Tuesday, December 28, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 48 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४८

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 48 
Doha 281 to 286 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४८ 
दोहा २८१ आणि २८६

दोहा—सुनिअ सुधा देखिअहिं गरल सब करतूति कराल ।

जहँ तहँ काक उलूक बक मानस सकृत मराल ॥ २८१ ॥

अमृत हे फक्त ऐकायला मिळते आणि विष सर्वत्र प्रत्यक्ष पाहायला मिळते. विधात्याची सर्व कृत्ये भयंकर आहेत. जिकडे तिकडे कावळे घुबडे आणि बगळेच दिसतात. हंस फक्त मानससरोवरातच असतात.’ ॥ २८१ ॥

सुनि ससोच कह देबि सुमित्रा । बिधि गति बड़िबिपरीत बिचित्रा ॥

जो सृजि पालइ हरइ बहोरी । बालकेलि सम बिधि मति भोरी ॥

हे ऐकून सुमित्रा दुःखाने म्हणाली की, ‘ विधात्याची चाल मोठी विपरीत आणि विचित्र आहे. तो सृष्टी उत्पन्न करुन तिचे पालन करतो आणि मग ती नष्ट करतो. विधात्याची बुद्धी बालकांच्या खेळासारखी अविचारी आहे. ‘ ॥ १ ॥

कौसल्या कह दोसु न काहू । करम बिबस दुख सुख छति लाहू ॥

कठिन करम गति जान बिधाता । जो सुभ असुभ सकल फल दाता ॥

कौसल्या म्हणाली, ‘ दोष कुणाचाही नाही. दुःख-सुख हानी-लाभ या गोष्टी कर्माच्या अधीन असतात. कर्माची गती कठीण असते आणि फक्त विधाताच ती जाणतो. तोच शुभ-अशुभ अशा सर्वांची फळे देणारा आहे. ॥ २ ॥

ईस रजाइ सीस सबही कें । उतपति थिति लय बिषहु अमी कें ॥

देबि मोह बस सोचिअ बादी । बिधि प्रपंचु अस अचल अनादी ॥

ईश्र्वराची आज्ञा सर्वांच्याच डोक्यावर आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय व अमृत आणि विष हे सर्व त्याच्या अधीन आहेत. हे देवी, मोहाने दुःख करणे हे व्यर्थ आहे. विधात्याचा प्रपंच असाच अटळ व अनादी आहे. ॥ ३ ॥

भूपति जिअब मरब उर आनी । सोचिअ सखि लखि निज हित हानी ॥

सीय मातु कह सत्य सुबानी । सुकृती अवधि अवधपति रानी ॥

महाराजांच्या मरण्या-जगण्याची गोष्ट मनात आणून आपण जी चिंता करतो, ती हे सखी, आपण आपल्या हिताची होणारी हानी पाहून स्वार्थामुळे करतो.’ सीतेची माता म्हणाली, ‘ तुमचे म्हणणे योग्य व सत्य आहे. तुम्ही पुण्यात्म्याची परिसीमा असणार्‍या अयोध्यापती महाराज दशरथांच्याच महाराणी आहात, मग असे का म्हणणार नाही ? ‘ ॥ ४ ॥

दोहा—लखनु रामु सिय जाहुँ बन भल परिनाम न पोचु ।

गहबरि हियँ कह कौसिला मोहि भरत कर सोचु ॥ २८२ ॥

कौसल्या दुःखी मनाने म्हणाली की, ‘ श्रीराम, लक्ष्मण, सीता वनात गेल्याने त्याचा परिणाम चांगलाच होईल, वाईट नाही. मला काळजी वाटते भरताची. ॥ २८२ ॥

ईस प्रसाद असीस तुम्हारी । सुत सुतबधू देवसरि बारी ॥

राम सपथ मैं कीन्हि न काऊ । सो करि कहउँ सखी सति भाऊ ॥

ईश्र्वराची कृपा व तुमच्या आशीर्वादामुळे माझे चारी पुत्र व चारी सुना गंगाजलाप्रमाणे पवित्र आहेत. हे सखी, मी कधी श्रीरामाची शपथ घेतली नाही. परंतु आज मी रामाची शपथ घेऊन सत्य भावनेने सांगतो की, ॥ १ ॥

भरत सील गुन बिनय बड़ाई । भायप भगति भरोसा भलाई ॥

कहत सारदहु कर मति हीचे । सागर सीप कि जाहिं उलीचे ॥

भरताचे शील, गुण, नम्रता, मोठेपणा, बंधुत्व, भक्ती, विश्र्वास आणि चांगुलपणा यांचे वर्णन करण्यास सरस्वतीसुद्धा धजावत नाही. शिंपल्याने कधी समुद्र उपसता येईल काय ? ॥ २ ॥

जानउँ सदा भरत कुलदीपा । बार बार मोहि कहेउ महीपा ॥

कसें कनकु मनि पारिखि पाएँ । पुरुष परिखिअहिंसमयँ सुभाएँ ॥

मी भरताला नेहमी कुलदीपक म्हणून मानते. महाराजांनी मला वेळोवेळी असेच सांगितले होते. सोने हे कस लावल्यावर व रत्न हे पारखी मिळाल्यावरच ओळखता येते. त्याप्रमाणे पुरुषाची परीक्षा वेळ आल्यावर त्याच्या स्वभावावरुन होते. ॥ ३ ॥

अनुचित आजु कहब अस मोरा । सोक सनेहँ सयानप थोरा ॥

सुनि सुरसरि सम पावनि बानी । भईं सनेह बिकल सब रानी ॥

परंतु आज मी असे म्हणणे योग्य नव्हे. शोक आणि स्नेहामध्ये शहाणपण कमी होतो. लोक म्हणतील की, मी प्रेमामुळे भरताची वाखाणणी करीत आहे ?’ कौसल्येची गंगेसारखी पवित्र वाणी ऐकून सर्व राण्या प्रेमामुळे व्याकुळ झाल्या. ॥ ४ ॥

दोहा—कौसल्या कह धीर धरि सुनहु देबि मिथिलेसि ।

को बिबेकनिधि बल्लभहि तुम्हहि सकइ उपदेसि ॥ २८३ ॥

कौसल्या धीर धरुन पुन्हा म्हणाली, ‘ हे देवी मिथिलेश्वरी ! ज्ञानाचे भांडार असलेल्या श्रीजनकांची पत्नी असलेल्या तुम्हांला कोण उपदेश करु शकेल ? ॥ २८३ ॥

नि राय सन अवसरु पाई । अपनी भॉंति कहब समुझाई ॥

रखिअहिं लखनु भरतु गवनहिं बन । जौं यह मत मानै महीप मन ॥

हे राणी, सवड सापडताच तुम्ही राजांना आपल्याकडून जेवढे समजावून सांगता येईल तेवढे सांगा की, लक्ष्मणाला घरी ठेवून घ्यावे व भरताने वनात जावे. जर ही गोष्ट राजांना पटली तर, ॥ १ ॥

तौ भल जतनु करब सुबिचारी । मोरें सोचु भरत कर भारी ॥

गूढ़ सनेह भरत मन माहीं । रहें नीक मोहि लागत नाहीं ॥

चांगल्या प्रकारे विचार करुन असा प्रयत्न करा. मला भरताची मोठी काळजी वाटते. भरताच्या मनात गूढ प्रेम आहे. त्याने घरी राहण्यामध्ये मला भले वाटत नाही. त्याच्या जिवाची भीती वाटते. ‘ ॥ २ ॥

लखि सुभाउ सुनि सरल सुबानी । सब भइ मगन करुन रस रानी ॥

नभ प्रसून झरि धन्य धन्य धुनि । सिथिल सनेहँ सिद्ध जोगी मुनि ॥

कौसल्येचा स्वभाव बघून आणि तिचा सरळपणा व उत्तम वाणी ऐकून सर्व राण्या करुणरसात बुडून गेल्या. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि ‘ धन्य, धन्य ‘ ध्वनी होऊ लागला. सिद्ध, योगी आणि मुनी प्रेमामुळे गलितगात्र झाले. ॥ ३ ॥

सबु रनिवासु बिथकि लखि रहेऊ । तब धरि धीर सुमित्रॉं कहेऊ ॥

देबि दंड जुग जामिनि बीती । राम मातु सुनि उठी सप्रीती ॥

हे पाहून सारा राणीवसा निस्तब्ध झाला. तेव्हा सुमित्रेने धीर धरुन म्हटले की, ‘ देवी, दोन घटका रात्र सरली आहे. ‘ हे ऐकून श्रीरामांची माता उठली. ॥ ४ ॥

दोहा—बेगि पाउ धारिअ थलहि कह सनेहँ सतिभाय ।

हमरें तौ अब ईस गति कै मिथिलेस सहाय ॥ २८४ ॥

आणि सद् भावपूर्वकप्रेमाने म्हणाली, ‘ आता तुम्ही लवकर मुक्कामाला जा. आम्हांला आता ईश्र्वरच गती आहे अथवा मिथिलेश्वर जनक साहाय्य करणारे आहेत.’ ॥ २८४ ॥

लखि सनेह सुनि बचन बिनीता । जनकप्रिया गह पाय पुनीता ॥

देबि उचित असि बिनय तुम्हारी । दसरथ घरिनि राम महतारी ॥

कौसल्येचे प्रेम पाहून आणि तिचे विनम्र शब्द ऐकून जनकांच्या प्रिय पत्नीने तिचे पाय धरले आणि म्हटले, ‘ हे देवी, तुम्ही राजा दशरथांची राणी आणि श्रीरामांच्या माता आहात. तुमची ही नम्रता तुम्हांलाच शोभून दिसते. ॥ १ ॥

प्रभु अपने नीचहु आदरहीं । अगिनि धूम गिरि सिर तिनु धरहीं ॥

सेवकु राउ करम मन बानी । सदा सहाय महेसु भवानी ॥

प्रभु श्रीराम आपल्या सामान्य माणसांचाही आदर ठेवतात. अग्नी हा धुराला व पर्वत हा गवताला आपल्या मस्तकी धारण करतो. आमचे राजे तर कर्म, मन, वचन यांनी तुमचे सेवक आहेत आणि श्रीमहादेव-पार्वती हे नित्य सहाय्यक आहेत. ॥ २ ॥

रउरे अंग जोगु जग को है । दीप सहाय कि दिनकर सोहै ॥

रामु जाइ बनु करि सुर काजू । अचल अवधपुर करिहहिं राजू ॥

तुमचा सहायक होण्याजोगा जगात कोण आहे ? दिवा सूर्याला मदत करण्यास गेला, तर शोभेल काय ? श्रीरामचंद्र वनात जाऊन देवांचे कार्य पार पाडतील व अयोध्येस येऊन दीर्घकाळ राज्य करतील. ॥ ३ ॥

अमर नाग नर राम बाहुबल । सुख बसिहहिं अपनें थल ॥

यह सब जागबलिक कहि राखा । देबि न होइ मुधा मुनि भाषा ॥

देव, नाग व मनुष्य हे सर्व श्रीरामांच्या बाहुबलावर आपापल्या लोकी सुखाने नांदतील. हे सर्व याज्ञवल्क्य मुनींनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. हे देवी ! मुनींचे वचन खोटे होत नाही. ‘ ॥ ४ ॥        

दोहा—अस कहि पग परि पेम अति सिय हित बिनय सुनाइ ।

सिय समेत सियमातु तब चली सुआयसु पाइ ॥ २८५ ॥

असे म्हणून व प्रेमाने पाया पडून सीतेच्या मातेने सीतेला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची विनंती केली व मनापासून आज्ञा मिळाल्यावर ती सीतेला घेऊन आपल्या मुक्कामी निघाली. ॥ २८५ ॥

प्रिय परिजनहि मिली बैदेही । जो जेहि जोगु भॉंति तेहि तेहि ॥

तापस बेष जानकी देखी । भा सबु बिकल बिषाद बिसेषी ॥

जानकी आपल्या प्रिय कुटुंबियांना योग्य प्रकारे भेटली. जानकीला तपस्विनीच्या वेषात पाहून सर्वजण शोकाकुल झाले. ॥ १ ॥

जनक राम गुर आयसु पाई । चले थलहि सिय देखी आई ॥

लीन्हि लाइ उर जनक जानकी । पाहुनि पावन पेम प्रान की ॥

राजा जनक श्रीरामांचे गुरु वसिष्ठ यांची आज्ञा घेऊन आपल्या निवासात गेले. त्यांनी सीतेला पाहिले. जनकांनी आपल्या पवित्र प्रेमाची आणि प्राणांची पाहुणी असलेल्या जानकीला हृदयाशी कवटाळले. ॥ २ ॥

उर उमगेउ अंबुधि अनुरागू । भयउ भूप मनु मनहुँ पयागू ॥

सिय सनेह बटु बाढ़त जोहा । ता पर राम पेम सिसु सोहा ॥

त्यांच्या मनात प्रेमाचा सागर उसळला होता. राजांचे मन हे जणू प्रयाग होते आणि त्यांनी प्रेमसागरात आदिशक्ती सीतेचा अलौकिक प्रेमरुपी अक्षयवट पल्लवित होताना पाहिला. त्या सीतेच्या प्रेमरुपी वटवृक्षावर श्रीरामांचे प्रेमरुप बालक शोभून दिसत होते. ( प्रलयसागरात वटपत्रावर बाल भगवान शोभावे तसे. ) ॥ ३ ॥

चिरजीवी मुनि ग्यान बिकल जनु । बूड़त लहेउ बाल अवलंबनु ॥

मोह मगन मति नहिं बिदेह की । महिमा सिय रघुबर सनेह की ॥

जनकांचे ज्ञानरुपी चिरंजीव मार्कंडेय मुनी व्याकूळ होऊन बुडता बुडता जणू श्रीरामरुपी बालकाचा आधार मिळाल्याने वाचले.वस्तुतः ज्ञान्यांचे शिरोमणी विदेहराजाची बुद्धी मोहात पडली नव्हती. श्रीसीतारामांच्या प्रेमाचा हा महिमा होता. त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्ञान्यांचे ज्ञानसुद्धा विरुन गेले. ॥ ४ ॥         

दोहा—सिय पितु मातु सनेह बस बिकल न सकी सँभारि ।

धरनिसुतॉं धीरजु धरेउ समउ सुधरमु बिचारि ॥ २८६ ॥

माता-पित्याच्या प्रेमामुळे सीता व्याकूळ झाली. ती स्वतःला सावरु शकली नाही.परंतु धैर्यवती पृथ्वीची कन्या सीता हिने वेळ व धर्म यांचा विचार करुन धैर्य धारण केले. ॥ २८६ ॥

तापस बेष जनक सिय देखी । भयउ पेमु परितोषु बिसेषी ॥

पुत्रि पबित्र किए कुल दोऊ । सुजस धवल जगु कह सबु कोऊ ॥

सीतेला तपस्विनीच्या वेषात पाहून जनकांना फार प्रेम व समाधान वाटले. ते म्हणाले, ‘ मुली, तू दोन्ही कुळांना पवित्र केलेस. तुझ्या निर्मळ कीर्तीने संपूर्ण जग उजळले आहे, असेच सर्वजण म्हणत आहेत. ॥ १ ॥

जिति सुरसरि कीरति सरि तोरी । गवनु कीन्ह बिधि अंड करोरी ॥

गंग अवनि थल तीनि बड़ेरे । एहिं किए साधु समाज घनेरे ॥

तुझी कीर्तिरुपी नदी गंगेलाही जिंकून एका नव्हे तर कोट्यवधी ब्रह्मांडांमधून वाहात चालली आहे. गंगेने पृथ्वीवर हरिद्वार, प्रयागराज आणि गंगासागर यांना महान तीर्थे बनविले, परंतु तुझ्या या कीर्ति-नदीने अनेक संतसमाजरुपी तीर्थस्थाने निर्माण केली. ॥ २ ॥

पितु कह सत्य सनेहँ सुबानी । सीय सकुच महुँ मनहुँ समानी ॥

पुनि पितु मातु लीन्हि उर लाई । सिख आसिष हित दीन्हि सुहाई ॥

जनकांनी प्रेमाने खरीखुरी वाणी उच्चारली, परंतु आपले मोठेपण ऐकून सीता जणू संकोचात बुडून गेली. माता-पित्यांनी तिला उराशी धरले आणि हितकारक उपदेश व आशीर्वाद दिले. ॥ ३ ॥

कहति न सीय सकुचि मन माहीं । इहॉं बसब रजनीं भल नाहीं ॥

लखि रुख रानि जनायउ राऊ । हृदयँ सराहत सीलु सुभाऊ ॥

सीता काही बोलू शकली नाही, परंतु मनात संकोच वाटत

 होता की, रात्री सासूंची सेवा सोडून येथे राहणे योग्य

 नाही. राणी सुनयना हिने सीतेचा रोख पाहून राजा

 जनकांना सांगितले. तेव्हा दोघेजण आपल्या मनात

 सीतेच्या शील व स्वभावाची प्रशंसा करु लागली. ॥ 

४ ॥



Custom Search

No comments: