KanakaDhara Stotra
This is a very beautiful stotra of Goddess Lakshmi. It is created by Param Poojya Adi Shankaracharya. It is in Sanskrit and it is a praise of Goddess Lakshmi. We know that Adi Shankaracharya was sanyasi. He has nothing to ask for himself from Goddess Lakshmi. This stotra was created by him for the people who were very poor. They can’t afford to purchase even food. Adi Shankaracharya was very much moved when he saw such poverty and he created this beautiful KanakaDhara Stotra. It may be a myth but it is said that after completion and listening of this stotra, Goddess Lakshmi poured a shower of Gold coins.
We know that in India when we praise a person in front of his wife, Wife becomes very pleased. The same way Adi in this stotra first praised God Vishnu with all his names Narayan, Mukund, Keshav, Hari, Madhusudan and by many other names.
He also is calling Goddess Lakshmi as Vakdevata, Shakambhari, Parvati and Lakshmi. He is also saying that Goddess is ShrutiRupa, RatiRupa, Shaktiswarupa and Purushottam priya Pushti.
Finally he says that “I bow to Kamala who is having a beautiful face like a beautiful lotus. I bow to Shri Devi who is a daughter of an Ocean or who is came out of an Ocean. I bow to the sister of Moon and Sudha. I bow to the wife of Bhagwan Narayan.”
He further says that when we worship Goddess Lakshmi, we receive her blessings which fulfill our desires, we become wealthy. Hence he worship Goddess Lakshmi with his mind, words (Praise) and body.
He says to Goddess that you are looking very beautiful. You have worn a very nice saree, Chandan and Garlands of beautiful flowers.
Whosoever the devotee of the Goddess praises Goddess Lakshmi by this stotra every day becomes very fortunate and famous by the blessings of Goddess Lakshmi.
The above is not a stanza to stanza translation of KanakaDhara Stotra which is not so easy for me but I have tried to explain as per my limited knowledge of Sanskrit.
श्रीकनकधारा स्तोत्रम्
अङ्गं हरे: पुलकभूषणमाश्रयन्ती
भृङ्गाङगनेव मुकुलाभरणं तमालम् ।
अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला
माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः ॥ १ ॥
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः
प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि ।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले
या
सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः ॥ २ ॥
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्ष-
मानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्ध-
मिन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः ॥ ३ ॥
आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्द-
मानन्दकन्दमनिषमनङ्गतन्त्रम् ।
आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रं
भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः ॥ ४ ॥
बाह्वन्तरे मधुजितः श्रितकौस्तुभे
या
हारावलीव हरिनीलमयी विभाति ।
कामप्रदा भगवतोsपि कटाक्षमाला
कल्याणमावहतु मे कमलालयायाः ॥ ५ ॥
कालाम्बुदालिललितोरसि कैटभारे-
र्धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव ।
मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति-
र्भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः ॥ ६ ॥
प्राप्तं पदं प्रथमतः किल यत्प्रभावान्
माङ्गल्यभाजि मधुमाथिनी मन्मथेन ।
मय्यापतेत्तदिह मन्थरमीक्षणार्धं
मन्दालसं च मकरालयकन्यकायाः ॥ ७ ॥
दद्याद् दयानुपवनो द्रविणाम्बुधारा-
मस्मिन्नकिञ्चनविहङ्गशिशौ विषण्णे ।
दुष्कर्मधर्ममपनीय चिराय दूरं
नारायणप्रणयिनीनयनाम्बुवाहः ॥ ८ ॥
इष्टा विशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-
दृष्ट्या त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते ।
दृष्टिः प्रह्रष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टरायाः ॥ ९ ॥
गीर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति
शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति ।
सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै
तस्यै नमस्त्रिभुवनैकगुरोस्तरुण्यै ॥ १० ॥
श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै
रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै ।
शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै
पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै ॥ ११ ॥
नमोऽस्तु नालीकनिभाननायै
नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूत्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै ॥ १२ ॥
सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि
साम्राज्यदानविभवानि सरोरुहाक्षि ।
त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यातानि
मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये ॥ १३ ॥
यत्कटाक्षसमुपासनाविधिः
सेवकस्य सकलार्थसम्पदः ।
संतनोति वचनाङ्गमानसै-
स्त्वां मुरारिह्रदयेश्वरीं भजे ॥ १४ ॥
सरसिजनिलये सरोजहस्ते
धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे ।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे
त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम् ॥ १५ ॥
दिग्धस्तिभिः कनककुम्भमुखावसृष्ट-
स्वर्वाहिनीविमलचारुजलप्लुताङ्गीम् ।
प्रातर्नमामि जगतां जननीमशेष-
लोकाधिनाथगृहिणीममृताब्धिपुत्रीम् ॥ १६ ॥
कमले कमलाक्षवल्लभे
त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः ।
अवलोकय मामकिञ्चनानां
प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः ॥ १७ ॥
स्तुवन्ति ये स्तुतिभिरमूभिरन्वहं
त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम् ।
गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो
भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः ॥ १८ ॥
॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कनकधारास्तोत्रं सम्पूर्णम् ॥
श्रीकनकधारा स्तोत्रम् चा मराठी अर्थः
१) ज्याप्रमाणे भुंगे अर्धोन्मिलीत फुलांनी बहरलेल्या तमाल वृक्षाचा आसरा घेतात, त्याचप्रमाणे श्रीहरीच्या रोमांच्यानी सुशोभित अंगावर जी नेहमी पहुडलेली असते, तसेच जिच्यामध्ये संपूर्ण ऐश्वर्याचा निवास आहे, त्या सर्व मंगल करणार्या अधिष्ठात्री भगवती महालक्ष्मीचा कृपाकटाक्ष माझे मंगल करो. २) ज्याप्रमाणे भुंगे येजा करुन कमलदलावर सारखे भ्रमण करतात, त्याचप्रमाणे मुर राक्षसाचा शत्रु जो श्रीहरि त्याच्या मुखाकडे जी वारंवार जाते आणि लज्जेमुळे परत माघारी फिरते, त्या समुद्रकन्या लक्ष्मीची मनोहर मुग्ध दृष्टि माला धन, संपत्ती देवो.
३) जी देवतांचा अधिपती इंद्राच्या पदाचा वैभव विलास देण्यास समर्थ आहे, जी मुरारि श्रीहरिला अत्यंत आनंदित करणारी आहे आणि जी नीलकमलाच्या आंतील भागाप्रमाणे अत्यंत मनोहर दिसते, त्या लक्ष्मीची अर्धोन्मिलीत दृष्टि एकक्षणभर तरी माझ्यावर पडो.
४) शेषशायी भगवान श्रीविष्णुची धर्मपत्नी श्रीलक्ष्मीचा जो डोळा आनंदित श्रीमुकुन्दाला आपल्या निकट पाहुन तिरळा होतो तो डोळा मला ऐश्वर्य देणारा होवो.
५) भगवान मधुसुदनाच्या कौस्तुभमण्याने आच्छादिलेल्या वक्षःस्थळावर इंद्रनील मण्यांच्या हारा प्रमाणे शोभणार्या आणि त्याच्याही मनांत प्रेम जागवणार्या कमलकुंजवासिनी कमलाची कटाक्षमाला माझे कल्याण करो.
६) जशी काळ्यामेघांच्या दाटीमध्ये वीज चमकते, त्याचप्रमाणे जी कैटभशत्रु श्रीविष्णुच्या काळ्या ढगांप्रमाणे श्यामसुंदर वक्षःस्थलावर जी प्रकाशित होते, जिने आपल्या आविर्भावाने भृगुवंशाला आनंदी केले आहे आणि जी सर्व लोकांची माता आहे अशी भगवती लक्ष्मीची मूर्ती माझे कल्याण करो.
७) समुद्रकन्या कमलेची ती मंद, अस्थिर आणि अर्धोन्मिलीत दृष्टि की, जिच्या प्रभावाने कामदेवाने मंगलमयी भगवान मधुसुदनाच्या ह्रदयांत प्रथम प्रवेश केला ती माझ्यावर पडो.
८) भगवान नारायणाची प्रेयसी लक्ष्मीचा डोळेरुपी ढग दयेने भरलेल्या वार्याने प्रेरीत होऊन दुष्कर्मरुपी घामाला कायमचा हटवून विषादांत पडलेल्या माझ्यासारख्या दीनरुपी चातकावर धनरुपी जलधारांची वृष्टि करो.
९) काही विशिष्ट कुशाग्र बुद्धीची माणसे जीच्या प्रीतिस पात्र होऊन, जीच्या दयार्द दृष्टिच्या प्रभावाने स्वर्गपदासारखे पद सहज मिळवतात, त्या पद्मासना पद्माची कमलगर्भाप्रमाणे पुष्ट कांतीवान दृष्टि, माझी मनोवांछित पुष्टि मला देवो.
१०)जी सृष्टि लीलेच्यावेळी वाग्देवता (ब्रह्मशक्ति)च्या रुपांत असते. जी पालनाचे कार्य करतांना भगवान गरुडध्वजाची पत्नी लक्ष्मी (वैष्णवी शक्ति)च्या रुपांत विराजमान असते. जी प्रलयकाळी शाकम्भरी (भगवती दुर्गा) किंवा चंद्रशेखराची पत्नी पार्वती (रुद्र शक्ति)च्या रुपांत असते. त्या त्रिभुवनांतील एकमात्र गुरु जो भगवान नारायण त्याची नित्ययौवना प्रेयसी श्रीलक्ष्मीला माझा नमस्कार.
११) माते, शुभकर्मांचे फळ देणार्या श्रुतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. रमणीय सिन्धुरुप रतिच्या रुपांत असलेल्या आपल्याला मी नमस्कार करतो. कमलवनांत निवास करणार्या शक्तिस्वरुपा लक्ष्मीला मी नमस्कार करतो. तसेच पुरुषोत्तमप्रिया पुष्टिला मी नमस्कार करतो.
१२) कमळासारखे मुख असलेल्या कमलेला मी नमस्कार करतो. क्षीरसागरांतून उत्पन्न झालेल्या देविला मी नमस्कार करतो. चंद्र आणि सुधा यांची सख्खी बहिण असलेलीला मी नमस्कार करतो. भगवान नारायणाच्या वल्लभेला मी नमस्कार करतो.
१३) कमलासारखे डोळे असलेल्या आदरणीय माते, आपल्या चरणांवर नतमस्तक होऊन तुला केलेला नमस्कार, सर्व संपत्ती देणारा, सर्व इंद्रियांना आनंद देणारा, साम्राज्य देणारा आणि सर्व पापांचे हरण करण्यास सर्वथा समर्थ आहे. तसा नमस्कार करण्याचे भाग्य मलाच नेहमी प्राप्त होवो.
१४) जीच्या कृपाकटाक्षासाठी केलेली उपासना उपासकाला त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करुन देणारी आणि त्याची संपत्ती वृद्धिंगत करणारी होते त्या श्रीहरिच्या ह्रदयेश्वरी लक्ष्मीदेवीचे मी मन, वाणी आणि शरीराने भजन, गुणगान करतो.
१५) हे भगवती हरिप्रिये! तू कमलवनामध्ये निवास करणारी आहेस. तुझ्या हातांत लीलाकमल शोभून दिसत आहे. तू अतिशय सुंदर वस्त्र, गन्ध आणि माळांनी सुशोभित आहेस. तूझे रुप अत्यंत मनोरम दिसत आहे. हे त्रिभुवनाचे ऐश्वर्य देऊ शकणार्या देवि, माझ्यावर प्रसन्न हो.
१६) दिग्गजांकडून सुवर्णकलशाच्या मुखांतून ओतलेल्या आकाशगंगेच्या निर्मळ आणि स्वच्छ, सुंदर पाण्याने ज्याच्या पवित्र अंगावर अभिषेक केला जातो, त्या सर्व लोकांच्या अधीश्वर भगवान श्रीविष्णुची गृहिणी आणि क्षीरसागराची कन्या अशा त्या जगज्जननी लक्ष्मीला मी प्रातःकाळी नमस्कार करतो.
१७) हे कमलनयन असलेल्या केशवाच्या कमनीय कामिनी कमले, मी दरिद्री लोकांमध्ये अति दरिद्री आहे. त्यामुळे तुझ्या कृपेस नक्कीच पात्र आहे. तू करुणारुपी सागराच्या उसळणार्या लाटांप्रमाणे असलेल्या अशा तुझ्या दृष्टि कटाक्षाने माझ्याकडे बघ.
१८) जे लोक अशाप्रकारे केलेल्या स्तुतिने प्रत्येक दिवशी वेदत्रयीस्वरुप आणि त्रिभुवनाची जननी भगवती लक्ष्मीची स्तुति करतात, ते या भूतलावर महान गुणवान आणि अत्यंत सौभाग्यशाली होतात. तसेच विद्वान लोकसुद्धा त्यांची मनोभावना जाणून घेण्याची ईच्छा करतात.
अशा रीतीने श्री परम पूज्य आदिशंकराचार्यांनी केलेले हे कनकधारा स्तोत्र पुरे झाले.
KanakDhara Stotra
श्रीकनकधारा स्तोत्रम्
Custom Search
1 comment:
Hello Team,
I really like this article, we also have an article in Hindi domain Kanakadhara Stotram - कनकधारा स्त्रोत
Post a Comment