ShriRamCharitManas
दोहा—हय गय कोटिन्ह केलिमृग पुरपसु चातक मोर ।
पिक रथांग सुक सारिका सारस हंस चकोर ॥ ८३ ॥
कोट्यावधी घोडे, हत्ती, खेळण्यासाठी पाळलेली हरणे, नगरातील
गाई, बैल, बकरी इत्यादी पशू, चातक मोर, कोकिळ, चक्रवाक, पोपट, मैना, सारस, हंस,
चकोर, ॥ ८३ ॥
राम बियोग बिकल सब ठाढ़े । जहँ तहँ मनहुँ चित्र लिखि काढ़े ॥
नगरु सफल बनु गहबर भारी । खग मृग बिपुल सकल नर नारी ॥
हे सर्व श्रीरघुनाथांच्या वियोगामुळे व्याकुळ होऊन चित्रात
काढल्यासारखे इकडे तिकडे स्तब्ध उभे होते. नगर जणू फळांनी भरलेले घनदाट जंगल होते.
नगरवासी सर्व स्त्री-पुरुष हे पुष्कळसे पशु-पक्षी होते. ॥ १ ॥
बिधि कैकई किरातिनि कीन्ही । जेहिं दव दुसह दसहुँ दिसि
दीन्ही ॥
सहि न सके रघुबर बिरहागी । चले लोग सब ब्याकुल भागी ॥
विधात्याने कैकेयीला भिल्लीण बनविले. तिने दाही दिशांना
दुःसह वणवा पेटवून दिला. श्रीरामचंद्रांच्या विरहाची ही आग लोक सहन करु शकले
नाहीत. सर्व लोक व्याकूळ होऊन पळून गेले. ॥ २ ॥
सबहिं बिचारु कीन्ह मन माहीं । राम लखन सिय बिनु सुखु नाहीं
॥
जहॉं रामु तहँ सबुइ समाजु । बिनु रघुबीर अवध नहिं काजू ॥
सर्वांनी मनांत विचार केला की, श्रीराम, लक्ष्मण व सीता
यांच्याविना सुख नाही. जिथे श्रीराम राहतील, तेथेच सर्व समाज राहील.
श्रीरामचंद्रांच्याविना अयोध्येमध्ये आमचे काही काम नाही. ॥ ३ ॥
चले साथ अस मंत्रु दृढ़ाई । सुर दुर्लभ सुख सदन बिहाई ॥
राम चरन पंकज प्रिय जिन्हही । बिषय भोग बस करहिं कि तिन्हही
॥
असा पक्का विचार करुन व देवांनाही दुर्लभ अशी सुखे नांदणारी
घरे सोडून सर्वजण श्रीरामांच्याबरोबर निघाले. ज्यांना श्रीरामांची चरण-कमले प्रिय
आहेत, त्यांना कधी विषयभोग वश करु शकतील काय ? ॥ ४ ॥
दोहा—बालक बृद्ध बिहाइ गृहँ लगे लोग सब साथ ।
तमसा तीर निवासु किय प्रथम दिवस रघुनाथ ॥ ८४ ॥
मुले व म्हातारे-कोतारे यांना घरांत सोडून सर्व लोक
श्रीरामांच्याबरोबर निघाले. पहिल्या दिवशी श्रीरघुनाथांनी तमसा नदीच्या किनार्यावर
निवास केला. ॥ ८४ ॥
रघुपति प्रजा प्रेमबस देखी । सदय हृदयँ दुखु भयउ बिसेषी ॥
करुनामय रघुनाथ गोसॉंई । बेगि पाइअहिं पीर पराई ॥
प्रजेचे प्रेम पाहून श्रीरघुनाथांचे कृपाळू मन अतिशय
द्रवले. प्रभू श्रीरघुनाथ करुणामय आहेत. दुसर्याची पीडा त्यांना चटकन जाणवते. ॥ १
॥
कहि सप्रेम मृदु बचन सुहाए । बहुबिधि राम लोग समुझाए ॥
किए धरम उपदेस घनेरे । लोग प्रेम बस फिरहिं न फेरे ॥
प्रेमयुक्त कोमल व सुंदर वचने बोलून श्रीरामांनी पुष्कळ
प्रकारे लोकांना समजावले आणि बराच धर्मविषयक उपदेश केला. परंतु प्रेमामुळे लोक परत
पाठविले, तरी ते परतत नव्हते. ॥ २ ॥
सीलु सनेहु छाड़ि नहिं जाई । असंमजस बस भे रघुराई ॥
लोग सोग श्रम बस गए सोई । कछुक देवमायॉं मति मोई ॥
शील व स्नेह सोडता येत नाही. श्रीरघुनाथ गोंधळून गेले. शोक
व थकवा यांमुळे लोक झोपी गेले आणि देवांच्या काहीशा मायेमुळे त्यांची बुद्धी मोहित
झाली. ॥ ३ ॥
जबहिं जाम जुग जामिनि बीती । राम सचिव सन कहेउ सप्रीती ॥
खोज मारि रथु हॉंकहु ताता । आन उपायँ बनिहि नहिं बाता ॥ ]
दोन प्रहर रात्र झाली, तेव्हां श्रीरामचंद्रांनी प्रेमाने
मंत्री सुमंत्राला सांगितले की, ‘ तात, चाकोर्या दिसून येणार नाहीत, अशा रीतीने
रथ हाका. याखेरीज दुसरा उपाय नाही.’ ॥ ४ ॥
दोहा—राम लखन सिय जान चढ़ि संभु चरन सिर नाइ ।
सचिवँ चलायउ तुरत रथु इत उत खोज दुराइ ॥ ८५ ॥
शमकरांच्या चरणीं मस्तक नमवून श्रीराम, लक्ष्मण व सीता हे
रथावर बसले. मंत्र्याने लगेच इकडे तिकडे खुणा लपवत छपवत रथ हाकला.
जागे सकल लोग भएँ भोरु । गे रघुनाथ भयउ अति सोरु ॥
रथ कर खोज कतहुँ नहिं पावहिं । राम राम कहि चहुँ दिसि
धावहिं ॥
सकाळ होताच सर्व लोक जागे झाले. मोठा गोंधळ उडाला की, श्रीरघुनाथ
कोठे गेले ? कुठेही रथाचा पत्ता लागेना.सर्वजण ‘ हाय राम, हाय राम ‘ असा पुकारा
करीत चोहीकडे धावले. ॥ १ ॥
मनहुँ बारिनिधि बूड़ जहाजू । भयउ बिकल बड़ बनिक समाजू ॥
एकहि एक देहिं उपदेसू । तजे राम हम जानि कलेसू ॥
जसे समुद्रां जहाज बुडाले की, व्यापारी लोक हवालदील होतात.
एक दुसर्याला ते सांगू लागले की, आपणा सर्वांना क्लेश होतील, म्हणून श्रीरामचंद्र
न सांगता निघून गेले.
निंदहिं आपु सराहहिं मीना । धिग जीवनु रघुबीर बिहीना ॥
जौं पै प्रिय बियोगु बिधि कीन्हा । तौ कस मरनु न मागें
दीन्हा ॥
ते सर्व आपली निंदा करु लागले व पाण्याविना मरणार्या
माशांची प्रशंसा करु लागले. ते म्हणू लागले की, ‘ श्रीरामांच्याविना आपल्या
जिण्याचा धिक्कार असो. विधात्याने जर प्रिय व्यक्तीचा वियोग आमच्या नशिबी ठेवला
होता, तर आम्ही मागितल्यावर आम्हांला मरण का दिले नाही ? ॥ ३ ॥
एहि बिधि करत प्रलाप कलापा । आए अवध भरे परितापा ॥
बिषम बियोगु न जाइ बखाना । अवधि आस सब राखहिं प्राना ॥
अशा रीतीने अनेक प्रकारे प्रलाप करीत ते दुःखाने भरलेल्या
अयोध्येला आले. त्यांच्या भयंकर वियोगाच्या अवस्थेचे वर्णन करणे कठीण आहे. चौदा
वर्ष संपण्याची आशा करीत, ते प्राण बाळगून होते. ॥ ४ ॥
राम दरस हित नेम ब्रत लगे करन नर नारि ।
मनहुँ कोक कोकी कमल दीन बिहीन तमारि ॥ ८६ ॥
सर्व स्त्री-पुरुष श्रीरामांच्या दर्शनासाठी नियम व व्रत
करु लागले. ज्याप्रमाणे चक्रवाक जोडपे आणि कमळ हे सूर्याविना दीन होतात,
त्याप्रमाणे सर्वजण दीनवाणे झाले. ॥ ८६ ॥
सीता सचिव सहित दोउ भाई । सृंगबेरपुर पहुँचे जाई ॥
उतरे राम देवसरि देखी । कीन्ह दंडवत हरषु बिसेषी ॥
सीता व मंत्री यांच्यासह दोघे बंधू शृंगवेरपुरला पोहोचले.
तेथे गंगानदी पाहून श्रीराम रथांतून उतरले आणि मोठ्या आनंदाने त्यांनी तिला दंडवत
घातला. ॥ १ ॥
लखन सचिवँ सियँ किए प्रनामा । सबहि सहित सुखु पायउ रामा ॥
गंग सकल मुद मंगल मूला । सब सुख करनि हरनि सब मूला ॥
लक्ष्मण, सुमंत्र व सीतेनेही गंगेला प्रणाम केला.
श्रीरामांसह सर्वांना गंगा पाहून सुख वाटले. गंगा ही सर्व आनंदाचे व मांगल्याचे
मूळ आहे. ती सर्व सुखे देणारी व सर्व पीडा हरण करणारी आहे. ॥ २ ॥
कहि कहि कोटिक कथा प्रसंगा । रामु बिलोकहिं गंग तरंगा ॥
सचिवहि अनुजहि प्रियहि सुनाई । बिबुध नदी महिमा अधिकाई ॥
अनेक कथा-प्रसंग सांगत श्रीराम गंगेच्या लहरी पाहू लागले.
त्यांनी सुमंत्र. लक्ष्मण व सीतेला गंगेचा महिमा सांगितला. ॥ ३ ॥
मज्जनु कीन्ह पंथ श्रम गयऊ । सुचि जलु पिअत मुदित मन भयऊ ॥
सुमिरत जाहि मिटइ श्रम भारु । तेहि श्रम यह लौकिक ब्यवहारु
॥
त्यानंतर सर्वांनी स्नान केले. त्यामुळे प्रवासाचा शीण
नाहींसा झाला आणि पवित्र जल पिण्यामुळे त्यांचे मन प्रसन्न झाले. ज्यांच्या फक्त
स्मरणाने जन्म-मरणाचे श्रम नष्ट होतात, त्या श्रीरामांना ‘ श्रम ‘ झाले असे म्हणणे
हा फक्त लौकिक व्यवहार आहे. ॥ ४ ॥
दोहा—सुद्ध
सच्चिदानंदमय कंद भानुकुल केतु ।
चरित करत नर
अनुहरत संसृति सागर सेतु ॥ ८७ ॥
त्रिगुणातीत
व मायातीत दिव्य मंगलविग्रह व सच्चिदानंदस्वरुप असलेले सूर्यकुलाचे ध्वज भगवान
श्रीराम हे मनुष्याप्रमाणे लीला अशी करतात की, ती संसाररुपी समुद्र तरुन
जाण्यासाठी सेतूसारखी आहे. ॥ ८७ ॥
यह सुधि
गुहँ निषाद जब पाई । मुदित लिए प्रिय बंधु बोलाई ॥
लिए फल मूल
भेंट भरि भारा । मिलन चलेउ हियँ हरषु अपारा ॥
जेव्हा
निषादराज गुहाला श्रीरामांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याने आनंदित होऊन
आपल्या आप्तांना व बंधु-बांधवांना बोलावले आणि भेट म्हणून देण्यासाठी फळे, कंदमुळे
घेऊन तो दर्शनासाठी निघाला. त्याच्या मनाला अपार आनंद झाला होता. ॥ १ ॥
करि दंडवत
भेंट धरि आगें । प्रभुहि बिलोकत अति अनुरागें ॥
सहज सनेह
बिबस रघुराई । पूँछी कुसल निकट बैठाई ॥
त्याने
येऊन दंडवत केला आणि श्रीरामांच्यासमोर भेटी ठेवून मोठ्या प्रेमाने तो प्रभूंना
पाहू लागला. श्रीरामांनी स्वाभाविक प्रेमाने निषादराजाला आपल्याजवळ बसवून घेऊन
खुशाली विचारली. ॥ २ ॥
नाथ कुसल पद
पंकज देखें । भयउँ भागभाजन जन लेखें ॥
देव धरनि
धनु धामु तुम्हारा । मैं जनु नीचु सहित परिवारा ॥
गुह
म्हणाला, ‘ हे नाथ, तुमच्या चरणांच्या दर्शनानेच सर्व कुशल आहे. आज माझी गणना
भाग्यवान पुरुषांमध्ये होत आहे. हे देवा, माझी जमीन, धन आणि घर हे सर्व तुमचेच
आहे. मी सहकुटुंब तुमचा तुच्छ सेवक आहे. ॥ ३ ॥
कृपा करिअ
पुर धारिअ पाऊ । थापिय जनु सबु लोगु सिहाऊ ॥
कहेहु सत्य
सबु सखा सुजाना । मोहि दीन्ह पितु आयसु आना ॥
आता
कृपा करुन माझ्या शृंगवरपुरात येऊन, या दासाची प्रतिष्ठा वाढवा. त्यामुळे सर्वजण
माझ्या भाग्याची प्रशंसा करु लागतील. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे सज्जन मित्रा ! तू
म्हणतोस ते सर्व खरे आहे, परंतु वडिलांनी मला वेगळीच आज्ञा दिलेली आहे. ॥ ४ ॥
दोहा—बरष
चारिदस बासु बन मुनि ब्रत बेषु अहारु ।
ग्राम बासु
नहिं उचित सुनि गुहहि भयउ दुखु भारु ॥ ८८ ॥
त्यानुसार
मला चौदा वर्षे मुनिव्रत व मुनिवेष धारण करुन मुनींच्यासारखा आहार करुन वनात
राहायचे आहे. गावामध्ये राहाणे योग्य नव्हे. ‘ हे ऐकून गुहाला मोठे दुःख झाले. ॥
८८ ॥
राम लखन सीय
रुप निहारी । कहहिं सप्रेम ग्राम नर नारी ॥
ते पितु
मातु कहहु सखि कैसे । जिन्ह पठए बन बालक ऐसे ॥
श्रीराम,
लश्र्मण व सीता यांची रुपे पाहून गावातील लोक प्रेमाने चर्चा करु लागले. कोणी
म्हणत होता की, ‘ हे सखी, ज्यांनी या सुकुमार बालकांना वनात धाडले, ते माता-पिता
आहेत तरी कसले ?’ ॥ १ ॥
एक कहहिं भल
भूपति कीन्हा । लोयन लाहु हमहि बिधि दीन्हा ॥
तब निषादपति
उर अनुमाना । तरु सिंसुपा मनोहर जाना ॥
कोणी
म्हणत होता, राजांनी चांगले केले. या निमित्ताने ब्रह्मदेवाने आमच्या डोळ्यांचे
पारणे फेडले. ‘ निषादराजाने मनात विचार केला की, अशोकवृक्षाखाली यांना राहाण्यास
योग्य जागा आहे. ॥ २ ॥
लै रघुनाथहि
ठाउँ देखावा । कहेउ राम सब भॉंति सुहावा ॥
पुरजन करि
जोहारु घर आए । रघुबर संध्या करन सिधाए ॥
त्याने
श्रीरघुनाथांना नेऊन ती जागा दाखविली. श्रीरामांनी ती पाहून म्हटले की, ही जागा
सर्वप्रकारे छान आहे. पुरवासी लोक त्यांना वंदन करुन घरी परतले आणि श्रीराम
संध्या-वंदन करण्यास गेले. ॥ ३ ॥
गुहँ सँवारि
सॉंथरी डसाई । कुस किसलयमय मृदुल सुहाई ॥
सुचि फल मूल
मधुर मृदु जानी । दोना भरि भरि राखेसि पानी ॥
गुहाने यावेळी कुश व कोमल पानांची कोमल आणि सुंदर
पथारी पसरली. आणि पवित्र, मधुर व कोमल अशी
फळे, कंदमुळे व पाणी आणून ठेवले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment