Shri Dnyaneshwari Adhyay 5 Part 3
देखें बुद्धीची भाषा नेणिजे । मनाचा अंकुर
नुदैजे ।
ऐसा
व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥
५१)
पाहा, जें कर्म, बुद्धीला समजण्याच्या पूर्वीं व मनांत विचार उद्भवण्याच्या अगोदर
होतें, त्या ( कर्माच्या ) व्यवहाराला ‘ कायिक ‘ व्यवहार म्हणतात.
हेंचि
मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये
कर्में करिती तैशीं । केवळ तनू ॥ ५२ ॥
५२) हेंच
स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक, ज्याप्रमाणें तान्ह्या मुलाची हालचाल असते,
त्याप्रमाणें योगी केवळ शरीरानेंच कर्में करतात.
मग
पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि
राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
५३) मग
हें पांच भूतांचें बनलेलें शरीर ज्या वेळेला झोपलेलें असतें, त्या वेळेला
ज्याप्रमाणें एकटें मनच स्वप्नांत व्यवहार करतें.
नवल ऐकें
धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा ।
देहा होंऊ
नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
५४)
अर्जुना, एक आश्र्चर्य पाहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे ? ती देहाला जागें होऊं
देत नाहीं, पण सुखदुःखांचा भोग भोगविते.
इंद्रियांचां
गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळ गा
म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥
५५)
अरे, इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो, असें जें कर्म उत्पन्न होतें, त्यास केवळ ‘
मानसिक ‘ कर्म म्हणतात.
योगिये तोहि
करिती । परी कर्में तेणें न बंधिजती ।
जे सांडिली
आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥
५६)
योगी तेंहि कर्म करतात, पण तें त्याकर्मानें बांधले जात नाहींत; कारण त्यांनी
अहंकाराची संगति टाकलेली असते.
आतां
जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
मग
इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥
५७)
आतां ज्याप्रमाणें भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होतें, मग त्या माणसाच्या
इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात.
स्वरुप तरी
देखे । आळविलें आइके ।
शब्दु बोले
मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥
५८)
त्यास रुप तर दिसतें, हाकां मारलेलें ऐकूं येतें, तो तोंडानें शब्दांचा उच्चारहि
करतो, परंतु हें सर्व केल्याची जाणीव नसते.
हें असो
काजेंविण । जें जें कांहीं कारण ।
तें केवळ
कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥
५९) हें
राहूं दे, तो प्रयोजनावांचून जें जें कांहीं करतो, ते ते सर्व केवळ इंद्रियांचें
कर्म आहे, असें समज.
मग सर्वत्र
जें जाणतें । तें बुद्धीचें कर्म निरुते ।
वोळख
अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥
६०) मग
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणीं जाणण्याचें जें काम आहे, ते खरोखर
बुद्धीचें आहे, असे ओळख.
ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देउनी ।
परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥ ६१ ॥
६१) ते ( कर्मयोगी ) बुद्धि पुढें करुन मनःपूर्वक कर्मे
करतात; पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षांहि मुक्त दिसतात.
जे बुद्धीचिये ठावूनि देहीं । तयां अहंकाराचा सेचि नाहीं ।
म्हणोनि कर्मेंचि करितां पाहीं । चोखाळले ॥ ६२ ॥
६२) कारण त्यांच्यामध्यें बुद्धिपासून देहापर्यंत कोठेंहि
अहंकाराचे स्मरणच नसतें, म्हणून अशा कर्मांचें आचरण करीत असतांहि ते शुद्धच असतात,
असें समज.
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें निष्कर्म ।
हें जाणती सवर्म । गुरुगम्य जें ॥ ६३ ॥
६३) अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेलें जें कर्म,
तेंच नैष्कर्म्य होय; ही गुरुकडून कळणारी मर्माची गोष्ट ( प्राप्त पुरुष ) समजतात.
आतां शांतरसाचें भरिते । सांडीत आहे पात्रातें ।
जे बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥ ६४ ॥
६४) आतां ( माझ्या बोलण्यांतील ) शांतरसाचा पूर मर्यादा
सोडून उचंबळत आहे; कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचें व्याख्यान करतां आलें.
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथि लागु । परिसावया ॥ ६५ ॥
६५) ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्हेनें
नाहींसा झाला आहे, त्यांनाच हें ऐकण्याची योग्यता आहे.
हा असो अतिप्रसंगु । न
संडीं पां कथालागु ।
होईल श्र्लोकसंगतिभंगु म्हणोनियां ॥ ६६ ॥
६६) ( या ज्ञानेश्र्वरमहाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते
म्हणतात, ) हें विषयांतर करणें पुरें. कथेचा संबंध सोडूं नकोस, कारण तसें
करण्यानें श्र्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल.
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥ ६७ ॥
६७) जें मनानें आकलन करणें कठीण आहे, घासाघीस केली तर
बुद्धीला बुद्धीला जें प्राप्त होत नाहीं तें दैवाच्या अनुकूलतेनें तुला सांगतां
आलें.
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें । सांगें कथा ॥ ६८ ॥
६८) जें स्वभावतः शब्दांच्या पलीकडचें आहे, तें बोलण्यांत
जर सांपडलें, तर आणिकांचें काय प्रयोजन ? तेव्हां तूं श्रीकृष्णार्जुनसंवादाची
चाललेली कथा सांग.
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा ।
म्हणे संवादु तया दोघांचा । परिसोनि परिसा ॥ ६९ ॥
६९) श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून
निवृत्तिनाथांचे शिष्य ( ज्ञानेश्र्वरमहाराज ) म्हणतात, ‘ कृष्ण आणि अर्जुन या
दोघांत झालेलें संभाषण एवढा वेळ ऐकलें तें लक्षांत घेऊन यापुढें ऐका.
मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिह्न पुरतें
।
सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥ ७० ॥
७०) मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आतां तुला कृतकृत्य
झालेल्या पुरुषाचें चिन्ह संपूर्ण सांगेन. तूं चांगलें लक्ष दे.
तरी
आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ॥ ७१ ॥
७१) तरी या जगांत ज्ञानयोगानें जो संपन्न झाला आहे आणि
ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे, त्याला घरांत घुसून शांति वरते.
येरु कर्मबंधें । किरीटी । अभिलाषाचिया गांठी ।
कळासला खुंटीं । फळभोगाचां ॥ ७२ ॥
७२) अर्जुना, त्याहून दुसरा ( आसक्त ) कर्माच्या बंधामुळें
अभिलाषेच्या दाव्यानें फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो.
जैसा फळाचिये हावे । ऐसें कर्म करी आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥ ७३ ॥
७३) फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणें तो सर्व कर्में
करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाहीं, अशा अकर्तेपणाच्या समजुतीनें जो
त्याविषयीं उदासीन राहातो,
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।
तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥ ७४ ॥
७४) तो जिकडे पाहातो, तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथें
सांगेल तेथें महाबोध नांदतो.
नवद्वारे देहीं । तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥ ७५ ॥
७५) नऊ छिद्रांच्या देहामध्यें वागत असूनहि त्याचें
देहाशीं तादात्म्य नसतें. तो फलांचा त्याग करणारा कर्में
करीत असतांनाहि ( तत्त्वतः )
कांहींच करीत नाहीं.
No comments:
Post a Comment