Adhyay Akrava TrividhaVastu Nirupan
Ganesh Geeta Adhyay Akrava TrividhaVastu Nirupan is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय अकरावा त्रिविधवस्तुनिरुपण योग
श्रीगजानन उवाच
तपोऽपि त्रिविधं राजन्कायिकादिप्रभेदतः ।
ऋजुताऽऽर्जवशौचानि ब्रह्मचर्यमहिंसनम् ॥ १ ॥
१) कायिक, वाचिक व मानसिक असें तपाचेही तीन भेद आहेत. ( त्यांत कायिक तप ) ऋजुता ( कष्टांची पर्वा न करितां आचार पालन करणें ), आर्जव ( श्रद्धेने प्रवृत्त होणे ), शौच ( अंतर्बाह्य शिचिता ), ब्रह्मचर्य व अहिंसा.
गुरुविज्ञद्विजातीनां पूजनं चाऽसुरद्विषाम् ।
स्वधर्मपालनं नित्यं कायिकं तप ईदृशम् ॥ २ ॥
२) गुरु, ज्ञानी, ब्राह्मण, अनुरद्वेषी देव, यांचे पूजन व नित्य स्वधर्माचें पालन करणें याला कायिक तप म्हणतात.
मर्मास्पृक्च प्रियं वाक्यमनुद्वेगि हितमृतम् ।
अधीतिर्वेदशास्त्राणां वाचिकं तप ईदृशम् ॥ ३ ॥
३) मर्मभेद नसलेलें, प्रिय, उद्वेग न करणारे , सत्य व हितकर असें वाक्य व वेदशास्त्रांचे अध्ययन हें वाचिक तप आहे.
अन्तःप्रसादचः शान्तत्वं मौनमिन्द्रियनिग्रहः ।
निर्मलाशयता नित्यं मानसं तप ईदृशम् ॥ ४ ॥
४) अन्तकरणांत प्रसन्नता असणें, शान्ति, मौन, इंद्रियनिग्रह, नित्य मन निर्मल असणें याला मानस तप असें म्हणतात.
अकामतः श्रद्धया च यत्तपः सात्त्विकं च तत् ।
ऋद्ध्यै सत्कारपूजार्थं सदम्भं राजसं तपः ॥ ५ ॥
५) कामना सोडून व श्रद्धेनें केलेल्या तपास सात्त्विक तप असें म्हणतात. उत्कर्ष व्हावा, सत्कार व पूजा यांकरितां केलेल्या सदंभ तपाला राजस तप म्हणतात.
तदस्थिरं जन्ममृती प्रयच्छति न संशयः ।
परात्मपीडकं यच्च तपस्तामसमुच्यते ॥ ६ ॥
६) हें राजस तप अस्थिर असतें. तें जन्ममरण चुकवीत नाहीं, ज्या तपानें दुसर्यांच्या मनास दुःख होतें त्या तपाला तामस तप असें म्हणतात.
विधिवाक्यप्रमाणार्थं सत्पात्रे देशकालतः ।
श्रद्धया दीयमानं यद्दानं तत्सात्विकं स्मृतम् ॥ ७ ॥
७) विधिवाक्य प्रमाण मानून योग्य देशकालीं श्रद्धेनें जें दान दिलें जातें तें सात्त्विक दान असें मानतात.
उपकारं फलं वापि काङ्क्षद्भिर्दीयते नरैः ।
क्लेशतो दीयमानं वाऽभक्त्या राजसमुच्यते ॥ ८ ॥
८) प्रत्युपकार व फल यांची इच्छा धरुन भक्तिरहित दिलें जातें व दिल्यानंतर ज्याच्याबद्दल मागून कष्ट होतात. त्या दानास राजस दान म्हणतात.
अकालदेशतोऽपात्रेऽवज्ञया दीयते तु यत् ।
असत्काराच्च यद्दतं यद्दानं तामसं नृप ॥ ९ ॥
९) योग्य, काल, व देश, तसेंच दान घेणारा सत्पात्र ज्या दानांत असत नाहीं व अचज्ञा करुन जें दान दिलें जातें त्याला तामस ज्ञान असें म्हणतात.
ज्ञानं च त्रिविधं राजन् श्रृणुष्व स्थिरचेतसा ।
त्रिधा कर्म च कर्तारं ते ब्रवीमि प्रसंगतः ॥ १० ॥
१०) हे राजा, ज्ञानही तीन प्रकारचें आहे. तें तूं स्थिर मनानें ऐक. तसेंच कर्म व कर्ता तीन प्रकारचे आहेत. हें प्रसंगानें तुला सांगतों तें तूं ऐक.
नानाविधेषु भूतेषु मामेकं वीक्षते तु यः ।
नाशवस्तु च नित्यं मां तज्ज्ञानं सात्त्विकं नृप ॥ ११ ॥
११) भूतें अनेक प्रकारची आहेत. पण त्यां सर्वांत मी एकच आहे असें जो पहातो व नाशवंत पदार्थांत मी नित्य आहे. असेम जो पहातो त्याच्या ज्ञानाला सात्त्विक ज्ञान म्हणतात.
तेषु वेत्ति पृथग्भूतं विविधं भावमाश्रितः ।
मामव्ययं च तज्ज्ञानं राजसं परिकीर्तितम् ॥ १२ ॥
१२) मी अव्यक्त व एक असा असतांही मी प्रत्येक भूतांत भिन्न असून उत्तम, मध्यम व कनिष्ठादि भावही माझ्यांत आहेत, असें ज्या ज्ञानानें भासतें तें ज्ञान राजस ज्ञान आहे असें म्हणतात.
हेतुहीनमसत्यं च देहात्मविषयं च यत् ।
असदल्पार्थविषयं तामसं ज्ञानमुच्यते ॥ १३ ॥
१३) देहच आत्मा असलें असत्य, हेतुहीन, निंद्य व क्षुद्र विषय ज्या ज्ञानांत असतात तें ज्ञान तामस ज्ञान आहे असें बोलतात.
भेदतस्त्रिविधं कर्म विद्धि राजन्मयेरितम् ।
कामनाद्वेषदम्भैर्यद्रहितं नित्यकर्म यत् ॥ १४ ॥
१४) हे राजा, आतां कर्म विविध कसें आहे तें मी सांगतो. तें समजून घे. ( त्यांतील सात्त्विक कर्म ) कामना, द्वेष व दंभ ज्यांत असत नाहींत असें जें नित्यकर्म.
कृतं विना फलेच्छां यत्कर्म सात्त्विकमुच्यते ।
यद्बहुक्लेशतः कर्म कृतं यच्च फकेच्छया ॥ १५ ॥
१५) तसेंच निष्काम बुद्धीनेजें कर्म केलें जातें त्या कर्माला सात्त्विक कर्म असें म्हणतात. ज्या कर्मांत पुष्कळ क्लेश असतात व फलाच्या इच्छेनें जें केलें जातें.
क्रियामाणं नृभिर्दम्भात्कर्म राजसमुच्यते ।
अनपेक्ष्य स्वशक्तिं यदर्थक्षयकरं च यत् ॥ १६ ॥
१६) तसेंच मनुष्याकडून दंभानें केले जाणारे कर्म राजस असते असें म्हणतात. आपल्या शक्तीचा विचार न करितां जें कर्म केलें जातें व ज्यांत व्यर्थ अर्थांचीही हानि होते.
अज्ञानात्क्रियमाणं यत्कर्म तामसमीरितम् ।
कर्तारं त्रिविधं विद्धि कथ्यमानं मया नृप ॥ १७ ॥
१७) जें कर्म अज्ञानानें केले जाते त्याला तामस कर्म असें म्हणतात. आतां कर्ताही तीन प्रकारचा असतो. तें मी तुला सांगतो. तें समजुन घे.
धैर्योत्साही समोऽसिद्धौ सिद्धौ चाऽविक्रियस्तु यः ।
अहंकारविमुक्तो यः स कर्ता सात्विको नृप ॥ १८ ॥
१८) धैर्य आणि उत्साह यांनी युक्त, सर्वत्र सम व कार्य सिद्धीला गेले अगर न गेले तरीही ज्याला सुखदुःखादि विकार होत नाहीत, जो अहंकाररहित असतो, अशा कर्त्याला सात्त्विक कर्ता असें म्हणतात.
कुर्वन्हर्षं च शोकं च हिंसां फलस्पृहां च यः ।
अशुचिर्लुब्धको यश्र्च राजसोऽसौ निगद्यते ॥ १९ ॥
१९) ज्याला कर्म करितांना हर्ष व शोक होतात व फलांच्या इच्छेने जो कर्म करतो, लोभी व अपवित्र अशा कर्त्याला राजस कर्ता असें म्हणतात.
प्रमादाज्ञानसहितः परोच्छेदपरः शठः ।
अलसस्तर्कवान्यतु कर्तासौ तामसो मतः ॥ २० ॥
२०) ज्याच्याकर्म करितांना चुका होतात, जे करतो त्याचे ज्ञानही असत नाही. दुसर्याचे वाटोळे करणारा, शठ, आळशी, उगीच तर्क करीत बसणारा, असला कर्ता तामसी असतो.
सुखं च त्रिविधं राजन्दुःखं च क्रमतः शृणु ।
सात्त्विकं राजसं चैव तामसं च मयोच्यते ॥ २१ ॥
२१) हे राजा, सुख व दुःख हीं सात्त्विक, राजस व तामस अशा भेदानें तीन प्रकारची आहेत. तें मी तुला क्रमानें सांगतो.
विषवद्भासते पूर्वं दुःखस्याऽन्तकरं च यत् ।
इच्छ्यमानं तथा वृत्त्या यदन्तेऽमृतवद्भवेत् ॥ २२ ॥
२२) प्रथम जें विषासारखें भासतें, जें दुःखाचा नाश करते, वारंवार ज्याच्या प्राप्तीची इच्छा होतें व शेवटीं अमृतासारखें होतें.
प्रसादात्स्वस्य बुद्धेर्यत्सात्त्विकं सुखमीरितम् ।
आपली बुद्धि प्रसन्न झाल्यावर जें सुख होतें त्याला सात्त्विक सुख असें म्हणतात.
विषयाणां तु यो भोगो विषवद्भासते पुरा ।
हालाहलमिवान्ते यद्राजसं सुखमीरितम् ॥ २३ ॥
२३) विषयांचा भोग प्रथम अमृतासारखा भासतो व अंतीं हालाहल विषासारखा होतो, त्या सुखाला राजस सुख असें म्हणतात.
तन्द्रीप्रमादसंभूतमालस्यप्रभवं च यत् ।
सर्वदा मोहकं स्वस्य तामसं सुखमीदृशम् ॥ २४ ॥
२४) तन्द्रा, प्रमाद व आळस यांपासून जें सुख उत्पन्न होते व जे आपल्याला मोह उत्पन्न करितें त्या सुखाला तामस सुख असें म्हणतात.
न तदस्ति यदेतैर्यन्मुक्तं स्यात्त्रिविधैर्गुणैः ॥ २५ ॥
२५) तीन गुणांनीरहित असें या लोकीं कांहींच नाही.
राजन्ब्रह्माऽपि त्रिविधमोंतत्सदिति भेदतः ।
त्रिलोकेषु त्रिधा भूतमखिलं भूप वर्तते ॥ २६ ॥
२६) हे राजा, ॐ, तत् आणि सत् असे तीन प्रकारचे ब्रह्म आहे. या त्रैलोक्यांत वस्तुमात्र त्रिगुणात्मकच आहे.
ब्रह्मक्षत्रियविट्शूद्राः स्वभावाद्भिन्नकर्मिणः ।
तानि तेषां तु कर्माणि संक्षेपात्तेऽधुना ब्रुवे ॥ २७ ॥
२७) ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे स्वभावतःच भिन्न कर्मे करणारे आहेत. तीं त्यांची कर्में मी तुला आतां संक्षेपानें सांगतो.
अन्तर्बाह्येन्द्रियाणां च वश्यत्वमार्जवं क्षमा ।
नानातपांसि शौचं च त्रिविधं ज्ञानमात्मनः ॥ २८ ॥
२८) अन्तरिन्द्रिये व बाह्येन्द्रिये यांना स्वाधीन ठेवणें, सरळपणा, क्षमा, नाना प्रकारची तपें, अंतर्बाह्य शौच व आत्मज्ञान.
वेदशास्त्रपुराणानां स्मृतीनां ज्ञानमेव च ।
अनुष्ठानं तदर्थानां कर्म ब्राह्ममुदाहृतम् ॥ २९ ॥
२९) श्रुति, शास्त्रें, पुराणें व स्मृति यांचें ज्ञान व यांत सांगितलेल्या कर्मांचें आचरण याला ब्राह्मणाचें कर्म असें म्हणतात.
दार्ढ्य शौर्यं च दाक्ष्यं च युद्धे पृष्ठदर्शनम् ।
शरण्यपालनं दानं धृतिस्तेजः स्वभावजम् ॥ ३० ॥
३०) दृढता, शौर्य, दक्षता, युद्धांत पाठ न दाखविणें, शरणागतांचें पालन, धैर्य व स्वाभाविक तेज.
प्रभुता मनऔन्नत्यं सुनीतिर्लोकपालनम् ।
पंचकर्माधिकारित्वं क्षात्रं कर्म समीरितम् ॥ ३१ ॥
३१) मनाचे प्रभुत्व, औन्नत्य, उत्तम नीति, लोकांचे रक्षण, पंचकर्मांचा अधिकार हें क्षत्रियांचे कर्म आहे. असें सुज्ञ म्हणतात.
नानावस्तुक्रयो भूमेः कर्षणं रक्षणं गवाम् ।
त्रिधा कर्मादहिकारित्वं वैश्यकर्म समीरितम् ॥ ३२ ॥
३२) अनेक वस्तुंचा क्रय, शेतकी, गोरक्षण या तीन कर्मांचा अधिकार हें वैश्यांचे कर्म आहे.
दानं द्विजानां शुश्रूषा सर्वदा शिवसेवनम् ।
एतादृशं नरव्याघ्र कर्म शौद्र मुदीरितम् ॥ ३३ ॥
३३) दान, द्विजांची शुक्षुषा, सर्वदा शिवभक्ति हें शूद्रांचे कर्म आहे असे म्हणतात.
स्वस्वकर्मरता एते मय्यार्प्याखिलकारिणः ।
मत्प्रसादात्स्थिरं स्थानं यान्ति ते परमं नृप ॥ ३४ ॥
३४) स्वकर्मांत रत असें जे पुरुष केलेलें कर्म मला अर्पण करीत असतात. त्यामुळें माझ्या प्रसादानें परमस्थिर अशा स्थानाला ते जातात.
इति ते कथितो राजन्प्रसादाद्योग उत्तमः ।
सांगोपांगः सविस्तारोऽनादिसिद्धो मया नृप ॥ ३५ ॥
३५) हे प्रिय राजा, याप्रमाणें तुझ्यावर कृपा करुन हा उत्तम योग सांगोपांग व सविस्तर आणि अनादि सिद्ध असा मी तुला सांगितला आहे.
युङ्क्ष्व योगं मयाख्यातं नाऽऽख्यातं कस्यचिन्नृप ।
गोपयैनं ततः सिद्धिं परां यास्यस्यनुत्तमाम् ॥ ३६ ॥
३६) हा योग मी कुणाला सांगितला नाही. तूं याचें अनुष्ठान कर. व हा गुप्त ठेव. म्हणजे उत्तम अशा सिद्धीला तूं जाशील.
क उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा प्रसन्नस्य महात्मनः ।
गणेशस्य वरेण्यः स चकार च यथोदितम् ॥ ३७ ॥
३७) ब्रह्मदेव म्हणतात, हे व्यास ! प्रसन्न अशा महात्मा गजाननांनीं वरेण्य राजाला जे गीतारुप वचन सांगितले, राजानें उपदेशानुसार वर्तन केले.
त्यक्त्वा राज्यं कुटुम्बं च कान्तारं प्रययौ रयात् ।
उपदिष्टं यथा योगमास्थाय मुक्तिमाप्तवान् ॥ ३८ ॥
३८) राज्य व कुटुंब यांचा त्याग करुन तो त्वरित अरण्यांत गेला व तेथें गजाननांनी जसा योग सांगितलेला होता त्याप्रमाणें अनुष्ठान करुन तो मुक्तीला गेला.
इमं गोप्यतमं योगं शृणोति श्रद्धया तु यः ।
सोऽपि कैवल्यमाप्नोति यथा योगी तथैव सः ॥ ३९ ॥
३९) हा अति गुह्य असा योग आहे. याला जो कोणी श्रद्धेनें श्रवण करील त्याला योग्याप्रमाणें मोक्ष मिळतो.
य इमं श्रावयेद्योगं कृत्वाऽस्यार्थं सुबुद्धिमान् ।
यथा योगी तथा सोऽपि परं निर्वाणमृच्छति ॥ ४० ॥
४०) जो कोणी चांगला बुद्धिमान याचा अर्थ करुन ऐकवील तो जसा योगी मोक्षाला जातो तसाच मोक्षाला जाईल.
यो गीतां सम्यगभ्यस्य ज्ञात्वा चाऽर्थं गुरोर्मुखात् ।
कृत्वा पूजां गणेशस्य प्रत्यहं पठते तु यः ॥ ४१ ॥
४१) गीतेचा उत्तम अभ्यास करुन व गुरुकडून याचाअर्थ समजून जो घेईल व दररोज श्रीगजाननाची पूजा करुन जो प्रत्येक दिवशीं याचा पाठ करील.
एककालं द्विकालं वा त्रिकालं वापि यः पठेत् ।
ब्रह्मीभूतस्य तस्यापि दर्शनान्मुच्यते नरः ॥ ४२ ॥
४२) दिवसांतून एक वेळ, दोनदां अगर तीनदा जो या गीतेचा पाठ करील तो ब्रह्मरुप होतो. अशा पुरुषाचे दर्शन करणाराही मुक्त होतो.
न यज्ञैर्न व्रतैर्दानैर्नाऽग्निहोत्रैर्महाधनैः ।
न वेदैः सम्यगभ्यस्तैः सम्यग्ज्ञातैः सहाङ्गकैः ॥ ४३ ॥
४३) यज्ञ, व्रत, दान व धन व्यय करुन चाललेंली अग्निहोत्रें ; तसेंच ज्यांचा उत्तम अभ्यास केलेलाअसून ज्याचें, अर्थज्ञानही झालेलें असेल असे सांगवेद यांनीं
पुराणश्रवणैर्नैव न शास्त्रैः साधुचिन्तितैः ।
प्राप्यते ब्रह्म परममनयाप्राप्यते नरैः ॥ ४४ ॥
४४) सर्व पुराणांचे श्रवण उत्तम विचार केलेलीं शास्त्रें यांनीं जें मिळूं शकत नाहीं तें परब्रह्म या गीतेनें मिळते.
ब्रह्मघ्नो मद्यपः स्तेयी गुरुतल्पगमोऽपि यः ।
चतुर्णां यस्तु संसर्गी महापातककारिणाम् ॥ ४५ ॥
४५) ब्रह्महत्या करणारा, मद्यपी, सुवर्ण चोरणारा, गुरुतल्पगामी हे चार महापातकी; त्यांचा संसर्ग करणारा महापापी,
स्त्रीहिंसागोवधादीनां कर्तारो ये च पापिनः ।
ते सर्वे प्रतिमुच्यन्ते गीतामेतां पठन्ति चेत् ॥ ४६ ॥
४६) स्त्रियांची हिंसा, गोवध, यांसारखी पातकें जे करितात ते या गीतेचा पाठ करितील तर पातकांपासून मुक्त होतील.
यः पठेत्प्रयतो नित्यं स गणेशो न संशयः ।
चतुर्थ्यां यः पठेद्भक्त्या सोऽपि मोक्षाय कल्पते ॥ ४७ ॥
४७) जो यत्नपूर्वक या गीतेचा पाठ करतो तो साक्षात् गणेश आहे. जो चतुर्थीचे दिवशीं याचा पाठ करतो तोही मोक्षाला जातो.
तत्तत्क्षेत्रं समासाद्य स्नात्वाऽभ्यर्च्य गजाननम् ।
सकृद्गीतां पठन्भक्त्या ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ४८ ॥
४८) जो त्या त्या क्षेत्रांत जाऊन स्नान करुन गजाननाची पूजाकरुन गीतेचा पाठ करतो तो मोक्षाला जातो.
भाद्रे मासि सिते पक्षे चतुर्थ्यां भक्तिमाम्मरः ।
कृत्वा महीमयीं मूर्तिं गणेशस्य चतुर्भुजाम् ॥ ४९ ॥
४९) भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्रीगणेशाची चतुर्भुज अशी मूर्ति करुन भक्तिमान् पुरुष,
सवाहनां सायुधां च समभ्यर्च्य यथाविधि ।
यः पठेत्सप्तकृत्वस्तु गीतामेतां प्रयत्नतः ॥ ५० ॥
५०) सायुध, सवाहन अशा या मूर्तीचे पूजन करुन जो यत्नपूर्वक सात वेळां या गीतेचा पाठ करील,
ददाति तस्य सन्तुष्टो गणेशो भोगमुत्तमम् ।
पुत्रान्पौत्रान्धनं धान्यं पशुरत्नादि सम्पदः ॥ ५१ ॥
५१) त्याच्यावर श्रीगणेश संतुष्ट होऊन त्याला उत्तम भोग, पुत्र, नातु, धनधान्य, पशु, रत]नें वगैरे संपत्ति देतो.
विद्यार्थिनो भवेद्विद्या सुखार्थी सुखमाप्नुयात् ।
कामानन्याँल्लभेत्कामी मुक्तिमन्ते प्रयान्ति ते ॥ ५२ ॥
५२) विद्यार्थ्याला विद्या मिळते, सुखाची इच्छा करणारास सुख मिळते. कामी जनांच्या सर्व कामना पूर्ण होतात व शेवटीम तें मोक्षाला जातात.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे विविधवस्तुविवेक निरुपणं नामैकादशोऽध्यायः ॥
अनुवाद
श्री दत्तात्रेय रघुनाथशास्त्री देवधर यांनी केलेला आहे.
Adhyay Akrava TrividhaVastu Nirupan
अध्याय अकरावा त्रिविधवस्तुनिरुपण योग
Custom Search
No comments:
Post a Comment