दोहा---सुनत बिनीत बचन अति
कह कृपाल मुसुकाइ ।
जेहि बिधि उतरै कपि कटकु
तात सो कहहु उपाइ ॥ ५९ ॥
समुद्राची अत्यंत विनीत
वचने ऐकून कृपाळू श्रीरामांनी हसून म्हटले, ‘ बाबा रे, ज्या रीतीने वानरांची सेना पार
उतरुन जाईल असा उपाय सांग. ‘ ॥ ५९ ॥
नाथ नील नल कपि द्वौ भाई ।
लरिकाईं रिषि आसिष पाई ॥
तिन्ह कें परस किएँ गिरि
भारे । तरिहहिं जलधि प्रताप तुम्हारे ॥
समुद्र म्हणाला, ‘ हे
नाथ, नील व नल हे दोघे वानर बंधू आहेत. त्यांना लहानपणी ऋषींचा आशीर्वाद मिळाला
होता, त्यांनी स्पर्श केल्यास मोठमोठे पर्वतसुद्धा तुमच्या प्रतापाने समुद्रात
तरंगू लागतील. ॥ १ ॥
मैं पुनि उर धरि प्रभु
प्रभुताई । करिहउँ बल अनुमान सहाई ॥
एहि बिधि नाथ पयोधि बँधाइअ
। जेहिं यह सुजसु लोक तिहुँ गाइअ ॥
मी प्रभूंची सत्ता
ध्यानात ठेवून आपल्या बळानुसार जी शक्य होईल, ती मदत करतो. अशाप्रकारे समुद्राला
बांध घाला की, त्यामुळे त्रैलोक्यामध्ये तुमची सुंदर कीर्ती गाइली जाईल. ॥ २ ॥
एहिं सर मम उत्तर तट बासी ।
हतहु नाथ खल नर अघ रासी ॥
सुनि कृपाल सागर मन पीरा ।
तुरतहिं हरी राम रनधीरा ॥
या बाणाने माझ्या
उत्तरेकडील तटावर राहाणारे जे अत्यंत पापी व दुष्ट मनुष्य आहेत, त्यांचा वध करा. ‘
कृपाळू आणि रणधीर रामांनी समुद्राच्या मनातील दुःख ऐकून, ते त्वरित दूर केले व
त्या दुष्टांना बाणाने टाकले. ॥ ३ ॥
देखि राम बल पौरुष भारी ।
हरषि पयोनिधि भयउ सुखारी ॥
सकल चरित कहि प्रभुहि
सुनावा । चरन बंदि पाथोधि सिधावा ॥
श्रीरामांचा प्रचंड
पराक्रम पाहून समुद्र आनंदित झाला. त्याने त्या दुष्टांची सारी हकीगत प्रभूंना
सांगितली. नंतर त्यांच्या चरणांना वंदन करुन समुद्र निघून गेला. ॥ ४ ॥
छंद---निज भवन गवनेउ सिंधु
श्रीरघुपतिहि यह मत भायऊ ।
यह चरित कलि मलहर जथामति
दास तुलसी गायऊ ॥
सुख भवन संसय समन दवन बिषाद
रघुपति गुन गना ।
तजि सकल आस भरोस गावहि
सुनहि संतत सठ मना ॥
समुद्र आपल्या घरी
गेला. श्रीरघुनाथांना त्याचा विचार आवडला. हे चरित्र कलियुगातील पापांचे हरण
करणारे आहे, आणि तुलसीदासाने आपल्या बुद्धीप्रमाणे ते गाइले आहे. श्रीरघुनाथ हे
गुण-निधी, सुख-धाम, संशयाचा नाश करणारे आणि विषादाचे दमन करणारे आहेत. अरे मूर्ख
मना, तू संसारातील सर्व आशा व विश्र्वास सोडून निरंतर त्यांचे गायन कर व त्यांचे
चरित्र ऐक.
दोहा—सकल सुमंगल दायक
रघुनायक गुन गान ।
सादर सुनहिं ते तरहिं भव
सिंधु बिना जलजान ॥ ६० ॥
श्रीरघुनाथांचे गुणगान हे संपूर्ण मांगल्य देणारे आहे. जे
आदरपूर्वक हे ऐकतील, ते कोणत्याही जहाजाविना-
साधनाविना भवसागरातून तरुन जातील. ॥ ६० ॥
मासपारायण, चोविसावा
विश्राम
इति श्रीमद्रामचरित्रमानसे
सकलकलिकलुषविध्वंसने पञ्चम: सोपानः समाप्तः
कलियुगाच्या संपूर्ण
पापांचा नाश करणार्या श्रीरामचरितमानसाचा हा पाचवा सोपान समाप्त झाला. (
सुन्दरकाण्ड समाप्त )
No comments:
Post a Comment