ShriRamCharitManas
दोहा—संपति चकई भरतु चक
मुनि आयस खेलवार ।
तेहि निसि आश्रम पिंजरॉं
राखे भा भिनुसार ॥ २१५ ॥
ती भोग-विलासाची
सामग्री चकवी होती आणि भरत हा चक्रवाक. मुनींची आज्ञा हा खेळ होता. त्या खेळात
त्या रात्री आक्षमरुपी पिंजर्यात दोघांना बंदिस्त केले होते. ( चक्रवाक पक्षी व
पक्षिणी यांचा रात्रीच्यावेळी संयोग होत नाही. त्याप्रमाणे मुनींच्या आज्ञेने
भोग-पदार्थ उपलब्ध होते, परंतु भरत मनानेसुद्धा त्याला शिवला नाही. ) ॥ २१५ ॥
मासपारायण, एकोणिसावा
विश्राम
कीन्ह निमज्जनु तीरथराजा
। नाइ मुनिहि सिरु सहित समाजा ॥
रिषि आयसु असीस सिर राखी
। करि दंडवत बिनय बहु भाषी ॥
प्रातःकाळी भरताने
तीर्थराजामध्ये स्नान केले आणि सर्व परिवारासह मुनींपुढे नतमस्तक होऊन त्यांची
आज्ञा आणि आशीर्वाद मिळविला. नंतर त्यांना दंडवत करुन नम्रतापूर्वक त्यांचा निरोप
घेतला. ॥ १ ॥
पथ गति कुसल साथ सब
लीन्हें । चले चित्रकूटहिं चितु दीन्हें ॥
रामसखा कर दीन्हें लागू
। चलत देह धरि जनु अनुरागू ॥
त्यानंतर मार्ग
माहीत असलेल्या लोकांबरोबर सर्व लोकांना घेऊन भरत चित्तामध्ये चित्रकूटाचे ध्यान
करीत निघाला. तो रामसखा गुहाच्या हातात हात घालून असा चालला होता की, जणू
प्रत्यक्ष श्रीरामप्रेमच साकार झाले होते. ॥ २ ॥
नहिं पद त्रान सीस नहिं
छाया । पेमु नेमु ब्रतु धरमु अमाया ॥
लखन राम सिय पंथ कहानी ।
पूँछत सखहि कहत मृदु बानी ॥
त्याच्या पायांत
जोडे नव्हते आणि डोक्यावर छत्र नव्हते. त्याचे प्रेम, नियम, व्रत व धर्म निष्कपट
होते. तो निषादराजाला लक्ष्मण, श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या प्रवासाविषयी कोमल
वाणीने विचारत होता. ॥ ३ ॥
राम बास थल बिटप बिलोकें
। उर अनुराग रहत नहिं रोकें ॥
देखि दसा सुर बरिसहिं
फूला । भइ मृदु महि मगु मंगल मूला ॥
श्रीरामांच्या
उतरण्याच्या जागा आणि तेथील वृक्ष पाहून त्याच्या हृदयातील प्रेम आवरत नव्हते.
भरताची ती दशा पाहून देव फुले उधळू लागले. पृथ्वी कोमल बनली आणि मार्ग मांगल्याचे
मूळ बनला. ॥ ४ ॥
दोहा—किएँ जाहिं छाया
जलद सुखद बहइ बर बात ।
तस मगु भयउ न राम कहँ जस
भा भरतहि जात ॥ २१६ ॥
मेघ सावली धरीत
होते, सुखद वारा वाहात होता. भरत जात होता त्यावेळी मार्ग असा सुखदायक झाला की,
तसा श्रीरामचंद्रांसाठीही झाला नव्हता. ॥ २१६ ॥
जड़ चेतन मग जीव घनेरे ।
जे चितए प्रभु जिन्ह प्रभु हेरे ॥
ते सब भए परम पद जोगू ।
भरत दरस मेटा भव रोगू ॥
वाटेत असंख्य
जड-चेतन जीव होते. त्यांपैकी ज्यांना श्रीरामांनी कृपा-दृष्टीने पाहिले किंवा
ज्यांनी प्रभु श्रीरामांना पाहिले, ते सर्व तत्क्षणी परमपदाचे अधिकारी झाले. परंतु
आता भरताच्या दर्शनामुळे त्यांचा जन्म-मरणरुपी भव-रोगच नाहींसा झाला. ॥ १ ॥
यह बड़ि बात भरत कइ नाहीं
। सुमिरत जिनहि रामु मन माहीं ॥
बारक राम कहत जग जेऊ ।
होत तरन तारन नर तेऊ ॥
भरताकरता ही काही
फार मोठी गोष्ट नव्हती. कारण प्रत्यक्ष श्रीराम त्याचे आपल्या मनात सदा स्मरण करीत
होते. जगामध्ये जे मनुष्य एकदा ‘ राम ‘ म्हणतात, ते सुद्धा तरुन जाणारे व तारुन
नेणारे होत असतात. ॥ २ ॥
भरतु राम प्रिय पुनि लघु
भ्राता । कस न होइ मगु मंगलदाता ॥
सिद्ध साधु मुनिबर अस
कहहीं । भरतहि निरखि हरषु हियँ लहहीं ॥
शिवाय, भरत हा तर
श्रीरामचंद्रांचा प्रिय असा धाकटा भाऊ होता. मग त्याच्यासाठी मार्ग सुखदायक का बरे
होणार नाही ? असे सिद्ध, साधू आणि श्रेष्ठ मुनी म्हणत होते आणि भरताला पाहून
मनातून आनंदित होत होते. ॥ ३ ॥
देखि प्रभाउ सुरेसहि सोचू
। जगु भल भलेहि पोच कहुँ पोचू ॥
गुर सन कहेउ करिअ प्रभु
सोई । रामहि भरतहि भेट न होई ॥
भरताचे हे प्रेम
पाहून इंद्र कालजीत पडला. ( आता याच्या प्रेमाला वश होऊन श्रीराम परत न जावोत व
आमच्या कार्याला विघ्न न येवो, म्हणजे झाले. ) जग चांगल्यासाठी चांगले व वाईटासाठी
वाईट असते. इंद्राने गुरु बृहस्पतींना म्हटले की, ‘ हे प्रभो, श्रीरामचंद्र व भरत
यांची भेट होऊ नये असा उपाय करा. ॥ ४ ॥
दोहा—रामु सँकोची प्रेम
बस भरत सपेम पयोधि ।
बनी बात बेगरन चहति करिअ
जतनु छलु सोधि ॥ २१७ ॥
श्रीरामचंद्र भिडस्त
आणि प्रेमाला भुलणारे आहेत आणि भरत तर प्रेमाचा समुद्र आहे. सगळे जुळून आलेले
विस्कटू पाहात आहेत. म्हणून काहीतरी कपटी युक्ती शोधून यावर उपाय करा. ॥ २१७ ॥
बचन सुनत सुरगुरु
मुसुकाने । सहसनयन बिनु लोचन जाने ॥
मयापति सेवक सन माया ।
करइ त उलटि परइ सुरराया ॥
इंद्राचे बोलणे
ऐकताच देवगुरु बृहस्पतींना हसू आले. त्यांना तो हजार डोळ्यांचा ( पण ज्ञान नेत्र
नसल्यामुळे ) नेत्ररहित ( मूर्ख ) वाटला. ते म्हणाले, ‘ हे देवराज, मायेचे स्वामी
असलेल्या श्रीरामचंद्रांच्या सेवकावर जर कुणी माया केली, तर ती उलटून त्याच्यावरच
पडते. ॥ १ ॥
तब किछु कीन्ह राम रुख
जानी । अब कुचालि करि होइहि हानी ॥
सुनु सुरेस रघुनाथ सुभाऊ
। निज अपराध रिसाहिं न काऊ ॥
मागील वेळी
श्रीरामांचा रोख पाहूनच वनवासाला जाण्याचे कारस्थान रचले होते. परंतु यावेळी दुष्ट
चाल खेळल्यास हानीच होईल. हे देवराज, श्रीरामांचा स्वभाव ऐका. ते स्वतःवर केलेल्या
अपराधामुळे कधी रागावत नाहीत. ॥ २ ॥
जो अपराधु भगत कर करई ।
राम रोष पावक सो जरई ॥
लोकहुँ बेद बिदित
इतिहासा । यह महिमा जानहिं दुरबासा ॥
परंतु कुणी
त्यांच्या भक्ताचा अपराध केला, तर मात्र श्रीराम क्रोधाग्नीने भडकतात. लोक व वेद
यांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. हा महिमा दुर्वासांना माहीत आहे. ॥ ३ ॥
भरत सरिस को राम सनेही ।
जगु जप राम रामु जप जेही ॥
सारे जग श्रीरामांचा
जप करोत, परंतु श्रीराम स्वतः ज्याचा जप करतात, त्या भरतासारखा श्रीरामांचा भक्त
कोण असणार ? ॥ ४ ॥
दोहा—मनहुँ न आनाअ
अमरपति रघुबर भगत अकाजु ।
अजसु लोक परलोक दुख दिन
दिन सोक समाजु ॥ २१८ ॥
म्हणून हे देवराज,
रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांच्या भक्ताच्या कार्यात विघ्न आणायचे मनातसुद्धा आणू नका.
असे केल्याने या लोकी अपकीर्ती आणि परलोकी दुःख मिळेल आणि शोकाची कारणे दिवसेंदिवस
वाढतच जातील. ॥ २१८ ॥
सुनु सुरेस उपदेसु हमारा
। रामहि सेवकु परम पिआरा ॥
मानत सुखु सेवक सेवकाईं
। सेवक बैर बैरु अधिकाईं ॥
हे देवराज, आमचा
उपदेश ऐका. श्रीरामांना आपला सेवक अत्यंत प्रिय असतो. त्यांना आपल्या सेवकाच्या
सेवेमध्ये सुख वाटते आणि सेवकाबरोबर वैर केल्यास ते फार मोठे शत्रुत्व मानतात. ॥ १
॥
जद्यपि सम नहिं राग न
रोषू । गहहिं न पाप पूनु गुन दोषू ॥
करम प्रधान बिस्व करि
राखा । जो जस करइ सो तस फलु चाखा ॥
जरी ते सम आहेत.
त्यांच्यामध्ये आसक्ती नाही व रोषही नाही आणि ते कुणाचे पाप-पुण्य आणि गुण-दोषही
ग्रहण करीत नाहीत, त्यांनी विश्वामध्ये कर्मालाच प्राधान्य दिले आहे, जो जसे कर्म
करतो, त्याला तसेच फळ भोगावे लागते. ॥ २ ॥
तदपि करहिं सम बिषम
बिहारा । भगत अभगत हृदय अनुसारा ॥
अगुन अलेप अमान एकरस ।
रामु सगुन भए भगत पेम बस ॥
तथापि ते भक्त व
अभक्ताच्या भावनेप्रमाणे सम व विषम व्यवहार करतात. ( भक्ताला आलिंगन देतील, तर
अभक्ताला ठार मारुन त्याला तारुन नेतील. ) गुणरहित, निर्लेप, मानरहित आणि सदा एकरस
असलेले भगवान श्रीराम भक्ताच्या प्रेमामुळेच सगुण झालेले आहेत. ॥ ३ ॥
राम सदा सेवक रुचि राखी
। बेद पुरान साधु सुर साखी ॥
अस जियँ जानि तजहु
कुटिलाई । करहु भरत पद प्रीति सुहाई ॥
श्रीरामांना नेहमी
आपले भक्त आवडतात. वेद, पुराणे, साधू आणि देव हे यासाठी साक्षीला आहेत. असे जाणून
कपट सोडून भरताच्या चरणी मनापासून प्रेम बाळगा. ॥ ४ ॥
दोहा—राम भगत परहित निरत
पर दुख दुखी दयाल ।
भगत सिरोमनि भरत तें जनि
डरपहु सुरपाल ॥ २१९ ॥
हे देवराज इंद्रा,
श्रीरामचंद्रांचे भक्त नेहमी दुसर्याचे हित करण्यात मग्न असतात. ते दुसर्यांच्या
दुःखाने दुःखी व दयाळू असतात. त्यात भरत हा तर भक्तशिरोमणि आहे. याला मुळीच घाबरु
नका. ॥ २१९ ॥
सत्यसंघ प्रभु सुर हितकारी । भरत राम आयस अनुसारी
॥
स्वारथ बिबस बिकल तुम्ह होहू । भरत दोसु नहिं
राउर मोहू ॥
प्रभू श्रीरामचंद्र हे सत्यप्रतिज्ञ व
देवांचे हित करणारे आहेत आणि
भरत हा
श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे वागणारा आहे. तुम्ही विनाकारण स्वार्थाचा विचार करुन
घाबरला आहात. यात भरताचा काही दोष नाही. तुमचा मोहच आहे. ‘ ॥ १ ॥
सुनि सरबर सुरगुर बर
बानी । भा प्रमोदु मन मिटी गुलानी ॥
बरषि प्रसून हरषि सुरराऊ
। लगे सराहन भरत सुभाऊ ॥
देवगुरु
ब्रहस्पतींची हितकर वाणी ऐकून इंद्राला मनापासून आनंद झाला आणि त्याची चिंता
नाहीशी झाली. तेव्हा आनंदाने त्याने पुष्पवर्षाव करुन भरताची प्रशंसा केली. ॥ २ ॥
एहि बिधि भरत चले मग
जाहीं । दरसा देखि मुनि सिद्ध सिहाहीं ॥
जबहिं रामु कहि लेहिं
उससा । उमगत पेमु मनहुँ चहु पासा ॥
अशा प्रकारे भरत
वाटेने चालत होता. त्याची प्रेममय दशा पाहून मुनी व सिद्ध पुरुष यांनासुद्धा हेवा
वाटे.भरत जेव्हा ‘ राम ‘ म्हणत उसासा टाकी, तेव्हा जणू चोहीकडे प्रेम उसळे. ॥ ३ ॥
द्रवहिं बचन सुनि कुलिस
पषाना । पुरजन पेमु न जाइ बखाना
॥
बीच बास करि जमुनहिं आए
। निरखि नीरु लोचन जल छाए ॥
भरताचे प्रेमाचे व
दैन्याचे बोलणे ऐकून वज्र व पाषाणही विरळून जात. अयोध्यावासीयांच्या प्रेमाबद्दल
काय सांगावे ? मध्ये एकदा मुक्काम करुन भरत यमुनातीरावर पोहोचला. यमुनेचे पाणी पाहून
त्याच्या डोळ्यांत पाणी आले. ॥ ४ ॥
दोहा—रघुबर बरन बिलोकि
बर बारि समेत समाज ।
होत मगन बारिधि बिरह चढ़े
बिबेक जहाज ॥ २२० ॥
श्रीरामांच्या
सावळ्या रंगाप्रमाणे असलेले यमुनेचे श्यामल जळ पाहून भरत व सर्व परिवार
प्रेमविव्हल होऊन विरहरुपी समुद्रात बुडुन जात असताना ते विवेकरुपी जहाजावर चढले.
( विरहव्यथेमध्ये बुडत असताना आपण लवकर जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेऊ, या विचाराने ते
सर्व उत्साहित झाले. ) ॥ २२० ॥
जमुन तीर तेहि दिन करि
बासू । भयउ समय सम सबहि सुपासू ॥
रातिहिं घाट घाट की तरनी
। आईं अगनित जाहिं न बरनी ॥
त्या दिवशी यमुनेच्या
किनार्यावर त्यांनी मुक्काम केला. प्रसंगानुरुप खाण्या-पिण्याची चांगली व्यवस्था
झाली. निषादराजाच्या इशार्यावर रातोरात सर्व घाटावरील असंख्य नौका तेथे आल्या
होत्या. त्यांचे वर्णनही करणें कठीण. ॥ १ ॥
प्रात पार भए एकहि खेवॉं
। तोषे रामसखा की सेवॉं ॥
चले नहाइ नदिहि सिर नाई
। साथ निषादनाथ दोउ भाई ॥
सकाळी एका फेरीतच
सर्व लोक पलीकडे गेले. ते सर्व श्रीरामांचा मित्र निषादराजाच्या या सेवेमुळे
प्रसन्न झाले. नंतर स्नान करुन व यमुना नदीपुढे नतमस्तक होऊन दोघे भाऊ निषादराजासह
निघाले. ॥ २ ॥
आगें मुनिबर बाहन आछें ।
राजसमाज जाइ सबु पाछें ॥
तेहि पाछें दोउ बंधु
पयादें । भूषन बसन बेष सुठि सादें ॥
पुढील चांगल्या
वाहनांवर श्रेष्ठ मुनी होते. त्यांच्यामागे सर्व राज-परिवार जात होता आणि मागे
दोघे बंधू सामान्य वस्त्राभूषणामध्ये पायी चालत होते. ॥ ३ ॥
सेवक सुहृद सचिवसुत साथा
। सुमिरत लखनु सीय रघुनाथा ॥
जहँ जहँ राम बास
बिश्रामा । तहँ तहँ करहिं सप्रेम प्रनामा ॥
त्याच्यासोबत सेवक, मित्र व मंत्र्यांचे पुत्र होते. लक्ष्मण,
सीता व रघुनाथ यांचे स्मरण करीत ते चालत होते. जिथे
जिथे श्रीरामांनी निवास केला, विश्रांती घेतली, तेथे तेथे ते
प्रेमाने
प्रणाम करीत होते. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment