Adhyay Sahava Buddhi Yogaha
Ganesh Geeta Adhyay Sahava Buddhi Yogaha is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय सहावा बुद्धियोग
श्रीगजानन उवाच
ईदृशं विद्धि मे तत्त्वं कद्गतेनान्तऽरात्मना ।
यज्ज्ञात्वा मामसन्दिग्धं वेत्सि मोक्ष्यसि बन्धनात् ॥ १ ॥
१) श्रीगजानन म्हणाले, माझ्यावर अंतःकरण स्थिर करुन हें माझें तत्त्व तूं जाणून घे. सर्वव्यापक अशा मला तूं जाणशील तर निःसंशय मुक्त होशील.
तत्तेऽहं श्रृणु वक्ष्यामि लोकानां हितकाम्यया ।
अस्ति ज्ञेयं यतो नाऽन्यन्मुक्तेश्र्च साधनं नृप ॥ २ ॥
२) लोकांचें हित होईल या इच्छेनें मीं हें तत्त्व तुला सांगणार आहे. तें तूं ऐक. हे राजा, ज्याच्या ज्ञानानें मोक्ष मिळतो तें हेंच ज्ञेय तत्त्व आहे. यावांचून दुसरें नाही.
ज्ञेया मत्प्रकृतिः पूर्वं ततः स्याज्ज्ञानगोचरः ।
ततो विज्ञानसंपत्तिर्मयि ज्ञाते नृणां भवेत् ॥ ३ ॥
३) प्रथम माझी प्रकृति जाणावी. म्हणजे माझे ज्ञान होते. माझे ज्ञान झाल्यावर विज्ञानरुपी संपत्ति त्याला मिळते. ( म्हणजे साक्षात्कार होतो. )
क्वनलौ खमहंकारः कं चित्तं धीः समीरणः ।
रवीन्दू यागकृच्चैकादशधा प्रकृतिर्मम ॥ ४ ॥
४) पृथ्वी, जल, तेज, वायु,, आकाश, चित्त, बुद्धि, अहंकार, चंद्र, सूर्य व (यज्ञकर्ता ) यजमान, अशी अकरा प्रकारची माझी प्रकृति आहे.
अन्यां मत्प्रकृतिं वृद्धां मुनयः संगिरन्ति च ।
तया त्रिविष्टपं व्याप्तं जीवत्वं गतयाऽनया ॥ ५ ॥
५) अशी माझी आणखी एक अनादि प्रकृति आहे, असे मुनि म्हणतात.जीवभावाला प्राप्त झालेल्या तिनें सर्व सर्व त्रैलोक्य व्यापून टाकिलें आहे.
आभ्यामुत्पाद्यते सर्वं चराचरमयं जगत् ।
संगाद्विश्र्वस्य संभूतिः परित्राणं लयोऽप्यहम् ॥ ६ ॥
६) या प्रकृतिद्वयापासून स्थिरचर जगताची उत्पत्ति होते. याच्या संगानेंच मी जगाच्या उत्पत्ति स्थिति लयांना कारण होत असतो.
तत्त्वमेतन्निबोद्धुं मे यतते कश्र्चिदेव हि ।
वर्णाश्रमवतां पुंसां पुरा चीर्णेन कर्मणा ॥ ७ ॥
७) वर्णाश्रमधर्माचे पालन करणार्या अनेक लोकांपैकीज्यांचें पूर्वकर्म अनुकुल असेल असा कोणी तरी हें माझें तत्त्व जाणण्याचा यत्न करितो.
साक्षात्करोति मां कश्र्चिद्यत्नवत्स्वपि तेषु च ।
मत्तोऽन्यन्नेक्षते किंचिन्मयि सर्वं च वीक्षते ॥ ८ ॥
८) अशा यत्न करणार्या अनेक लोकांमध्ये क्वचित एखाद्याला माझा साक्षात्कार होतो. त्याला माझ्यावाचून दुसरें कांहींच दिसत नाही. सर्व विश्र्व तो माझ्यांतच पाहात असतो.
क्षितौ सुगन्धरुपेण तेजोरुपेण चाऽग्निषु ।
प्रभारुपेण पूष्ण्यब्जे रसरुपेण चाऽप्सु च ॥ ९ ॥
९) भूमींत सुगंधाच्या रुपानें, सूर्यचंद्रांत प्रभेच्या रुपानें व उदकांत रसाच्या रुपानें मी रहात असतो.
धीतपोबलिनां चाऽहं धीस्तपोबलमेव च ।
त्रिविधेषु विकारेषु मदुत्पन्नेष्वहं स्थितः ॥ १० ॥
१०) धीमान् तपस्वी व बलवान् यांच्यांतील धी, तप व बल मीच आहे. माझ्यापासून ( जागृति, स्वप्न व सुषुप्तीरुपी ) विकार उत्पन्न होतात, त्यांत विश्र्वतैजस आणि प्राज्ञरुपानें मी रहातो.
न मां विन्दन्ति पापिष्ठा मायामोहितचेतसः ।
त्रिविकारा मोहयति प्रकृतिर्मे जगत्त्रयम् ॥ ११ ॥
११) ज्यांचे अंतःकरण मायेने मोहित झालेलें असते असे पापी लोक मला जाणत नाहीत. तीन विकारांनी युक्त असलेली माझी माया त्रैलोक्याला मोहित करते.
यो मे तत्त्वं विजानाति मोहं त्यजति सोऽखिलम् ।
अनेकैर्जन्मभिश्र्चैवं ज्ञात्वा मां मुच्यते ततः ॥ १२ ॥
१२) जो मनुष्य माझें तत्त्व जाणतो, तो अखिल मोहाचा त्याग करतो.अनेक जन्मांनी तो मला जाणून मुक्तीला जातो.
अन्ये नाना विधान्देवान्यजन्ते तान्व्रजन्ति ते ।
यथा यथा मतिं कृत्वा भजते मां जनोऽखिलः ॥ १३ ॥
तथा तथाऽस्य तं भावं पूरयाम्यहमेव तम् ।
अहं सर्वं विजानामि मां न कश्र्चिद्विबुध्यते ॥ १४ ॥
१३-१४) दुसरें कांहीं लोक नाना प्रकारच्या देवांची भक्ति करितात. ते त्या देवांना प्राप्त होतात. सर्व लोक ज्या भावानें माझी भक्ति करितात, त्यांची त्यांची ती ती भावना मी पूर्ण करितो. सर्व मी जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही.
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं न विदुः कामयोहिताः ।
नाऽहं प्रकाशतां यामि अज्ञानां पापकर्मणाम् ॥ १५ ॥
१५) मूळच्या अव्यक्त पण लोकोद्धाराकरितां व्यक्त झालेल्या मला कामाने मोहित झालेले कोणीही जाणत नाहीत. अशा पापरतअशांना मी माझें स्वरुप प्रकट करुन दाखवित नाही.
यः स्मृत्वा त्यजति प्राणमन्ते मां श्रद्धयाऽन्वितः ।
स यात्यपुनरावृत्तिं प्रसादान्मम भूभुज ॥ १६ ॥
१६) अंतकाळी श्रद्धेनें माझे स्मरण करुन जो प्राणत्याग करितो, तो माझ्या प्रसादानें पुनः जन्मास येत नाही.
यं यं देवं स्मरन्भक्त्या त्यजति स्वं कलेवरम् ।
तत्तत्सालोक्यमाप्नोति तत्तद्भक्त्या नरोत्तम ॥ १७ ॥
१७) ज्या ज्या देवाला भक्तीनें स्मरुन देहत्याग करितो त्याला त्या त्या देवाच्या भक्तीनें त्या त्या देवाचें सालोक्य प्राप्त होते.
अतश्र्चाऽहर्निशं भूप स्मर्तव्योऽनेकरुपवान् ।
सर्वेषामप्यहं गम्यः स्त्रोतसामर्णवो यथा ॥ १८ ॥
१८) म्हणुन हे राजा, अनेक रुपें धारण करणार्या अशा माझें अहर्निश स्मरण करावें. मी सर्वांना प्राप्त होणारा आहे. जसें जगांतील नद्यानाले शेवटी समुद्रास मिळतात.
ब्रह्मविष्णुमहेन्द्राद्यॉंल्लोकान्प्राप्य पुनः पतेत् ।
यो मामुपैत्यसन्दिग्धं पतनं तस्य न क्वचित् ॥ १९ ॥
१९) ब्रह्मा, विष्णु , महेश्र्वर व इंद्र इत्यादि देवांच्या वैकुंठादि लोकांस जे जातात, त्यांना तेथून पुनः पतन आहे. पण जे मला पावतात. त्यांना पुनः पतन नाही.
अनन्यशरणो यो मां भक्त्या भजति भूमिप ।
योगक्षेमौ च तस्याऽहं सर्वदा प्रतिपादये ॥ २० ॥
२०) हे राजा, अनन्यशरण होऊन जो भक्तीने मला भजतो, सर्व काळ मी त्याचे योगक्षेम पुरवीत असतो.
द्विविधा गतिरुद्दिष्टा शुक्ला कृष्णा नृणां नृप ।
एकया परमं ब्रह्म परया याति संसृतिम् ॥ २१ ॥
२१) सत्कर्म करणार्या मनुष्यांना देहपातानंतर शुक्ल व कृष्ण अशा दोन गति मिळतात. शुक्ल गति ज्याला मिळते तो परब्रह्माला प्राप्त होतो. ( त्याला पुनरावृत्ति नाहीं ) जो कृष्ण गतीला जातो तो या जन्ममरणरुप संसारांत पुनः येतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे बुद्धियोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ Adhyay Sahava Buddhi Yogaha
अध्याय सहावा बुद्धियोग
Custom Search
No comments:
Post a Comment