Monday, November 26, 2012

Shri Radhayaha Parihar Stotram श्रीराधायाः परीहारस्तोत्रम्

Shri Radhayaha Parihar Stotram 
This parihar Stotram is from shri Brahmvaivart Purana. It is in Sanskrit. It is to be recited after a devotee performs pooja (Worship) of Goddess Radha. The meaning of the stotra is as under. 
O Radhe! You are a goddess; you are there since very long, since ancient times, you are mother of this world, you are maya of God Vishnu. You are soul of God ShriKrishna. You are loved by God ShriKrishna more than himself. You are very pious, shubha (doer of good to people). You are the energy filled by the love of God Shrikrishna. You are soubhagya rupini of God ShriKrishna. You make people to be a devotee of God ShriKrishna. I bow to you. Today I myself fill very fortunate as I have worshiped Radha who had been worship by God ShriKrishna himself. Radha who is always in the heart of ShriKrishna; is Raseshwri in RasMandala, Vrinda in Vridavan, Krishna Priya in Goloka, Tulasi in Tulasi van, Champavati while with Krishna, Krida in Champakvan, Chandravali in Chandra van, Sati on Shatashrung mountain, Padmavati in Padmvan, Krishna in Krishna Sarovar, Bhadra in Kunjkutir, Kamya in Kamyavan, Mahalakshmi in Vaikuntha, Vina in the heart of God Narayan, SundhuKanya in milk of ocean, HariPriya Laxmi on this earth, in the heaven Laxmi of heaven destroying sorrow, worries of the Gods in the heaven, God Shiva’s Durga appearing very ancient times and by the maya of God Vishnu, VedMata who is with God Brahma, you are by a small part wife of God Dharm and mother of muni Nar-Narayan, you are by a small part appearing as Tulasi and Holy Ganga who purifies this world by her water, Gopies are born from your hairs, Rohini and Rati are also by a small part of you, Shatarupa, Shachi and Diti are also a small part of you, Mother of Gods Aditi is also from a small part of you, O holy Devi Wifes of Gods and wifes of Rushies are also from your small part of you. O holy Shubhe and worshiped by God ShriKrishna! Please bless me with devotion of God ShriKrishna and in the service of god. Thus here completes Radhayaha Parihar Stotram. 
श्रीराधायाः परीहारस्तोत्रम् 
त्वं देवी जगतां माता विष्णुमाया सनातनी । 
कृष्णप्राणाधिदेवी च कृष्णप्राणाधिका शुभा ॥ १ ॥ 
कृष्णप्रेममयी शक्तिः कृष्णसौभाग्यरुपिणी । 
कृष्णभक्तिप्रदे राधे नमस्ते मङगलप्रदे ॥ २ ॥ 
अद्य मे सफलं जन्म जीवनं सार्थकं मम । 
पूजितासि मया सा च या श्रीकृष्णेन पूजिता ॥ ३ ॥ 
कृष्णवक्षसि या राधा सर्वसौभाग्यसंयुता । 
रासे रासेश्र्वरीरुपा वृन्दा वृन्दावने वने ॥ ४ ॥ 
कृष्णप्रिया च गोलोके तुलसी कानने तु या । 
चम्पावती कृष्णसंगे क्रीडा चम्पककानने ॥ ५ ॥ 
चन्द्रावली चन्द्रवने शतश्रृंङगे सतीति च । 
विरजादर्पहन्त्री च विरजातटकानने ॥ ६ ॥ 
पद्मावती पद्मवने कृष्णा कृष्णसरोवरे । 
भद्रा कुञ्जकुटीरे च काम्या च काम्यके वने ॥ ७ ॥ 
वैकुण्ठे च महालक्ष्मीर्वाणी नारायणोरसि । 
क्षीरोदे सिन्धुकन्या च मर्त्ये लक्ष्मीर्हरिप्रिया ॥ ८ ॥ 
सर्वस्वर्गे स्वर्गलक्ष्मीर्देवदुःखविनाशिनी । 
सनातनी विष्णुमाया दुर्गा शंकरवक्षसि ॥ ९ ॥ 
सावित्री वेदमाता च कलया ब्रह्मवक्षसि । 
कलया धर्मपत्नी त्वं नरनारायणप्रसूः ॥ १० ॥ 
कलया तुलसी त्वं च गङगा भुवनपावनी । 
लोमकुपोद्भवा गोप्यः कलांशा रोहिणी रतिः ॥ ११ ॥ 
कलाकलांशरुपा च शतरुपा शची दितिः । 
अदितिर्देवमाता च त्वत्कलांशा हरिप्रिया ॥ १२ ॥ 
देव्यश्र्च मुनिपत्न्यश्र्च त्वत्कलाकलया शुभे । 
कृष्णभक्तिं कृष्णदास्यं देहि मे कृष्णपूजिते ॥ १३ ॥ 
एवं कृत्वा परीहारं स्तुत्वा च कवचं पठेत् । 
पुरा कृतं स्तोत्रमेतद् भक्तिदास्यप्रदं शुभम् ॥ १४ ॥ 
॥ इति श्रीब्रह्मवैवर्ते श्रीराधायाः परीहारस्तोत्रं संपूर्णम् ॥
श्रीराधायाः परीहारस्तोत्रम् मराठी अर्थः 
हे राधे! तू देवी आहेस. तू जगज्जननी, सनातनी तसेच विष्णुची माया आहेस. श्रीकृष्णांच्या प्राणांची अधिष्ठात्री आहेस. त्यांना प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहेस. तू शुभस्वरुप आहेस. कृष्णाच्या प्रेमाने भरलेली शक्ति आहेस. तू कृष्णसौभाग्यरुपिणी आहेस. श्रीकृष्णाच्या भक्तिमार्गाला लावणारी मङगलदायिनी राधा तुला माझा नमस्कार. आज माझे जीवन सफल झाले कारण स्वतः श्रीकृष्णाने जीची पूजा केली आहे त्या राधेची मी पूजा केली. श्रीकृष्णाच्या वक्षःस्थळामध्ये जी सर्वसौभाग्यशालिनी राधा आहे तीच रासमण्डलांत रासेश्र्वरी, वृन्दावनांत वृन्दा, गोलोकांत कृष्णप्रिया, तुलसीवनांत तुलसी, कृष्णसंगात चम्पावती, चम्पकवनांत क्रीडा, चन्द्रवनांत चन्द्रावली, शतश्रृङग पर्वतावर सती, विरजातटवर्ती वनांत विरजादर्प हरण करणारी, पद्मवनांत पद्मावती, कृष्णसरोवरांत कृष्णा, कुञ्जकुटीरांत भद्रा, काम्यकवनांत काम्या, वैकुण्ठांत महालक्ष्मी, नारायणाच्या ह्रदयांत वाणी, क्षीरसागरामध्ये सिन्धुकन्या, मर्त्यलोकामध्ये हरिप्रिया लक्ष्मी, सम्पूर्ण स्वर्गांत देवदुःखविनाशिनी स्वर्गलक्ष्मी, तसेच शंकरांच्या वक्षःस्थळावरील सनातनी विष्णुमाया दुर्गा आहे. तीच आपल्या कलेने वेदमाता सावित्री होउन ब्रह्मदेवाच्या वक्षःस्थळावर विलास करते. हे देवी राधे! तू आपल्या कलेने धर्माची पत्नी तसेच मुनी नर-नारायणाची माता आहेस. तू आपल्या कलांशाने तुलसी आणि भुवनाला पावन करणारी गंगा आहेस. गोपि तुझ्याच रोमांतुन निर्माण झालेल्या आहेत. रोहिणी आणि रति तुझ्याच कलेच्या अंशस्वरुपाच्या आहेत. शतरुपा, शची आणि दिति तुझ्याच कलेच्या अंशरुप आहेत. देवमाता अदिति तुझीच कलांशरुप आहे. हे शुभे! देवाङगना आणि मुनिच्यां पत्नि तुझ्याच कलेच्या कलेने प्रकट झाल्या आहेत. हे कृष्णपूजिते तू मला श्रीकृष्णांची भक्ति आणि श्रीकृष्णाचे दास्य प्रदान कर. अशा प्रकारे स्तुति केल्यानंतर राधा कवचाचा पाठ करावा. हे प्राचीन शुभ स्तोत्र श्रीहरिची भक्ति आणि दास्यत्व प्रदान करणारे आहे. 
अशारीतीने राधा परिहार स्तोत्र पुरे झाले.
         Shri Radhayaha Parihar Stotram 
 श्रीराधायाः परीहारस्तोत्रम्


Custom Search

Tuesday, November 13, 2012

Bhagwan ShriVishnu Vandana भगवान श्रीविष्णु वंदना


Bhagwan ShriVishnu Vandana 

We are celebrating Bali Pratipada and Padava every year on Kartik Shukla Pratipada. Current year it is on 14th November 2012. More about Bali Pratipada and Padava and other days in Diwali please refer following link. 
http://www.youtube.com/watch?v=6NrT9VF6bq4&list=PLF6AB666BE9DDD0E2 index=2&feature=plpp_video
Vaman Incarnation of God Vishnu sent Demon Bali in Patala Loka on Kartik Shukla Pratipada. By the blessing of God Vishnu Demon Bali is allowed to be on earth on the days of Diwali and this day is celebrated in his name. 
I am uploading Bhagwan ShriVishnu Vandana to remember Incarnation Vaman and demon Bali. This Vandana is in Sanskrit and it is from Garud Purana. I bow to God of all Gods Bhagwan Vishnu. The care taker of this world is God Vasudeo (Vishnu), I bow to him. I bow to God of the Gods and head of the yadnyas. I bow to God of Munies and Yakshas. I bow to head of all the Gods, Bhagwan Vishnu. I bow to God Vishnu who is there in everybody’s heart. I bow to God Vishnu who I worshiped by Great Rushies, God Brahma and God Indra and God Shiva. I bow to God Vishnu who does well to all people, destroyer of wicked and demons, doer of everything, head of all and relative of all. I bow to God Vishnu who is very calm and always at peace, Greatest among all, who gives blessings to the devotees, who protects those who surrender him, who is very beautiful and who gives the knowledge of Dharma, Arth and Kam. I bow to God Vishnu many times. 
Thus here completes Bhagwan Shri Vishnu Vandana which is from Garud Purana, Aachar Khanda.

भगवान श्रीविष्णु वंदना
विष्णवे देवदेवाय नमो वै प्रभविष्णवे ।
विष्णवे वासुदेवाय नमः स्थितिकराय च ॥
ग्रसिष्णवे नमश्र्चैव नमः प्रलयशायिने ।
देवानां प्रभवे चैव यज्ञानां प्रभवे नमः ॥
मुनीनां प्रभवे नित्यं यक्षाणां प्रभविष्णवे ।
जिष्णवे सर्वदेवानां सर्वगाय महात्मने ॥
ब्रह्मेन्द्ररुद्रवन्द्याय सर्वेशाय नमो नमः ।
सर्वलोकहितार्थाय लोकाध्यक्षाय वै नमः ॥
सर्वगोप्त्रे  सर्वकर्त्रे सर्वदुष्टविनाशिने ।
वरप्रदाय शान्ताय वरेण्याय नमो नमः ।
शरण्याय सुरुपाय धर्मकामार्थदायिने ॥
॥ इति श्रीगरुड पुराणे आचारकाण्डे भगवान श्रीविष्णु वंदना संपूर्णा ॥
भगवान श्रीविष्णु वंदना
मराठी अर्थ
देवाधिदेव, तेजोमूर्ति भगवान विष्णुना माझा नेहमीच नमस्कार आहे. संसाराचे पालन करणारे भगवान वासुदेव विष्णुना मी वंदन करतो. प्रलयसमयी संसाराला आपल्या मूळ प्रकृतिमध्ये लीन करुन शयन करणार्‍या भगवान विष्णुना मी नमस्कार करतो. देवांचे आणि यज्ञांचे अधिपति विष्णुना मी नमस्कार करतो. मुनि आणि सर्व यक्षांचे प्रभु आणि सर्व देवांवर सत्ता गाजविणारे, सर्वाला व्यापून असलेले, महात्मा, ब्रह्मा, इन्द्र आणि रुद्र याना वंदनीय असलेल्या सर्वेश्र्वर भगवान श्रीविष्णुना मी नमस्कार करतो. 
सर्व लोकांचे कल्याण करणारे, लोकाध्यक्ष, सर्वगोप्ता, सर्वकर्ता आणि सर्व दुष्टांचा नाश करणारे भगवान श्रीविष्णुना मी नमस्कार करतो. भक्तांना वर देणारे, अति शांत, सर्वश्रेष्ठ, शरणागतांचे रक्षण करणारे, सुंदर रूप असलेले, धर्म, अर्थ आणि काम याची प्राप्ती करून देणारे श्री भगवान विष्णुना मी वारंवार नमस्कार करतो. 
अशा प्रकारे भगवान श्रीविष्णु वंदना पुरे झाली. 
Bhagwan ShriVishnu Vandana  
भगवान श्रीविष्णु वंदना



Custom Search

MahaLakshmi Stuti महालक्ष्मीस्तुतिः

MahaLakshmi Stuti 
We are celebrating Lakshmi Poojanam every year on Ashwin Krushna Amavasya current year it is on 13th November 2012. Muhurta Time is from 6.00P.M. To 8.30 P.M. More about Lakshmi Poojanam and other days in Diwali please refer following link.
http://www.youtube.com/watch?v=6NrT9VF6bq4&list=PLF6AB666BE9DDD0E2 index=2&feature=plpp_video
MahaLakshmi Stuti is in Sanskrit. It is the praise of MahaLakshmi by Agasti Rushi. It is from Kashi Khand of Skanda Purana. Agasti Rushi Said, 
1 I bow to the mother who is having big eyes like lotus. O mother! You live in the lotus like heart of God Vishnu. You are mother of this world. You are daughter of ocean of milk. You are protector of those who surrender you. I request you to be pleased with me always. 
2 You are mother of Madan (Pradduman). You appear in the form of mother Rukhmini. You are famous as “Shree” in the Vaikuntha which is the house of God Vishnu. You are having a beautiful face like moon and you are as bright as Sun. You are having control or influence on three worlds. You are protector of those who surrender you. I request you to be pleased with me always. 
3 You are the burning power of Agani (Fire). God Brahma creates the world with your help. God Vishnu who take care of this world relying on your help to him while doing so. You are protector of those who surrender you. I request you to be pleased with me always. 
4 O pious Goddess! Whatever you do not accept is destroyed by God Shiva. However you are the creator, caretaker and destroyer of this world. You are the cause and result of this world. You are protector of those who surrender you. I request you to be pleased with me always. God Hari has become famous because he possessed you. You are protector of those who surrender you. I request you to be pleased with me always. 5 O Goddess Shubhe (who does well)! Those who are blessed by you became famous, Victorious, great, virtuous, wealthy and well known. They are treated as good artiest and holy people. 
6 O Goddess! Your presence for a short time in anything like a man, elephant, horse, house, temple, jewel, food, animals and birds, bed or land makes such thing valuable. Nothing other than that becomes valuable. 
7 O Wife of God Vishnu, Kamle, He Kamlalaye, He mother Lakshmi! Whatever you touch becomes holy and whatever you reject becomes dirty in this world. Wherever your name is there it is good and holy. 
8 Those people who recites the names Lakshmi, Kamla, Kamlalya, Padma, Rma, Nalin-yugma-kara, Mother, Kshirodja, Amrut-Kumbha-Kara, Era and Vishnu-Priya of Goddess Lakshmi they never become unhappy. 
9-10 (Goddess Lakshmi becomes pleased by the above praised and asked Rushi Agasti what he wants from her) Rushi Agasti asked for the blessing from the Goddess Lakshmi “Those who recites this Mahalakshmi Stuti will never become angry and poor. Whatever they like will always remain with them. Their wealth, money will remain with them always. They will become victorious everywhere and there will not be loss of their Santati (children).” 
11 Goddess Lakshmi said O Agasti! Whatever you have said will be received by my blessings to the reciter of this stotra. I will be there with him forever. 
Thus here completes this Mahalakshmi Stuti by Agasti Rushi which is from Kashi Khand of Skanda Purana.
महालक्ष्मीस्तुतिः 
अगस्तिरुवाच 
मातर्नमामि कमले कमलायताक्षि श्रीविष्णुहृत्कमलवासिनि विश्वमातः । 
क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरि लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ १ ॥ 
त्वं श्रीरुपेन्द्रसदने मदनैकमात- र्ज्योत्स्नासि चन्द्रमसि चन्द्रमनोहरास्ये । 
सूर्ये प्रभासि च जगत्त्रितये प्रभासि लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ २ ॥ 
 त्वं जातवेदसि सदा दहनात्मशक्ति- र्वेधास्त्वया जगदिदं विविधं विदध्यात् । 
विश्वम्भरोऽपि बिभृयादखिलं भवत्या लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ३ ॥ 
त्वत्त्यक्तमेतदमले हरते हरोऽपि त्वं पासि हंसि विदधासि परावरासि । 
ईड्यो बभूव हरिरप्यमले त्वदाप्त्या लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ ४ ॥ 
शूरः स एव स गुणी स बुधः स धन्यो मान्यः स एव कुलशीलकलाकलापैः । 
एकः शुचिः स हि पुमान् सकलेऽपि लोके यत्रापतेत्तव शुभे करुणाकटाक्षः ॥ ५ ॥ 
यस्मिन्वसेः क्षणमहो पुरुषे गजेऽश्वे स्त्रैणे तृणे सरसि देवकुले गृहेऽन्ने । 
रत्ने पतत्रिणि पशौ शयने धरायां सश्रीकमेव सकले तदिहास्ति नान्यत् ॥ ६ ॥ 
त्वत्स्पृष्टमेव सकलं शुचितां लभेत त्वत्त्यक्तमेव सकलं त्वशुचीह लक्ष्मि । 
त्वन्नाम यत्र च सुमड़्गलमेव तत्र श्रीविष्णुपत्नि कमले कमलालयेऽपि ॥ ७ ॥ 
लक्ष्मीं श्रियं च कमलां कमलालयां च पद्मां रमां नलिनयुग्मकरां च मां च । 
क्षीरोदजाममृतकुम्भकरामिरां च विष्णुप्रियामिति सदा जपतां क्व दुःखम् ॥ ८ ॥ 
ये पठिष्यन्ति च स्तोत्रं त्वद्भक्त्या मत्कृतं सदा । 
तेषां कदाचित् संतापो माऽस्तु माऽस्तु दरिद्रता ॥ ९ ॥ 
माऽस्तु चेष्टवियोगश्च माऽस्तु सम्पत्तिसंक्षयः । 
सर्वत्र विजयश्चाऽस्तु विच्छदो माऽस्तु सन्ततेः ॥ १० ॥ 
श्रीरुवाच 
एवमस्तु मुने सर्वं यत्त्वया परिभाषितम् । 
एतत् स्तोत्रस्य पठनं मम सांनिध्यकारणम् ॥ ११ ॥ 
॥ इति श्रीस्कन्दमहापुराणे काशीखण्डे अगस्तिकृता महालक्ष्मीस्तुतिः सम्पूर्णा ॥
महालक्ष्मीस्तुतिः मराठी अर्थ 
अगस्ति ऋषी म्हणाले 
१) कमलासारखे विशाल नेत्र असलेल्या माते मी तुला नमस्कार करतो. आपण भगवान श्रीविष्णुंच्या हृदयकमलांत निवास करता आणि या विश्वाची जननी आपणच आहात. कमलाच्या गर्भाप्रमाणे गोर्‍या वर्णाच्या हे क्षीरसागर कन्ये महालक्ष्मी आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. 
२) मदन (प्रद्दुम्न) ची एकमात्र माता रुक्मिणीरुपधरिणी माते, आपण भगवान विष्णुच्या वैकुण्ठधामांत "श्री" नावाने प्रसिद्ध आहात. चंद्राप्रमाणे मनोहर मुख असणार्‍या देवि, चंद्रामधिल चांदणी आपणच आहात. तसेच सूर्याची प्रभा आपणच आहात. तीन्ही लोक आपणच प्रभावित करता. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. 
३) आपणच अग्निमधिल दाहक शक्ति आहात. ब्रह्मदेव आपल्याच सहाय्याने विविध प्रकारच्या विश्वाची रचना करतात. संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करणारे श्रीविष्णु हे आपल्याच भरवशावर सर्वांचे पालन करतात. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. 
४) निर्मलरुप असलेल्या देवि, ज्यांचा आपण त्याग केलेला आहे त्याचाच भगवान रुद्र संहार करतात. वास्तविक आपणच या जगताचे पालन, संहार आणि निर्माण करता. आपणच कार्य-कारण स्वरुप जगत आहात. हे निर्मलस्वरुप लक्ष्मी, आपल्याला प्राप्त करुनच भगवान श्रीहरि सर्वांना पूजनिय झाले. आपण आपल्या शरणागतांचे रक्षण करणार्‍या आहात. आपण माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. 
५) हे शुभे, ज्या पुरुषावर आपला कृपाकटाक्ष होतो, या संसारांत तोच एकमात्र शूरवीर, गुणवान, धन्य, मान्य, कुलीन, शीलवान तसेच अनेक कलांचा ज्ञाता आणि परम पवित्र मानला जातो. 
६) हे देवि, आपण क्षणभरसुद्धा ज्या पुरुषांत, हत्तीत, घोड्यांत, स्त्रैण, तृण, सरोवर, देवमन्दिर, घर, अन्न, रत्न, पशु-पक्षी, शय्या अथवा भूमिवर राहता तेच या जगांत शोभायमान होते दुसरे काहिही नाही. 
७) हे विष्णुपत्नि! हे कमले, हे कमलालये, हे माता लक्ष्मि! आपण ज्याला स्पर्श करता ते पवित्र होते. आपण ज्याचा त्याग करता ते सर्व या जगांत अपवित्र होते. जेथे आपले नाव आहे ते उत्तम व मंगल आहे. 
८) जे लक्ष्मी, श्री, कमला, कमलालया, पद्मा, रमा, नलिनयुग्मकरा (दोन्ही हातांत कमल धारण करणारी), मा, क्षीरोदजा, अमृतकुम्भकरा (हातांत अमृतचा कलश धारण करणारी), इरा आणि विष्णुप्रिया या नावांचा नेहमी जप करतात त्याना दुःख होत नाही. 
९-१०) (या स्तुतिने प्रसन्न होऊन देवीने वर माग असे सांगितल्यावर अगस्ति मुनी म्हणाले हे देवि! ) माझ्याकडून केलेल्या या स्तुतिचा जे भक्तिपूर्वक पाठ करतील त्याना कधि संताप होणार नाही तसेच दरिद्रता येणार नाही. त्याना जे इष्ट आहे त्याचा त्याना वियोग होणार नाही. आणि त्याच्या धनाचा नाश होणार नाही. त्याना सर्वत्र विजय प्राप्त होवो आणि त्याच्या संततिचा त्याना कधि वियोग न होवो. 
११) श्रीलक्ष्मी म्हणाली, हे मुने, जसे आपण इच्छिता तसेच होइल. या स्तोत्राचा पाठ माझी प्राप्ती (सांनिध्य) करुन देणारा होइल. 
अशा रितीने श्रीस्कन्दमहापुराणांतील काशीखण्डांतील अगस्ति मुनिने केलेल्या महालक्ष्मीस्तुतिचा पाठ पुरा झाला.
MahaLakshmi Stuti 
महालक्ष्मीस्तुतिः


Custom Search

GovindAshtakam गोविन्दाष्टकम्

GovindAshtakam 
We are celebrating NarakChaturdashi every year on Ashwin Krushna Chaturdashi current year it is on 13th November 2012. God ShriKrishna killed demon Narakasur on this day. Hence I am uploading  GovindAshtakam  More about NarakChaturdashi and Lakshmi Poojanam in Diwali please refer following link.
http://www.youtube.com/watch?v=6NrT9VF6bq4&list=PLF6AB666BE9DDD0E2 index=2&feature=plpp_video
GovindAshtakam is in Sanskrit. It is a very beautiful creation of Shri ParamHamsa Swami BrahmaNand. It is a praise of God Govind in eight stanzas hence it is called as (Govind) Ashtakam. Swami Brahmanand is describing virtues of God Govind and advising the devotees to worship God Govind. 
1 God Govind is chindanad swaroop means he is always happy. His virtues and everything is very sweet to hear. He is caretaker of those who don’t have any protector. He can lift you up from the troubles, difficulties of this material world. He is described as a garland in the neck of Goddess of Lakshmi. He is worshiped by the God Shiva. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
2 He lives in an ocean. He is protector of gods. Garud is his vehicle. He always drinks amrut. He likes truth and peace. He knows everything by his mind. He is knowledge. He is an abode for the Rushies and yogis and Munies. He is a place from where nobody can displace them (yogis and others). Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
3 Courageous devotees meditate him by their intelligence. Yogis know him by his great names. He is the creator three worlds. We cannot find him or we can’t get any knowledge about him by our mind and other things. He always appears in a new body. He can be meditated in our heart. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
4 He is maya. He has wear garland of flowers around his neck. He is destroyer of sins. He is Gopal means he has to take cows for feeding. He has killed Shishupal. He is Kal. He is beyond all arts. He has defeated swan by his speed. He is an enemy of demon Mur. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
5 He is everywhere just like sky. Many Granthas described his virtues however he is like us. He is always happy like gods and he is enemy of demons. He resides in the cave of intelligence. He is beyond the speed of words (talk, speech). He likes navneet (butter). He always establishes good principles. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
6 He is God. He is husband of Goddess Lakshmi. He is master of God Brahma and God Shiva. He does well to us. He is God Brahmin and other Gods. He has long and curling hairs. He is destroyer of sins in Kaliyuga. He is master of the Sun in the sky. He is SheshNag who has held this world on his head. He is master of this world. He is Govardhandhari means he has held Govardhan Mountain on his right hands’ little finger. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
7 He is husband of Goddess Lakshmi. He is destroyer of fear and troubles. He is giver of happiness. He is destroyer of ill will. He is peace. He lives in everybody’s heart. He is caretaker of three worlds. He is destroyer of demons. His life is very pious and beautiful. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
8 He is great among greatest. He is above all. He is brother of Indra (king of Gods). He has great virtues. He is very powerful and strong. He is Guru of all Gurus. He is head of Yadna. Hence O Devotee! Always worship God Govind who is forever happy. 
9 The devotee who recites this stotra of God Vishnu who has held Gada in his hand becomes happy and sinless and receives all the happiness in his life and at the end goes to Vaikuntha which is abode of God Vishnu. 
Thus here completes this GovindAshtakam created by Brahmanand Swami.


गोविन्दाष्टकम् 

चिदानन्दाकारं श्रुतिसरसारं समरसं निराधाराधारं भवजलधिपारं परगुणम् । 
रमाग्रीवाहारं व्रजवनविहारं हरनुतं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ १ ॥ 
महाम्भोधिस्थानं स्थिरचरनिदानं दिविजपं सुधाधारापानं विहगपतियानं यमरतम् । 
मनोज्ञं सुज्ञानं मुनिजननिधानं ध्रुवपदं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ २ ॥ 
धिया धीरैर्ध्येयं श्रवणपुटपेयं यतिवरै- र्महावाक्यैर्ज्ञेयं त्रिभुवनविधेयं विधिपरम् । 
मनोमानामेयं सपदि हृदि नेयं नवतनुं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ३ ॥ 
महामाया जालं विमलवनमालं मलहरं सुभालं गोपालं निहतशिशुपालं शशिमुखम् । 
कलातीतं कालं गतिहतमरालं मुररिपुं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ४ ॥ 
नभोबिम्बस्फीतं निगमगणगीतं समगतिं सुरौघै: सम्प्रीतं दितिजविपरीतं पुरिशयम् । 
गिरां मार्गातीतं स्वदितनवनीतं नयकरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ५ ॥ 
परेशं पद्मेशं शिवकमलजेशं शिवकरं द्विजेशं देवेशं तनुकुटिलकेशं कलिहरम् । 
खगेशं नागेशं निखिलभुवनेशं नगधरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ६ ॥ 
रमाकान्तं कान्तं भवभयभयान्तं भवसुखं दुराशान्तं शान्तं निखिलहृदि भान्तम भुवनपम् । 
विवादान्तं दान्तं दनुजनिचयान्तं सुचरितं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ७ ॥ 
जगज्ज्येष्ठं श्रेष्ठं सुरपतिकनिष्ठं क्रतुपतिं बलिष्ठं भूयिष्ठं त्रिभुवनवरिष्ठं वरवहम् । 
स्वनिष्ठं धर्मिष्ठं गुरुगुणगरिष्ठं गुरुवरं सदा तं गोविन्दं परमसुखकन्दं भजत रे ॥ ८ ॥ गदापाणेरेतददुरितदलनं दुःखशमनं विशुद्धात्मा स्तोत्रं पठति मनुजो यस्तु सततम् । 
स भुक्त्वा भोगौघं चिरमिह ततोऽपास्तवृजिनः परं विष्णोः स्थानं व्रजति खलु वैकुण्ठभुवनम् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीपरमहंसस्वामिब्रह्मानन्दविरचितं गोविन्दाष्टकं सम्पूर्णम् ॥

गोविन्दाष्टकम् मराठी अर्थ 
१) जो चिदानन्दस्वरुप आहे, श्रुतिचे सुमधुर सार आहे, समरस आहे, निराधारांचा आधार आहे, संसारसागर पार करुन नेणारा आहे, दुसर्‍याच्या गुणांना आक्षय देणारा आहे, श्रीलक्ष्मीच्या गळ्यांतील हार आहे, वृन्दावनांत विहार करणारा आहे, तसेच जो भगवान श्रीशंकरांकडून पूजित आहे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
२) ज्याने महासमुद्राचा आश्रय केला आहे, जो चराचर विश्वाचे आदिकारण आहे, देवांचे संरक्षण करणारा आहे, अमृतपान करणारा आहे, गरुड हे ज्याचे वहान आहे, जो यम (अहिंसा, सत्यादि) नियमांचे पालन करणारा आहे, जो मनोज्ञ, ज्ञानस्वरुप आहे, मुनिजनांचा आश्रय आहे.ध्रुवस्थान आहे. त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
३) धीर पुरुषांकडून बुद्धिने ज्याचे ध्यान केले जाते, कर्णपुटांनी ज्याचे पान केले जाते, योगी ज्याला महावाक्यांनी ओळखतात. जो तीन्ही लोकांचा विधाता आणि विधिवाक्या पलीकडे आहे, ज्याचे मन आदी प्रमाणांनी ज्ञान होउ शकत नाही, जो हृदयांत ध्यान करण्यास योग्य आहे, आणि जो नेहमी नविन शरिर धारण करणारा आहे अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
४) ज्याचे मायारुपी महाजाल आहे, ज्याने निर्मळ वनमाला घातली आहे, जो दोषांचे हरण करणारा आहे, ज्याचे कपाळ सुन्दर आहे, जो गोपाल आहे, ज्याने शिशुपालाचा वध केला आहे, ज्याचे मुख चंद्रासारखे सुन्दर आहे, जो कलातीत आहे, काल आहे, आपल्या सुन्दर गतीने हंसावर विजय मिळविणारा आहे, जो मुर दैत्याचा शत्रु आहे अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
५) जो आकाशाप्रमाणे व्यापक आहे, शास्त्रे ज्याचे गुणगान करतात, जो सगळ्यांप्रमाणे समान गतीचा आहे, देवतांसारखा अत्यंत आनंदी आणि दैत्यांचा शत्रु आहे, जो बुद्धिरुपी गुहेंत स्थित आहे, जो वाणीच्या वेगापेक्षा बाहेर आहे, नवनीताचा आस्वाद घेणार आहे, तसेच जो नीतिचा संस्थापक आहे अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
६) जो परमेश्वर आहे, लक्ष्मीपती आहे, शिव आणि ब्रह्माचा पण स्वामी आहे, जो कल्याणकारी आहे, द्विज आणि देवांचा ईश्वर आहे, लांब आणि कुरळे केस असलेला, कलियुगांतील पापांचा नाश करणारा आहे, आकाशांत संचार करणार्‍या सूर्याचा शासक आहे, धरणीतल डोक्यावर धारण करणारा शेष नाग आहे, जो संपूर्ण भूमंडलाचा स्वामी आहे, जो गोवर्धनधारी आहे, अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
 ७) जो लक्ष्मीपति आहे, विमल द्दुति आहे, भवभयाचे हरण करणारा आहे, संसारांतील सुख देणारा आहे, वाईट इच्छेचा नाश करणारा आहे, शान्त आहे, सर्वांच्या हृदयी भासमान होणारा आहे, त्रिभुवनाचा पालक आहे, विवाद, मतभिन्नतेचा अंत करणारा आहे, दमशील आहे, दैत्य दलाचा नाश करणारा आहे, सुन्दर चरित्र असलेला आहे, अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
 ८) जो संसारामध्ये सर्वांत मोठा आहे, श्रेष्ठ आहे, सुरराज इंद्राचा अनुज आहे, यज्ञपति आहे, बलिष्ठ आहे, भूयिष्ठ आहे, त्रिभुवनांत सर्वश्रेष्ठ आहे, वर देणारा आहे, आत्मनिष्ठ आहे, धर्मिष्ठ आहे, महान गुण धारण करणारा आहे, गुरुचां गुरु आहे, अरे त्या परमानन्द गोविन्दाचे सदैव भजन कर. 
९) जो विशुद्धात्मा पुरुष, हातांत गदा धारण केलेल्या गोविन्दाचे हे पापनाशक, दुःखनाशक स्तोत्र नेहमी वाचतो, तो चिरकालपर्यंत नाना सुखपोभोगांचा उपभोग घेऊन, पापमुक्त होऊन भगवान श्रीविष्णुंच्या परमपावन धाम वैकुन्ठास नक्कीच जातो. 
 अशा रितीने परमहंस स्वामी ब्रह्मानन्दानी रचिलेले गोविन्दाष्टकं पुरे झाले.
GovindAshtakam 
गोविन्दाष्टकम्


Custom Search

Sunday, November 11, 2012

Anadikalpeshwar Stotra अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम्

Anadikalpeshwar Stotra 
Anadikalpeshwar Stotra is in Sanskrit. It is a beautiful creation of Param Poojya Vasudevanand Saraswati. Anadikalpeshwar means God Shiva. This is a God Shiva Stotra. 
1 His body color is white as camper. He has worn a garland of snakes. He has held the holy river Ganga in his Jatajut (hairs). He is helping people. He is master of all. He is great among Gods. However he is very cruel in his look. He is no other than Anadikalpeshwar. 
2 He lives on the Kailas Mountain. He happily lives with Girija his wife. He found in cemetery. He lives in the mind of his devotees. He stays in holy Kashi city. He is who makes us victorious. He is no other than Anadikalpeshwar. 
3 He holds trishool in his hand as a weapon. He removes difficulties and troubles in the life of people. He had destroyed pride of God Kamdev. He is having moon on his head. He fulfills the desires of the people who worship him. He is no other than Anadikalpeshwar. 
4 He is leader of all. He is leader of Pramath Ganas. He is giver of all type of knowledge. He knows Shruti and Shastras. He has knowledge of Dharma, Artha, Kam and Moksha. He is no other than Anadikalpeshwar. 
5 God Vishnu and God Brahma tried to measure his greatness. God Vishnu went into Patala and God Brahma in the heaven for finding out his (God Shiva’s) adi and anta. But both were unsuccessful. He is no other than Anadikalpeshwar. 
6 Demon Ravan by his famous Tandav Dance and Stotra pleased him and receives blessings from him. He is no other than Anadikalpeshwar. 
7 Demon Banasur bowed only once at his feet and received more wealth and money than God Indra by his (God Shiva’s) blessings. He is no other than Anadikalpeshwar. 
8 I am full of troubles and difficulties and as such unable to praise his appearance, form and greatness. Even Shruties are also unable to describe and praise him. He is no other than Anadikalpeshwar. 
9 O Anadikalpeshwar! Whosoever recites this stotra three times a day becomes happy and wealthy and all his desires are fulfilled by your blessings. At the end of his life he goes to Kailas, abode of God Shiva. 
Thus here completes this Anadikalpeshwar Stotra created by Param Poojya Vasudevanand Saraswati.

अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम् 
कर्पूरगौरो भुजगेन्द्रहारो गङ्गाधरो लोकहितावहः सः । 
सर्वेश्र्वरो देववरोऽप्यघोरो योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ १ ॥ 
कैलासवासी गिरिजाविलासी श्मशानवासी सुमनोनिवासी । 
काशीनिवासी विजयप्रकाशी योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ २ ॥ 
त्रिशूलधारी भवदुःखहारी कन्दर्पवैरी रजनीशधारी । 
कपर्दधारी भजकानुसारी योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ३ ॥ 
लोकाधिनाथः प्रमथाधिनाथः कैवल्यनाथः श्रुतिशास्त्रनाथः । 
विद्यार्थनाथः पुरुषार्थनाथो योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ४ ॥ 
लिङ्गं परिच्छेत्तुमधोगतस्य नारायणश्र्चोपरि लोकनाथः । 
बभूवतुस्तावपि नो समर्थौ योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ५ ॥ 
यं रावणस्ताण्डवकौशलेन गीतेन चातोषयदस्य सोऽत्र । 
कृपाकटाक्षेण समृद्धिमाप योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ६ ॥ 
सकृच्च बाणोऽवनमय्यशीर्षं यस्याग्रतः सोप्यलभत्समृद्धिम् । 
देवेन्द्रसम्पत्त्यधिकां गरिष्ठां योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ७ ॥ 
गुणान्विमातुं न समर्थ एष वेषश्र्च जीवोऽपि विकुण्ठितोऽस्य । 
श्रुतिश्र्च नूनं चलितं बभाषे योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ ८ ॥ 
अनादिकल्पेश उमेश एतत् स्तवाष्टकं यः पठति त्रिकालम् । 
स धौतपापोऽखिललोकवन्द्यं शैवं पदं यास्यति भक्तिमांश्र्चेत् ॥ ९ ॥ 
॥ इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीकृतमनादिकल्पेश्वरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम् मराठी अर्थ: 
१ ज्यांचा वर्ण कापराप्रमाणे पांढरा शुभ्र आहे, ज्यानी सर्पांचा हार गळ्यांत घातला आहे, जटाजूटामध्ये ज्यांनी गंगेला धारण केले आहे, संसाराचे हित करणारे जे आहेत, जे सर्वांचे स्वामी आहेत आणि देवतांमध्ये श्रेष्ठ असूनही जे अघोर आहेत असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
२ जे कैलासावर राहतात, भगवती गिरीजेसहित आनंद उपभोगतात, जे स्मशानवासी आहेत, भक्तांच्या मनांत राहणारे, काशीमध्ये निवास करणारे आणि विजयी करणारे असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
३ जे त्रिशूल धारण करतात, संसारांतील दुःखाचे हरण करतात, कामदेवाचा गर्व हरण करणारे, मस्तकावर चंद्राला धारण करणारे, जटाजूटधारी आणि भजन करणारांचे मनोरथ पूर्ण करणारे असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
४ जे सर्व लोकांचे स्वामी, प्रमथगणांचे नाथ, मोक्ष मिळवून देणारे, श्रुति व शास्त्र यांचे ज्ञान देणारे, सर्व विद्यांचे दाते, तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारहि पुरुषार्थांचे अधिष्ठाते असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
५ ज्यांच्या लिंगाची उंची व खोली जाणण्यासाठी विष्णु पाताळांत आणि ब्रह्मदेव स्वर्गांत गेले परंतु ते दोघेहि त्यांत असफल झाले असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
६ ज्यांना रावणाने आपल्या ताण्डव नृत्य कौशल्याने आणि स्तुतिने प्रसन्न करुन घेतले आणि ज्यांच्या कृपाप्रसादाने समृद्धि प्राप्त करुन घेतली असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
७ बाणासुराने ज्यांच्यासमोर एकदाच मस्तक झुकवून एकदाच नमस्कार केला आणि त्यांच्या प्रसन्नतेने देवेन्द्राच्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती आणि समृद्धि प्राप्त करुन घेतली असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
८ अनेक प्रकारच्या संकटांनी आणि अडचणीनी ग्रस्त असलेला हा जीव ज्यांच्या स्वरुपाचे आणि गुणांचे योग्य ते वर्णन करण्यास असमर्थ आहे. श्रुतिसुद्धा ज्यांचे वर्णन करु शकत नाही व नेति नेति असेच म्हणते. असे ते दुसरेतिसरे कोणीहि नसून अनादिकल्पेश्वरच आहेत. 
९ हे अनादिकल्पेश्वर उमापती! आपल्या या आठ श्र्लोकांमधून केलेल्या स्तुतिचा पाठ जो तीन्हि त्रिकाळ करतो त्याची सर्व पापे धुतली जाऊन तो सर्वां वंदनीय होतो आणि अन्ती शिवसन्निधानास प्राप्त होतो. 
अशा प्रकारे श्रीवासुदेवानंदसरस्वतींनी रचिलेले हे अनादिकल्पेश्वर स्तोत्र पूर्ण झाले. 
Anadikalpeshwar Stotra 
अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम्


Custom Search

Saturday, November 10, 2012

Lakshmya Dhyanam लक्ष्म्या ध्यानम्


Lakshmya Dhyanam 
We are celebrating Dhantrayodashi every year on Ashwin Krushna Trayodashi current year it is on 11th November 2012. We are also donating Lamp (DipDan) to God Yam on this day. More about Dhantrayodashi and other days in Diwali please refer following link.
http://www.youtube.com/watch?v=6NrT9VF6bq4&list=PLF6AB666BE9DDD0E2 index=2&feature=plpp_video

Hence I am uploading Lakshmya Dhyanam for the worship of Dhan, (Money and Money means Goddess Lakshmi) on Dhantrayodashi.
Lakshmi Dhyanam is in Sanskrit. It is from Brahmavaivart purana, Prakruti Khanda.
Bhagavati Lakshmi is standing on a pink Lotus which has got thousand petals. Her sari is so beautiful that it is shining like thousands of Moon on full moon night in Sharad Rutu. She has got her own brightness. My mind is dancing with joy by looking at pleasant appearance of Goddess. Her body is appearing yellowish bright as hot gold. Ornaments on her body are making her more beautiful. She has worn a yellow sari. Goddess Lakshmi is looking very pleasant with her smiling face. She looks always young and rich. Goddess Lakshmi gives all type of wealth to her devotees. I am worshiping Goddess Lakshmi.

लक्ष्म्या ध्यानम् 
सहस्त्रदलपद्मस्य कर्णिकावासिनीं पराम् । 
शरत्पार्वणकोटीन्दुप्रभाजुष्टवराम्बराम् ॥ १ ॥ 
स्वतेजसा प्रज्वलन्तीं सुखदृश्यां मनोहराम् । 
प्रतप्तकाञ्चननिभां शोभां मूर्तिमतीं सतीम् ॥ २ ॥ 
रत्नभूषणभूषाढ्यां शोभितां पीतवाससा । 
ईषद्धास्यप्रसन्नास्यां शश्र्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ ३ ॥ 
सर्वसम्पत्प्रदात्रीं च महालक्ष्मीं भजे शुभाम् ॥ 
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे प्रकृतिखण्डे लक्ष्म्या ध्यानम् सम्पूर्णम् ॥

लक्ष्म्या ध्यानम् चा मराठी अर्थ 
परम पूज्य भगवती महालक्ष्मी सहस्र पाकळ्या असलेल्या कमल कर्णिकांवर विराजमान आहे. तीची सुंदर साडी शरद् ऋतूंतील पौर्णिमेच्या करोडो चंद्रांच्या प्रकाशाने शोभायमान झाली आहे. ही परम साध्वी देवी स्वतःच्या तेजाने प्रकाशित होत आहे. या परम मनोहर देवीच्या दर्शनाने मन आनंदाने प्रफुल्लीत होत आहे. हीची अंगकांती तापलेल्या सोन्याप्रमाणे दिसत आहे. मढविलेल्या रत्नांनी हीचे सौन्दर्यांत भर पडली आहे. तीने पीतांबर नेसले आहे. या प्रसन्न चेहर्‍याच्या भगवती महालक्ष्मीच्या चेहर्‍यावर हास्य उमलेले आहे. ही नेहमी युवावस्थेंत संपन्न दिसते. ही सर्व प्रकारची संपत्ती देते. अशा कल्याणस्वरूप असलेल्या भगवती महालक्ष्मीची मी उपासना करतो.
Lakshmya Dhyanam 
लक्ष्म्या ध्यानम्


Custom Search

Friday, November 9, 2012

MadhurAshtakam मधुराष्टकम्


MadhurAshtakam 
Diwali starts from tomorrow from 10th November 2012. On this day that is on Vasubaras (Ashwin Krushna Twadashi) we worship the holy cow in the evening. It is a very special occasion when we pay our respect to the mother cow with calf. As everybody knows God GopalKrishna and Cow are associated with each other very closely. We may remember the life of God in Mathura. Hence to respect Gomata (mother cow) on this day, I am uploading a very sweet MadhurAshtakam of God GopalKrishna. More about Vasubaras and other days in Diwali please refer following link.
http://www.youtube.com/watch?v=6NrT9VF6bq4&list=PLF6AB666BE9DDD0E2&index=2&feature=plpp_video
MadhurAshtakam is in Sanskrit and it is created by Vallabhacharya. Vallabhacharya was a great devotee of God Shrikrishna. It is a very beautiful creation by him. He was so much absorbed in God Shrikrishna’s devotion that whatever he thinks of God Shrikrishna, he describes it as very sweet (Madhur). Madhur means sweet. However anything he says, reminds us the beautiful incidents in the life of God Shrikrishna, more particularly in the minds of God Shrikrishna’s devotees. 
1 He says Gods’ lips are sweet, mouth is very sweet, eyes are sweet, heart is sweet, and smile is sweet and his speed is sweet. Thus everything of God is sweet. Here we remind a childlike God Shrikrishna in the Mathura behaving as naughty as a child and as sweet as described as above. 
2 Further he says God’s life story is sweet, his speech is sweet, his clothes are sweet, his walking is sweet, his turning is sweet, and his wandering is also sweet. The above things reminds us the life span of God in Mathura during his child hood in which he had destroyed demons and made people of Mathura fearless and happy. Many stories like, killing of Putana maushi, Kaliya Mardan and other many stories are reminded. 
3 He says, Gods’ Murali (flute) is sweet, his dance is sweet, his hands and legs are sweet, and his friendship is sweet. Again all the above description leads us to the bank of Great Yamuna River wherever child activities of God Shrikrishna are witnessed by the river. 
4 He describes, Gods singing is sweet, his drinking is sweet, and his food is sweet, his sleeping is sweet, his form and appearance is sweet, and his tila (the chandan paste applied on forehead) is also sweet. Thus everything of madhuradhipati is sweet. 
5 Gods work is sweet, his swimming is sweet, his playing is sweet, his loosing is sweet, his speech is sweet and his remaining in peace is sweet. Thus everything of madhuradhipati is sweet. 
6 Gods’ garland is sweet, River Yamuna is sweet, tides of Yamuna are sweet, and Water of Yamuna is sweet and lotuses in the water are also sweet. Thus everything of madhuradhipati is sweet. 
7 Gopies are sweet, their playing is sweet, their presence is sweet and their disappearance is also sweet. Their observance is sweet and their behavior is also sweet. Thus everything of madhuradhipati is sweet. 
8 Gopes are sweet. Cows are sweet. Forests are sweet. Creation is sweet. Caretaking and protection is sweet. The fruits are sweet. Thus everything of madhuradhipati is sweet. 
Thus here completes MadhurAshtakam created by Vallabhacharya. 

मधुराष्टकम् 

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् । 
हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ १ ॥ 
वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् । 
चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ २ ॥ 
वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ । 
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ३ ॥ 
गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम् । 
रुपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ४ ॥ 
करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् । 
वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ५ ॥ 
गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा । 
सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ६ ॥ 
गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् । 
दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ७ ॥ 
गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा । 
दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥ ८ ॥ 
॥ इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं सम्पूर्णम् ॥

मधुराष्टकं मराठी अर्थ 
१) श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. त्याचे ओठ मधुर आहेत. तोंड मधुर आहे. डोळे मधुर आहेत. हास्य मधुर आहे. हृदय मधुर आहे आणि गतिपण अति मधुर आहे. 
२) त्यांचे वचन मधुर आहे. चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे. वळणे मधुर आहे. चाल मधुर आहे. फिरणे मधुर आहे. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
३) त्यांची मुरली मधुर आहे. चरणरज मधुर आहे. करकमल मधुर आहेत. चरण मधुर आहेत. नृत्य मधुर आहे. सख्य मधुर आहे. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
४) त्यांचे गाणे मधुर आहे. पीणे मधुर आहे. भोजन मधुर आहे. झोपणे मधुर आहे. रुप मधुर आहे आणि तिळापण मधुर आहे. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
५) त्यांचे काम मधुर आहे. तरणे मधुर आहे. हरणे मधुर आहे. रमणे मधुर आहे. बोलणे मधुर आहे. शांत राहणे पण मधुर आहे. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
६) त्यांची गुंजा मधुर आहे. माळा मधुर आहे. यमुना मधुर आहे. तीच्या लाटा मधुर आहेत. पाणी मधुर आहे. कमळेपण अति मधुर आहेत. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
७) गोपी मधुर आहेत. त्यांची लिला मधुर आहे. त्यांचा संयोग मधुर आहे. त्यांचा वियोग मधुर आहे. निरीक्षण मधुर आहे आणि शिष्टाचारपण अति मधुर आहेत' श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
८) गोप मधुर आहेत. गाई मधुर आहेत. वने मधुर आहेत. रचना मधुर आहे. दलन मधुर आहे आणि त्याचे फल पण अति मधुर आहे. श्रीमधुराधिपतिचे(श्रीकृष्णाचे) सर्वच मधुर आहे. 
अशा प्रकारे श्रीवल्लभाचार्यांनी रचिलेले हे मधुराष्टकं पुरे झाले.

MadhurAshtakam 
मधुराष्टकम्


Custom Search