Adhyay Chavatha Vaidha Sanyas Yoga
Ganesh Geeta Adhyay Chavatha Vaidha Sanyas Yoga is in Sanskrit. It is told by God Gajanan to King Varenya.
अध्याय चवथा वैधसंन्यास योग
वरेण्य उवाच
संन्यस्तिश्र्चैव योगश्र्च कर्मणां वर्ण्यते त्वया ।
उभयोर्निश्र्चितं त्वेकं श्रेयो यद्वद मे प्रभो ॥ १ ॥
क्रियायोगो वियोगश्र्चाप्युभौ मोक्षस्य साधने ।
तयोर्मध्ये क्रियायोगस्त्यागात्तस्य विशिष्यते ॥ २ ॥
मुच्यते बन्धनात्सद्यो नित्यं संन्यासवान्सुखम् ॥ ३ ॥
मूढाल्पग़ास्तयोरेकं संयुञ्जीत विचक्षणः ॥ ४ ॥
संग्रहं कर्मणो योगं यो विन्दति स विन्दति ॥ ५ ॥
कुर्वन्ननिच्छया कर्म योगी ब्रह्मैव जायते ॥ ६ ॥
आत्मानं सर्वभूतस्थं पश्यन्कुर्वन्न लिप्यते ॥ ७ ॥
एकादशानीन्द्रियाणि कुर्वन्ति कर्म संख्याया ॥ ८ ॥
न लिप्यते पुण्यपापैर्भानुर्जलगतो यथा ॥ ९ ॥
त्यक्त्वाऽऽशां कर्म कुर्वन्ति योगज्ञाश्र्चित्तशुद्धये ॥ १० ॥
बध्यते कर्मबीजैः स ततो दुःखं समश्र्नुते ॥ ११ ॥
न कुर्वन्कारयन्वापि नन्दन्श्र्वभ्रे सुपत्तने ॥ १२ ॥
न क्रियाबीजसंपर्कः शक्त्या तत्क्रियतेऽखिलम् ॥ १३ ॥
ज्ञानमूढा विमुह्यन्ते मोहेनाऽऽवृतबुद्धयः ॥ १४ ॥
तेषां विकाशमायाति ज्ञानमादित्यवत्परम् ॥ १५ ॥
अपुनर्भवमायान्ति विज्ञानान्नाशितैनसः ॥ १६ ॥
समेक्षणा महात्मानः पण्डिताः श्र्वपचे शुनि ॥ १७ ॥
यतोऽदोषं ब्रह्म समं तस्मात्तैर्विषयीकृतम् ॥ १८ ॥
ब्रह्मश्रिता असंमूढा ब्रह्मज्ञाः समबुद्धयः ॥ १९ ॥
किं सुखं त्रिषु लोकेषु देवगन्धर्वयोनिषु ।
भगवन्कृपया सर्वं वद विद्याविशारद ॥ २० ॥
आनन्दमश्रुतेऽसक्तः स्वात्मारामो निजात्मनि ।
अविनाश्यं सुखं तद्धि न सुखं विषयादिषु ॥ २१ ॥
उत्पत्तिनाशयुक्तानि तत्राऽऽसक्तो न तत्ववित् ॥ २२ ॥
तौ जेतुं वर्ष्मविरहात्स सुखं चिरमश्र्नुते ॥ २३ ॥
असन्दिग्धोऽक्षयं ब्रह्म सर्वभूतहितार्थकृत् ॥ २४ ॥
तेषां समन्ततो ब्रह्म स्वात्मज्ञानां विभात्यहो ॥ २५ ॥
संस्तभ्य भृकुटीमास्ते प्राणायामपरायणः ॥ २६ ॥
वदन्ति मुनयस्तं च त्रिधाभूतं विपश्र्चितः ॥ २७ ॥
दशभिर्द्व्यधिकैर्वर्णैः प्राणायामो लघुः स्मृतः ॥ २८ ॥
षट्त्रिंशल्लघुवर्णो य उत्तमः सोऽभिधीयते ॥ २९ ॥
नयन्ति प्राणिनस्तद्वत्प्राणापानौ सुसाधयेत् ॥ ३० ॥
दहत्येनस्तथा वायुः संस्तब्धो न च तत्तनुम् ॥ ३१ ॥
तथा तथा वशीकुर्यात्प्राणापानौ हि योगवित् ॥ ३२॥
अतीतानागतज्ञानी ततः स्याज्जगतीतले ॥ ३३ ॥
योगस्तु धारणे द्वे स्याद्योगीशस्ते सदाभ्यसेत् ॥ ३४ ॥
अनायासेन तस्य स्याद्वश्यं लोकत्रयं नृप ॥ ३५ ॥
एवं योगश्र्च संन्यासः समानफलदायकौ ॥ ३६ ॥
मां ज्ञात्वा मुक्तिमाप्नोति त्रैलोक्यस्येश्र्वरं विभुम् ॥ ३७ ॥
Adhyay Chavatha Vaidha Sanyas Yoga
अध्याय चवथा वैधसंन्यास योग
संन्यस्तिश्र्चैव योगश्र्च कर्मणां वर्ण्यते त्वया ।
उभयोर्निश्र्चितं त्वेकं श्रेयो यद्वद मे प्रभो ॥ १ ॥
१) वरेण्य म्हणाला, हे गणेशा,तुम्हीं कर्मांचा संन्यास आणि योग मला सांगितला आहे. त्या दोहोंत मला निश्र्चितरुपानें जो श्रेयस्कर असेल तो सांगा.
श्रीगजानन उवाच क्रियायोगो वियोगश्र्चाप्युभौ मोक्षस्य साधने ।
तयोर्मध्ये क्रियायोगस्त्यागात्तस्य विशिष्यते ॥ २ ॥
२) श्री गजानन म्हणाले, संन्यास व कर्मयोग हीं दोन्हीही मोक्षाचीं साधनें आहेत. पण त्यांत संन्यासापेक्षां कर्मयोग श्रेष्ठ आहे.
द्वन्द्वदुःखसहोऽद्वेष्टा यो न काङ्क्षति किंचन ।मुच्यते बन्धनात्सद्यो नित्यं संन्यासवान्सुखम् ॥ ३ ॥
३) शीतोष्णादि द्वंद्वांपासून होणारीं दुःखें जो सहन करतो, जो कशाचीही इच्छा करीत नाहीं, नित्य फलत्याग करतो, तो सुखानें त्वरित बंधमुक्त होतो.
वदन्ति भिन्नफलकौ कर्मणस्त्यागसंग्रहौ ।मूढाल्पग़ास्तयोरेकं संयुञ्जीत विचक्षणः ॥ ४ ॥
४) मूढ व अल्पज्ञ लोक संन्यास व कर्मयोग यांची फलें भिन्न आहेत असें म्हणतात. सुज्ञ मनुष्यानें त्यांतील एकाची तरी कांस धरावी.
यदेव प्राप्यतते त्यागात्तदेव योगतः फलम् ।संग्रहं कर्मणो योगं यो विन्दति स विन्दति ॥ ५ ॥
५) संन्यासानें जें फळ मिळतें ते योगानेंही मिळते. सर्व कर्मांचा समावेश ज्यांत होतो असा योग ज्याला कळला त्याला सर्व समजलेंअसें जाणावें.
केवलं कर्मणां योगं संन्यासं न विदुर्बुधाः ।कुर्वन्ननिच्छया कर्म योगी ब्रह्मैव जायते ॥ ६ ॥
६) केवळ अज्ञानानें केलेल्या कर्मत्यागास ज्ञाते लोक संन्यास मानीत नाहीत. निष्कामकर्म करणारा योगी ब्रह्मरुप होतो.
निर्मलो यतचित्तात्मा जितखो योगतत्परः ।आत्मानं सर्वभूतस्थं पश्यन्कुर्वन्न लिप्यते ॥ ७ ॥
७) जो अंतर्बाह्य निर्मल असतो, मन व बुद्धि ज्याच्या ताब्यांत असतात, इन्द्रियजय करुन जो सर्वदा योगचरणांत निमग्न असतो, सर्व भूतांना जो आत्म्यांत पाहतो, अशा पुरुषानें कर्म केलें तरी तो त्या कर्मानें लिप्त होत नाहीं.
तत्त्वविद्योगयुक्तात्मा करोमीति न मन्यते ।एकादशानीन्द्रियाणि कुर्वन्ति कर्म संख्याया ॥ ८ ॥
८) तत्त्ववेत्ता योगरत पुरुष मी कांहींच करीत नाहीं, मनासह संख्येनें अकरा अशी इंद्रियें काम करीत असतात, ( मी इंद्रियांहून भिन्न आहे. ) म्हणून मी कांहींच करीत नाहीं असें मानतो.
तत्सर्वमर्पयेद्ब्रह्मण्यपि कर्म करोति यः ।न लिप्यते पुण्यपापैर्भानुर्जलगतो यथा ॥ ९ ॥
९) जलांत प्रतिबिंबित सूर्यास जसा जलगत दोषाचा लेप लागत नाहीं, त्याप्रमाणें कर्म करुन तें ब्रह्मार्पण केले असतां त्याला पुण्यपाप कांहींच लागत नाहीं.
कायिकं वाचिकं बौद्धमैन्द्रियं मानसं तथा ।त्यक्त्वाऽऽशां कर्म कुर्वन्ति योगज्ञाश्र्चित्तशुद्धये ॥ १० ॥
१०) योगज्ञ पुरुष काया, वाचा, मन, बुद्धि व इंद्रियें यांचे योगानें फलाशा सोदून चित्तशुद्धीकरितां कर्में करीत असतात.
योगहीनो नरः कर्म फलेहया करोत्यलम् ।बध्यते कर्मबीजैः स ततो दुःखं समश्र्नुते ॥ ११ ॥
११) योगरहित पुरुष सत्व कर्में फलेच्छेनेंच करीत असतो. त्यामुळें तो कर्मबीजांनीं बद्ध होतो. व म्हणून त्याला दुःख भोगावें लागतें.
मनसा सकलं कर्म त्यक्त्वा योगी सुखं वसेत् ।न कुर्वन्कारयन्वापि नन्दन्श्र्वभ्रे सुपत्तने ॥ १२ ॥
१२) योग्यानें मनानेंच सर्व कर्मांचा त्याग करुन सुखानें रहावे. स्वतः कर्म करुं नये व दुसर्याकडून करवूं ही नये. त्यानें गुहेंत अथवा नगरांतही सुखानें कालक्रमणा करावी.
न क्रिया न च कर्तृत्वं कस्यचित्सृज्यते मया ।न क्रियाबीजसंपर्कः शक्त्या तत्क्रियतेऽखिलम् ॥ १३ ॥
१३) मी कर्में, त्यांचें कर्तृत्व व कर्मबीजांशीं संबंध यांपैकी कांहींहीं उत्पन्न करीत नाहीं. माझी शक्ति ( माया ) च हें सर्व उत्पन्न करीत असते.
कस्यचित्पुण्यपापानि न सृशामि विभुर्नृप ।ज्ञानमूढा विमुह्यन्ते मोहेनाऽऽवृतबुद्धयः ॥ १४ ॥
१४) मी व्यापक असलों तरीही कोणाच्याही पुण्यपापांशीं माझा संबंध असत नाही. अज्ञानी लोकांची बुद्धि मोहानें व्यापलेली असते, म्हणून ते मोहांत सांपडतात.
विवेकेनाऽऽत्मनोज्ञानं येषां नाशितमात्मना ।तेषां विकाशमायाति ज्ञानमादित्यवत्परम् ॥ १५ ॥
१५) आत्मवस्तूबद्दलचें अज्ञान विवेकानें ज्यांनीं नाहींसे केलेलें असतें त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणें उदयास येते.
मन्निष्ठा मद्धियोऽत्यन्तं मच्चित्ता मयि तत्पराः ।अपुनर्भवमायान्ति विज्ञानान्नाशितैनसः ॥ १६ ॥
१६) ज्यांची माझ्यावर अत्यंत निष्ठा असते, ज्यांची बुद्धि व मन हीं माझ्याकडेच लागलेलीं असतात, अशा लोकांचीं विज्ञानानें सर्व पातकें नष्ट होऊन तें जन्ममरणांतून मुक्त होतात.
ज्ञानविज्ञानसम्पन्ने द्विजे गवि गजादिषु ।समेक्षणा महात्मानः पण्डिताः श्र्वपचे शुनि ॥ १७ ॥
१७) ज्ञानविज्ञानसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती वगैरे प्राणी, चांडाल व श्र्वान या सर्वांना महात्मे पंडित लोक ब्रह्मबुद्धीनेंच पाहतात.
वश्यः स्वर्गो जगत्तेषां जीवन्मुक्ताः समेक्षणाः ।यतोऽदोषं ब्रह्म समं तस्मात्तैर्विषयीकृतम् ॥ १८ ॥
१८) सर्वत्र ब्रह्मदृष्टीनें पाहणारे असे जीवन्मुक्त पुरुष असतात. त्यांना स्वर्ग व सर्व जगत् वश असते. कारण निर्दोष व सम अशा ब्रह्माचा त्यांना साक्षात्कार झालेला असतो.
प्रियाप्रिये प्राप्य हर्षद्वेषौ ये प्राप्नुवन्ति न ।ब्रह्मश्रिता असंमूढा ब्रह्मज्ञाः समबुद्धयः ॥ १९ ॥
१९) प्रियप्राप्तीनें हर्ष व अप्रियप्राप्तीनें ज्यांना विषाद होत नाही, ते ब्रह्मज्ञ पुरुष ब्रह्माचा आश्रय करुन राहतात, ते कधीही मोहांत सांपडत नाहीत व सर्वत्र समबुद्धीनेच पाहत असतात.
वरेण्य उवाचकिं सुखं त्रिषु लोकेषु देवगन्धर्वयोनिषु ।
भगवन्कृपया सर्वं वद विद्याविशारद ॥ २० ॥
२०) वरेण्य म्हणाला, हे सर्व विद्याविशारद भगवन् गजानना, या त्रैलोक्यांत देव, गंधर्व वगैरे अनेक योनि आहेत. तरी त्यांना खरें सुख कशानें मिळते तें कृपा करुन सांगा.
श्रीगजानन उवाचआनन्दमश्रुतेऽसक्तः स्वात्मारामो निजात्मनि ।
अविनाश्यं सुखं तद्धि न सुखं विषयादिषु ॥ २१ ॥
२१) श्रीगजानन म्हणाले, जो आत्मरत व असक्त असतो त्याला आपल्या आत्म्यांतच सुख मिळते व तें कधींही नष्ट होत नाही. असलें सुख विषयादि बाह्य वस्तूंत असत नाही.
विषयोत्थानि सौख्यानि दुःखानां तानि हेतवः ।उत्पत्तिनाशयुक्तानि तत्राऽऽसक्तो न तत्ववित् ॥ २२ ॥
२२) विषयांपासून उत्पन्न होणारीं सुखें दुःखाला कारण होत असतात. तीं उत्पन्न होऊन नष्ट होणारीं असल्यानें तत्त्ववेत्ता त्यांत आसक्त होत नाही.
कारणे सति कामस्य क्रोधस्य सहते च यः ।तौ जेतुं वर्ष्मविरहात्स सुखं चिरमश्र्नुते ॥ २३ ॥
२३) कामक्रोधांचें निमित्त पुढें आलें असतांही देहपातापर्यंत त्यांना जिंकण्याला जो समर्थ असतो, त्याला चिरकाल सुख मिळते.
अन्तर्निष्ठोऽन्तःप्रकाशोऽन्तःसुखोऽन्तारतिर्लभेत् ।असन्दिग्धोऽक्षयं ब्रह्म सर्वभूतहितार्थकृत् ॥ २४ ॥
२४) ( कामक्रोधांवर जय मिळवल्यावर ) जो अंतर्निष्ठ होतों, ज्याला आंतच प्रकाश दिसूं लागतो, सुख व प्रेम हीं ज्याचे अंतरी असतात, जो संशयमुक्त असून सर्व भूतांचे हित करतो, अशा पुरुषाला अक्षयब्रह्माची प्राप्ती होते.
जेतारः षड्रिपूणां ये शमिनो दमिनस्तथा ।तेषां समन्ततो ब्रह्म स्वात्मज्ञानां विभात्यहो ॥ २५ ॥
२५) कामादि षद्रिपूंचा पराजय करुन ज्यांनी शम व दम साधले असतात, अशांना सर्वत्र ब्रह्मभान झालेले असते.
आसनेषु समासीनस्त्यक्त्वेमान्विषयान्बहिः ।संस्तभ्य भृकुटीमास्ते प्राणायामपरायणः ॥ २६ ॥
२६) योगांत अनेक आसनें सांगितलीं आहेत. त्यांपैकीं एखाद्या आसनावर स्थिर बसून मनांतून सर्व विषयांना बाहेर काढून भ्रूमध्यावर दृष्टि स्थिर करुन प्राणायामरत व्हावें.
प्राणायामं तु संरोधं । प्राणापानसमुद्भवम् ।वदन्ति मुनयस्तं च त्रिधाभूतं विपश्र्चितः ॥ २७ ॥
२७) प्राण व अपान वायूंचा निरोध करणे हाच प्राणायाम असें ज्ञाते मुनि बोलतात, त्यांनीं या प्राणायामाचे तीन प्रकार सांगितले आहेत.
प्रमाणं भेदतो विद्धि लघुमध्यममुत्तमम् ।दशभिर्द्व्यधिकैर्वर्णैः प्राणायामो लघुः स्मृतः ॥ २८ ॥
२८) प्रमाणानें लघु, मध्यम व उत्तम असे प्राणायामाचे तीन भेद आहेत. बारा वर्ण उच्चारण्यास लागणार्या कालांत होणारा प्राणायाम लघु प्राणायाम होतो.
चतुर्विशत्यक्षरो यो मध्यमः स उदाहृतः ।षट्त्रिंशल्लघुवर्णो य उत्तमः सोऽभिधीयते ॥ २९ ॥
२९) चौवीस अक्षरांच्या वेळांत होणारा मध्यम व छत्तीस अक्षरांच्या काळांत होणारा प्राणायाम उत्तम होतो असें म्हणतात.
सिंहं शार्दूलकं वापि मत्तेभं मृदुतां यथा ।नयन्ति प्राणिनस्तद्वत्प्राणापानौ सुसाधयेत् ॥ ३० ॥
३०) सिंह, वाघ व माजलेला हत्ती यांनाही साधनानें मृदु करतां येते. तसेंच प्राणापानासही साधनानें वश करुन घ्यावे.
पीडयन्ति मृगांस्ते न लोकान्वश्यगता नृप ।दहत्येनस्तथा वायुः संस्तब्धो न च तत्तनुम् ॥ ३१ ॥
३१) सिंहव्याघ्रादिक प्राणी वश झाले असतां ते इतर मृगांना व लोकांना पीडा देत नाहींत, त्याप्रमाणें स्तंभित केलेला वायु शरिरांतील दोष जाळून टाकतो, देहाला जाळीत नाही.
यथा यथा नरः कश्र्चित्सोपानावलिमाश्रयेत् ।तथा तथा वशीकुर्यात्प्राणापानौ हि योगवित् ॥ ३२॥
३२) जिन्यावर मनुष्याला एका पायरीवरुन दुसरीवर जसें क्रमानें चढावें लागतें, योगज्ञ पुरुषानेंही प्राणापानांना तसेंच क्रमाक्रमानें वश करावें.
पूरकं कुम्भकं चैव रेचकं च ततोऽभ्यसेत् ।अतीतानागतज्ञानी ततः स्याज्जगतीतले ॥ ३३ ॥
३३) पूरक, कुंभक व रेचक यांचा नंतर अभ्यास करावा म्हणजे त्याला भूत, भविष्य कळूं लागतें.
प्राणायामैर्द्वादशभिरुत्तमैर्धारणा मता ।योगस्तु धारणे द्वे स्याद्योगीशस्ते सदाभ्यसेत् ॥ ३४ ॥
३४) बारा उत्तम प्राणायामाच्या धारणा असें म्हणतात. त्या दोन धारणा म्हणजे एक योग होतो. योग्यांनीं या योगाचा नेहमीं अभ्यास करावा.
एवं यः कुरुते राजं स्त्त्रिकालज्ञः स जायते ।अनायासेन तस्य स्याद्वश्यं लोकत्रयं नृप ॥ ३५ ॥
३५) असें योगसाधन करणारा पुरुष त्रिकालज्ञ होतो. व अनायासें त्याला सर्व त्रैलोक्य वश होतें.
ब्रह्मरुपं जगत्सर्वं पश्यन्ति स्वान्तरात्मनि ।एवं योगश्र्च संन्यासः समानफलदायकौ ॥ ३६ ॥
३६) योगानें त्याला आपल्या अंतरात्म्यांत सर्व विश्र्व ब्रह्मरुप दिसूं लागतें. याप्रमाणें संन्यास व कर्मयोग हे दोन्हीही समान फल देणारे आहेत.
जन्तूनां हितकर्तारं कर्मणां फलदायिनम् ।मां ज्ञात्वा मुक्तिमाप्नोति त्रैलोक्यस्येश्र्वरं विभुम् ॥ ३७ ॥
३७) मी प्राणीमात्रांचा हितकर्ता व कर्मफल देणारा आहें. त्रैलोक्याचा ईश्र्वर व्यापक अशा मला जाणल्यानें मुक्ति मिळते.
ॐ तत्सदिति श्रीमद्गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे श्रीगणेशपुराणे उत्तरखंडे श्रीगजाननवरेण्यसंवादे वैधसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ Adhyay Chavatha Vaidha Sanyas Yoga
अध्याय चवथा वैधसंन्यास योग
Custom Search
No comments:
Post a Comment