Adhyay Pachava YogaVruti Prashansany Yoga
Ganesh Geeta Adhyay Pachava YogaVruti Prashansany Yoga is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय पांचवा योगवृत्तिप्रशंसन
श्रीगजानन उवाच
श्रौतस्मातर्तानि कर्माणि फलं नेच्छन्समारभेत् ।
शस्तः स योगी राजेन्द्र अक्रियाद्योगमाश्रितात् ॥ १ ॥
१) श्रीगजानन म्हणाले, श्रौतस्मार्त कर्मे फलाची इच्छा सोडून जो करतो तो योगी कर्में न करणार्या योग्यांपेक्षां श्रेष्ठ आहे.
योगप्राप्त्यै महाबाहो हेतुः कर्मैव मे मतम् ।
सिद्धयोगस्य संसिद्ध्यै हेतू शमदमौ मतौ ॥ २ ॥
२) योगप्राप्तीला कर्म हेच कारण आहे. असें माझें मत आहे. तो योगसाध्य झाल्यावर त्यांत विशेष सिद्धि मिळविण्याकरितां शमदम हे कारण आहेत.
इन्द्रियार्थांश्र्च संकल्प्य कुर्वन्स्वस्य रिपुर्भवेत् ।
एताननिच्छन्यः कुर्वन्सिद्धिं योगी स सिध्यति ॥ ३ ॥
३) विषयांचा संकल्प करुन जो कर्मे करितो, तो आपणच आपला वैरी होतो. जो फलाशा सोडून कर्म करितो त्याला कर्मसिद्धि मिळते.
सुहृत्त्वे च रिपुत्वे च उद्धारे चैव बन्धने ।
आत्मनैवात्मनो ह्यात्माऽनात्मा भवति कश्र्चन ॥ ४ ॥
४) सुदृढत्व, रिपुत्व, उद्धार आणि बंधन, याला आपले आपणच कारण असतो; याशिवाय दुसरे कांहीहीं कारण असत नाही.
मानेऽपमाने दुःखे च सुखे सुहृदि साधुषु ।
मित्रेऽमित्रेऽप्युदासीने द्वेष्ये लोष्टे च काञ्चने ॥ ५ ॥
५) मान, अपमान, सुख, दुःख, सज्जन, साधु, मित्र, शत्रु, उदासीन, द्वेष, ढेंकूळ व सुवर्ण, ( ही सर्व )
समो जितात्मा विज्ञानी ज्ञानीन्द्रियजयावहः ।
अभ्यसेत्सततं योगं यदा युक्ततमो हि सः ॥ ६ ॥
६) ज्यास सम भासतात, मनाच्या व इंद्रियांचा ज्यानें जय केलेला असा ज्ञान व विज्ञान यांनीं युक्त पुरुष जेव्हां योगाभ्यास करतो तेव्हां तो अतिशय योगयुक्त होतो.
तप्तः श्रान्तो व्याकुलो वा क्षुधितो व्यग्रचित्तकः ।
कालेऽतिशीतेऽत्युष्णेवाऽनिलाग्न्यम्बुसमाकुले ॥ ७ ॥
७) ( योगाभ्यासाला पुढील गोष्टी वर्ज कराव्या ) उन्हाने वगैरे तापलेला, दमलेला, व्याकुळ, क्षुधित, चित्त व्यग्र झालें असेल तर, अति शीत व अति उष्ण असा काल, वारा जास्त असेल, जवळ अग्नि पेटला असेल अगर जेथें पाणी खोल असेल, ( अशी परिस्थिती योगाला प्रतिकूल आहे. )
सध्वनावतिजीर्णे गोस्थाने साग्नौ जलान्तिके ।
कूपकूले श्मशाने च नद्यां भित्तौ च मर्मरे॥ ८ ॥
८) जेथें गोंगाट आहे, जुनें स्थान, गोठा, अग्नि व जळ जवळ असेल तर, विहिरीच्या कांठीं, स्मशानांत, नदींत, भिंतीजवळ बसून व जेथें पानांचा वगैरे शब्द असेल ( अशा ठिकाणीं योगाभ्यास करुं नये. )
चैत्ये सवल्मिके देशे पिशाचादिसमाकुले ।
नाऽभ्यसेद्योगविद्योगं योगध्यानपरायणः ॥ ९ ॥
९) चैत्य म्हणजे नास्तिकांचीं मंदिरें जेथें जवळ असतील तेथें, पिशाचादिकांचे जेथें वास्तव्य असेल अशा ठिकाणीं योगज्ञ पुरुषानें योगाभ्यास अगर ध्यानादि करुं नये.
स्मृतिलोपश्र्च मूकत्वं बाधिर्यं मन्दता ज्वरः ।
जडता जायते सद्यो दोषाज्ञानद्धि योगिनः ॥ १० ॥
१०) स्मृतिनाश, मुकेपणा, ज्वर, बधिरता, मंदता, जडता, हे सर्व योगांतील दोष न समजतां योगाचें आचरण केलें असतां प्राप्त होतात.
एते दोषाः परित्याज्या योगाभ्यसनशालिना ।
अनादरे हि चैतेषां स्मृतिलोपादयो ध्रुवम् ॥ ११ ॥
११) याकरितां योगाभ्यास करणार्यानें हे दोष न येतील अशी दक्षता घ्यावी.यांकडे दुर्लक्ष झाल्यास स्मृतिलोपादि दोष निश्र्चित येतील.
नाऽतिभुञ्जन्सदा योगी नाऽभुञ्जन्नाऽतिनिद्रितः ।
नाऽतिजाग्रत्सिद्धिमेति भूप योगं सदाभ्यसन् ॥ १२ ॥
१२) अति भोजन, अति लंघन, अति निद्रा व अति जाग्रण या गोष्टी नित्य योगाभ्यास करणारानें सोडल्या पाहिजेत; नाहीं तर त्याचा योग सिद्धिला जाणार नाही.
संकल्पजांस्त्यजेत्कामान्नियताहारजागरः ।
नियम्य खगजं बुद्ध्या विरमेत शनैः शनैः ॥ १३ ॥
१३) संकल्पानें होणारे काम सोडावे, आहार व जागरण नियमित ठेवावे, बुद्धीनें इंद्रियांनानियमितकरुन हळूहळू यांतून विरत व्हावें.
ततस्ततः कृषेदेतद्यत्र यत्राऽनुगच्छति ।
धृत्वाऽऽत्मवशगं कुर्याच्चित्तं चञ्चलमादृतः ॥ १४ ॥
१४) हें चंचल चित्त जिकडे जिकडे जाईल तिकडून तिकडून त्यास धैर्यानें काढून घ्यावें व आपल्या स्वाधीन करुन ठेवावे.
एवं कुर्वन्सदा योगी परां निर्वृतिमृच्छति ।
विश्र्वस्मिन्निजमात्मानं विश्र्वं च स्वात्मनीक्षते ॥ १५ ॥
१५) असें जो योगी करतो त्यास परम सौख्य प्राप्त होतें. तो विश्र्वांत आपणांस व आत्म्यांत सर्व पाहतो.
योगेन यो मामुपैति तमुपैभ्यहमादरात् ।
मोचयामि न मुञ्चामि तमहं मां स न त्यजेत् ॥ १६ ॥
१६) योगानें जो मला प्राप्त होतो, मीही पण आदरानें त्याला पावतों. मी त्याला संसारांतून मुक्त करतो. मी त्याचा त्याग करीत नाहीं, व तोही मला सोडीत नाहीं.
सुखे सुखेतरे द्वेषे क्षुधि तोषे समस्तृषि ।
आत्मसाम्येन भूतानि सर्वगं मां च वेत्ति यः ॥ १७ ॥
१७) सुखदुःख, तहान, भूक, हर्ष, द्वेष, ( यांचे प्रसंग आलें असतां ) ज्याची समता ढळत नाही, तो सर्व भूतांना आपल्यासारखें पाहतो. सर्व व्यापक अशा माझाही त्याला साक्षात्कार झालेला असतो.
जीवन्मुक्तः स योगीन्द्रः केवलं मयि संस्थितः ।
ब्रह्मादीनां च देवानां स वन्द्यः स्याज्जगगत् त्रये ॥ १८ ॥
१८) वरील लक्षणें असणारा योगीश्र्वर हा जीवन्मुक्त असतो. व केवळ माझाच आश्रय करतो. तो ब्रह्मादिक देवांना व त्रैलोक्यालाही वंद्य होतो
वरेण्य उवाच
द्विविधोऽपि हि योगोऽयं असंभाव्यो हि मे मतः ।
यतोऽन्तःकरणं दुष्टं चञ्चलं दुर्ग्रहं विभो ॥ १९ ॥
१९) राजा वरेण्य म्हणाला, तुम्हीं सांगितलेला दोन प्रकारचा योग मला असाध्य वाटतो. कारण हें अंतःकरण दुष्ट असून अति चंचल असल्यानें याचा निग्रह करणें फार कठीण आहे.
श्रीगजानन उवाच
यो निग्रहं दुर्ग्रहस्य मनसः संप्रकल्पयेत् ।
घटीयन् त्रसमादस्मान्मुक्तः संसृतिचक्रकात् ॥ २० ॥
२०) श्रीगजानन म्हणाले, निग्रहास कठीण अशा मनाचा निग्रह करणाराच असा संकल्प करुन जो यत्नाला लागतो तोच रहाटगाडग्यासारख्या या संसारचक्रांतून मुक्त होतो.
विषयैः क्रकचैरेतत्संसृष्टं चक्रकं दृढम् ।
जनच्छेतुं न शक्नोति कर्मकीलैः सुसंवृतम् ॥ २१ ॥
२१) विषयरुपी करकोच्यांनी बनविलेलें व कर्मरुपी खिळ्यांनीं चोहों बाजूंनीं बळकट केलेल्या अशा संसृतिरुपी दृढ चक्राचा छेद करण्यास मनुष्य समर्थ होत नाहीं.
अतिदुःखं च वैराग्यं भोगाद्वैतृष्ण्यमेव च ।
गुरुप्रसादः सत्सङ्ग उपायास्तज्जये अमी ॥ २२ ॥
२२) अति दुःख, वैराग्य भोगून आलेली तृप्ति, गुरुप्रसाद व सत्संग हे चित्ताचा जय करण्यास उपाय आहेत.
अभ्यासाद्वा वशीकुर्यान्मनो योगस्य सिद्धये ।
वरेण्य दुर्लभो योगो विनाऽस्य मनसो जयात् ॥ २३ ॥
२३) शास्त्रोक्त मार्गानें अभ्यास करुन मन वश करावें. कारण योगसिद्धि करितां मनोजयाची आवश्यकता आहे. गजानन म्हणतात, हे वरेण्या मनोजयावाचून योग हा दुर्लभ आहे.
वरेण्य उवाच
योगभ्रष्टस्य को लोकः का गतिः किं फलम् भवेत् ।
विभो सर्वज्ञ मे छिन्धि संशयं बुद्धिचक्रभृत् ॥ २४ ॥
२४) वरेण्य म्हणाल, हे देवा, योगांत पूर्ण न होतां देहपात झाला असतां त्याला कोणता लोक मिळतो, तो कोणत्या गतीला जातो व फल काय मिळतें ? हे विभो, आपण सर्वज्ञ व बुद्धिचक्राला धारण करणारे आहांत; तरी माझा संशय दूर करावा.
श्रीगजानन उवाच
दिव्यदेहधरोयोगाद्भ्रष्टः स्वर्भोगमुत्तमम् ।
भुक्त्वा योगिकुले जन्म लभेच्छुद्धिमतां कुले ॥ २५ ॥
२५) श्रीगजानन म्हणाले, योगभ्रष्ट दिव्य देह धरुन स्वर्गांत जातात. व तेथील उत्तम भोग भोगून पुनः या लोकांत शुद्ध आचरवान् योग्यांच्या कुलांत जन्माला येतात.
पुनर्योगी भवत्येष संस्कारात्पूर्वकर्मजात् ।
न हि पुण्यकृतां कश्र्चिन्नरकं प्रतिपद्यते ॥ २६ ।
२६) ( योग्याच्या कुलांत जन्मल्यावर ) हा पूर्वकर्माच्या संस्कारानें योगी होतो. हे राजा, पुण्य करणार्यामध्यें कोणीही नरकांत जात नाहींत.
ज्ञाननिष्ठात्तपोनिष्ठात्कर्मनिष्ठान्नराधिप ।
श्रेष्ठो योगी श्रेष्ठतमो भक्तिमान्मयि तेषु यः ॥ २७ ॥
२७) जे ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ व कर्मनिष्ठ असतात त्या सर्वांहून योगी श्रेष्ठ आहे. त्या योग्यांत ज्याची माझ्यावर भक्ति असेल, तो अत्यंत श्रेष्ठ आहे.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे योगवृत्तिप्रशंसनो नाम पंचमोऽध्यायः ॥
Adhyay Pachava YogaVruti Prashansany Yoga
अध्याय पांचवा योगवृत्तिप्रशंसन
Custom Search
No comments:
Post a Comment