Wednesday, October 7, 2020

ShriRamcharitmans Part 52 श्रीरामचरितमानस भाग ५२

 

ShriRamcharitmans Part 52 
Doha 243 to 245 
श्रीरामचरितमानस भाग ५२ 
दोहा २४३ ते २४५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--कुंजर मनि कंठा कलित उरन्हि तुलसिका माल ।
बृषभ कंध केहरि  ठवनि बल निधि बाहु बिसाल ॥ २४३ ॥
वक्षःस्थलावर गजमुक्तांचे कंठे आणि तुळशीच्या माळा शोभत होत्या. त्यांचे खांदे बैलामसारखे उंच व पुष्ट होते. त्यांची उभे राहाण्याची ऐट सिंहासारखी होती आणि बाहू विशाल व शक्तीचे भांडार होते. ॥ २४३ ॥
कटि तूनीर पीत पट बॉंधें । कर सर धनुष बाम बर कॉंधें ॥
पीत जग्य उपबीत सुहाए । नख सिख मंजु महाछबि छाए ॥
कमरेला पीतांबर कसलेला असून त्यावर भाते बांधलेले होते. उजव्या हातात बाण व डाव्या सुंदर खांद्यावर धनुष्य व पिवळे यज्ञोपवीत शोभत होते. नखशिखांत सर्व अवयव सुंदर असून त्यांच्यावर मोठी कांती झळकत होती. ॥ १ ॥
देखि लोग सब भए सुखारे । एकटक लोचन चलत न तारे ॥
हरषे जनकु देखि दोउ भाई । मुनि पद कमल गहे तब जाई ॥
त्या दोघांना पाहून सर्वजण सुखावले. सर्वांचे डोळे एकटक त्यांना पाहू लागले. डोळ्यांच्या बाहुल्यासुद्धा स्थिरावून गेल्या. राजा जनक त्या दोघा भावांना पाहून आनंदित झाले. मग त्यांनी मुनींजवळ जाऊन त्यांची चरणकमले धरली. ॥ २ ॥
करि बिनती निज कथा सुनाई । रंग अवनि सब मुनिहि देखाई ॥
जहँ जहँ जाहिं कुअँर बर दोऊ । तहँ तहँ चकित चितव सबु कोऊ ॥
त्यांनी धनुष्याच्या पणाविषयीची आपली कथा नम्रपणे सांगितली आणि मुनींना संपूर्ण रंगभूमी दाखविली. मुनींच्याबरोबर दोघे राजकुमार जेथे जेथे जात होते, तेथे तेथे सर्वजण त्यांना आश्र्चर्यचकित होऊन पाहात होते. ॥ ३ ॥
निज निज रुख रामहि सबु देखा । कोउ न जान कछु मरमु बिसेषा ॥
भलि रचना मुनि नृप सन कहेऊ । राजॉं मुदित महासुख लहेऊ ॥
सर्वांना वाटे की, श्रीराम आपल्याकडेच पाहात आहेत, परंतु त्यामागील रहस्य कोणी जाणू शकले नाही. मुनींनी राजाला सांगितले की, ' रंगभूमीची निर्मिती फार छान आहे. ' ते ऐकून राजा जनक प्रसन्न झाले आणि त्यांना फार समाधान वाटले. ॥ ४ ॥
दोहा--सब मंचन्ह तें मंचु एक सुंदर बिसद बिसाल ।
मुनि समेत दोउ बंधु तहँ बैठारे महिपाल ॥ २४४ ॥
सर्व मंचांमध्ये एक मंच अधिक सुंदर, देदीप्यमान व विशाल होता. स्वतः राजांनी मुनींसह दोघा भावांना तेथे बसविले. ॥ २४४ ॥
प्रभुहि देखि सब नृप हियँ हारे । जनु राकेस उदय भएँ तारे ॥ 
असि प्रतीति सब के मन माहीं । राम चाप तोरब सक नाहीं ॥
ज्याप्रमाणें पूर्ण चंद्र उगवताच तारे प्रकाशहीन होतात, त्याप्रमाणे प्रभूंना पाहून जनलेले सर्व राजे मनातून निराश झाले. सर्वांची खात्री पटली की, श्रीरामचंद्रच हे शिवधनुष्य मोडणार, यात शंका नाही. ॥ १ ॥
बिनु भंजेहुँ भव धनुषु बिसाला । मेलिहि सीय राम उर माला ॥
अस बिचारि गवनहु घर भाई । जसु प्रतापु बलु तेजु गवॉंई ॥
शिवांचे विशाल धनुष्य मोडले नाही, तरी सीता श्रीरामचंद्रांच्याच गळ्यात वरमाला घालील. असा विचार करुन काही राजे म्हणू लागले की, ' अरे बाबांनो, असा विचार करा आणि आपली कीर्ती, प्रताप, बल व तेज यांवर पाणी सोडून आपापल्या घरी चला. ॥ २ ॥
बिहसे अपर भूप सुनि बानी । जे अबिबेक अंध अभिमानी ॥
तोरेहुँ धनुषु ब्याहु अवगाहा । बिनु तोरें को कुअँरि बिआहा ॥
दुसरे राजे जे अविवेकामुळे अंध झालेले होते आणि घमेंडखोर होते, त्यांनी हे ऐकल्यावर ते फिदीफिदी हसले. ते म्हणाले, ' धनुष्य मोडले, तरीही विवाह होणे कठीण आहे. आम्ही सहजपणें सीता हातची जाऊ देणार नाही. मग धनुष्य मोडल्याविना राजकुमारीशी लग्न कोण करु शकेल ? ॥ ३ ॥
एक बार कालउ किन होऊ । सिय हित समर जितब हम सोऊ ॥
यह सुनि अवर महिप मुसुकाने । धरमसील हरिभगत सयाने ॥ ४ ॥
प्रत्यक्ष काल जरी असला, तरी सीतेसाठी आम्ही त्यालाही युद्धात जिंकू ' ही घमेंडीची भाषा ऐकून धर्मात्मे, हरिभक्त आणि शहाणे असे जे दुसरे राजे होते, ते हसले. ॥ ४ ॥       
सो०--सीय बिआहबि राम गरब दूरि करि नृपन्ह के ।
जीति को सक संग्राम दसरथ के रन बॉंकुरे ॥ २४५ ॥
ते म्हणाले, ' राजांचा गर्व हरण करुन श्रीरामचंद्रच सीतेशी विवाह करतील. युद्धाच्या बाबतीत म्हणाल तर, महाराज दशरथांच्या रणवीर पुत्रांना युद्धात कोण जिंकू शकेल ? ॥ २४५ ॥
ब्यर्थ मरहु जनि गाल बजाई । मन मोदकन्हि कि भूख बुताई ॥
सिख हमारि सुनि परम पुनीता । जगदंबा जानहु जियँ सीता ॥
फुकट बडबड करुन मरु नका. मनातल्या मांड्यांनी भूक भागते काय ? आमचा निष्कपट सल्ला ऐकून सीतेला आपल्या मनात प्रत्यक्ष जगज्जननी समजा. ॥ १ ॥
जगत पिता रघुपतिहि बिचारी । भरि लोचन छबि लेहु निहारी ॥
सुंदर सुखद सकल गुन रासी । ए दोउ बंधु संभु उर बासी ॥
आणि श्रीरघुनाथांना जगत्पिता परमेश्र्वर मानून डोळे भरुन त्यांचे लावण्य पाहून घ्या. अशी संधि वारंवार येत नसते. सुंदर, सुखदायक आणि समस्त गुणांची राशी असलेले हे दोघे भाऊ भगवान शिवांच्या हृदयात निवास करणारे आहेत. ॥ २ ॥
सुधा समुद्र समीप बिहाई । मृगजलु निरखि मरहु कत धाई ॥
करहु जाइ जा कहुँ जोइ भावा । हम तौ आजु जनम फलु पावा ॥
जवळ आलेल्या भगवद्दर्शनरुप अमृताचा समुद्र सोडून जगज्जननी जानकीला पत्नी म्हणून मिळविण्याचे मृगजल पाहून धावून का मरता ? असो. बाबांनो, ज्याला जे योग्य वाटेल तेच करा. आम्ही तर श्रीरामांचे दर्शन घेऊन आज जन्माचे सार्थक करुन घेतले आहे. ' ॥ ३ ॥
अस कहि भले भूप अनुरागे । रुप अनूप बिलोकन लागे ॥
देखहिं सुर नभ चढ़े बिमाना । बरषहिं सुमन करहिं कल गाना ॥
असे म्हणत सज्जन राजे प्रेममग्न होऊन श्रीरामांचे अनुपम रुप पाहू लागले. देवगणसुद्धा आकाशातून विमानात बसून दर्शन घेत होते आणि सुंदर गायन करीत फुले उधळत होते. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: