरादिक लोक पृथक् पृथक् रहात होते.
दृष्ट्वैश्र्वरं परं रुपं प्रणम्य स नृपोऽब्रवीत् ।
वरेण्य उवाच
वीक्षेऽहं तव देहेऽस्मिन्देवानृषिगणान्पितृन् ॥ ८ ॥
८) श्रीगजाननाचें दिव्यरुप पाहून वरेण्यानें त्याला वंदन केलें व म्हणाला, या तुझ्या देहावर देव, ऋषिगण व पितर मला दिसत आहेत.
पातालानां समुद्राणां द्विपानां चैव भूभृताम् ।
महर्षीणां सप्तकं च नानार्थैः संकुलं विभो ॥ ९ ॥
९) सप्त पातालें. सप्त समुद्र, सप्त द्वीपें, सप्त कुलाचल व सप्त महर्षि नाना प्रकारांची कर्में करीत असलेले मी पहात आहे.
भुवाऽन्तरिक्षं स्वर्गांश्र्च मनुष्योरगराक्षसान् ।
ब्रह्मविष्णुमहेशेन्द्रान्देवाञ्जन्तूननेकधा ॥ १० ॥
१०) मी या तुझ्या स्वरुपांत भूमीसह आकाश, स्वर्ग, मनुष्य, सर्प, राक्षस तसेंच ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, इंद्र व इतर देव व अनेक प्रकारच्या प्राण्यांना पहात आहे.
अनाद्यनन्तं लोकादिमनन्तभुजशीर्षकम् ।
प्रदीप्तानलसंकाशमप्रमेयं पुरातनम् ॥ ११ ॥
११) आदिअन्तरहित, सर्व लोकांचा जनक, ज्याला कर व शिरें अनंत आहेत, प्रदीप्त अग्नीप्रमाणें दिसणारा, प्रमाणातीत व पुरातन
किरीटकुणडलधरं दुर्निरीक्ष्यं मुदावहम् ।
एतादृशं च वीक्षे त्वां विशालवक्षसं प्रभुम् ॥ १२ ॥
१२) किरीटकुंडल धारण करणारा, भक्तांना सुख देणारा, ज्याला पहातांना डोळे दिपतात, वक्षस्थल ज्याचें विशाल आहे, हे प्रभो, अशा तुला मी पहातो.
सुरविद्याधरैर्यक्षैः किन्नरैर्मुनिमानुषैः ।
नृत्यद्भिरप्सरोभिश्र्च गन्धर्वैर्गानतत्परैः ॥ १३ ॥
१३) देव, विद्याधर, यक्ष, किन्नर, मुनि, मनुष्य, नाचणार्या अप्सरा, गायन करणारें गंधर्व,
वसुरुद्रादित्यगणैः सिद्धैः साध्यैर्मुदायुतैः ।
सेव्यमानं महाभक्त्या वीक्ष्यमाणं सुविस्मितैः ॥ १४ ॥
१४) अष्टवसु, एकादश रुद्र, द्वादशादित्य, सिद्ध व साध्य हें आनंदानें व भक्तीनें तुझी सेवा करीत आहेत व आश्र्चर्यानें तुला पहात आहेत.
वेत्तारमक्षरं वेद्यं धर्मगोप्तारमीश्र्वरम् ।
पातालानि दिशः स्वर्गान्भुवं व्याप्याऽखिलं स्थितम् ॥ १५ ॥
१५) सर्वज्ञ, अक्षर, वेद्य धर्माचा रक्षक, सर्वांचा नियन्ता, सप्त पाताले, दशदिशा , सप्तस्वर्ग, या सर्वांना व्यापून राहिलेल्या
भीता लोकास्तथा चाऽहमेवं त्वां वीक्ष्य रुपिणम् ।
नानादंष्ट्राकरालं च नानाविद्याविशारदम् ॥ १६ ॥
१६) सर्व लोक व स्वतः मीही अशा तुझ्या स्वरुपाला पाहून भ्यालों आहोंत. अनेक दाढांनीं भयंकर अनेक विद्यांमध्ये प्रवीण.
प्रलयानलदीप्तास्यं जटिलं च नभःस्पृशम् ।
दृष्ट्वा गणेश ते रुपं भ्रान्त इवाऽभवम् ॥ १७ ॥
१७) प्रलयकालच्या अग्नीप्रमाणें ज्याचें प्रदीप्त मुख आहे, जटांनीं युक्त व आकाशाला टेकलेलें, असें तुझे रुप पाहून मला भ्रम झाल्यासारखें झालें आहे.
देवा मनुष्या नागाद्याः खलास्त्वदुदरेशयाः ।
नानायोनिभुजश्र्चाऽन्ते त्वय्येव प्रविशन्ति च ॥ १८ ॥
अब्धे रुत्पद्यमानास्ते यथा जीमूतबिन्दवः ।
१८) देव, मनुष्य, नाग वगैरे दुष्ट प्राणीही तुझ्या उदरांत रहात आहेत. अनेक योनींत भोग भोगून हे सर्व लोक शेवटीं तुझ्यांत प्रविष्ट होतात. जसें, समुद्रांतून उत्पन्न झालेले जलबिंदु शेवटीं समुद्रांत लीन होतात.
त्वमिन्द्रोऽग्निर्यमश्र्चैव निर्ऋतिर्वरुणो मरुत् ॥ १९ ॥
गुह्यकेशस्तथेशानः सोमाः सूर्योऽखिलं जगत् ।
१९) इन्द्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, मरुत, कुबेर, रवि, चंद्र व हें सर्व जगत तूंच आहेस.
नमामि त्वामतः स्वामिन्प्रसादं कुरु मेऽधुना ॥ २० ॥
दर्शयस्व निजं रुपं सौम्यं यत्पूर्वमीक्षितम् ।
२०) वरेण्य म्हणाला, हे स्वामिन् गजानना ! मी तुला नमन करितो. तरी मजवर कृपा करुन मी पूर्वीं पाहिले होतें तसलें सौम्य रुप मला दाखीव.
को वेद लीलास्ते भूमन् क्रियमाणा निजेच्छया ॥ २१ ॥
अनुग्रहान्मया दृष्टमैश्र्वरं रुपमीदृशम् ।
ज्ञानचक्षुर्यतो दत्तं प्रसन्नेन त्वया विभो ॥ २२ ॥
२१-२२) तूं आपल्या इच्छेने ज्या लीला करतोस त्या जाणायला कोण समर्थ आहे? तूं माझ्यावर अनुग्रह केलास, म्हणूनच मी हें ऐश्र्वर्य (विश्र्वरुप) पाहूं शकलों. कारण तूं प्रसन्न होऊन मला ज्ञानचक्षु दिलास.
श्रीगजानन उवाच
नेदं रुपं महाबाहो मम पश्यन्ति योगिनः ।
सनकाद्या नारदाद्याः पश्यन्ति मदनुग्रहात् ॥ २३ ॥
२३) श्रीगजानन म्हणतात, राजा ! हें माझें रुप कोणीही योगी पाहूं शकत नाहीत. सनकादिकव नारदादिकही माझ्या अनुग्रहानें पहातात.
चतर्वेदार्थतत्त्वज्ञाश्र्चतुःशास्त्रविशारदाः ।
यज्ञदानतपोनिष्ठा न मे रुपं विदन्ति ते ॥ २४ ॥
२४) ज्यांना चारीही वेदार्थांचे तत्त्व समजते व जे चारीही शास्त्रांत निष्णात असतात व यज्ञदान व तप यांचेचवर ज्यांची निष्ठा असते अशानांही माझें हे रुप कळत नाही.
शक्योऽहमीक्षितं ज्ञातुं प्रवेष्टुं भक्तिभावतः ।
त्यज भीतिं च मोहं च पश्य मां सौम्यरुपिणम् ॥ २५ ॥
२५) मला पहाणें, माझे ज्ञान व प्रवेश हीं भक्तिभवानेंच शक्य आहेत. तूं भीति व मोह सोडून, मीं आतां सौम्य रुप धारण केलेआहे त्या मला पहा.
मद्भक्तो मत्परः सर्वसंगहीनो मदर्थकृत् ।
निष्क्रोधः सर्वभूतेषु समो मामेति भूभुज ॥ २६ ॥
२६) ज्याला मी श्रेष्ठ वाटतो, सर्वसंगपरित्याग केलेला, निष्क्रोध, सर्व भूतांचे ठायीं समता ठेवणारा, असा माझा भक्त मला प्राप्त होतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे विश्र्वरुपदर्शनो नाम अष्टमोऽध्यायः ॥
Adhyay Aathava Vishwarup Darshan
अध्याय आठवा विश्र्वरुपदर्शन
Custom Search
No comments:
Post a Comment