ShriRamCharitManas
दोहा—राखि राम रुख धरमु
ब्रतु पराधीन मोहि जानि ।
सब कें संमत सर्ब हित
करिअ पेमु पहिचानि ॥ २९३ ॥
म्हणून मला परादहीन
समजून श्रीरामांचा रोख, धर्म व सत्यव्रत राखून जे सर्वांना संमत असेल व सर्वांसाठी
हितकारक असेल, ते सर्वांचे प्रेम ओळखून आपणच त्याप्रमाणे करा. ‘ ॥ २९३ ॥
भरत बचन सुनि देखि सुभाऊ
। सहित समाज सराहत राऊ ॥
सुगम अगम मृदु मंजु
कठोरे । अरथु अमित अति आखर थोरे ॥
भरताचे बोलणे ऐकून
आणि त्याचा स्वभाव पाहून सर्व समाजासह राजा जनकत्याची वाखाणणी करु लागले. भरताचे
बोलणे सुगम पण अगम्य, सुंदर, कोमल पण कठोर होते. त्यात अक्षरे थोडी पण अर्थ अत्यंत
अपार भरला होता. ॥ १ ॥
ज्यों मुखु मुकुर मुकुरु
निज पानी । गहि न जाइ अस अद्भुत बानी ॥
भूप भरतु मुनि सहित
समाजू । गे जहँ बिबुध कुमुद द्विजराजू ॥
ज्याप्रमाणे आरशात
मुख दिसते आणि आरसा हातात असूनही ते मुखाचे प्रतिबिंब पकडता येत नाही. त्याप्रमाणे
भरताची अद्भुत वाणी हीसुद्धा पकडता येत नव्हती. आशय समजत नव्हता. कुणाला बोलता
येईना, तेव्हा राजा जनक, भरत व मुनी वसिष्ठ सर्व समाजाबरोबर देवता-रुपी कुमुदांना
प्रफुल्लित करणारे चंद्रमा श्रीराम यांच्याकडे गेले. ॥ २ ॥
सुनि सुधि सोच बिकल सब
लोगा । मनहुँ मीनगन नव जल जोगा ॥
देवँ प्रथम कुलगुर गति
देखी । निरखि बिदेह सनेह बिसेषी ॥
ही वार्ता ऐकून सर्व
लोक काळजीने व्याकूळ झाले,ज्याप्रमाणे पहिल्या पावसाच्या पाण्यामुळे मासे व्याकुळ
होतात. देवांनी प्रथम कुलगुरु वसिष्ठांची प्रेमविव्हळ दशा पाहिली, नंतर विदेहांचे
उत्कट प्रेम पाहिले. ॥ ३ ॥
राम भगतिमय भरतु निहारे
। सुर स्वारथी हहरि हियँ हारे ॥
सब कोउ राम पेममय पेखा ।
भए अलेख सोच बस लेखा ॥
आणि मग
श्रीरामभक्तीने ओतप्रोत भरलेल्या भरताला पाहिले. या सर्वांना पाहून स्वार्थी देव
घाबरले आणि मनातून निराश झाले. त्यांना सर्वजण श्रीराम प्रेमामध्ये ओथंबलेले दिसून
आले. त्यामुळे देव इतक्या काळजीत पडले की, सांगता सोय नाही. ॥ ४ ॥
दोहा—रामु सनेह सकोच बस
कह ससोच सुरराजु ।
रचहु प्रपंचहि पंच मिलि
नाहिं त भयउ अकाजु ॥ २९४ ॥
इंद्र चिंतेने म्हणू
लागला की, ‘ श्रीरामचंद्र हे स्नेह व संकोचाच्या अधीन आहेत. म्हणून सर्वजण मिळून
काही तरी माया करा, नाही तर काम बिघडेल, असे समजा. ‘ ॥ २९४ ॥
सुरन्ह सुमिरि सारदा
सराही । देबि देव सरनागत पाही ॥
फेरि भरत मति करि निज
माया । पालु बिबुध कुल करिछल छाया ॥
देवांनी सरस्वतीचे
स्मरण करुन तिची स्तुती केली आणि म्हटले की, ‘ हे देवी, आम्ही देव तुझे शरणागत
आहोत. आमचे रक्षण कर. आपली माया करुन भरताची बुद्धी फिरव. कपट रचून देवांच्या
कुलाचे रक्षण कर.’ ॥ १ ॥
बिबुध बिनय सुनि देबि
सयानी । बोली सुर स्वारथ जड़ जानी ॥
मो सन कहहु भरत मति फेरु
। लोचन सहस न सूझ सुमेरु ॥
देवांची विनंती ऐकून
व ते स्वार्थामुळे मूर्ख झाल्याचे पाहून बुद्धिमती सरस्वती म्हणाली, ‘ भरताची
बुद्धी पालटा असे तुम्ही मला सांगता ? हजार नेत्रांनीही तुम्हांला सुमेरुसारखा
पर्वत दिसत नाही ? ॥ २ ॥
बिधि हरि हर माया बड़ि
भारी । सोउ न भरत मति सकइ निहारी ॥
सो मति मोहि कहत करु
भोरी । चंदिनि कर कि चंडकर चोरी ॥
ब्रह्मदेव, विष्णू
आणि महेश यांची माया मोठी प्रबळ आहे, परंतु तेसुद्धा भरताच्या बुद्धीकडे पाहू शकत
नाहीत. त्या बुद्धीला भ्रमात पाडण्यास तुम्ही मला सांगता ? अरे चांदणे हे कधी
प्रचंड किरणांच्या सूर्याला चोरु शकेल काय ? ॥ ३ ॥
भरत हृदयँ सिय राम
निवासू । तहँ कि तिमिर जहँ तरनि प्रकासू ॥
अस कहि सारद गइ बिधि
लोका । बिबुध बिकल निसि मानहुँ कोका ॥
भरताच्या हृदयात
श्रीसीतारामांचा निवास आहे. जेथे सूर्याला प्रकाश असतो, तेथे कुठे अंधार राहू शकतो
काय ? ‘ असे म्हणून सरस्वती ब्रह्मलोकी निघून गेली. रात्री चक्रवाक पक्षी जसा
व्याकूळ होतो, त्याप्रमाणे देव व्याकूळ होऊन गेले. ॥ ४ ॥
दोहा—सुर स्वारथी मलीन
मन कीन्ह कुमंत्र कुठाटु ।
रचि प्रपंच माया प्रबल
भय भ्रम अरति उचाटु ॥ २९५ ॥
परंतु मलिन मनाच्या
स्वार्थी देवांनी दुष्ट सल्ला मसलत करुन षड्यंत्र रचले. प्रबळ मायाजाल पसरुन भय,
भ्रम, अप्रीती आणि उद्वेग पसरुन टाकले. ॥ २९५ ॥
करि कुचालि सोचत सुरराजू
। भरत हाथ सबु काजु अकाजू ॥
गए जनकु रघुनाथ समीपा ।
सनमाने सब रबिकुल दीपा ॥
दुष्ट चाल खेळून
इंद्र विचार करु लागला की, ‘ काम होणे न होणे हे सर्व भरताच्या हाती आहे. ‘ इकडे
जनक, वसिष्ठ मुनी इत्यादींच्याबरोबर श्रीरामचंद्रांच्याकडे गेले. सूर्यकुलाचे दीपक
श्रीरामचंद्रांनी सर्वांचा सन्मान केला. ॥ १ ॥
समय समाज धरम अबिरोधा ।
बोले तब रघुबंस पुरोधा ॥
जनक भरत संबादु सुनाई ।
भरत कहाउति कही सुहाई ॥
तेव्हा रघुकुलाचे
पुरोहित वसिष्ठ वेळ, समाज व धर्म यांना अनुकूल
असे बोलले. त्यांनी
प्रथम जनक व भरत यांच्यात झालेला संवाद सांगितला. नंतर भरताने सांगितलेल्या
चांगल्या गोष्टी ऐकविल्या. ॥ २ ॥
तात राम जस आयसु देहू ।
सो सबु करै मोर मत एहू ॥
सुनि रघुनाथ जोरि जुग
पानी । बोले सत्य सरल मृदु बानी ॥
नंतर ते म्हणाले, ‘
हे रामा, माझ्या मते तुमची जशी आज्ञा असेल, तसेच सर्वांनी करावे. ‘ हे ऐकून दोन्ही
हात जोडून श्रीरघुनाथ सत्य, सरळ व कोमल शब्दांत म्हणाले, ॥ ३ ॥
बिद्यमान आपुनि मिथिलेसू
। मोर कहब सब भाँति भदेसू ॥
राउर राय रजायसु होई ।
राउरि सपथ सही सिर सोई ॥
‘ तुम्ही व
मिथिलेश्वर जनक असताना मी काय बोलणे, हे अनुचित आहे. तुमची व जनक महाराजांची जी
आज्ञा असेल, मी शपथेवर सांगतो की, ती सर्वांना निश्चितपणे शिरोधार्य होईल.’ ॥ ४ ॥
दोहा—राम सपथ सुनि मुनि
जनकु सकुचे सभा समेत ।
सकल बिलोकत भरत मुखु बनइ
न ऊतरु देत ॥ २९६ ॥
श्रीरामांची शपथ
ऐकून सर्व सभा, मुनी व जनक संकोचून गेले. कुणाला उत्तर येईना. सर्व लोक भरताच्या
तोंडाकडे पाहू लागले. ॥ २९६ ॥
सभा सकुच बस भरत निहारी
। रामबंधु धरि धीरजु भारी ॥
कुसमउ देखि सनेहु सँभारा
। बढ़त बिंधि जिमि घटज निवारा ॥
भरताने मोठ्या
संकोचाने सभेकडे पाहिले. त्याने मोठा धीर धरुन व वेळ वाईट असल्याचे पाहून आपले
प्रेम आवरते घेतले. ज्याप्रमाणे वाढत जाणार्या विंध्याचलाला अगस्त्य मुनींनी
रोखले होते. ॥ १ ॥
सोक कनकलोचन मति छोनी ।
हरी बिमल गुन गन जगजोनी ॥
भरत बिबेक बराहँ बिसाला
। अनायास उधरी तेही काला ॥
शोकरुपी
हिरण्याक्षाने सर्व सभेची बुद्धिरुपी पृथ्वी हरण केली. जी गुणसमूहरुपी जगताला
उत्पन्न करणारी होती. भरताच्या विवेकरुपी विशाल वराहाने शोकरुपी हिरण्याक्षाला
नष्ट करुन विनासायास तिचा उद्धार केला. ॥ २ ॥
करि प्रनामु सब कहँ कर
जोरे । रामु राउ गुर साधु निहोरे ॥
छमब आजु अति अनुचित मोरा
। कहउँ बदन मृदु बचन कठोरा ॥
भरताने प्रणाम करुन
सर्वांना हात जोडले आणि श्रीरामचंद्र, राजा जनक, गुरु वसिष्ठ आणि साधु-संतांना
विनंती करीत म्हटले, ‘ आज माझ्या या अत्यंत अयोग्य वर्तनाबद्दल क्षमा करा. मी लहान
तोंडी उद्धटपणे बोलत आहे. ॥ ३ ॥
हियँ सुमिरी सारदा सुहाई
। मानस तें मुख पंकज आई ॥
बिमल बिबेक धरम नय साली
। भरत भारती मंजू मराली ॥
नंतर त्याने
हृदयामध्ये सुंदर देवी सरस्वतीचे स्मरण केले. ती त्याच्या मनरुपी मानससरोवरातून
मुखारविंदावर येऊन विराजित झाली. ती निर्मल विवेक, धर्म आणि नीतिपूर्ण भरताची
नीरक्षीर यांचे विवेचन करणारी वाणीरुपी हंसी झाली. ॥ ४ ॥
दोहा—निरखि बिबेक
बिलोचनन्हि सिथिल सनेहँ समाजु ।
करि प्रनामु बोले भरतु
सुमिरि सीय रघुराजु ॥ २९७ ॥
विवेकाच्या
नेत्रांनी भरताने पाहिले की, सारा समाज प्रेमाने भरुन गेला आहे. त्याने सर्वांना
प्रणाम केला आणि सीता व रघुनाथांचे स्मरण करुन म्हटले, ॥ २९७ ॥
प्रभु पितु मातु सुहृद
गुर स्वामी । पूज्य परम हित अंतरजामी ॥
सरल सुसाहिबु सील निधानू
। प्रनतपाल सर्बग्य सुजानु ॥
‘ हे प्रभो, तुम्ही
पिता, माता, मित्र, गुरु, स्वामी, पूज्य, परम हितैषी व अंतर्यामी आहात. सरल हृदयी,
श्रेष्ठ स्वामी, सद्गुणांचे भांडार, शरणागताचे रक्षक, सर्वज्ञ, ॥ १ ॥
समरथ सरनागत हितकारी ।
गुनगाहकु अवगुन अघ हारी ॥
स्वामि गोसाँइहि सरिस
गोसाईं । मोहि समान मैं साइँ दोहाईं ॥
समर्थ, शरणागताचे
कल्याण करणारे, गुणांचा आदर करणारे आणि अवगुण व पाप यांचे हरण करणारे आहात. हे
स्वामी, तुमच्यासारखे स्वामी तुम्हीच आहात आणि स्वामींचा अपराध करणारा माझ्यासारखा
मीच आहे. ॥ २ ॥
प्रभु पितु बचन मोह बस
पेली । आयउँ इहॉं समाजु सकेली ॥
जग भल पोच ऊँच अरु नीचू
। अमिअ अमरपद माहुरु मीचू ॥
मी मोहामुळे तुमच्या
व वडिलांच्या वचनांचे उल्लंघन करुन आणि समाज गोळा करुन येथे आलो आहे. जगामध्ये
चांगले-वाईट, उच्च-नीच, अमृत-अमरपद, विष व मृत्यु इत्यादी, ॥ ३ ॥
राम रजाइ मेट मन माहीं ।
देखा सुना कतहुँ कोइ नाहीं ॥
सो मैं सब बिधि कीन्हि
ढिठई । प्रभु मानी सनेह सेवकाई ॥
यांपैकी असा कोणी
पाहिला किंवा ऐकला नाही की, ज्याने श्रीरामचंद्रांची आज्ञा मोडली. मी सर्व प्रकारे
ते धाष्टर्य केले, परंतु प्रभूंनी तेच स्नेह व सेवा असेच मानले. ॥ ४ ॥
दोहा—कृपाँ भलाईं आपनी
नाथ कीन्ह भल मोर ।
दूषन भे भूषन सरिस सुजसु
चारु चहु ओर ॥ २९८ ॥
हे नाथ, तुम्ही
आपल्या कृपेने व चांगुलपणाने माझे चांगले केले. त्यामुळे माझे दोषसुद्धा भूषण ठरले.
चोहोकडे माझी उत्तम कीर्ती पसरली. ॥ २९८ ॥
राउरि रीति सुबानि बड़ाई
। जगत बिदित निगमागम गाई ॥
कूर कुटिल खल कुमति
कलंकी । नीच निसील निरीस निसंकी ॥
हे नाथ, तुमची नीती
आणि सुंदर महिमा जगात प्रसिद्ध आहे आणि त्याचे गायन वेद व शास्त्रांनी केले आहे.
जे क्रूर, दुष्ट, कुबुद्धी, कलंकी, नीच, शीलरहित, नास्तिक व निर्भय आहेत; ॥ १ ॥
तेउ सुनि सरन सामुहें आए
। सकृत प्रनामु किहें अपनाए ॥
देखि दोष कबहुँ न उर आने
। सुनि गुन साधु समाज बखाने ॥
तेही शरण येऊन समोर
आल्यावर एकदा प्रणाम करताच त्यांना तुम्हीआपलेसे केले. त्या शरणागतांचे दोष कधी मनात
ठेवले नाहीत आणि त्यांचे गुण ऐकून साधु समाजात त्यांची वाखाणणी केली. ॥ २ ॥
को साहिब सेवकहि नेवाजी
। आपु समाज साज सब साजी ॥
निज करतूति न समुझिअ
सपनें । सेवक सकुच सोचु उर अपनें ॥
अशाप्रकारे
सेवकाच्या सर्व गरजा पूर्ण करणारा व सेवकावर कृपा करणारा स्वामी कोण आहे ? शिवाय
स्वप्नातही आपण सेवकासाठी काही केले आहे, असे न मानता उलट सेवकाला संकोच वाटू नये,
याचीच तुम्ही मनापासून काळजी घेता. ॥ ३ ॥
सो गोसाइँ नहिं दूसर
कोपी । भुजा उठाइ कहउँ पन रोपी ॥
पसु नाचत सुक पाठ
प्रबीना । गुन गति नट पाठक आधीना ॥
मी दोन्ही हात उभारुन प्रतिज्ञापूर्वक सांगतो की
, तुमच्यासारखा दुसरा कोणीही स्वामी नाही. वानर
इत्यादी पशु नाच करतात. पोपट शिकविल्यावर
बोलण्यात कुशल होतात, परंतु पोपटाच्या बोलण्याचा
गुण आणि पशुचे नाचणे हे नाचविणार्याच्या आणि
शिकवीणार्याच्या हाती
असते. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment