Shri Navanath BhaktiSar Adhyay 24
DrumilNarayan had taken birth as Bhartari. Bhartari was son of God Mitra-Varuni. Bhartari in his early age was cared by a dear by offering milk and looking after all his needs of the age. Bhartari was growing in the forest started to eat leaves like dear. He learnt the language of the animals. One day Jaysing and his wife Renuka saw Bhartari in the forest and were surprised that such a small child had been left their by his mother and father. However they took him with them and took care of him, thinking all the time that they have to return the child to his mother and father one day upon their asking to do so. Jaysing and his family came to Kashi on the bank of Bhagirathi. They decided to stay there as Kashi being a holy place. One day he took Bhartari with him and went in the God Shiva temple. God welcomed the child calling him as Bhartari. Jaysing herd it and came to know that the child is a God. He told everything to Renuka and they decided to name the child as Bhartari, as God Shiva had called him as Bhartari. One day Bhartari became unconscious while playing with other children who ran away. Mitra-Varini saw Bhartari wounded came down from swarga and cured him. He took Bhartari to Renuka and introducing himself told everything to her right from Bhartari's birth. He told her to take care of Bhartari. Further he assured her that nobody would take Bhartari from them. Renuka told everything to Jaysing. As Bhartari grew older day by day, Jaysing and Renuka thought of his marriage and decided to leave Kashi and to go to their native village. However in the forest they met with the thieves who killed Jaysing and took the money and everything with them. Renuka also died because of the shock. Bhartari became very sad and could not understand what to do. However a group of traders saw him and took him with them. What happened next would be told to us in the next 25th Adhayay by Dhudisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४) भाग २/२
आसन वसन भोजन पान । देती करिती बहु लालन ।
बाळ खेळतांना पाहून । हर्षयुक्त होती तीं ॥ १०१ ॥
बाळ भर्तरी पंचवर्षी । बोबडे बोले नाचे महीसी ।
नाच नाचोनि धांवोनि कंठासी । मिठी घाली मातेच्या ॥ १०२ ॥
मिठी घालितां रेणुका सती । उचलूनि घेत अंगावरती ।
चुंबन घेता उभय तीं । हास्यवदन करिताती ॥ १०३ ॥
हांसूनि एकमेकां म्हणती । ईश्र्वर पावला आपणांप्रती ।
उदरीं नसतां स्वसंतती । ईश्र्वरें दिधला कृपेनें ॥ १०४ ॥
दिधला परी आक्षेप चित्तासी । घेऊनि म्हणती या बाळासी ।
मातापिता चुकल्यासी । शोधीत असती महीतें ॥ १०५ ॥
परी तीं शोधितां कोठें । अवचित जरी पडली गांठ ।
मग तीं आपणांपासूनि नेटें । घेऊनि जातील बाळातें ॥ १०६ ॥
ऐसी चिंता उभय तीं । नित्य नित्य हृदयीं वाहती ।
अहा हें बाळ अलोलिक स्थिती । स्वरुपा मिती नसे त्याच्या ॥ १०७ ॥
ऐसें बाळ हें परम सगुण । हें तों नेतील आम्हांपासून ।
ऐसें चिंतिती परी मन । घोंटाळत उभयतांचें ॥ १०८ ॥
मग तीं उभयतां विचार करिती । कीं यासी सोडूनि क्षेत्राप्रती ।
मही हिंडता कोणे क्षितीं । गांठी पडेल तयांची ॥ १०९ ॥
मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून । राहते झाले भिक्षुकपणें ।
भिक्षा मागूनि क्षेत्राकारण । निर्वाहाते चालविती ॥ ११० ॥
यापरी तें भर्तरी बाळ । मेळ मुलांचे स्थावरमंडळ ।
तयांमाजी खेळे खेळ । राजचिन्हें सर्वस्वीं ॥ १११ ॥
आपण सर्वांचा होऊनि राव । मुलांचींच मुलें सर्व ।
काठीचे करुनि अश्र्व । शाळा लाविल्या तयानें ॥ ११२ ॥
मंत्री परिचारक पायदळ जन । स्वार झुंझार कारकून ।
नाना वेष मुलांसी दाखवून । राजचिन्हें करीतसे ॥ ११३ ॥
तरी खेळ नव्हे भविष्य होणार । होय भाग्याचा संस्कार ।
जैसें ज्याचें भाग्य पर । चिन्हें उदय पावलीं ॥ ११४ ॥
तरी असो राजचिन्हीं । खेळ खेळतां बाळपणीं ।
तों एके दिवशीं आरोहणोनी । काष्ठशालिके पळताती ॥ ११५ ॥
पळती ते वाताकृती । मुखें हो हो करुनि म्हणती ।
हो हो म्हणूनि थापटिती । काष्ठशालिके अश्र्वातें ॥ ११६ ॥
ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र । धांवती भरले काननीं सर्वत्र ।
एकान्त विपिनीं खेळ खेळत । सन्निध कोणी नसेचि ॥ ११७ ॥
परी ते काननचव्हाट्यांत । भर्तरी धांवता शालिकाअश्र्वातें ।
तों पायासी ठेंच लागूनि महीतें । उलथोनियां पडियेला ॥ ११८ ॥
पडिला महीं कासावीस । होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ।
नेत्रें विकासूनि महीतें । दाविता झाला तत्क्षणीं ॥ ११९ ॥
ते श्र्वेतवर्ण पाहूनि नयन । अर्भकें (लहान मुलें) पळालीं भयेंकरुन ।
म्हणती भर्तरी पावला मरण । भूत होईल आतां हा ॥ १२० ॥
मग हा आपुल्या लागोनि पाठीं । भक्षील सकळ मग शेवटीं ।
ऐसें भय मानूनि पोटीं । पळूनि गेलीं अर्भकें ॥ १२१ ॥
जाऊनि भागीरथीघांटावर । करीत बैसलीं आहेत विचार ।
म्हणती भर्तरिया भूत थोर । होऊनि हिंडे ग्रामांत ॥ १२२ ॥
मग गडे हो आपण गल्लीसी । कैसें खेळावें भक्षील आपणांसी ।
तरी आतां आपुले ग्रामासी । खेळ खेळू सदनांत ॥ १२३ ॥
यापरी दुसरा अर्भक बोलत । कीं बरवें सांडिलें काननातें ।
मनुष्य कोणी नव्हते तेथें । भक्षिलें असते आपणांसी ॥ १२४ ॥
ऐसे अर्भक घांटावर । करीत बैसले आहेत विचार ।
तों येरीकडे मूर्च्छा अपार । भर्तरीतें वेधली ॥ १२५ ॥
मही पडलासे उलथोन । शरीर सुकले तेणेंकरुन ।
ठायीं ठायीं भेदले पाषाण । रुधिर तेणें वाहातसे ॥ १२६ ॥
ऐसें होतां अवस्थेसी । मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ।
मग पुत्रमोह हृदयासी । परम कळवळा दाटला ॥ १२७ ॥
मग महीस मित्रावरुणी । येता झाला स्नेहेंकरुनी ।
अति लगबगें बाळ उचलोनी । हृदयालागीं कवळिलें ॥ १२८ ॥
त्वरें आणूनि भागीरथीजीवन । तयासी करविलें तोयपान ।
हृदयालागीं आलिंगून । सावध केलें बाळासी ॥ १२९ ॥
आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं । मग दुःखलेशाची झाली फिटी ।
पाषाणघाव घसवटीं । अदृश्यपणें मिरवले ॥ १३० ॥
मग तो बाळ सावधपणीं । अंकीं घेऊनि मिरवोनि ।
परम स्नेहें मुखावरोनी । वरदहस्तें कुरवाळी ॥ १३१ ॥
यापरी विप्राचा वेष धरोनी । तेथोनि चालिला मित्रावरुणी ।
भर्तरीचा धरोनि पाणी । सदनालागीं आणीतसे ॥ १३२ ॥
तों मार्गीं येतां घाबरे । पाहते झाले सर्व किशोर ।
पाहतांचि म्हणती भर्तरी थोर । भूत होऊनि आला रे ॥ १३३ ॥
ऐसें म्हणूनि आरडोनी । पळताती अति भयेकरुनी ।
आपुलाले सदना जाऊनी । भये दडती संधींत ॥ १३४ ॥
येरीकडे मित्रा वरुणी । सदनीं आला त्यासी घेऊनी ।
माता रेणुकेसी पाचारोनी । म्हणे सांभाळीं बाळातें ॥ १३५ ॥
मग ते चरणीं ठेवूनि माथा । म्हणे महाराजा हे ताता ।
आपण कोण्या ग्रामीं असतां । परम स्नेहाळू आम्हां कीं ॥ १३६ ॥
ते रेणुका प्रेमळ सती । पाहतां विप्र दिव्यमूर्ती ।
वस्रासन टाकूनि निगुतीं । बैसविलें त्यावरी ॥ १३७ ॥
मग म्हणे बाळका करीं कवळून । आणिलें तुम्ही मोहेंकरुन ।
तरी सकळ संशय सोडून । नामाभिधान मज सांगा ॥ १३८ ॥
येरी म्हणे वो सती ऐक । या बाळाचा मी असे जनक ।
म्हणोनि स्नेहाचें दोंदिक । तरी तुजपाशीं मी आलों ॥ १३९ ॥
तरी बाळ तुजकारणें । कायावाचा केलें अर्पण ।
परी तूंही आतां संशय टाकून । संगोपन करीं याचें ॥ १४० ॥
तें ऐकूनि बोले ऐसें । तुम्ही बाळकाचे जनक कैसे ।
येरी म्हणे वो अनायासें । कथा ऐक बाळाची ॥ १४१ ॥
अगे मी विप्रवेषें तूतें । दिसत आहें परी मी दैवत ।
मित्रावरुणी नाम मातें । महीलागीं वदतात ॥ १४२ ॥
मग मूळापासूनि तीतें कथन । भर्तरीपात्रव्यक्त जनन ।
हरिणीस्तनींचें संगोपन । सकळ निर्णय वदलासे ॥ १४३ ॥
तरी या बाळाचे संभवन । अपूर्व आहे महीकारण ।
परी असो पूर्ण दैवानें । लाभ झाला तुज याचा ॥ १४४ ॥
झाला परी आर्तभूत । जगीं म्हणवीं कां आपुला सुत ।
काया वाचा बुद्धि सुत । रक्षण करीं उचित हें ॥ १४५ ॥
ऐसें सांगूनि मित्रावरुणी । जाता झाला आपुले स्थानीं ।
येरीकडे नितंबिनी । परम चित्तीं तोषली ॥ १४६ ॥
मग भ्रतारासी सांगे वर्तमान । तोही हर्षें ऐकून ।
मग जननीजनकांचें भय पूर्ण । बाळप्रकरणीं फिटलें कीं ॥ १४७ ॥
जैसें वस्र स्पर्शिल्या साबणीं । सकळ मळाची होय हानी ।
तेवीं मित्रावरुणीवाचेकरुनी । सकळ संशय फिटलासे ॥ १४८ ॥
किंवा गढूळ झालें असतां उदक । स्थिरावल्या दावी पवित्र मुख ।
तेवीं त्यांचा समूळ धाक । फिटूनि गेला तत्काळ ॥ १४९ ॥
कीं दारा सगुणपर । गृहीं असतां गरोदर ।
परी प्रसूतीचे भय थोर । प्रसूत झालिया फिटतसे ॥ १५० ॥
कीं अनभ्यस्त कांसे लागतां । परम भय मानी पार होतां ।
परी पार झालिया सकळ चिंता । फिटोनि जाय सरितेची ॥ १५१ ॥
कीं अचाट काननीं तस्करभयातें । मार्ग मिळाला भयव्यक्त ।
परी पार वस्ती पावल्या स्वस्थचित्त । भयापासूनि होतसे ॥ १५२ ॥
तन्न्यायें मित्रावरुणी । वार्ता ऐकतां उभय कर्णीं ।
भयमुक्त होती आनंदोनी । हेलावे चित्त पूर्णत्वें ॥ १५३ ॥
जैसें दुःख जाऊनि होतां सुख । पोसे शरीर दोंदिक ।
तेवीं त्यांचें चित्तीं बलाहक (मेघ) । आनंदाचा उदेला ॥ १५४ ॥
मग ते अतिप्रेमेंकरुन । आशापाशाचें गुंतलें बंधन ।
मग परम स्नेहाचा खुंट उभवोन । गरके घालिती त्यासवें ॥ १५५ ॥
ऐसियापरी दिवसेंदिवस । परम उदेलीं लालनपालनास ।
तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस । पंच वरुषें लोटलीं ॥ १५६ ॥
तो षड्दशवर्षीं भर्तरीनाथ । पूर्ण झाला वयें व्यक्त ।
जयसिंग आणि रेणुकेप्रत । लग्नविचार सूचला ॥ १५७ ॥
मग उभयतां बैसूनि एकांतीं । म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ।
लक्षूनि संबंधा जाती । लग्न करुं बाळाचें ॥ १५८ ॥
ऐसा विचार उभयतां करोनि । सोडिते झाले क्षेत्रालागोनी ।
माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी । मार्ग धरिती तयाचा ॥ १५९ ॥
मार्गी चालतां ग्रामोग्रामीं । भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ।
मार्गीं चालतां भविष्य वर्मी । विकट झगटलें येऊनि ॥ १६० ॥
मार्गी चालता काननांत । तस्कर येऊनि अकस्मात ।
जयसिंग शस्रघातें । मुक्त केला प्राणांतें ॥ १६१ ॥
जवळी होतें वित्त कांहीं । तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ।
जयसिंगाचें प्रेत महीं । निचेष्टित पडियेलें ॥ १६२ ॥
मग तें पाहूनि रेणुका सती । प्रेत कवळूनि देहानिगुतीं ।
परम शोक देहाप्रती । सांडिती झाली तेधवां ॥ १६३ ॥
मग तीं उभयतां स्रीपुरुष । भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ।
अग्नि लावूनि उभयतांस । शोकडोहीं बुडाला ॥ १६४ ॥
उभयतांचे करितां दहन । परी शोकविशोकें पोळे प्राण ।
म्हणे अहा तातमातेनें । कैसें सोडिलें काननीं या ॥ १६५ ॥
अहा तुम्ही जननी जनक । पहातें झालां परत्रलोक ।
यावरी महीतें मायिक । कोणी नसे मजलागीं ॥ १६६ ॥
अहा जननी रेणुकानाम्नी । कैसी गेली मज सोडोनी ।
आतां आई आई म्हणोनि वाणी । बोलावूं मी कोणातें ॥ १६७ ॥
अहा जननी तूं परम मायिक । जाणती होतीस तृषाभूक ।
आतां निकटपणीं लोक । परम कैसें पाहतील ॥ १६८ ॥
अहा जननी रात्रींतून । तीन वेळां उठोन ।
करवीत होतीस तोयपान । तरी मन निष्ठुर कां केलें ॥ १६९ ॥
अहा हृदयीं धरुनि करिसी चुंबन । वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ।
ऐसे म्हणोनि उदकपान । करवीत अससी नित्यशा ॥ १७० ॥
ऐसी माय तूं सघन । असोनि केलें निष्ठुरपण ।
मज ऐसा वनीं सोडून । गेलीस कैसी जननीये ॥ १७१ ॥
अहा ताता जयसिंगनामीं । कैसा गेलासी मज टाकुनी ।
आतां पृथ्वीवर दैन्यावाणी । कोठे राहूं निराश्रित ॥ १७२ ॥
अहा ताता बाहेर जातां । खाऊ मजला आणीत होतां ।
तो मुगुटीं खोवूनि सदनीं येतां । पाचारुनी मज देशी ॥ १७३ ॥
ऐसा मोह असतां पोटीं । सांडूनि गेलासी विपिनीं देठीं ।
ऐसें म्हणूनि करसंपुटीं । वक्षःस्थळ पिटीतसे ॥ १७४ ॥
ऐसें रुदन करीत करीत । पेटवूनि झाला शांतचित्त ।
परी तो तेथूनि न उठे त्वरित । प्राण सोडूं पहातसे ॥ १७५ ॥
तों मार्गेकरुनि व्यवसायिक । त्या वंजारें वृषभकटक ।
त्यांनीं पाहूनि त्याचा शोक । परम चित्तीं कळवळले ॥ १७६ ॥
मग तयापाशीं येऊन । पुसोनि घेतलें वर्तमान ।
वर्तमान कळल्या बोलती वचन । बोधनीतीं तयातें ॥ १७७ ॥
म्हणती अगा भाटसुता । शोक करिसी अति वृथा ।
होणार झालें विषयमाथां । विधिअक्षरें नेमीत ॥ १७८ ॥
जरी तूं आतां करिसी शोक । तरी काय मिळतील जननी जनक ।
ईश्र्वरकरणी प्रारब्ध फुटकें । आपुलेंचि म्हणावें ॥ १७९ ॥
तरी आतां धैर्य करुन । हित पाहावें आपुलें आपण ।
संसार करुनि आपुलें मतीनें । तीन्ही लोकीं मिरवावें ॥ १८० ॥
ऐसें म्हणूनि बोध अपार । उठविला त्याचा धरुनि कर ।
मग सवें घेऊनि मुक्कामावर । आणिलासे भर्तरी ॥ १८१ ॥
मुक्कामीं राहूनि सकळ जन । रात्रीं देऊनि अन्नपान ।
दुसरे दिवशीं सवें घेऊन । पुन्हां जात व्यवसायी ॥ १८२ ॥
ऐसेंपरी सात पांच दिन । शोक करितां गेले लोटून ।
मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण । सहजस्थिती वर्ततसे ॥ १८३ ॥
मग त्या व्यावसायिकां सहज । करुं लागला तयांचे काज ।
काज होतां तेजःपुंज । सकळ चाहती आदरानें ॥ १८४ ॥
मग आसन वसन भूषणांसहित । व्यवसायिक सकळ संपादीत ।
ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत । लोटूनि गेले तयाचे ॥ १८५ ॥
यावरी व्यवसायिक । धान्य भरुनि अति अमूप ।
उज्जयिनी शहर अवंतिक । मार्ग धरिला तयाचा ॥ १८६ ॥
मार्ग सरतां वृषभकटका । येऊनि पोहोंचला अवंतिका ।
तेथें कथेचा रस निका । होईल तो स्वीकारा पुढें ॥ १८७ ॥
म्हणाल पुढिले अध्यायीं रस । उगाचि मानाल स्वचित्तास ।
ऐसें तरी न म्हणावें पीयूष । चवी घेतां कळों येईल ॥ १८८ ॥
तरी ती कथा सुधारस थोर । वाढी श्रोत्यां धुंडीकुमर ।
मालू ऐसा नामोच्चार । नरहरिकृपें मिरवतसे ॥ १८९ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । चतुर्विंशतितमाध्याय गोड हा ॥ १९० ॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार चतुर्विशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath BhaktiSar Adhyay 24 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चोविसावा (२४)
Custom Search