Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 20 Doha 42 to 43 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग २० दोहा ४२ ते ४३

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 20 
Doha 42 to 43 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग २० 
दोहा ४२ ते ४३

दोहा—राका रजनी भगति तव राम नाम सोइ सोम ।

अपर नाम उडगन बिमल बसहुँ भगत उर ब्योम ॥ ४२ ( क ) ॥

तुमची भक्ती ही पौर्णिमेची रात्र आहे. आणि तिच्यात ‘ राम ‘ नाम हे पूर्ण चंद्रासारखे बनून इतर सर्व नामे तारागण बनून भक्तांच्या हृदयरुपी निर्मळ आकाशात निवास करोत. ‘ ॥ ४२ ( क ) ॥

एवमस्तु मुनि सन कहेउ कृपासिंधु रघुनाथ ।

तब नारद मन हरष अति प्रभु पद नायउ माथ ॥ ४२ (ख ) ॥

कृपासागर श्रीरघुनाथांनी मुनींना ‘ तथास्तु ‘ म्हटले. तेव्हा नारद मनापासून आनंदित होऊन प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. ॥ ४२ ( ख ) ॥

अति प्रसन्न रघुनाथहि जानी । पुनि नारद बोले मृदु बानी ॥

राम जबहिं प्रेरेउ निज माया । मोहेहु मोहि सुनहु रघुराया ॥

श्रीरघुनाथ अत्यंत प्रसन्न असलेले पाहून नारद पुन्हा मृदू वाणीने म्हणाले –‘ हे श्रीराम, हे रघुनाथ, जेव्हा तुम्ही आपल्या मायेने मला प्रेरित करुन मोहित केले होते, ॥ १ ॥

तब बिबाह मैं चाहउँ कीन्हा । प्रभु केहि कारन करै न दीन्हा ॥

सुनु मुनि तोहि कहउँ सहरोसा । भजहिं जे मोहि तजि सकल भरोसा ॥

तेव्हा मी विवाह करु इच्छित होतो. हे प्रभू, तुम्ही त्या वेळी मला कोणत्या कारणाने विवाह करु दिला नाहीत ? ‘ प्रभू म्हणाले, ‘ हे मुनि, मी तुम्हांला अत्यंत हर्षाने सांगतो की, जे सर्व आशा व विषयविश्वास सोडून फक्त मलाच भजतात. ॥ २ ॥

करउँ सदा तिन्ह कै रखवारी । जिमि बालक राखइ महतारी ॥

गह सिसु बच्छ अनल अहि धाई । तहँ राखइ जननी अरगाई ॥

त्यांचे रक्षण मी, माता जशी बालकाची काळजी घेते, तशी करतो. लहान मूल जेव्हा धावत आग किंवा साप पकडण्यास जाते, तेव्हा आई त्याला हाताने मागे ओढून वाचविते. ॥ ३ ॥

प्रौढ़ भएँ तेहि सुत पर माता । प्रीति करइ नहिं पाछिलि बाता ॥

मोरें प्रौढ़ तनय सम ग्यानी । बालक सुत सम दास अमानी ॥

मूल शहाणे झाल्यावर माता त्याच्यावर प्रेम तर करते, पण ती पूर्वीची गोष्ट उरत नाही. माता त्याला वाचविण्याची काळजी करीत नाही. तो आपले रक्षण आपण करु शकतो. ज्ञानीजन हे माझे प्रौढ शहाण्या पुत्रासारखे आहेत. तुमच्यासारखा आपल्या बळाची घमेंड न बाळगणारा सेवक हा माझ्या लहान मुलासारखा आहे. ॥ ४ ॥

जगहि मोर बल निज बल ताही । दुहु कहँ काम क्रोध रिपु आही ॥

यह बिचारि पंडित मोहि भजहीं । पाएहुँ ग्यान भगति नहिं तजहीं ॥

माझ्या सेवकाला फक्त माझ्याच बळाचा आधार असतो. आणि तो ज्ञानी मनुष्य स्वतःच्या बळावर विसंबून असतो. परंतु काम-क्रोधरुपी शत्रू हे तर दोघांनाही आहेत. भक्ताच्या शत्रूला मारण्याची जबाबदारी माझी आहे, कारण तो मला शरण असल्यामुळे माझेच बळ मानतो, परंतु स्वतःचे बळ मानणार्‍या ज्ञानी मनुष्याचीजबाबदारी माझ्यावर नाही. असा विचार करुन बुद्धिमान लोक मलाच भजतात. ज्ञान प्राप्त झाल्यावरही ते भक्ती सोडत नाहीत. ॥ ५ ॥

दोहा—काम क्रोध लोभादि मद प्रबल मोह कै धारि ।

तिन्ह महँ अति दारुन दुखद मायारुपी नारि ॥ ४३ ॥

काम, क्रोध, लोभ, मद इत्यादि प्रबळ सेना आहे. यामध्ये मायारुपिणी स्त्री ही अत्यंत दारुण दुःख देणारी आहे. ॥ ४३ ॥

सुनु मुनि कह पुरान श्रुति संता । मोह बिपिन कहुँ नारि बसंता ॥

जप तप नेम जलाश्रय झारी । होइ ग्रीषम सोषइ सब नारी ॥

हे मुनि, ऐका. पुराण, वेद व संत असे म्हणतात की, मोहरुपी वनाला फुलविणारा हा वसंत ऋतू आहे. जप, तप, नियमरुपी संपूर्ण जल-स्थानांना स्त्री ही ग्रीष्म ऋतू बनून शोषून घेते. ॥ १ ॥

काम क्रोध मद मत्सर भेका । इन्हहि हरषप्रद बरषा एका ॥

दुर्बासना कुमुद समुदाई । तिन्ह कहँ सरद सदा सुखदाई ॥

काम, क्रोध, मद व मत्सर हे बेडूक आहेत. यांना वर्षा-ऋतू बनून हर्ष देणारी स्त्री हीच एकमात्र आहे. वाईट वासना या कुमूदांचे समूह आहेत. त्यांना सदैव सुख देणारी स्त्री ही शरदऋतू आहे. ॥ २ ॥

धर्म सकल सरसीरुह बृंदा । होइ हिम तिन्हहि दहइ सुख मंदा ॥

पुनि ममता जवास बहुताई । पलुहइ नारि सिसिर रितु पाई ॥

संपूर्ण धर्म हे कमलांचे ताटवे आहेत. ही विषयजन्य सुख देणारी स्त्री हिम-ऋतू होऊन त्यांना नष्ट करते. मग ममतारुपी तांबड्या धमाशाचे वन स्त्रीरुपी शिशिर-ऋतू येताच हिरवेगार बनते. ॥ ३ ॥

पाप उलूक निकर सुखकारी । नारि निबिड़ रजनी अँधाआरी ॥

बुधि बल सील सत्य सब मीना । बनसी सम त्रिय कहहिं  प्रबीना ॥

पापरुपी घुबडांच्या समूहांना सुख देणारी स्त्री ही घोर

 अंधकारमय रात्र आहे. बुद्धी, बल, शील व सत्य हे सर्व

 मासे आहेत आणि त्यांना फसवून त्यांचा नाश

 करण्यासाठी स्त्री ही गळासारखी आहे, असे चतुर पुरुष

 म्हणतात. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 19 Doha 40 to 41 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १९ दोहा ४० ते ४१

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 19 
Doha 40 to 41 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १९ 
दोहा ४० ते ४१

दोहा—फल भारन नमि बिटप सब रहे भूमि निअराइ ।

पर उपकारी पुरुष जिमि नवहिं सुसंपति पाइ ॥ ४० ॥

फळांच्या ओझ्यामुळे वृक्ष वाकून जमिनीजवळ येऊन टेकत, ज्याप्रमणे परोपकारी पुरुष खूप संपत्ती मिळाल्यावरही विनयाने नम्र होतात. ॥ ४० ॥

देखि राम अति रुचिर तलावा । मज्जनु कीन्ह परम सुख पावा ॥

देखी सुंदर तरुबर छाया । बैठे अनुज सहित रघुराया ॥

श्रीरामांनी ते सुंदर सरोवर पाहून स्नान केले. त्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. एका सुंदर व उत्तम वृक्षाची सावली पाहून श्रीराम लक्ष्मणासह तेथे बसले. ॥ १ ॥

तहँ पुनि सकल देव मुनि आए । अस्तुति करि निज धाम सिधाए ॥

बैठे परम प्रसन्न कृपाला । कहत अनुज सन कथा रसाला ॥

मग तेथे सर्व देव व मुनी आले आणि श्रीरामांची स्तुती करुन घरी परत गेले. कृपाळू श्रीराम अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणाला रसाळ कथा सांगत होते. ॥ २ ॥

बिरहवंत भगवंतहि देखी । नारद मन भा सोच बिसेषी ॥

मोर साप करि अंगीकारा । सहत राम नाना दुख भारा ॥

भगवंतांना विरही अवस्थेत पाहून नारदांना मनातून विशेष दुःख झाले. त्यांनी विचार केला की, माझाच शाप स्वीकारुन श्रीराम हे नाना प्रकारची दुःखे  सहन करीत आहेत. ॥ ३ ॥

ऐसे प्रभुही बिलोकउँ जाई । पुनि न बनिहि अस अवसरु आई ॥

यह बिचारि नारद कर बीना । गए जहॉं प्रभु सुख आसीना ॥  

अशा भक्तवत्सल प्रभूंना जाऊन पाहावे तरी पुन्हा अशी संधि येणार  नाही. असा विचार करुन नारद हातात वीणा घेऊन प्रभू जेथे सुखाने बसले होते तेथे गेले. ॥ ४ ॥

गावत राम चरित मृदु बानी । प्रेम सहित बहु भॉंति बखानी ॥

करत दंडवत लिए उठाई । राखे बहुत बार उर लाई ॥

ते कोमल वाणीने व मोठ्या प्रेमाने राम-चरित्राचे वर्णन गात जात होते. ते दंडवत करीत आहेत, असे पाहून श्रीरामांनी त्यांना उठवले व हृदयाशी धरले. ॥ ५ ॥

स्वागत पूँछि निकट बैठारे । लछिमन सादर चरन पखारे ॥

नंतर त्यांचे स्वागत करुन व खुशाली विचारुन त्यांना आपल्याजवळ बसवून घेतले. लक्ष्मणाने आदराने त्यांचे चरण धुतले. ॥ ६ ॥

दोहा—नाना बिधि बिनती करि प्रभु प्रसन्न जियँ जानि ।

नारद बोले बचन तब जोरि सरोरुह पानि ॥ ४१ ॥

अनेक प्रकारे प्रभूंची विनवणी करुन व ते प्रसन्न आहेत, असे पाहून नारद आपले कर-कमल जोडून म्हणाले, ॥ ४१ ॥

सुनहु उदार सहज रघुनायक । सुंदर अगम सुगम बर दायक ॥

देहु एक बर मागउँ स्वामी । जद्यपि जानत अंतरजामी ॥

‘ हे स्वभावाने उदार असलेल्या श्रीरघुनाथा, तुम्ही सुंदर, दुर्लभ व सुखदायक वर देणारे आहात. हे स्वामी, मी एक वर मागतो, तो मला द्या. अंतर्यामी असल्यामुळे तुम्ही सर्व जाणताच. ‘ ॥ १ ॥

जानहु मुनि तुम्ह मोर सुभाऊ । जन सन कबहुँ कि करउँ दुराऊ ॥

कवन बस्तु असि प्रिय मोहि लागी । जो मुनिबर न सकहु तुम्ह मागी ॥

श्रीराम म्हणाले, ‘ हे मुनी, तुम्ही माझा स्वभाव जाणताच. मी आपल्या भक्तांपासून काही लपवून ठेवतो काय ? मला अशी कोणती गोष्ट प्रिय वाटते की, ती हे मुनिश्रेष्ठ, तुम्ही मागू शकणार नाही ? ॥ २ ॥

जन कहुँ कछु अदेय नहिं मोरें । अस बिस्वास तजहु जनि भोरें ॥

तब नारद बोले हरषाई । अस बर मागउँ करउँ ढिठाई ॥

भक्ताला न देण्यासारखे माझ्याकडे काही नाही, हा विश्वास चुकूनही विसरु नका. ‘ तेव्हा हर्षित होऊन नारद म्हणाले की, ‘ मी असा वर मागण्याचे धाडस करीत आहे. ॥ ३ ॥

जद्यपि प्रभु के नाम अनेका । श्रुति कह अधिक एक तें एका ॥

राम सकल नामन्ह तें अधिका । होउ नाथ अघ खग गन बधिका ॥

जरी प्रभुंची अनेक नावे आहेत आणि ती सर्व एकापेक्षा

 एक श्रेष्ठ आहेत, असे वेद सांगतात, तरीही हे नाथ,

 रामनाम हे सर्व नामांहून श्रेष्ठ असावे आणि ते पापरुपी

 पक्ष्यांच्या समूहासाठी पारध्याप्रमाणे असावे. ॥ ४ ॥



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 18 Doha 38 to 39 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १८ दोहा ३८ ते ३९

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 18 
Doha 38 to 39 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १८ 
दोहा ३८ ते ३९

दोहा—तात तीनि अति प्रबल खल काम क्रोध अरु लोभ ।

मुनि बिग्यान धाम मन करहिं निमिष महुँ छोभ ॥ ३८ ( क) ॥

हे बंधो ! काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही अत्यंत प्रबल व दुष्ट आहेत. ते ज्ञानसंपन्न मुनींचेही मन क्षणात क्षुब्ध करुन टाकतात. ॥ ३८ ( क ) ॥

लोभ कें इच्छा दंभ बल काम कें केवल नारि ।

क्रोध कें परुष बचन बल मुनिबर कहहिं बिचारि ॥ ३८ ( ख ) ॥

लोभाला इच्छा व दंभाचे बळ असते, कामाला केवळ स्त्रीचे बळ असते आणि क्रोधाला कठोर वचनांचे. श्रेष्ठ मुनी विचारपूर्वक असेच सांगतात. ‘ ॥ ३८ ( ख ) ॥

गुनातीत सचराचर स्वामी । राम उमा सब अंतरजामी ॥

कामिन्ह कै दीनता देखाई । धीरन्ह कें मन बिरति दृढ़ाई ॥

शिव म्हणतात, ‘ हे पार्वती, श्रीरामचंद्र हे त्रिगुणातीत, चराचर जगाचे स्वामी आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहेत. ‘ त्यांनी वरील वर्णनातून कामी लोकांची लाचारी दाखवून दिली आणि विवेकी पुरुषांच्या मनातील वैराग्य दृढ केले. ॥ १ ॥

क्रोध मनोज लोभ मद माया । छूटहिं सकल राम कीं दाया ॥

सो नर इंद्रजाल नहिं भूला । जा पर होइ सो नट अनुकूला ॥

काम, क्रोध, लोभ, मद आणि माया हे सर्व श्रीरामांच्या दयेमुळे सुटतात. ते नटराज भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होतात, तो मनुष्य मायेमुळे भटकत नाही. ॥ २ ॥

उमा कहउँ मैं अनुभव अपना । सत हरि भजनु जगत सब सपना ॥

पुनि प्रभु गए सरोबर तीरा । पंपा नाम सुभग गंभीरा ॥

हे उमे, मी तुला आपला अनुभव सांगतो. हरीचे भजन सत्य आहे आणि हे संपूर्ण जग स्वप्नाप्रमाणे खोटे आहे. नंतर प्रभू श्रीराम पंपा नामक सुंदर आणि अथांग सरोवराकाठी आले. ॥ ३ ॥

संत हृदय जस निर्मल बारी । बॉंधे घाट मनोहर चारी ॥

जहँ तहँ पिअहिं बिबिध मृग नीरा । जनु उदार गृह जाचक भीरा ॥

त्या सरोवराचे पाणी संतांच्या हृदयाप्रमाणे निर्मळ होते. त्याला बांधलेले मनोहर सुंदर चार घाट होते. तर्‍हेतर्‍हेचे पशू इकडे तिकडे पाणी पीत होते. जणू उदार दानी पुरुषांच्या घरी याचकांची गर्दी झालेली असावी. ॥ ४ ॥

दोहा—पुरइनि सघन ओट जल बेगि न पाइअ मर्म ।

मायाछन्न न देखिऐ जैसें निर्गुन ब्रह्म ॥ ३९ ( क ) ॥

दाट कमल-पत्रांनी झाकलेल्या पाण्याचा लवकर पत्ता लागत नाही, ज्याप्रमाणे मायेने झाकल्यामुळे निर्गुण ब्रह्म दिसत नाही. ॥ ३९ ( क ) ॥

सुखी मीन सब एकरस अति अगाध जल माहिं ।

जथा धर्मसीलन्ह के दिन सुख संजुत जाहिं ॥ ३९ ( ख ) ॥

त्या सरोवराच्या अत्यंत अथांग जलामध्ये सर्व मासे सतत एकसमान सुखी राहात होते. ज्याप्रमाणे धर्मशील पुरुषांचे सर्व दिवस सुखात जातात. ॥ ३९ ( ख ) ॥

बिकसे सरसिज नाना रंगा । मधुर मुखर गुंजत बहु भृंगा ॥

बोलत जलकुक्कुट कलहंसा । प्रभु बिलोकि जनु करत प्रशंसा ॥

त्यात रंगी-बेरंगी कमळे उमललेली होती. पुष्कळ भ्रमर मधुर स्वरांनी गुंजारव करीत होते. पाणकोंबडे व राजहंस बोलत होते, जणु प्रभूंना पाहून ते त्यांची प्रशंसा करीत असावेत. ॥ १ ॥

चक्रबाक बक खग समुदाई । देखत बनइ बरनि नहिं जाई ॥

सुंदर खग गन गिरा सुहाई । जात पथिक जनु लेत बोलाई ॥

चक्रवाक, बगळे इत्यादी पक्ष्यांचे समुदाय पाहातच राहावे, असे वर्णनीय वाटत होते. सुंदर पक्ष्यांची किलबिल फार गोड वाटत होती; जणू रस्त्याने जाणार्‍या वाटसरुंना ते बोलावीत होते. ॥ २ ॥

ताल समीप मुनिन्ह गृह छाए । चहु दिसि कानन बिटप सुहाए ॥

चंपक बकुल कदंब तमाला । पाटल पनस परास रसाला ॥

त्या सरोवराच्याजवळ मुनींनी आश्रम बनविले होते. त्याच्या चारी बाजूंना वनातील सुंदर वृक्ष होते. चाफा, बकुळ, कदंब, तमाल, पाटस, फणस, पळस, आम्रवृक्ष इत्यादी ॥ ३ ॥

नव पल्लव कुसुमित तरु नाना । चंचरीक पटली कर गाना ॥

सीतल मंद सुगंध सुभाऊ । संतत बहइ मनोहर बाऊ ॥

अनेक प्रकारचे वृक्ष नवनवीन पाने आणि सुगंधित फुलांनी भरलेले होते, त्यांवर भ्रमरांचे समूह गुंजारव करीत होते. तसेच शीतल, मंद, सुगंधित हवा नित्य वाहात होती. ॥ ४ ॥

कुहू कुहू कोकिळ धुनि करहीं । सुनि रव सरस ध्यान मुनि टरहीं ॥

कोकिळ ‘ कुहू-कुहू ‘ बोलत होते. त्यांचे मधुर बोल ऐकून मुनींचे ध्यानही भंग पावत होते. ॥ ५ ॥   



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 17 Doha 36 to 37 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १७ दोहा ३६ ते ३७

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 17 
Doha 36 to 37 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १७ 
दोहा ३६ ते ३७

छं०—कहि कथा सकल बिलोकि हरि मुख हृदयँ पद पंकज धरे ।

तजि जोग पावक देह हरि पद लीन भइ जहँ नहिं फिरे ॥

नर बिबिध कर्म अधर्म बहु मत सोकप्रद सब त्यागहू ।

बिस्वास करि कह दास तुलसी राम पद अनुरागहू ॥

सर्व कथा सांगितल्यावर भगवंतांच्या मुखाचे दर्शन घेऊन, हृदयामध्ये तिने त्यांचे चरण-कमल धारण केले आणि योगाग्नीने देह-त्याग करुन ती दुर्लभ हरिपदांमध्ये लीन झाली की, जेथून परत यावे लागत नाही. तुलसीदास म्हणतात की, अनेक प्रकारची कर्मे, अधर्म आणि अनेक मते ही सर्व दुःख देणारी आहेत. मनुष्यांनो, त्यांचा त्याग करा आणि विश्र्वासपूर्वक श्रीरामांच्या चरणीं प्रेम करा.

दोहा—जाति हीन अघ जन्म महि मुक्त कीन्हि असि नारि ।

महामंद मन सुख चहसि ऐसे प्रभुहि बिसारि ॥ ३६ ॥

जी शबरी हलक्या जातीत जन्मली असतानाही तिला ज्यांनी मुक्त केले, अरे महामूर्ख मना, तू अशा प्रभूंना विसरुन ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा करतोस ? ॥ ३६ ॥

चले राम त्यागा बन सोऊ । अतुलित बल नर केहरि दोऊ ॥

बिरही इव प्रभु करत बिषादा । कहत कथा अनेक संबादा ॥

श्रीरामचंद्रांनी ते वन सोडले आणि ते पुढे निघाले. दोन्ही पुरुषसिंह बंधू अतुलनीय बलवान होते. प्रभू एखाद्या विरही पुरुषाप्रमाणे विषाद करीत अनेक कथा सांगत संवाद करीत होते. ॥ १ ॥

लछिमन देखु बिपिन कइ सोभा । देखत केहि कर मन नहिं छोभा ॥

नारि सहित सब खग मृग बृंदा । मानहुँ मोरि करत हहिं निंदा ॥

‘ हे लक्ष्मणा, जरा वनाची शोभा तर बघ. ती पाहून कुणाचे मन क्षुब्ध होणार नाही ? पक्षी व पशूंचे समूह हे सर्व आपापल्या माद्यांसोबत आहेत, जणूं ते माझी निंदा करीत आहेत. ॥ २ ॥

हमहि देखि मृग निकर पराहीं । मृगीं कहहिं तुम्ह कहँ भय नाहीं ॥

तुम्ह आनंद करहु मृग जाए । कंचन मृग खोजन ए आए ॥

आपणाला पाहून घाबरुन हरिणांचे कळप पळत आहेत, तेव्हा हरिणी त्यांना म्हणत आहेत, ‘ तुम्ही भिऊ नका. तुम्ही तर सामान्य हरीण आहात, म्हणून तुम्ही आनंदात राहा. हे लोक सोन्याचे हरीण शोधायला आले आहेत.’ ॥ ३ ॥

संग लाइ करिनीं करि लेहीं । मानहुँ मोहि सिखावनु देहीं ॥

सास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखिअ । भूप सुसेवित बस नहिं लेखिअ ॥

हत्ती हत्तिणींच्या मागे असतात. ते जणू मला शिकवीत आहेत की, ‘ स्त्रीला कधी एकटे सोडू नये. गहनपणे चिंतन केलेली शास्त्रेही वारंवार पाहात राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे सेवा केल्यावरही राजा आपल्याला वश आहे, असे समजू नये. ॥ ४ ॥

राखिअ नारि जदपि उर माहीं । जुबती सास्त्र नृपति बस नाहीं ॥

देखहु तात बसंत सुहावा । प्रिया हीन मोहि भय उपजावा ॥

आणि स्त्रीला अगदी हृदयात ठेवले, तरी युवती स्त्री, शास्त्र आणि राजा कुणालाही वश होत नाहीत. हे बंधो ! हा सुंदर वसंत ऋतु बघ. प्रियेविना तो माझ्या मनात भय उत्पन्न करीत आहे. ॥ ५ ॥

दोहा---बिरह बिकल बलहीन मोहि जानेसि निपट अकेल ।

सहित बिपिन मधुकर खग मदन कीन्ह बगमेल ॥ ३७ ( क ) ॥

मी विरहाने व्याकूळ, बलहीन आणि अगदी एकटा झालो आहे, हे पाहून कामदेवाने वने, भ्रमर आणि पक्षी यांना घेऊन माझ्यावर हल्ला केला आहे. ॥ ३७ ( क ) ॥

देखि गयउ भ्राता सहित तासु दूत सुनि बात ।

डेरा कीन्हेउ मनहुँ तब कटकु हटकि मनजात ॥ ३७ ( ख ) ॥

परंतु जेव्हा त्याला दिसले की, माझ्यासोबत भाऊ आहे, मी एकटा नाही, तेव्हा ही गोष्ट ऐकल्यावर कामदेवाने जणू आपली सेना थांबवून तळ ठोकला आहे. ॥ ३७ ( ख ) ॥

बिटप बिसाल लता अरुझानी । बिबिध बितान दिए जनु तानी ॥

कदलि ताल बर धुजा पताका । देखि न मोह धीर मन जाका ॥

विशाल वृक्षांना बिलगलेल्या वेली पाहून असे वाटते की, जणू नाना प्रकारचे तंबू ठोकले आहेत. केळी, ताड हे जणू सुंदर ध्वज-पताका आहेत. त्या पाहून ज्याचे मन धीट आहे, तोच मोहित होणार नाही. ॥ १ ॥

बिबिध भॉंति फूले तरु नाना । जनु बानैत बने बहु बाना ॥

कहुँ कहुँ सुंदर बिटप सुहाए । जनु भट बिलग बिलग होइ छाए ॥

अनेक वृक्ष नाना प्रकारे फुललेले आहेत. जणू ते वेगवेगळे वेष घातलेले पुष्कळ तिरंदाज असावेत, असे वाटते. कुठे कुठे सुंदर वृक्ष शोभून दिसत आहेत. ते जणू वेगवेगळ्या ठिकाणी योध्यांनी छावणी केल्या प्रमाणे वाटतात. ॥ २ ॥

कूजत पिक मानहुँ गज माते । ढेक महोख ऊँट बिसराते ॥

मोर चकोर कीर बर बाजी । पारावत मराल सब ताजी ॥

कोकिळ कूजन करीत आहेत, ते जणू मत्त हत्ती आहेत. तितर, लावा पक्षी जणू उंट व खेचरे आहेत. मोर, चकोर, पोपट, कबूतर आणि हंस हे सर्व जणू अरबी घोडे आहेत. ॥ ३ ॥

तीतिर लावक पदचर जूथा । बरनि न जाइ मनोज बरुथा ॥

रथ गिरि सिला दुंदुभीं झरना । चातक बंदी गुन गन बरना ॥

तितिर व बटेर पक्षी हे पायदळ शिपायांचे जमाव आहेत. कामदेवाची सेना अद्भुत आहे. पर्वतावरील शिळा हे रथ व पाण्याचे झरे हे नगारे आहेत. चातक हे भाट आहेत. ते बिरुदावली गात आहेत. ॥ ४ ॥

मधुकर मुखर भेरि सहनाई । त्रिबिध बयारि बसीठीं आई ॥

चतुरंगिनी सेन सॅंग लीन्हें । बिचरत सबहि चुनौती दीन्हें ॥

भ्रमरांचा गुंजारव दुंदुभी आणि सनई आहेत. शीतल, मंद आणि सुगंधित वारे जणू दूताचे काम करण्यासाठी आले आहेत. अशा प्रकारे चतुरंग सेना बरोबर घेऊन कामदेव जणू सर्वांना आव्हान देत फिरत आहे. ॥ ५ ॥

लछिमन देखत काम अनीका । रहहिं धीर तिन्ह कै जग लीका ॥

एहि कें एक परम बल नारी । तेहि तें उबर सुभट सोइ भारी ॥

हे लक्ष्मणा, कामदेवाची ही सेना पाहूनही जे निश्र्चल

 राहातात, त्यांनाच जगात प्रतिष्ठा मिळते. स्त्रीमध्ये या

 कामदेवाची मोठी शक्ती आहे. तुच्यापासून जो बचावेल,

 तोच मोठा योद्धा होतो. ॥ ६ ॥



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 16 Doha 34 to 35 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १६ दोहा ३४ ते ३५

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 16 
Doha 34 to 35 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १६ 
दोहा ३४ ते ३५

दोहा—कंद मूल फल सुरस अति दिए राम कहुँ आनि ।

प्रेम सहित प्रभु खाए बारंबार बखानि ॥ ३४ ॥

तिने अत्यंत रसाळ व स्वादिष्ट कंद-मुळे आणि फळे आणून श्रीरामांना दिली. श्रीप्रभूंनी वारंवार प्रशंसा करीत ती प्रेमाने खाल्ली. ॥ ३४ ॥

पानि जोरि आगें भइ ठाढ़ी । प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी ॥

केहि बिधि अस्तुति करौं तुम्हारी । अधम जाति मैं जड़मति भारी ॥

मग ती हात जोडून समोर उभी राहिली. प्रभूंना पाहून तिचे प्रेम उचंबळून आले. ती म्हणाली, ‘ मी कशा प्रकारे तुमची स्तुती करु ? मी नीच जातीची आणि अत्यंत मंदबुद्धीची आहे. ॥ १ ॥

अधम ते अधम अधम अति नारी । तिन्ह महँ मैं मतिमंद अघारी ॥

कह रघुपति सुनु भामिनि बाता । मानउँ एक भगति कर नाता ॥

जे अधमांचे अधम आहेत, त्यांच्यामध्येही स्त्रिया या अत्यंत अधम आहेत. हे पापनाशना, त्यातही पुन्हा मी मंदबुद्धीची आहे. ‘ श्रीराम म्हणाले, ‘ हे भामिनी, माझे ऐक. मी फक्त भक्तीला महत्व देतो. ॥ २ ॥

जाति पॉंति कुल धर्म बड़ाई । धन बल परिजन गुन चतुराई ॥

भगति हीन नर सोहइ कैसा । बिनु जल बारिद देखिअ जैसा ॥

जात-पात कुल, मोठेपणा, धन, बल, कुटुंब, गुण आणि चातुर्य हे सर्व असूनही भक्तीने रहित मनुष्य जलहीन मेघासारखा मला वाटतो. ॥ ३ ॥

नवधा भगति कहउँ तोहि पाहीं । सावधान सुनु धरु मन माहीं ॥

प्रथम भगति संतन्ह कर संगा । दूसरि रति मम कथा प्रसंगा ॥

मी तुला आता माझी नवविधा भक्ती सांगतो. तूं लक्ष देऊन ऐक आणि मनात ठेव. पहिली भक्ती म्हणजे संतांचा संग. दुसरी भक्ती आहे माझ्या कथा-प्रसंगांबद्दल प्रेम. ॥ ४ ॥

दोहा—गुर पद पंकज सेवा तीसरि भगति अमान ।

चौथि भगति मम गुन गन करइ कपट तजि गान ॥ ३५ ॥

अभिमानरहित होऊन गुरुंच्या चरणांची सेवा ही तिसरी भक्ती आणि निष्कपट भावनेने माझे गुणगान करणे ही चौथी भक्ती. ॥ ३५ ॥

मंत्र जाप मम दृढ़ बिस्वासा । पंचम भजन सो बेद प्रकासा ॥

छठ दम सील बिरति बहु करमा । निरत निरंतर सज्जन धरमा ॥

माझ्या राममंत्राचा जप आणि माझ्यावर दृढ विश्वास ही पाचवी भक्ती. वेदांमध्ये ही प्रसिद्ध आहे. सहावी भक्ती म्हणजे इंद्रियनिग्रह, शील, अनेक लौकिक कार्यांबद्दल वैराग्य आणि संत पुरुषांप्रमाणे आचरण करणे, हे होय. ॥ १ ॥

सातवँ सम मोहि मय जग देखा । मोतें संत अधिक करि लेखा ॥

आठवँ जथालाभ संतोषा । सपनेहुँ नहिं देखइ परदोषा ॥त

सातवी भक्ती म्हणजे संपूर्ण जगाला समभावाने माझ्यामध्ये ओतप्रोत असलेले पाहणे आणि संतांना माझ्यापेक्षाही अधिक मानणे. आठवी भक्ती म्हणजे जे काही मिळेल, त्यांत संतोष मानणे आणि स्वप्नातही कधी दुसर्‍याचे दोष न पाहणे. ॥ २ ॥

नवम सरल सब सन छलहीना । मम भरोस हियँ हरष न दीना ॥

नव महुँ एकउ जिन्ह कें होई । नारि पुरुष सचराचर कोई ॥

नववी भक्ती म्हणजे सरळपणा व सर्वांबरोबर कपटरहित वागणे, मनातून माझ्यावर श्रद्धा ठेवणे आणि कोणत्याही अवस्थेमध्ये हर्ष व दैन्य नसणे. या नऊंपैकी ज्याला एकही भक्ती प्राप्त असते, तो स्त्री-पुरुष, जड-चेतन कुणीही असो, ॥ ३ ॥

सोइ अतिसय प्रिय भामिनि मोरें । सकल प्रकार भगति दृढ़ तोरें ॥

जोगि बृंद दुरलभ गति जोई । तो कहुँ आजु सुलभ भइ सोई ॥

हे भामिनि, तोच मला प्रिय आहे आणि तुझ्यात तर सर्व भक्ती दृढ आहेत. म्हणून योग्यांनाही जी गती दुर्लभ आहे, तीच आज तुला सुलभ झाली आहे. ॥ ४ ॥

मम दरसन फल परम अनूपा । जीव पाव निज सहज सरुपा ॥

जनकसुता कइ सुधि भामिनि । जानहि कहु करिबरगामिनी ॥

जीव आपले सहज स्वरुप प्राप्त करतो, हेच माझ्या दर्शनाचे परम अनुपम फल आहे. बाई गं ! जर तुला सुंदरी सीतेची काही बातमी असेल, तर ती आता सांग ‘ ॥ ५ ॥

पंपा सरहि जाहु रघुराई । तहँ होइहि सुग्रीव मिताई ॥

सो सब कहिहि देव रघुबीरा । जानतहूँ पूछहु मतिधीरा ॥

शबरी म्हणाली, ‘ हे रघुनाथ, तुम्ही पंपासरोवराला जा. तेथे तुमची सुग्रीवाशी मैत्री होईल. हे देवा, हे रघुवीरा, तो सर्व परिस्थिती सांगेल. हे धीरबुद्धी श्रीराम, सर्व जाणत असतानाही तुम्ही मला विचारता आहात.’ ॥ ६ ॥

बार बार प्रभु पद सिरु नाई । प्रेम सहित सब कथा सुनाई ॥

वारं वार प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन तिने प्रेमाने

 आपली सर्व कथा सांगितली. ॥ ७ ॥



Custom Search