Wednesday, January 18, 2023

SunderKanda Part 18 Doha 50 to 52 सुंदरकाण्ड भाग १८ दोहा ५० ते ५२

 

SunderKanda Part 18 
ShriRamCharitManas 
Doha 50 to Doha 52 
सुंदरकाण्ड भाग १८ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५० ते दोहा ५२

दोहा—प्रभु तुम्हार कुलगुर जलधि कहिहि उपाय बिचारि ।

बिनु प्रयास सागर तरिहि सकल भालु कपि धारि ॥ ५० ॥

हे प्रभू, समुद्र तुमच्या कुळाचा पूर्वज आहे. तो विचार करुन उपाय सांगेल. मग अस्वले व वानरांची सेना विनासायास समुद्रापलीकडे जाऊ शकेल. ‘ ॥ ५० ॥

सखा कही तुम्ह नीकि उपाई । करिअ दैव जौं होइ सहाई ॥

मंत्र न यह लछिमन मन भावा । राम बचन सुनि अति दुख पावा ॥

श्रीरामांनी म्हटले, ‘ हे मित्रा, तू चांगला उपाय सांगितलास. जर दैव सहाय्यक असेल, तर हाच उपाय करावा.’ हा सल्ला लक्ष्मणाला आवडला नाही. श्रीरामांचे बोलणे ऐकून तर त्याला फार दुःख झाले. ॥ १ ॥

नाथ दैव कर कवन भरोसा । सोषिअ सिंधु करिअ मन रोसा ॥

कादर मन कहुँ एक अधारा । दैव दैव आलसी पुकारा ॥

लक्ष्मण म्हणाला, ‘ हे नाथा, दैवाचा काय भरवसा. मनात राग आणा आणि समुद्र टाका. दैव हे भित्र्या मनाचे एक समाधान आहे. आळशी लोकाच दैव, दैव असे म्हणत बसतात.’ ॥ २ ॥

सुनत बिहसि बोले रघुबीरा । ऐसेहिं करब धरहु मन धीरा ॥

अस कहि प्रभु अनुजहि समुझाई । सिंधु समीप गए रघुराई ॥

हे ऐकून श्रीरघुवीर हसत म्हणाले, ‘ असेच करु. मनात धीर धर.’ असे म्हणून भावाला समजावून प्रभू रघुनाथ समुद्राजवळ गेले. ॥ ३ ॥

प्रथम प्रनाम कीन्ह सिरु नाई । बैठे पुनि तट दर्भ डसाई ॥

जबहिं बिभीषन प्रभु पहिं आए । पाछें रावन दूत पठाए ॥

त्यांनी प्रथमतः मस्तक नमवून समुद्राला प्रणाम केला. मग किनार्‍यावर कुश पसरुन त्यावर बसले. इकडे ज्यावेळी बिभीषण प्रभूंच्याकडे आला होता, त्याचवेळी रावणाने आपले दूत त्याच्यामागे पाठविले होते. ॥ ४ ॥     

दोहा—सकल चरित तिन्ह देखे धरें कपट कपि देह ।

प्रभु गुन हृदयँ सराहहिं सरनागत पर नेह ॥ ५१ ॥

कपटाने त्यांनी वानर-रुप धारण करुन सर्व लीला पाहिल्या. ते आपल्या मनात प्रभूंच्या गुणांची व शरणागतावरील त्यांच्या प्रेमाची प्रशंसा करु लागले. ॥ ५१ ॥

प्रगट बखानहिं राम सुभाऊ । अति सप्रेम गा बिसरि दुराऊ ॥

रिपु के दूत कपिन्ह तब जाने । सकल बॉंधि कपीस पहिं आने ॥

नंतर उघडपणेही ते मोठ्या प्रेमाने श्रीरामांच्या स्वभावाचा मोठेपणा वर्णन करु लागले. ते आपले सोंग विसरुन गेले. तेव्हा वानरांना कळले की, हे शत्रूचे दूत आहेत आणि ते त्यांना बांधून सुग्रीवाकडे घेऊन आले. ॥ १ ॥

कह सुग्रीव सुनहु सब बानर । अंग भंग करि पठवहु निसिचर ॥

सुनि सुग्रीव बचन कपि धाए । बॉंधि कटक चहु पास फिराए ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ वानरांनो, या राक्षसांची हाडे मोडून यांना परत पाठवा.’ सुग्रीवाचे बोलणे ऐकून वानर धावले. दूतांना बांधून त्यांनी सैन्यामधून त्यांची धिंड काढली. ॥ २ ॥

बहु प्रकार मारन कपि लागे । दीन पुकारत तदपि न त्यागे ॥

जो हमार हर नासा काना । तेहि कोसलाधीस कै आना ॥

वानर त्यांना खूप प्रकारे मारु लागले. ते दीनवाणे होऊन ओरडत होते, तरीही वानरांनी त्यांना सोडले नाही. तेव्हा त्या दूतांनी ओरडून सांगितले की, ‘ जो आमचे कान-नाक कापेल, त्याला कोसलाधीश श्रीरामांची शपथ आहे.’ ॥ ३ ॥

सुनि लछिमन सब निकट बोलाए । दया लागि हँसि तुरत छोड़ाए ॥

रावन कर दीजहु यह पाती । लछिमन बचन बाचु कुलघाती ॥

हे ऐकताच लक्ष्मणाने सर्व वानरांना जवळ बोलावले. त्याला दया आली. त्यामुळे त्याने हसून त्या राक्षसांना लगेच सोडविले.तो त्यांना म्हणाला, ‘ रावणच्या हाती ही चिठ्ठी द्या आणि सांगा की, हे कुलघातका, लक्ष्मणाचा निरोप वाच. ॥ ४ ॥

दोहा—कहेहु मुखागर मूढ़ सन मम संदेसु उदार ।

सीता देइ मिलहु न त आवा कालु तुम्हार ॥ ५२ ॥

मग त्या मूर्ख रावणला माझा तोंडी कृपापूर्ण निरोप द्या की, सीतेला परत देऊन श्रीरामांना भेट, नाही तर तुझा काळ आला आहे, असे समज. ‘ ॥ ५२ ॥

तुरत नाइ लछिमन पद माथा । चले दूत बरनत गुन गाथा ॥

कहत राम जसु लंकॉं आए । रावन चरन सीस तिन्ह नाए ॥

लक्ष्मणाच्या पाया पडून व श्रीरामांच्या गुणांची कथा वर्णन करीत ते दूत त्वरित निघाले. श्रीरामांची कीर्ती गात ते लंकेत आले आणि त्यांनी रावणाच्या पायांवर मस्तक टेकविले. ॥ १ ॥

बिहसि दसानन पूँछी बाता । कहसि न सुक आपनि कुसलाता ॥

पुनि कहु खबरि बिभीषन केरी । जाहि मृत्यु आई अति नेरी ॥

रावणाने हसून विचारले, ‘ अरे शुका, आपली खुशाली का सांगत नाहीस ? नंतर बिभीषणाची वार्ता सांग. कारण मृत्यु अगदी त्याच्याजवळ आला आहे. ॥ २ ॥

करत राज लंका सठ त्यागी । होइहि जव कर कीट अभागी ॥

पुनि कहु भालु कीस कटकाई । कठिन काल प्रेरित चलि आई ॥

लंकेत राज्य करीत असताना तो मूर्ख लंका सोडून गेला. तो अभागी आता धान्यातला किडा होईल. ( नर-वानरांच्याबरोबर तोही मारला जाईल. ) नंतर अस्वले व वानरांच्या सेनेची स्थिती सांग, जी कठीण काळाच्या प्रेरणेने मरण्यासाठी येथे आली आहेत. ॥ ३ ॥

जिन्ह के जीवन कर रखवारा । भयउ मृदुल चित सिंधु बिचारा ॥

कहु तपसिन्ह कै बात बहोरी । जिन्ह के हृदयँ त्रास अति मोरी ॥

आणि ज्यांच्या जीवनाचा रक्षक कोमल चित्ताचा बिचारा

 समुद्र झाला आहे. तो नसता तर आतापर्यंत राक्षसांनी

 त्यांना मारुन टाकले असते. नंतर त्या तपस्व्यांची वार्ता

 सांग, ज्यांच्या मनात माझी मोठी भीती आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: