ShriRamcharitmans Part 61
दोहा—लखन उतर आहुति सरिस भृगुबर कोपु कृसानु ।
बढ़त देखि जल सम बचन बोले रघुकुलभानु ॥ २७६ ॥
लक्ष्मणाच्या बोलण्याची आहुती पडताच
परशुरामांचा क्रोधरुपी अग्नी भडकला असलेला पाहून रघुकुलातील सूर्य
श्रीरामचंद्रांनी जलसमान शांत वचन उच्चारले. ॥ २७६ ॥
नाथ करहु बालक पर छोहू । सूध दूधमुख करिअ न कोहू
॥
जौं पै प्रभु प्रभाउ कछु जाना । तौ कि बराबरि करत
अयाना ॥
‘ हे नाथ, बालकावर कृपा करा. या भोळ्या व
दूधपित्या मुलावर राग धरु नका. जर याला प्रभूंचा प्रभाव ठाऊक असता, तर या समज
नसलेल्याने तुमची बरोबरी केली असती काय ? ॥ १ ॥
जौं लरिका कछु अचगरि करहीं । गुर पितु मातु मोद
मन भरहीं ॥
करिअ कृपा सिसु सेवक जानी । तुम्ह सम सील धीर
मुनि ग्यानी ॥
बालकाने जरी काही खोडी केली, तरी गुरु, पिता
व माता मनात आनंदून जातात. म्हणून लहान मूल आणि सेवक समजून याच्यावर कृपा करा.
तुम्ही तर समदर्शी, सुशील, धीर व ज्ञानी मुनी आहात. ‘ ॥ २ ॥
राम बचन सुनि कछुक जुड़ाने । कहि कछु लखनु बहुरि
मुसुकाने ॥
हँसत देखि नख सिख रिस ब्यापी । राम तोर भ्राता बड़
पापी ॥
श्रीरामांचे बोल ऐकून परशुराम थोडेसे थंड
झाले. इतक्यात लक्ष्मण काही पुटपुटत हसला. त्याचे हसणे पाहून परशुराम नखशिखांत
क्रुद्ध झाले. ते म्हणाले, ‘ हे रामा, तुझा भाऊ मोठा पापी आहे. ॥ ३ ॥
गौर सरीर स्याम मन माहीं । कालकूटमुख पयमुख नाहीं
॥
सहज टेढ़ अनुहरइ न तोही । नीचु मीचु सम देख न मोही
॥
हा शरीराने गोरा असला तरी मनाने फार काळा
आहे. हा विषमुखी आहे, दूधमुखी बाळ नव्हे. हा स्वभावानेच तिरकस आहे. तुझे अनुकरण
करीत नाही. ( तुझ्यासारखा शीलवान नाही ). या नीचाला मी काळासारखा वाटत नाही. ॥ ४ ॥
दोहा—लखन कहेउ हँसि सुनहु मुनि क्रोधु पाप कर मूल
।
जेहि बस जन अनुचित करहिं चरहिं बिस्व प्रतिकूल ॥
२७७ ॥
लक्ष्मण हसत म्हणाला, ‘ हे मुनी ऐका. क्रोध
हा पापाचे मूळ आहे. त्याला वश झाल्यामुळे मनुष्य अनुचित कर्म करतो आणि जगाचे
अकल्याण करतो. ॥ २७७ ॥
मैं तुम्हार अनुचर मुनिराया । परिहरि कोपु करिअ
अब दाया ॥
टूट चाप नहिं जुरिहि रिसाने । बैठिअ होइहिं पाय
पिराने ॥
हे मुनिराज, मी तुमचा दास आहे. आता क्रोध
सोडून देऊन दया करा. मोडलेले धनुष्य क्रोध केल्याने काही जोडले जाणार नाही. उभे
राहून पाय दुखत असतील. आता बसा. ॥ १ ॥
जौं अति प्रिय तौ करिअ उपाई । जोरिअ कोउ बड़ गुनी
बोलाई ॥
बोलत लखनहिं जनकु डेराहीं । मष्ट करहु अनुचित भल
नाहीं ॥
जर धनुष्य फारच प्रिय असेल तर काही उपाय करता
येईल. एखाद्या मोठ्या गुणी कारागीराला बोलावून जोडून घेऊ. ‘ लक्ष्मणाच्या अशा
बोलण्याने जनक राजा घाबरुन गेले आणि म्हणाले, ‘ आता पुरे, गप्प बसा. अनुचित बोलणे
योग्य नव्हे.’ ॥ २ ॥
थर थर कॉंपहिं पुर नर नारी । छोट कुमार खोट बड़
भारी ॥
भृगुपति सुनि सुनि निरभय बानी । रिस तन जरइ होइ
बल हानी ॥
जनकपुरीचे स्त्री-पुरुष थरथर कापू लागले आणि
मनात म्हणू लागले की, ‘ हा छोटा कुमार फार लबाड आहे. ‘ लक्ष्मणाचे बेधडक बोलणे
ऐकून परशुरामांच्या अंगाचा तिळपापड होत होता, आणि त्यांचे बळही कमी होऊ लागले
होते. ॥ ३ ॥
बोले रामहि देइ निहोरा । बचउँ बिचारि बंधु लघु
तोरा ॥
मनु मलीन तनु सुंदर कैसें । बिष रस भरा कनक घटु
जैसें ॥
तेव्हा श्रीरामचंद्रांच्यावर मेहरबानी
केल्यासारखे दाखवीत परशुराम म्हणाले, ‘ तुझा लहान भाऊ समजून मी याला सोडून देतो.
हा मनाने वाईट आणि शरीराने गोरा आहे., जणू विषाने भरलेला सुवर्णकुंभ आहे. ॥ ४ ॥
दोहा—सुनि लछिमन बिहसे बहुरि नयन तरेरे राम ।
गुर समीप गवने सकुचि परिहरि बानी बाम ॥ २७८ ॥
हे ऐकून लक्ष्मण पुन्हा हसला. तेव्हा
श्रीरामांनी डोळ्यांनी त्याला दतावले. त्यामुळे लक्ष्मण वरमला आणि उलट बोलणे सोडून
देऊन गुरुंच्याजवळ गेला. ॥ २७८ ॥
अति बिनीत मृदु सीतल बानी । बोले रामु जोरि जुग
पानी ॥
सुनहु नाथ तुम्ह सहज सुजाना । बालक बचनु करिअ
नहिं काना ॥
श्रीरामचंद्र दोन्ही हात जोडून अत्यंत
नम्रतेने व कोमल, शीतल वाणीने म्हणाले, ‘ हे नाथ, ऐका. तुम्ही स्वभावतः ज्ञानी
आहात. बालकाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ॥ १ ॥
बररै बालकु एकु सुभाऊ । इन्हहि न संत बिदूषहिं
काऊ ॥
तेहिं नाहीं कछु काज बिगारा । अपराधी मैं नाथ
तुम्हारा ॥
गांधील माशी आणि मुले यांचा स्वभाव सारखा
असतो. संतजन त्यांना दोष देत नाहीत. शिवाय त्याने काही तुमच्या गुरुंचे धनुष्य
मोडले नाही. हे नाथ मी तुमचा अपराधी आहे. ॥ २ ॥
कृपा कोपु बधु बँधब गोसाईं । मो पर करिअ दास की
नाईं ॥
कहिअ बेगि जेहि बिधि रिस जाई । मुनिनायक सोइ करौं
उपाई ॥
म्हणून हे स्वामी, कृपा, क्रोध, वध व बंधन जे
काही करायचे आहे, ते दास समजून माझ्यावर करा. हे मुनिराज, तुमचा राग कशाने दूर
होईल ते सांगा. मी ते करीन. ‘ ॥ ३ ॥
कह मुनि राम जाइ रिस कैसें । अजहुँ अनुज तव चितव
अनैसें ॥
एहि कें कंठ कुठारु न दीन्हा । तौ मैं काह कोपु
करि कीन्हा ॥
मुनी म्हणाले, ‘ हे रामा, राग कसा जाणार ? अजुनी
तुझा लहान भाऊ वाकड्या नजरेने माझ्याकडे बघत आहे. याच्या मानेवर कुर्हाड चालविली
नाही, तर क्रोध करुन काय उपयोग झाला ? ॥ ४ ॥
दोहा—गर्भ स्त्रवहिं अवनिप रवनि सुनि कुठार गति
घोर ।
परसु अछत देखउँ जिअत बैरी भूपकिसोर ॥ २७९ ॥
माझ्या ज्या कुर्हाडीची घोर कृत्ये ऐकून
राजांच्या स्त्रियांचा गर्भपात होत असे. तो परशू असतानाही मी या शत्रू राजपुत्राला
अजुनही जिवंत पाहात आहे. ॥ २७९ ॥
बहइ न हाथु दहइ रिस छाती । भा कुठारु कुंठित
नृपघाती ॥
भयउ बाम बिधि फिरेउ सुभाऊ । मोरे हृदयँ कृपा कसि
काऊ ॥
हात चालेनासा झाला असून क्रोधाने छाती जळत
आहे. राजे लोकांचा घात करणारी ही कुर्हाडही कुंठित झाली आहे. दैव प्रतिकूल झाले
आहे. त्यामुळे माझा स्वभाव बदलला आहे. नाही तर माझ्या मनात अवेळी कृपा कशी आली
असती ? ॥ १ ॥
आजु दया दुखु दुसह सहावा । सुनि सौमित्रि बिहसि
सिरु नावा ॥
बाउ कृपा मूरति अनुकूला । बोलत बचन झरत जनु फूला
॥
आज दयेमुळे मला दुःसह यातना होत आहेत. ‘ हे
ऐकून लक्ष्मणाने हसून मस्तक नम्र केले आणि म्हटले, ‘ तुमचा कृपारुपी वायूही आपल्या
रुपाला शोभणाराच आहे. आपण बोलत आहात, तेव्हा जणू फुलांचा वर्षाव होत आहे. ॥ २ ॥
जौं पै कृपॉं जरिहिं मुनि गाता । क्रोध भएँ तनु
राख बिधाता ॥
देखु जनक हठि बालकु एहू । कीन्ह चहत जड़ जमपुर
गेहू ॥
हे मुनी, जर कृपा केल्याने तुमच्या शरीराची
आग होत असेल, तर मग क्रोध आला असता शरीराचे रक्षण विधाताच करु शकेल.’ परशुराम
म्हणाले,’ हे जनका, बघ. हा मूर्ख मुलगा हट्टाने यमपुरीत जाऊ इच्छितो. ॥ ३ ॥
बेगि करहु किन आँखिन्ह ओटा । देखत छोट खोट नृपु
ढोटा ॥
बिहसे लखनु कहा मन माहीं । मूदें आँखि कतहुँ कोउ
नाहीं ॥
याला ताबडतोब माझ्या नजरेपासून दूर का करीत
नाहीस. हा राजपुत्र दिसतो छोटा, परंतु आहे खोटा.’
लक्ष्मण हसून मनात म्हणाला, ‘ डोळे मिटून घेतल्यावर
कुठेही काहीही नसते.’ ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment