दोहा—भरत तीसरे पहर कहँ
कीन्ह प्रबेसु प्रयाग ।
कहत राम सिय राम सिय
उमगि उमगि अनुराग ॥ २०३ ॥
प्रेमाच्या उत्साहात
‘ सीताराम, सीताराम ‘ असे म्हणत भरताने तिसर्या प्रहरी प्रयाग क्षेत्रात प्रवेश
केला. ॥ २०३ ॥
झलका झलकत पायन्ह कैसें
। पंकज कोस ओस कन जैसें ॥
भरत पयादेहिं आए आजू ।
भयउ दुखित सुनि सकल समाजू ॥
त्याच्या तलपायावर
फोड आलेले होते, ते कमळाच्या कळीवरील दवबिंदूप्रमाणे वाटत होते. भरत आज पायींच
चालत आला, ते ऐकून सर्व परिवार दुःखी झाला. ॥ १ ॥
खबरि लीन्ह सब लोग नहाए
। कीन्ह प्रनामु त्रिबेनिहिं आए ॥
सबिधि सितासित नीर नहाने
। दिए दान महिसुर सनमाने ॥
सर्वांनी स्नान
केल्याचे समजल्यावर भरताने त्रिवेणी संगमावर जाऊन प्रणाम केला. नंतर विधिपूर्वक
गंगा-यमुनेच्या पांढर्या काळ्या जलामध्ये स्नान केले आणि दान देऊन ब्राह्मणांचा
सन्मान केला. ॥ २ ॥
देखत स्यामल धवल हलोरे ।
पुलकि सरीर भरत कर जोरे ॥
सकल कामप्रद तीरथराऊ ।
बेद बिदित जग प्रगट प्रभाऊ ॥
गंगा-यमुनेच्या त्या
श्वेत-श्याम लहरी पाहून भरत पुलकित झाला आणि दोन्ही हात जोडून म्हणाला, ‘ हे
तीर्थराज, तुम्ही सर्व कामना पूर्ण करणारे आहात. तुमचा महिमा वेदांमध्ये प्रसिद्ध
आहे आणि जगाला तो प्रत्यक्ष आहे. ॥ ३ ॥
मागउँ भीख त्यागि निज
धरमू । आरत काह न करइ कुकरमू ॥
अस जियँ जानि सुजान
सुदानी । सफल करहिं जग जाचक बानी ॥
मी स्वतःचा याचना न
करण्याचा क्षत्रियधर्म सोडून तुमच्यासमोर भीक मागतो. आर्त झाल्यावर मनुष्य कोणते
कुकर्म करीत नाही ? मनात असा विचार करुन सुजाण व उत्तम दानशूर, जगात याचना करणार्या
याचकाला मागेल ते देतात. ॥ ४ ॥
दोहा—अरथ न धरम न काम
रुचि गति चहउँ निरबान ।
जनम जनम रति राम पद यह
बरदानु न आन ॥ २०४ ॥
मला काही अर्थाची
इच्छा नाही, धर्माची नाही, कामाची नाही आणि मोक्षाचीही नाही. जन्मोजन्मी
श्रीरामांच्या चरणी माझे प्रेम राहो, एवढेच वरदान मी मागतो; दुसरे काही नाही. ॥
२०४ ॥
जानहुँ रामु कुटिल करि
मोही । लोग कहउ गुर साहिब द्रोही ॥
सीता राम चरन रति मोरें
। अनुदिन बढ़उ अनुग्रह तोरें ॥
प्रत्यक्ष राम हवे
तर मला कुटिल समजोत आणि लोक मला खुशाल गुरुद्रोही व स्वामिद्रोही म्हणोत. परंतु
तुमच्या कृपेने श्रीसीता-रामांच्या चरणी माझे प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत
राहो. ॥ १ ॥
जलदु जनम भरि सुरति
बिसारउ । जाचत जलु पबि पाहन डारउ ॥
चातकु रटनि घटें घटि जाई
। बढ़ें प्रेमु सब भॉंति भलाई ॥
मेघाने हवे तर
चातकाची वर्षभर दखल घेतली नाही आणि त्याने पाणी मागीतल्यावर वज्र व गारा यांचा
वर्षाव केला आणि चातकाची पाण्यासाठी चाललेली ओरड रोडावली, तर मेघाचीच प्रतिष्ठा
जाईल. चातकाचे मेघाविषयी प्रेम वाढण्यातच त्याचा चांगुलपणा आहे. ॥ २ ॥
कनकहिं बान चढ़इ जिमि
दाहें । तिमि प्रियतम पद नेम निबाहें ॥
भरत बचन सुनि माझ
त्रिबेनी । भइ मृदु बानि सुमंगल देनी ॥
ज्याप्रमाणे सोने
तापवल्यावर त्याला झळाळी येते, त्याप्रमाणे प्रियतमाच्या चरणीं असलेल्या प्रेमाचा
नेम राखण्यातच प्रेमी सेवकाचा गौरव वाढतो. ‘भरताने बोलणे ऐकून त्रिवेणी संगमामधून
सुंदर मांगल्य देणारी कोमल वाणी प्रकटली. ॥ ३ ॥
तात भरत तुम्ह सब बिधि
साधू । राम चरन अनुराग अगाधू ॥
बादि गलानि करहु मन
माहीं । तुम्ह सम रामहि कोउ प्रिय नाहीं ॥
‘ हे भरता ! तू
पूर्णपणे साधू आहेस. श्रीरामचंद्रांच्या चरणी तुझे अथांग प्रेम आहे. तू मनात
विनाकारण उदास होत आहेस. श्रीरामांना तुझ्याइतका प्रिय कोणी नाही. ‘ ॥ ४ ॥
दोहा—तनु पुलकेउ हियँ
हरषु सुनि बेनि बचन अनुकूल ।
भरत धन्य कहि धन्य सुर
हरषित बरषहिं फूल ॥ २०५ ॥
त्रिवेणीचे अनुकूल
वचन ऐकून भरताचे शरीर पुलकित झाले. मनात हर्ष दाटला. ‘ भरत धन्य आहे, धन्य आहे ‘
असे म्हणत देव आनंदाने फुले उधळू लागले. ॥ २०५ ॥
प्रमुदित तीरथराज निवासी
। बैखानस बटु गृही उदासी ॥
कहहिं परसपर मिलि दस
पॉंचा । भरत सनेहु सीलु सुचि सॉंचा ॥
तीर्थराज
प्रयागमध्ये राहाणारे वानप्रस्थी, ब्रह्मचारी, गृहस्थ आणि विरक्त संन्यासी हे सर्व
आनंदित झाले आणि दहा-पाचाच्या गटाने जमून परस्पर म्हणू लागले की, ‘ भरताचे प्रेम व
स्वभाव हे पवित्र आणि खरे आहेत.’ ॥ १ ॥
सुनत राम गुन ग्राम
सुहाए । भरद्वाज मुनिबर पहिं आए ॥
दंड प्रनामु करत मुनि
देखे । मूरतिमंत भाग्य निज लेखे ॥
श्रीरामचंद्रांचे
सुंदर गुण समुच्चय ऐकत भरत भरद्वाज मुनींच्याकडे आला. तो दंडवत करीत असलेला पाहून
मुनींना आपले सद्भाग्य साकार झाल्याचे वाटले. ॥ २ ॥
धाइ उठाइ लाइ उर लीन्हे
। दीन्हि असीस कृतारथ कीन्हे ॥
आसनु दीन्ह नाइ सिरु
बैठे । चहत सकुच गृहँ जनु भजि पैठे ॥
त्यांनी धावत जाऊन
भरताला उठवले आणि हृदयाशी धरले. तसेच आशीर्वाद देऊन कृतार्थ केले. मुनींनी त्याला
आसन दिले. भरत मस्तक खाली घालून असा बसला की, जणू पळून जाऊन संकोचाच्या घरात
घुसावेसे त्याला वाटत होते. ॥ ३ ॥
मुनि पूँछब कछु यह बड़
सोचू । बोले रिषि लखि सीलु सँकोचू ॥
सुनहु भरत हम सब सुधि
पाई । बिधि करतब पर किछु न बसाई ॥
त्याच्या मनाला
काळजी वाटत होती की मुनींनी काही विचारले, तर काय उत्तर द्यावे ? भरताचे वर्तन व
संकोच पाहून ऋषी म्हणाले, ‘ भरता, आम्हांला सर्व वार्ता समजली आहे. विधात्याच्या
करणीपुढे कुणाचे काही चालत नाही. ॥ ४ ॥
दोहा—तुम्ह गलानि जियँ जनि
करहु समुझि मातु करतूति ।
तात कैकाइहि दोसु नहिं
गई गिरा मति धूति ॥ २०६ ॥
मातेच्या कृत्याची
आठवण करुन तू मनात खेद करु नकोस. हे कुमार, कैकयीकडे कोणताही दोष नाही. तिची
बुद्धी सरस्वतीने बिघडून टाकली होती. ॥ २०६ ॥
यहउ कहत भल कहिहि न कोऊ
। लोकु बेदु बुध संमत दोऊ ॥
तात तुम्हार बिमल जसु
गाई । पाइहि लोकउ बेदु बड़ाई ॥
म्हणून सरस्वती दोषी
आहे, असे म्हणणेही बरोबर नाही. कारण तिला देवांनी प्रेरित केले. लोकमतानुसार
कैकेयी दोषी आहे. लोकमत व वेदमत हे विद्वानांनाही मान्य आहे. परंतु कुमार ! तुझी
मात्र निर्मळ कीर्ती गाऊन लोक व वेद या दोघांनाही गौरव मिळेल. ॥ १ ॥
लोक बेद संमत सबु कहई ।
जेहि पितु देइ राजु सो लहई ॥
राउ सत्यब्रत तुम्हहि
बोलाई । देत राजु सुखु धरमु बड़ाई ॥
लोक व वेद यांना हे
मान्य आहे आणि सर्वजण असे म्हणतात की, पिता ज्याला राज्य देतो, त्यालाच ते मिळते.
राजा दशरथ सत्यव्रती होते. त्यांनी तुला बोलावून राज्य दिले असते, तर सुख मिळाले
असते, धर्माचे पालन झाले असते आणि मोठेपणा मिळाला असता. ॥ २ ॥
राम गवनु बन अनरथ मूला ।
जो सुनि सकल बिस्व भइ सूला ॥
सो भावी बस रानि अयानी ।
करि कुचालि अंतहुँ पछितानी ॥
सार्या अनर्थांचे
मूळ म्हणजे श्रीरामचंद्रांचे वनगमन, त्याची वार्ता ऐकून संपूर्ण जगाला दुःख झाले.
ते श्रीरामांचे वनगमनसुद्धा भवितव्यामुळे घडले आणि भवितव्याच्या अधीन झाल्यामुळे
दुर्वर्तन करुन कैकेयी शेवटी पश्र्चात्ताप पावली. ॥ ३ ॥
तहँउँ तुम्हार अलप
अपराधू । कहै सो अधम अयान असाधू ॥
करतेहु राजु त तुम्हहि न
दोषू । रामहि होत सुनत संतोषू ॥
त्यात तुझा
थोडासासुद्धा अपराध आहे, असे कोणी म्हणेल, तर तो अधम, अज्ञानी व असाधू होय. जर तू
राज्य केले असतेस, तरी तुला दोष येत नव्हता. ते ऐकून श्रीरामांनाही समाधानच झाले
असते. ॥ ४ ॥
दोहा—अब अति कीन्हेहु
भरत तुम्हहि उचित मत एहु ।
सकल सुमंगल मूल जग रघुबर
चरन सनेहु ॥ २०७ ॥
हे भरता, आता तर तू
फार चांगले केलेस. तुझ्यासाठी हाच विचार योग्य होता. श्रीरामांच्या चरणी प्रेम
असणे हेच जगात सर्व मांगल्याचे मूळ आहे. ॥ २०७ ॥
सो तुम्हार धनु जीवनु
प्नाना । भूरिभाग को तुम्हहि समाना ॥
यह तुम्हार आचरजु न ताता
। दसरथ सुअन राम प्रिय भ्राता ॥
ते श्रीरामांच्या
चरणीचे प्रेम हे तर तुझे धन, जीवन व प्राण आहे. तुझ्यासारखा भाग्यशाली कोण आहे ?
कुमार ! तुझ्यासाठी ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण तू दशरथांचा पुत्र व
श्रीरामचंद्रांचा आवडता भाऊ आहेस. ॥ १ ॥
सुनहु भरत रघुबर मन
माहीं । पेम पात्रु तुम्ह सम कोउ नाहीं ॥
लखन राम सीतहि अति
प्रीती । निसि सब तुम्हहि सराहत बीती ॥
हे भरता, ऐक.
श्रीरामचंद्रांच्या मनातही तुझ्यासारखा प्रेमापात्र दुसरा कोणीही नाही. लक्ष्मण,
श्रीराम व सीता या तिघांची सर्व रात्र त्या दिवशी अत्यंत प्रेमाने तुझी प्रशंसा
करण्यातच निघून गेली. ॥ २ ॥
जाना मरमु नहात प्रयागा
। मगन होहिं तुम्हरें अनुरागा ॥
तुम्ह पर अस सनेहु रघुबर
कें । सुख जीवन जग जस जड़ नर कें ॥
प्रयागराजामध्ये
जेव्हा ते स्नान करीत होते, त्यावेळी मला त्यांचे रहस्य समजले. ते तुझ्या प्रेमात
मग्न झाले होते. तुझ्यावर श्रीरामांचे इतके अगाध प्रेम आहे की, विषयासक्त
मनुष्याचे जगातील सुखमय जीवनावर असते तसे. ॥ ३ ॥
यह न अधिक रघुबीर बड़ाई ।
प्रनत कुटुंब पाल रघुराई ॥
तुम्ह तौ भरत मोर मत एहू
। धरें देह जनु राम सनेहू ॥
ही काही श्रीरघुनाथांची
फार मोठी थोरवी नव्हे. कारण श्रीरघुनाथ तर शरणागताच्या संपूर्ण कुटुंबाचे
पालनकर्ते आहेत. हे भरता, माझ्या मते तू तर जणू श्रीरामांचे शरीरधारी प्रेमच आहेस.
॥ ४ ॥
दोहा—तुम्ह कहँ भरत कलंक
यह हम सब कहँ उपदेसु ।
राम भगति रस सिद्धि हित
भा यह समउ गनेसु ॥ २०८ ॥
हे भरता, तुझ्या
दृष्टीने हा कलंक आहे, परंतु आम्हा सर्वांसाठी हा उपदेश आहे. श्रीरामभक्तिरुपी
रसाच्या सिद्धिसाठी ही वेळ फार शुभ आहे. ॥ २०८ ॥
नव बिधु बिमल तात जसु
तोरा । रघुबर किंकर कुमुद चकोरा ॥
उदित सदा अँथइहि कबहूँ
ना । घटिहि न जग नभ दिन दिन दूना ॥
कुमारा ! तुझी
कीर्ती ही निर्मल नवचंद्रमा आहे आणि श्रीरामचंद्रांचे दास हे कुमुद व चकोर आहेत.
चंद्रमा नेहमी कमीजास्त होत असतो. त्यामुळे कुमुद आणि चकोर यांना दुःख होते, परंतु
तुझा कीर्तिरुपी चंद्रमा हा नित्य पूर्ण राहील, कधी कमी होणारच नाही. जग-रुपी
आकाशात तो कधी घटणार नाही, तर दिवसेंदिवस द्विगुणित होत राहील. ॥ १ ॥
कोक तिलोक प्रीति अति
करिही । प्रभु प्रताप रबि छबिहि न हरिही ॥
निसि दिन सुखद सदा सब
काहू । ग्रसिहि न कैकइ करतबु राहू ॥
त्रैलोक्यरुपी
चक्रवाक या कीर्ति-चंद्रावर अत्यंत प्रेम करील आणि श्रीरामचंद्रांचा प्रताप-सूर्य
याची शोभा कधी हरण करु शकणार नाही. तुझ्या कीर्तीचा हा चंद्र रात्रंदिवस नेहमी
सर्वांना सुख देत राहील. कैकेयीचा कुकर्मरुपी राहू याला कधी ग्रासणार नाही. ॥ २ ॥
पूरन राम सुपेम पियूषा ।
गुर अवमान दोष नहिं दूषा ॥
रामभगत अब अमिअँ अघाहूँ
। कीन्हेहु सुलभ सुधा बसुधाहूँ ॥
हा चंद्र
श्रीरामचंद्रांच्या सुंदर प्रेमरुपी अमृताने भरलेला आहे. हा गुरुच्या अपमानरुपी
दोषाने दूषित नाही. तू हा कीर्तिरुपी चंद्र निर्माण करुन पृथ्वीवरही अमृत सुलभ
केलेले आहेस. आता श्रीरामांचे भक्त या अमृताने तृप्त होवोत. ॥ ३ ॥
भूप भगीरथ सुरसरि आनी ।
सुमिरत सकल सुमंगल खानी ॥
दसरथ गुन गन बरनि न
जाहीं । अधिकु कहा जेहि सम जग नाहीं ॥
ज्या गंगेचे फक्त स्मरणच संपूर्ण मांगल्याची खाण आहे,
ती गंगा तुझ्या पूर्वजाने भगीरथाने आणली. दशरथांच्या
गुणराशींचे तर वर्णनच करता येत नाही. त्यांच्याहून श्रेष्ठ
इतकेच काय, त्यांच्या बरोबरीचाही या जगात कोणी
नाही. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment