Shri RamCharitManas Part 67
दोहा—तेहिं रथ रुचिर बसिष्ठ कहुँ हरषि चढ़ाइ नरेसु
।
आपु चढ़ेउ स्यंदन सुमिरि हर गुर गौरि गनेसु ॥ ३०१
॥
त्या सुंदर रथावर राजांनी वसिष्ठांना आनंदाने
बसवून नंतर शिव, गुरु, गौरी आणि गजाननाचे स्मरण करुन महाराज स्वतः दुसर्या रथात
बसले. ॥ ३०१ ॥
सहित बसिष्ठ सोह नृप कैसें । सुर गुर संग पुरंदर
जैसें ॥
करि कुल रीति बेद बिधि राऊ । देखि सबहि सब भॉंति
बनाऊ ॥
देवगुरु बृहस्पतीबरोबर इंद्र शोभावा, तसे
वसिष्ठांबरोबर महाराज शोभत होते. वेद-विधीप्रमाणे आणि कुलाचाराप्रमाणे सर्व कृत्ये
करुन व सर्वांना सर्व प्रकारे सज्ज झालेले पाहिल्यावर, ॥ १ ॥
सुमिरि रामु गुर आयसु पाई । चले महीपति संख बजाई
॥
हरषे बिबुध बिलोकि बराता । बरषहिं सुमन सुमंगल
दाता ॥
श्रीरामांचे स्मरण करुन आणि गुरुंची आज्ञा
झाल्यावर पृथ्वीपती राजा दशरथांनी शंख फुंकून प्रस्थान केले. वर्हाड पाहून देव
आनंदून गेले व मंगलदायी फुलांचा वर्षाव करु लागले. ॥ २ ॥
भयउ कोलाहल हय गय गाजे । ब्योम बरात बाजने बाजे ॥
सुर नर नारि सुमंगल गाईं । सरस राग बाजहिं सहनाईं
॥
प्रचंड आवाज दुमदुमून राहिला. घोडे खिंकाळू
लागले. हत्ती चीत्कार करु लागले. आकाशात व वरातीत मंगलवाद्ये वाजू लागली. अप्सरा व
स्त्रिया मंगल गाणी गाऊ लागल्या आणि सुंदर रागदारीत सनया वाजू लागल्या. ॥ ३ ॥
घंट घंटि धुनि बरनि न जाहीं । सरव करहिं पाइक
फहराहीं ॥
करहिं बिदूषक कौतुक नाना । हास कुसल कल गान
सुजाना ॥
घंटांच्या आवाजाचे तर वर्णन करणेही कठीण
होते. पायी चालणारे सेवक किंवा पट्टेबाज कसरती करीत होते आणि आकाशात उंच उड्या मारीत
होते. हशा पिकविण्यात वाकबगार आणि सुंदर गाणी गाण्यात चतुर विदूषक हे तर्हेतर्हेच्या
गमजा करुन दाखवीत होते. ॥ ४ ॥
दोहा—तुरग नचावहिं कुअँर बर अकनि मृदंग निसान ।
नागर नट चितवहिं चकित डगहिं न ताल बँधान ॥ ३०२ ॥
सुंदर राजकुमार मृदंग आणि नगार्याच्या
तालावर घोड्यांना असे नाचवीत होते की, त्यांचा ताल जराही चुकत नव्हता. चतुर
नटसुद्धा ते पाहून चकित होत होते. ॥ ३०२ ॥
बनइ न बरनत बनी बराता । होहिं सगुन सुंदर सुभदाता
॥
चारा चाषु बाम दिसि लेई । मनहुँ सकल मंगल कहि देई
॥
वर्हाडाचे वर्णन करायचे म्हटले तरी कठीण
आहे. सुंदर शुभदायक शकुन होत होते. चास पक्षी चारा शोधण्यास डावीकडे जात होते. जणू
सर्व मंगलदायक असल्याची सूचना देत होते. ॥ १ ॥
दाहिन काग सुखेत सुहावा । नकुल दरसु सब काहूँ
पावा ॥
सानुकूल बह त्रिबिध बयारी । सघट सबाल आव बर नारी ॥
उजवीकडे कावळा शेतामध्ये शोभून दिसत होता.
सर्वांना मुंगूसही दिसले. शीतल, मंद, सुगंधित वारे मागून पुढे वाहात होते.
सुवासिनी स्त्रिया डोक्यावर भरलेले घडे आणि कड़ेवर मूल घेऊन येत होत्या. ॥ २ ॥
लोवा फिरि फिरि दरसु देखावा । सुरभी सनमुख सिसुहि
पिआवा ॥
मृगमाला फिरि दाहिनि आई । मंगल गन जनु दीन्हि
देखाई ॥
कोल्हे वारंवार तोंड दाखवीत होते. समोर गाई
उभ्या राहून वासरांना पाजत होत्या. हरणांचे कळप डावीकडे वळून उजवीकडे येत. अशा
रितीने सर्व मांगल्यांचे समूह दिसून आले. ॥ ३ ॥
छेमकरी कह छेम बिसेषी । स्यामा बाम सुतरु पर देखी
॥
सनमुख आयउ दधि अरु मीना । कर पुस्तक दुइ बिप्र
प्रबीना ॥
पांढर्या शिराची घार विशेष क्षेम दर्शवीत
होती. कोकिळा डाव्या बाजूच्या सुंदर वृक्षावर दिसून ली. समोरुन दही, मासे आणि दोन
विद्वान ब्राह्मण हाती ग्रंथ घेऊन आले. ॥ ४ ॥
दोहा—मंगलमय कल्यानमय अभिमत फल दातार ।
जनु सब साचे होन हित भए सगुन एक बार ॥ ३०३ ॥
सर्व मंगलमय, कल्याणमय आणि मनोवांछित फळे
देणारे शकुन जणू खरोखरच मंगल होणार, हे सुचवण्यासाठी एकत्र आले होते. ॥ ३०३ ॥
मंगल सगुन सुगम सब ताकें । सगुन ब्रह्म सुंदर सुत
जाकें ॥
राम सरिस बरु दुलहिनि सीता । समधी दसरथु जनकु
पुनीता ॥
प्रत्तक्ष सगुण ब्रह्म ज्याचे पुत्र, त्याला
सर्व मंगलकारी शकुन सुलभ असणारच. श्रीरामचंद्रांच्यासारखा वर आणि सीतेसारखी वधू
आहे, तसेच दशरथ व जनक यांच्या सारखे पवित्र व्याही आहेत, ॥ १ ॥
सुनि अस ब्याहु सगुन सब नाचे । अब कीन्हे बिरंचि
हम सॉंचे ॥
एहि बिधि कीन्ह बरात पयाना । हय गय गाजहिं हने
निसाना ॥
असा विवाह आहे, हे ऐकून जणू सर्व शकुन नाचू
लागले आणि म्हणू लागले –‘आतां ब्रह्मदेवांनी आम्हांला सार्थ करुन दाखविले.’
अशाप्रकारे वर्हाडाने प्रस्थान केले. घोडे, हत्ती गर्जू लागले आणि नगार्यांवर
प्रहार होऊ लागले. ॥ २ ॥
आवत जानि भानुकुल केतू । सरितन्हि जनक बँधाए सेतू
॥
बीच बीच बर बास बनाए । सुरपुर सरिस संपदा छाए ॥
सूर्यवंशाची कीर्ति-पताका असलेले दशरथ येत
आहेत हे समजल्यावर जनकांनी नद्यांवर पुल बांधले. वाटेमध्ये त्यांना राहाण्याची सोय
केली. तेथे देवलोकीची संपदा भरली होती. ॥ ३ ॥
असन सयन बर बसन सुहाए । पावहिं सब निज निज मन भाए
॥
नित नूतन सुख लखि अनुकूले । सकल बरातिन्ह मंदिर
भूले ॥
आणि तेथे वर्हाडी मंडळींना आपापल्या आवडीचे
उत्तम भोजन, बिछाने आणि वस्त्रे मिळत होती. मनाप्रमाणे नित्य नवीन सुखे पाहून सर्व
वर्हाडी मंडळींना आपापल्या घराचा विसर पडला. ॥ ४ ॥
दोहा—आवत जानि बरात बर सुनि गहगहे निसान ।
सजि गज रथ पदचर तुरग लेन चले अगवान ॥ ३०४ ॥
मोठ्या जोरजोराने वाजणार्या नगार्यांचा
आवाज ऐकून आणि श्रेष्ठ वर्हाडी येत आहेत हे कळल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी
हत्ती, रथ, पायदळ आणि घोडे सजवून त्यांना आणण्यासाठी निघाले. ॥ ३०४ ॥
मास पारायण, दहावा विश्राम
कनक कलस भरि कोपर थारा । भाजन ललित अनेक प्रकारा
॥
भरे सुधासम सब पकवाने । नाना भॉंति न जाहिं बखाने
॥
दूध, सरबत, थंडाई, पाणी इत्यादींनी भरलेले
सोन्याचे कलश, अमृतासारखी तर्हेतर्हेची अवर्णनीय पक्वाने, भरलेल्या पराती,
थाळ्या इत्यादी अनेक प्रकारची सुंदर भांडी, ॥ १ ॥
फल अनेक बर बस्तु सुहाईं । हरषि भेंट हित भूप
पठाईं ॥
भूषन बसन महामनि नाना । खग मृग हय गय बहु बिधि
जाना ॥
उत्तम फळे आणि इतरही अनेक सुंदर वस्तू
जनकराजांनी मोठ्या आनंदाने भेट म्हणून पाठविल्या. दगिने, कपडे, नाना प्रकारची
मूल्यवान रत्ने, पक्षी, पशू, घोडे, हत्ती आणि अनेक प्रकारची वाहने ॥ २ ॥
मंगल सगुन सुगंध सुहाए । बहुत भॉंति महिपाल पठाए
॥
दधि चिउरा उपहार अपारा । भरि भरि कॉंवरि चले
कहारा ॥
तसेच अनेक प्रकारची सुगंधित व शोभिवंत मंगलिक
द्रव्ये आणि शुभशकुनी पदार्थ जनकांनी पाठविले. दही, पोहे आणि अगणित भेट वस्तू
इत्यादी कावड्यांतून भरभरुन भोई निघाले. ॥ ३ ॥
अगवानन्ह जब दीखि बराता । उर आनंदू पुलक भर गाता
॥
देखि बनावा सहित अगवाना । मुदित बरतिन्ह हये
निसाना ॥
स्वागत करणार्यांना जेव्हा वर्हाड दिसले, तेव्हां त्यांना
आनंद झाला.आणि ते रोमांचित झाले. सामोरे येणारे
नटून-थटून आलेले पाहून वर्हाडी मंडळींनी आनंदाने
नगारे वाजविले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment