Wednesday, October 21, 2020

ShriRamcharitmans Part 55 श्रीरामचरितमानस भाग ५५

 

ShriRamcharitmans Part 55 
Doha 252 to 255 
श्रीरामचरितमानस भाग ५५ 
दोहा २५२ ते २५५ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

  दोहा—कहि न सकत रघुबीर डर लगे बचन जनु बान ।

            नाइ राम पद कमल सिरु बोले गिरा प्रमान ॥ २५२ ॥

श्रीरघुवीरांच्या भीतीमुळे तो काही बोलू शकला नव्हता, परंतु जनक राजांचे बोलणे त्याला बाणाप्रमाणे टोचू लागले. जेव्हा राहावले नाही तेव्हा श्रीरामचंद्रांच्या चरणकमलांवर मस्तक लववून त्याने स्पष्टपणे म्हटले, ॥ २५२ ॥

रघुबंसिन्ह महुँ जहँ कोउ होई । तेहिं समाज अस कहइ न कोई ॥

कही जनक जसि अनुचित बानी । बिद्यमान रघुकुलमनि जानी ॥

‘ जेथे रघुवंशीयांपैकी कोणीही असतो, त्या सभेत जनकांनी रघुकुलशिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत, असे अनुचित कोणी बोलत नसते. ॥ १ ॥

सुनहु भानुकुल पंकज भानू । कहउँ सुभाउ न कछु अभिमानू ॥

जौं तुम्हारि अनुसासन पावौं । कंदुक इव ब्रह्मांड उठावौं ॥

हे सूर्यकुलरुपी ( कमलासाठी ) सूर्य असणार्‍या श्रीरामा ! ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की, जर तुमची आज्ञा असेल तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलून धरीन. ॥ २ ॥

काचे घट जिमि डारौं फोरी । सकउँ मेरु मूलक जिमि तोरी ॥

तव प्रताप महिमा भगवाना । को बापुरो पिनाक पुराना ॥

आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकीन. मी सुमेरु पर्वताला मुळीप्रमाणे उघडून टाकू शकतो. हे भगवन ! तुमच्या प्रतापाच्या महिम्यापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय ? ॥ ३ ॥

नाथ जानि अस आयसु होऊ । कौतुकु करौं बिलोकिअ सोऊ ॥

कमल नाल जिमि चाप चढ़ावौं । जोजन सत प्रमान लै धावौं ॥

हे नाथ, असे मानून आज्ञा द्याल, तर गंमत करुन दाखवितो. ती पाहा तर खरे. धनुष्याला कमळाच्या देठीप्रमाणे उचलून घेऊन शंभर योजने धावत जाईन. ॥ ४ ॥

दोहा—तोरौं छत्रक दंड जिमि तव प्रताप बल नाथ ।

जौं न करौं प्रभु पद सपथ कर न धरौं धनु भाथ ॥ २५३ ॥

हे नाथ, आपल्या प्रतापाच्या बळावर मी हे धनुष्य कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे मोडून टाकीन. जर मी असे केले नाही, तर प्रभूंच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की, मग मी धनुष्य व भाता कधीही हाती धरणार नाही.’ ॥ २५३ ॥

लखन सकोप बचन जे बोले । डगमगानि महि दिग्गज डोले ॥

सकल लोग सब भूप डेराने । सिय हियँ हरषु जनकु सकुचाने ॥

लक्ष्मण रागाने ओरडताच पृथ्वी डळमळू लागली आणि दिग्गज हादरले. सर्व लोक आणि राजे घाबरले. सीतेला आनंद झाला आणि जनक वरमले. ॥ १ ॥

गुर रघुपति सब मुनि मन माहीं । मुदित भए पुनि पुनि पुलकाहीं ॥

सयनहिं रघुपति लखनु नेवारे । प्रेम समेत निकट बैठारे ॥

गुरु विश्र्वामित्र, श्रीरघुनाथ व सर्व मुनी मनात आनंदले आणि वारंवार रोमांचित झाले. श्रीरघुनाथांनी खूण करुन लक्ष्मणाला रोखले आणि प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवून घेतले. ॥ २ ॥

बिस्वामित्र समय सुभ जानी । बोले अति स्नेहमय बानी ॥

उठहु राम भंजहु भवचापा । मेटहु तात जनक परितापा ॥

शुभ वेळ आल्याचे जाणून विश्र्वामित्र अत्यंत प्रेमाने म्हणाले, ‘ हे रामा, ऊठ शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा ! जनकांची चिंता दूर कर. ‘ ॥ ३ ॥

सुनि गुरु बचन चरन सिरु नावा । हरषु बिषादु न कछु उर आवा ॥

ठाढ़े भए उठि सहज सुभाएँ । ठवनि जुबा मृगराजु लजाएँ ॥

गुर-वचन ऐकून श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण सिंहालाही लाजविल्यासारखे सहजपणे उभे राहिले. ॥ ४ ॥

दोहा—उदित उदयगिरि मंच पर रघुबर बालपतंग ।

बिकसे संत सरोज सब हरषे लोचन भृंग ॥ २५४ ॥

मंचरुपी उदयाचलावर रघुनाथरुपी बाल-सूर्य उगवताच सर्व संतरुपी कमळे फुलून गेली आणि त्यांचे नेत्ररुपी भ्रमर आनंदित झाले. ॥ २५४ ॥

नृपन्ह केरि आसा निसि नासी । बचन नखत अवली न प्रकासी ॥

मानी महिप कुमुद सकुचाने । कपटी भूप उलूक लुकाने ॥

राजांची आशारुपी रात्र नाहीशी झाली. त्यांच्या वचनरुपी तारांच्या समुदायाचे चमकणे बंद झाले. घमेंडी राजारुपी रात्रविकासी कमळे कोमेजली आणि कपटी राजारुपी घुबडे लपून बसली. ॥ १ ॥

भए बिसोक कोक मुनि देवा । बरिसहिं सुमन जनावहिं सेवा ॥

गुर पद बंदि सहित अनुरागा । राम मुनिन्ह सन आयसु मागा ॥

मुनी व देवरुपी चक्रवाकांचे दुःख सरले. ते फुलांचा वर्षाव करीत सेवा करु लागले. प्रेमाने गुरुंच्या चरणांना वंदन करुन श्रीरामचंद्रांनी मुनींची आज्ञा मागितली. ॥ २ ॥

सहजहिं चले सकल जग स्वामी । मत्त मंजु बर कुंजर गामी ॥

चलत राम सब पुर नर नारी । पुलक पूरि तन भए सुखारी ॥

संपूर्ण जगताचे स्वामी श्रीराम हे मस्त व श्रेष्ठ हत्तीच्या डौलदार चालीने निघाले. श्रीराम निघताच नगरातील सर्व स्त्री-पुरुष सुखावून गेले व रोमांचित झाले. ॥ ३ ॥

बंदि पितर सुर सुकृत सँभारे । जौं कछु पुन्य प्रभाउ हमारे ॥

तौ सिवधनु मृनाल की नाईं । तोरहुँ रामु गनेस गोसाईं ॥

त्यांनी पितर व देवांना वंदन करुन आपल्या पुण्याईचे स्मरण केले. ते म्हणाले, ‘ जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल, तर हे देवा गणेशा, श्रीराम हे शिव-धनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. ‘ ॥ ४ ॥

दोहा—रामहि प्रेम समेत लखि सखिन्ह समीप बोलाइ ।

सीता मातु सनेह बस बचन कहइ बिलखाइ ॥ २५५ ॥

सीतेची माता श्रीरामांना वात्सल्याने पाहून व सख्यांना जवळ बोलावून प्रेमवश सद्गदित होऊन म्हणाली, ॥ २५५ ॥

सखि सब कौतुकु देखनिहारे । जेउ कहावत हितू हमारे ॥

कोउ न बुझाइ कहइ गुर पाहीं । ए बालक असि हठ भलि नाहीं ॥

‘ हे सखी, हे जे आमचे हितचिंतक म्हणवितात, ते सर्व कौतुक पाहाणारे आहेत. यापैकी कोणीही गुरु विश्र्वामित्रांना समजावून का सांगत नाहीत की, हे श्रीराम लहान आहेत. त्यांच्यासाठी असा आग्रह धरणे चांगले नव्हे. ॥ १ ॥

रावन बान छुआ नहिं चापा । हारे सकल भूप करि दापा ॥

सो धनु राजकुअँर कर देहीं । बाल मराल कि मंदर लेहीं ॥

रावण व बाणासुर धनुष्याला स्पर्शसुद्धा करु शकले नाहीत आणि सर्व घमेंडखोर राजांनी ज्याच्यापुढे हात टेकले, तेच हे धनुष्य या सुकुमार राजकुमाराच्या हाती देत आहेत. हंसाचे पिल्लू कधी मंदराचल उचलू शकेल काय ? ॥ २ ॥

भूप सयानप सकल सिरानी । सखि बिधि गति कछु जाति न जानी ॥

बोली चतुर सखी मृदु बानी । तेजवंत लघु गनिअ न रानी ॥

ज्ञानी महाराजांचेही सर्व शहाणपण संपले आहे, असे वाटते. हे सखी, विधात्याची गती काही समजत नाही.’ असे म्हणून राणी गप्प बसली. तेव्हा एक चतुर सखी कोमल वाणीने म्हणाली, ‘ हे राणी, जो तेजस्वी असतो त्याला कधीही लहान सनजू नये.’ ॥ ३ ॥

कहँ कुंभज कहँ सिंधु अपारा । सोषेउ सुजसु सकल संसारा ॥

रबि मंडल देखत लघु लागा । उदयँ तासु तिभुवन तम भागा ॥

कुठे घटातून उत्पन्न झालेले मुनी अगस्त्य आणि कुठे अपार समुद्र. परंतु त्यांनी तो शोषून टाकला, त्यांची श्रेष्ठ कीर्ती विश्र्वात पसरली आहे. सूर्यमंडल दिसायला लहान दिसते, परंतु त्याचा उदय होताच तिन्ही लोकीचा अंधकार पळून जातो. ॥ ४ ॥



Custom Search

1 comment:

micheal pan said...

I just want the whole world to know about this spell caster I met
two weeks ago, wisdomspiritualtemple@gmail.com I cannot say everything he has done for me my wife
left me 3 years ago left with my kids I was going through online
when I meant this wonderful man's testimony online I decided to
give it a try and my wife is back to me now and we ar1e happily
married again cause is too much to put in writing all I can say is
thank you very much am very happy .and does alot of spell
including Love Spell
Death Spell
Money Spell
Power Spell
Success Spell
Sickness Spell
Pregnancy Spell
Marriage Spell
Job Spell
Protection Spell
Lottery Spell
Court Case Spell
Luck Spell etc. In case you need his help contact him on this email
address wisdomspiritualtemple@gmail.com he is a good man
thanks.whatsapp number +234813 648 2342