Adhyay Dahava Upadesh Yogaha
Ganesh Geeta Adhyay Dahava Upadesh Yogaha is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय दहावा उपदेश योग
श्रीगजानन उवाच
देव्यासुरी राक्षसी च प्रकृतिस्त्रिविधा नृणाम् ।
तासां फलानि चिह्नानि संक्षेपात्तेऽधुना ब्रुवे ॥ १ ॥
१) श्रीगजानन म्हणाले, दैवी, आसुरी व राक्षसी अशी तीन प्रकारची मनुश्याची प्रकृति आहे. त्यांची फलें व लक्षणें आतां मी तुला सांगतो.
आद्या संसाधयेन्मुक्तिं द्वे परे बन्धनं नृप ।
चिह्नं ब्रवीमि चाद्यायास्तन्मे निगदतः श्रृणु ॥ २ ॥
२) त्यांतील दैवी ही पहिली प्रकृति मुक्ति देते. बाकीच्या दोन बन्धांत घालतात. आतां दैवी प्रकृति कशी असते तें तुला सांगतो.
अपैशून्यं दया क्रोधश्र्चापल्यं धृतिराजर्वम् ।
तेजोऽभयमहिंसा च क्षमा शौचमानिता ॥ ३ ॥
३) पैशून्य नसणें, दया, क्रोधाचा अभाव, चपलता, धैर्य, सरळपणा, तेज, अभय, अहिंसा, क्षमा, शौर्य व अमानित्व.
इत्यादि चिह्नमाद्याया आसुर्याः श्रृणु साम्यतम् ।
अर्थ इत्यादिक हीं दैवी प्रकृतिचीं चिन्हें आहेत. आतां तुला आसुरी प्रकृतिचीं चिन्हें सांगतों ऐक.
अतिवादोऽभिमानश्र्च दर्पोऽज्ञानं सकोपताः ॥ ४ ॥
एवमाद्यानि चिह्नानि आसुर्याः प्रकृतेर्नृप ।
४) अतिवाद (बडबड )अभिमान,गर्व, अज्ञान, क्रोध इत्यादि आसुरी प्रकृतीं चिन्हें आहेत.
निष्ठुरत्वं मदो मोहोऽहंकारो गर्व एव च ॥ ५ ॥
द्वेषो हिंसाऽदया क्रोध औद्धत्यं दुर्विनीतता ।
५) निष्ठुरत्व, मद, मोह, अहंकार, द्वेष, हिंसा, दया नसणें, क्रोध, उद्धटपणा, दुर्विनीतता,
आभिचारिककर्तृत्वं क्रूरकर्मरतिस्तथा ॥ ६ ॥
अविश्र्वासः सतां वाक्येऽशुचित्वं कर्महीनता ।
६) जारमारणादि अभिचारिक कर्मे करणें, क्रूर कर्माबद्दल प्रेम, सज्जनांच्या वचनावर अविश्र्वास, अपवित्रपणा व कर्महीनता.
निन्दकत्वं च वेदानां भक्तानामसुरद्विषाम् ॥ ७ ॥
मुनिश्रोत्रियविप्राणां तथा स्मृतिपुराणयोः ।
७) वेद, देव व भक्त यांची निंदा करणे, तसेंच ऋषि व श्रोत्रिय ब्राहण यांची निंदा करणें आणि मन्वादि स्मृति आणि पुराणें यांनाही नांवें ठेवणें.
पाखण्डवाक्ये विश्र्वासः संगतिर्मलिनात्मनाम् ॥ ८ ॥
सदम्भकर्मकारित्वं स्पृहा च परवस्तुषु ।
८) पाखंड वचनांवर विश्र्वास, दुष्टांची संगति, दंभानें कर्म करणें, दुसर्याच्या वस्तुवर डोळा ठेवणे.
अनेककामनावत्त्वं सर्वदाऽनृतभाषणम् ॥ ९ ॥
परोत्कर्षासहिष्णुत्वं परकृत्यपराहतिः ।
इत्याद्या बहवश्र्चाऽन्ये राक्षस्याः प्रकृतेर्गुणाः ॥ १० ॥
९-१०) अनेक वासना असणें, नेहमीं खोटें बोलणें, परोत्कर्ष सहन न होणें, दुसर्याच्या कार्यांत खो घालणें इत्यादि राक्षसी प्रकृतीचे बहुत गुण आहेत.
पृथिव्यां स्वर्गलोके च परिवृत्य वसन्ति ते ।
मद्भिक्तिरहिता लोका राक्षसीं प्रकृतिं स्थिता ॥ ११ ॥
११) माझी भक्ति न करणारे राक्षसी प्रकृतीचे लोक पृथ्वीवरुन स्वर्गावर पुन्हां तेथून पृथ्वीवर, असें त्यांचे भ्रमण चालू असते.
तामसीं ये श्रिता राजन्यान्ति ते रौरवं ध्रुवम् ।
अनिर्वाच्यं च ते दुःखं भुञ्जन्ते तत्र संस्थिताः ॥ १२ ॥
१२) तामसी प्रकृतीचे लोक निश्र्चित रौरव नरकांत जातात व तेथें राहून अनिर्वाच्य दुःख भोगतात.
दैवान्निः सृत्य नरकाज्जायन्ते भुवि कुब्जकाः ।
जात्यन्धाः पङ्गवो दीना हीनजातिषु ते नृप ॥ १३ ॥
१३) दैवयोगानें ते नरकांतून सुटले तरीही या भूमीवर कुबडे, जन्मान्ध, पांगळे, दीन असे होऊन हीनजातींत जन्म घेतात.
पुनः पापसमाचारा मय्यभक्ताः पतन्ति च ।
उत्पतन्ति च मद्भक्ता यां काचिञ्द्योनिमाश्रिताः ॥ १४ ॥
१४) अभक्त लोक पुन्हा पापमार्गाचे आचरण करुन अधोगतीला जातात. माझें भक्त कोणत्याहि जातींत जन्मले असले तरी त्यांचा उद्धार झाल्याशिवाय रहात नाही.
लभन्ते स्वर्गतिं यज्ञैरन्यैर्धर्मैश्र्च भूमिप ।
सुलभस्ताः सकामानां मयि भक्तिः सुदुर्लभा ॥ १५ ॥
१५) हे राजा ! यज्ञ करुन अगर इतर धर्मांनीं स्वर्गाची प्राप्ति करुन घेतां येते. या सत्व गोष्टी सुलभ आहेत; पण माझ्यावर भक्ति बसणें दुर्लभ आहे.
विमूढा मोहजालेन बद्धाः स्वेन च कर्मणा ।
अहं हन्ता अहं कर्ता अहं भोक्तेति वादिनः ॥ १६ ॥
१६) ते अतिमूढ लोक मोहजालानें व स्वकर्मानें बद्ध असल्यामुळें मी कर्ता व मी भोक्ता असे बोलत असतात.
अहमेवेश्र्वरः शास्ता अहं वेत्ता अहं सुखी ।
एतादृशी मतिर्नृणामधः पातयतीह तान् ॥ १७ ॥
१७) मीच ईश्र्वर आहे, सर्वांचा शास्ताही मीच आहें, सुखी व ज्ञाताही मीच आहे. या प्रकारची बुद्धि मनुष्यांना अधःपाताला कारण होते.
तस्मादेतत्समुत्सृज्य दैवीं प्रकृतिमाश्रय ।
भक्तिं कुरु मदीयां त्वमनिशं दृढचेतसा ॥ १८ ॥
१८) याकरिता इतर सर्व सोडून तूं दैवी प्रकृतीचा आश्रय कर व दृढ चित्तानें माझी भक्ति कर.
साऽपि भक्तिस्त्रिधा राजन् सात्विकी राजसीतरा ।
यद्देवान्भजते भक्त्या सात्विकी सा मता शुभा ॥ १९ ॥
१९) सात्विक, राजस व तामस असें भक्तिचे तीन प्रकार आहेत. भक्तीनें देवांना भजणे. हें सात्विक भक्तीचें लक्षण आहे.
राजसी सा तु विज्ञेया भक्तिर्जन्ममृतिप्रदा ।
यद्यक्षांश्र्चैव रक्षांसि भजन्ते सर्वभावतः ॥ २० ॥
२०) अनन्यभावानें यक्ष व राक्षसांची भक्ति करणें या भक्तीला राजस भक्ति म्हणतात. या भक्तीनें जन्ममरण चुकत नाहीं.
वेदेनाऽविहितं क्रूरं साहंकारं सदम्भकम् ।
भजन्ते प्रेतभूतादीन्कर्म कुर्वन्ति कामुकम् ॥ २१ ॥
२१) वेदविहित नसलेले, क्रूर, अहंकारयुक्त व सदंभ अशा कर्माला करितात त्यांत फलाची आशा असते व प्रेतभूतादिकांची भक्ति करतात.
शोषयन्तो निजं देहमन्तःस्थं मां दृढव्रताः ।
तामस्येतादृशी भक्तिर्नृणां सा निरयप्रदा ॥ २२ ॥
२२) जे हट्टानें आपल्या देहाला व अन्तस्थ मलाही शुष्क करतात; ती असली भक्ति तामस असते. ती मनुष्याला नरकांत घालते.
कामो लोभस्तथा क्रोधो दंभश्र्चत्वार इत्यमी ।
महाद्वाराणि वीचीनां तस्मादेतांस्तु वर्जयेत् ॥ २३ ॥
२३) काम, लोभ, क्रोध व दंभ हीं चार नरकाचीं महाद्वारें आहेत. म्हणून त्यांचा त्याग करावा.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे उपदेश योगो नाम दशमोऽध्यायः ॥
Adhyay Dahava Upadesh Yogaha अध्याय दहावा उपदेश योग
Custom Search
No comments:
Post a Comment