Saturday, December 30, 2017

Adhyay Navava Kshetra Dnyatru Dnyey Vivek अध्याय नववा क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेक योग


Adhyay Navava Kshetra Dnyatru Dnyey Vivek 
Ganesh Geeta Adhyay Navava Kshetra Dnyatru Dnyey Vivek is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय नववा क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेक योग
वरेण्य उवाच
अनन्यभावस्त्वां सम्यङ्मूर्तिमन्तमुपासते ।
योऽक्षरं परमव्यक्तं तयोः कस्ते मतोऽधिकः ॥ १ ॥
वरेण्य म्हणाला, जो अनन्यभावानें तुझ्या सगुण रुपाची उत्तम उपासना करतो व जो अक्षर, अव्यक्त अशा निर्गुण रुपाची उपासना करतो, या दोहोंत तुला अधिक मान्य कोण आहे? 
असि त्वं सर्ववित्साक्षी भूतभावन ईश्र्वरः ।
अतस्त्वां परिपृच्छामि वद मे कृपया विभो ॥ २ ॥
२) तूं सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भूतांना उत्पन्न करणारा असा आहेस. म्हणून मी तुला विचारीत आहे. तरी कृपा करुन सांग.  
श्रीगजानन उवाच
यो मां मूर्तिधरं भक्त्या मद्भक्तः परिसेवते ।
स मे मान्योऽनन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ॥ ३ ॥
३) श्रीजगानन म्हणाले,  सगुण अशा माझी जो माझा भक्त अनन्य होऊन, माझ्यावर मन एकाग्र करुन, भक्तीनें मला भजतो तो मला मान्य आहे. 
खगजं स्ववशं कृत्वाऽखिलभूतहितार्थकृत् ।
ध्येयमक्षरमव्यक्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ॥ ४ ॥
४) सर्व इंद्रियांना स्वाधीन ठेवून अखिल भूतांना हितप्रद असें कृत्य करणारा, अक्षर, अव्यक्त, कूटस्थ, स्थिर, सर्वव्यापक, अशा तत्त्वाचें ध्यान करणारा  
सोऽपि मामेत्य निर्देश्यं मत्परो य उपासते ।
संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ॥ ५ ॥
५) तो मत्पर होऊन अनिर्देश्य ( निर्गुण ) अशा माझी उपासना करितो तोही मलाच पावतो. अशा संसारसागरांतून मी त्याचा उद्धार करतो.  
अव्यक्तोपासनादुःखमधिकं तेन लभ्यते ।
व्यक्तस्योपासनात्साध्यं तदेवाऽव्यक्तभक्तितः ॥ ६ ॥
६) अव्यक्ताची ( निर्गुणाची ) उपासना करण्यांत त्याला कष्ट मात्र जास्त पडतात. व्यक्त व अव्यक्त यांच्या उपासनेंत फक्त एक मात्र असतें. 
भक्तिश्र्चैवाऽऽदराश्र्चाऽत्र  कारणं परमं मतम् ।
सर्वेषां विदुषां श्रेष्ठो ह्यकिंचिज्ज्ञोऽपि भक्तिमान् ॥ ७ ॥
७) या दोन्हीही उपासना आदर व भक्ति यांची जरुरी आहे. असें मान्य आहे. कांहीही येत नसेल व भक्तिमान् असेल तर तो विद्वानांहूनही श्रेष्ठ आहे.  
भजन्भक्त्या विहीनो यः स चाण्डालोऽभिधीयते ।
चाण्डालोऽपि भजन्भक्त्या ब्राह्मणेभ्योऽधिको मम ॥ ८ ॥
८) भक्ति नसतांना भजणारा चाण्डाल म्हटला जातो. चाण्डाल असून तो भक्तीनें भजत असेल तर द्विजाहूनही श्रेष्ठ आहे.  
शुकाद्याः सनकाद्याश्र्च पुरा मुक्ता हि भक्तितः ।
भक्त्यैव मामनुप्राप्ता नारदाद्याश्र्चिरायुषः ॥ ९ ॥
९) शुकादिक व सनकादिक हे पूर्वीं  या भक्तीनेंच मुक्त झाले आहेत. चिरंजीवी नारदादिकही भक्तीनेंच मला प्राप्त झालें आहेत.  
अतो भक्त्या मयि मनो निधेहि बुद्धिमेव च ।
भक्त्या भजस्व मां राजंस्ततो मामेव यास्यसि ॥ १० ॥
१०) म्हणून तूं भक्तीनें माझ्यावर मन व बुद्धि ठेव व मला भक्तीनें भज म्हणजे शेवटीं मला प्राप्त होशील.   
असमर्थोपिऽर्पितुं स्वान्तं ध्रुवं मयि नराधिप ।
अभ्यासेन च योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ॥ ११ ॥
११) तूं आपलें अंतःकरण मला अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास व योग यांचे योगानें मला प्राप्त होण्याचा यत्न कर.   
तत्राऽपि त्वमशक्तश्र्चेत्कुरु कर्म मदर्पणम् ।
ममाऽनुग्रहतश्र्चैव परां निर्वृतिमेष्यसि ॥ १२ ॥
१२) हेंही तुझ्या शक्तीच्या बाहेरचें असेल तर सर्व कर्म मला अर्पण कर.म्हणजे माझ्या अनुग्रहानें तुला परम निर्वृति ( मोक्ष ) प्राप्त होशील.  
अथैतदप्यनुष्टातुं न शक्तोऽसि तदा कुरु ।
प्रयत्नतः फलत्यागं त्रिविधानां हि कर्मणाम् ॥ १३ ॥ 
१३) तुला हें करणेंही शक्तीच्या बाहेरचें वाटत असेल तर कायिक, वाचिक व मानसिक कर्मांच्या फलांचा यत्नपूर्वक त्याग कर.   
श्रेयसी बुद्धिरावृत्तेस्ततो ध्यानं परं मतम् ।
ततोऽखिलपरित्यागस्ततः शान्तिर्गरीयसी ॥ १४ ॥
१४) अहंकारापेंक्षा बुद्धि श्रेष्ठ आहे. बुद्धीहून ध्यान, ध्यानाहून अखिल परित्याग व त्यापेक्षांही शान्ति श्रेष्ठ आहे. 
निरहंममता बुद्धिरद्वेषः करुणा समः ।
लाभालाभे सुखे दुःखे मानामाने च मे प्रियः ॥ १५ ॥
१५) ज्याची अहंता, ममताबुद्धि गेली आहे, जो कोणाशींही द्वेष करीत नाहीं, सर्वांवर दया करतो, लाभ, हानि, सुखदुःख, मान, अपमान यांत ज्याची समता असते. ( तो मला प्रिय असतो ).       
यं वीक्ष्य न भयं याति जनस्तस्मान्न च स्वयम् ।
उद्वेगभीकोपमुद्भी रहितो यः स मे प्रियः ॥ १६ ॥
१६) ज्याला पाहून लोक भीत नाहींत व जो लोकांना पाहून भीत नाही; उद्वेग, भय, क्रोध, प्रीति, हेही ज्यांना असत नाहींत ते मला प्रिय आहेत. 
रिपौ मित्रेऽथ गर्हायां स्तुतौ शोके समः समुत् ।
मौनी निश्र्चलधीभक्तिरसङ्गः स च मे प्रियः  ॥ १७ ॥
१७) ज्याला शत्रु-मित्र, निन्दा-स्तुति सम वाटतात, पुत्रवियोगासारख्या शोकाच्या प्रसंगीही जो सुख मानतो, मौन धारण करणारा, ज्याची बुद्धि व भक्ति स्थिर असते, ज्यानें सर्वसंगाचा त्याग केलेला असतो, तो मला प्रिय आहे. 
संशीलयति यश्र्चैनमुपदेशं मया कृतम् ।
स वन्द्यः सर्वलोकेषु मुक्तात्मा मे प्रियः सदा ॥ १८ ॥
१८) हा मी केलेला उपदेश मनांत धरुन जो त्याप्रमाणें वागतो तो सर्वांना वंद्य होतो. असा मुक्त पुरुष मला प्रिय आहे. 
अनिष्टाप्तौ च न द्वेष्टीष्टप्राप्तौ  न तुष्यति ।
क्षेत्रतज्ज्ञौ च यो वेत्ति स मे प्रियतमो भवेत् ॥ १९ ॥
१९) ज्याला अनिष्ठ प्राप्तीविषयीं द्वेष असत नाही, व इष्ट प्राप्तीमुळें आनंदही वाटत नाहीं; तसेंच ज्याला क्षेत्र व क्षेत्राचें ज्ञान असते, तो मला अतिशय प्रिय असतो.  
वरेण्य उवाच
किं क्षेत्रं कश्र्च तद्वेत्ति किं तज्ज्ञानं गजानन ।
एतदाचक्ष्व मह्यं त्वं पृच्छते करुणाम्बुधे ॥ २० ॥
२०) वरेण्य म्हणतो, हे गजानना, तें क्षेत्र काय व त्याला कोण जाणतो ? त्याचें ज्ञान कसें असतें ? ते दयानिधे, मी आपणास विचारत आहे. तरी समजावून सांगा.  
श्रीगजानन उवाच 
पञ्च भूतानि तन्मात्राः पञ्च कर्मेन्द्रियाणि च ।
अहंकारो मनो बुद्धिः पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ॥ २१ ॥
इच्छाऽव्यक्तं धृतिद्वेषौ सुखदुःखे तथैव च ।
चेतनासहितश्र्चाऽयं समूहः क्षेत्रमुच्यते ॥ २२ ॥
२१-२२)  पंच स्थूल भूतें व पंच सूक्ष्म भूतें, पंच कर्मेंद्रियें, , पंच ज्ञानेंद्रियें, अहंकार, मन, बुद्धि, इच्छा, अव्यक्त ( मूलप्रकृति ). धैर्य, द्वेष, सुखदुःख, व चेतना, या सर्वांच्या समूहाला क्षेत्र अशी संज्ञा आहे.   
तज्ज्ञं त्वं विद्धि मां भूप सर्वान्तर्यामिणं दृढम् ।
अयं समूहोऽहं चापि यज्ज्ञाने विषयौ नृप ॥ २३ ॥
२३) त्या क्षेत्राच्या सर्वान्तर्यामी विभु ( व्यापक व दृढ असा मी ) जाणत असतो. म्हणून क्षेत्रज्ञ मीच आहेअसें समज. हा क्षेत्रसंज्ञकसमूह व मी हे ज्या ज्ञानाचे विषय आहोंत त्याला ज्ञान असें म्हणतात.
आर्जवं गुरुशुश्रूषा विरक्तिश्र्चेन्द्रियार्थतः ।
शौचं क्षान्तिरदंभश्र्च जन्मादिदोषवीक्षणम् ॥ २४ ॥
समदृष्टिर्दृढा भक्तिरेकान्तित्वं शमो दमः ।
एतैर्यच्च युतं ज्ञानं तज्ज्ञानं विद्धि बाहुज ॥ २५ ॥
२४-२५) सरळपणा, गुरुसेवा, शब्दादि विषयांविषयीं वैराग्य, द्विविध शौच, शांतता,दंभ नसणें, जन्म, जरा, व्याधि इत्यादिकांत दोष पाहणें, सर्वत्र समदृष्टि, दृढभक्ति, शम, दम, एकान्तवास या सर्व गोष्टी ज्या ज्ञानांत असतील त्याला ज्ञान असें म्हणतात.  
तज्ज्ञानविषयं राजन्ब्रवीमि ते श्रृणुष्व मे ।
यज्ज्ञात्वैति च निर्वाणं मुक्त्वा संसृतिसागरात् ॥ २६ ॥
२६) हे राजा ! आतां तुला ज्ञेय वस्तु काय आहे तें सांगतों, ऐक, ज्याला जाणलें असतां मनुष्य संसारसागरांतून मुक्त होऊन मोक्षास जातो. 
यदनादीन्द्रियैर्हीनं गुणभुग्गुणवर्जितम् ।
अव्यक्तं सद्सद्भिन्नमिन्द्रियार्थावभासकम् ॥ २७ ॥
२७) जें अनादि, इंद्रियें नसतांनाही गुणांचा भोग घेणारे, जे अव्यक्त, सत् व असत् यांहून भिन्न, इंद्रियांच्या शब्दादि विषयांना भासविणारें ( असें आहे. )
विश्र्वभृच्चाऽखिलव्यापि त्वेकं नानेव भासते ।
बाह्याभ्यन्तरतः पूर्णमसंगं तमसः परम् ॥ २८ ॥
२८) विश्र्वाचे धारणपोषण करणारें, अखिल व्यापक, एकच असून अनेकासारखें भासणारें, अंतर्बाह्य पूर्ण, निःसंगव तमाहून पर असें. 
दुर्ज्ञेयं चाऽतिसूक्ष्मत्वाद्दीप्तानामपि भासकम् ।
ज्ञेयमेतादृशं विद्धि ज्ञानगम्यं पुरातनम् ॥ २९ ॥
२९) अतिशय सूक्ष्म असल्यानें जें समजावयाला कठीण आहे, चंद्रसूर्यादि प्रकाशक पदार्थांनाही प्रकाशित करणारें आहे, अतिशय पुरातन, ज्ञानानें ज्याचें आकलन करतां येतें असें ज्ञेय आहे. 
एतदेव परं ब्रह्म ज्ञेयमात्मा परोऽव्ययः ।
गुणाप्रकृतिजान्भुङ्क्ते पुरुषः प्रकृते परः ॥ ३० ॥
३०) परब्रह्म, परमात्मा, अव्यय या शब्दांनीं याच ज्ञेय वस्तूबद्दल व्यवहार करतात. ( सांख्य ज्याला ) प्रकृतीहून पर व प्रकृतीच्या गुणांचा भोग घेणारा पुरुष असे म्हणतात तो, हें ज्ञेयच आहे.   
गुणैस्त्रिभिरियं देहे बध्नाति पुरुषं दृढम् ।
यदा प्रकाशः शान्तिश्र्च वृद्धे सत्त्वे तदाऽधिकम् ॥ ३१ ॥
३१) ही प्रकृति सत्त्वादि आपल्या त्रिगुणांनी पुरुषाला ( जीवाला ) देहांत दृढबद्ध करते. ( त्रिगुणांपैकी ) सत्त्वगुण जेव्हां अधिक होतो तेव्हां प्रकाश (ज्ञान ) व शान्तीची वाढ होते.    
लोभोऽशमः स्पृहाऽऽरम्भः कर्मणां रजसो गुणाः ।
मोहोऽप्रवृत्तिश्र्चाऽज्ञानं प्रमादस्तमसो गुणाः ॥ ३२ ॥
३२) लोभ, हव्यास, शांतता नसणें, कर्म करण्याकडे प्रवृति हे रजोगुणाचे गुण आहेत. तसेंच मोह, कांहीं करुं नये असे वाटणें, अज्ञान व प्रमाद हे तमोगुणाचे गुण आहेत.   
सत्ताधिकः सुखं ज्ञानं कर्मसंगं रजोधिकः ।
तमोधिकश्र्च लभते निद्राऽलस्यं सुखेतरत् ॥ ३३ ॥
३३) ज्याचा सत्त्वगुण वाढलेला असतो, त्याला ज्ञान व सुख मिळते. रजोगुण वाढला असतां कर्म करीत रहावें असें वाटते. तमोगुण वाढला कीं झोंप, आळस व दुःख प्राप्त होते.    
एषु त्रिषु प्रवृद्धेषु मुक्तिसंसृतिदुर्गतीः ।
प्रयान्ति मानवा राजंस्तस्मात्सत्त्वयुतो भव ॥ ३४ ॥
३४) सत्त्वगुण वाढलां असतां ( मृत्यु आला तर ) मुक्ति मिळते. रजोगुण वाढला तर पन्हां जन्माला यावें लागतें. व तमोगुणाच्या आधिक्यानें मनुष्य दुर्गतीला जातात. यासाठी राजा, तूं सत्वगुणानें युक्त हो. 
ततश्र्च सर्वभावेन भज त्वं मां नरेश्र्वर ।
भक्त्या चाऽव्यभिचारिण्या सर्वत्रैव च संस्थितम् ॥ ३५ ॥
३५) हे राजा ! तूं सत्त्वयुक्त होऊन सर्वव्यापक अशा मला अनन्यभावानें व अव्यभिचारिणी भक्तीनें भज. 
अग्नौ सूर्ये तथा सोमे यच्च तारासु संस्थितम् ।
विदुषि ब्राह्मणे तेजो विद्धि तन्मामकं नृप ॥ ३६ ॥
३६) अग्नि, सूर्य, नक्षत्रें, चंद्र व विद्वान ब्राह्मण यांच्यांत जें तेज असतें तें माझे आहे.
अहमेवाऽखिलं विश्र्वं सृजामि विसृजामि च ।
औषधीस्तेजसा सर्वा विश्र्वं चाऽऽप्याययाम्यहम् ॥ ३७ ॥
३७) सर्व विश्र्वाला मीच उत्पन्न करितों आणि त्याचा संहारही मीच करितों. आपल्या तेजानें औषधींना व विश्र्वाला पुष्ट करितो. 
सर्वेन्द्रियाण्यधिष्ठाय जाठरं च धनंजयम् ।
भुनज्मि चाऽखिलन्भोगान्पुण्यपापविवर्जितः ॥ ३८ ॥
३८) सर्व इंद्रियें व उदरांतील अग्नि यांचा आश्रय करुन सर्व भोग मी भोगीत असतो; पण मला त्याचे पुण्यपाप कांहींही लागत नाही.
अहं विष्णुश्र्च रुद्रश्र्च ब्रह्म गौरी गणेश्र्वरः ।
इन्द्राद्या लोकपालाश्र्च ममैवांऽशसमुद्भुवाः ॥ ३९ ॥
३९) ब्रह्मा, विष्णु, महेश, गणपति, गौरी मीच आहे. इन्द्रादिक लोकपाल हेही माझ्याच अंशापासून झाले आहेत.  
येन येन हि रुपेण जनो मां पर्युपासते ।
तथा तथा दर्शयामि तस्मै रुपं सुभक्तितः ॥ ४० ॥
४०) जन मला ज्या ज्या रुपाचा कल्पून भजत असतो, मीही त्याला त्या त्या प्रमाणें रुप दाखवितो.
इति क्षेत्रं तथा ज्ञाता ज्ञानं ज्ञेयं मयोरितम् ।
अखिलं भूपते सम्यगुपपन्नाय पृच्छते ॥ ४१ ॥ 
४१) याप्रमाणें क्षेत्र, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय यासंबंधीं तूं मला शरण येऊन जें विचारलेंस तें सर्व मी तुला सांगितलें आहे. 
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेक योगो नाम नवमोऽध्यायः ॥   
Adhyay Navava Kshetra Dnyatru Dnyey Vivek
अध्याय नववा क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेक योग


Custom Search

No comments: