ShriRamCharitManas
दोहा--हंसबसु दसरथु जनकु राम लखन से भाइ ।
जननी तूँ जननी भई बिधि सन कछु न बसाइ ॥ १६१ ॥
मला सूर्यवंशासारखा वंश, दशरथांच्यासारखा पिता व
राम-लक्ष्मणासारखे भाऊ मिळाले. परंतु हे माते, मला जन्म देणारी आई तू
झालीस ! काय करणार ? विधात्याच्यापुढे कुणाचे काही चालत नाही. ॥ १६१ ॥
जब तैं कुमति कुमत जियँ ठयऊ । खंड खंड होइ हृदउ न गयऊ ॥
बर मागत मन भइ नहिं पीरा । गरि न जीह मुहँ परेउ न
कीरा ॥
अग दुष्टे ! जेव्हा तू हा दुष्ट विचार मनात पक्का केलास, त्यावेळीच तुझ्या
हृदयाचे तुकडे तुकडे का नाही झाले ? वरदान मागताना तुझ्या मनात थोडेसुद्धा दुःख झाले नाही ? तुझी जीभ गळून नाही
पडली ? तुझ्या तोंडात किडे का नाही पडले ? ॥ १ ॥
भूपँ प्रतीति तोरि किमि कीन्ही । मरन काल बिधि मति
हरि लीन्ही ॥
बिधिहुँ न नारि हृदय गति जानी । सकल कपट अघ
अवगुन खानी ॥
राजांनी तुझ्यावर विश्वास कसा ठेवला ? विधात्याने त्यांची
बुद्धी मरतेवेळी हरण केली होती, असे वाटते. स्त्रियांच्या मनातील चाल विधात्यालाही कळली
नाही. तुझे हृदय पूर्णपणे कपट, पाप व अवगुण यांची खाण आहे. ॥ २ ॥
सरल सुसील धरम रत राऊ । सो किमि जानै तीय
सुभाऊ ॥
अस को जीव जंतु जग माहीं । जेहि रघुनाथ प्रानप्रिय
नाहीं ॥
आणि राजा हे तर सरळ, सुशील व धर्मपरायण
होते. त्यांना स्त्री-स्वभाव कसा कळणार ? अग, जगांत असा कोणता प्राणी
आहे की, त्याला श्रीरामचंद्र प्राणासारखे प्रिय नाहीत ? ॥ ३ ॥
भे अति अहित रामु तेउतोही । को तू अहसि सत्य कहु मोही ॥
जो हसि सो हसि मुहँ मसि लाई । आँखि ओट उठि बैठहि जाई ॥
ते श्रीरामही तुला वैर्यासारखे वाटले ? तू कोण आहेस ? मला खरे खरे सांग. तू
जी कोण असशील, ती आता आपले तोंड काळे करुन माझ्या डोळ्यांआड निघून जा
कशी ! ॥ ४ ॥
दोहा--राम बिरोधी हृदय तें प्रगट कीन्ह बिधि मोहि ।
मो समान को पातकी बादि कहउँ कछु तोहि ॥ १६२ ॥
विधात्याने मला श्रीरामांना विरोध करणार्या तुझ्यापासून उत्पन्न
केले व मला श्रीरामविरोधी ठरविले. माझ्यासारखा पापी दुसरा कोण आहे ? मीच पापी आहे. मग
विनाकारण मी तुला बोल का लावू ? ॥ १६२ ॥
सुनि सत्रुघुन मातु कुटिलाई । जरहिं गात रिस कछु न
बसाई ॥
तेहि अवसर कुबरी तहँ आई । बसन बिभूषन बिबिध
बनाई ॥
मातेचा दुष्टपणा ऐकून शत्रुघ्नाचे शरीर क्रोधाने पेटले होते, परंतु त्याचे काही चालत
नव्हते. त्याचवेळी तर्हेतर्हेची वस्त्रे व अलंकार यांनी नटून कुबडी मंथरा तेथे
आली. ॥ १ ॥
लखि रिस भरेउ लखन लघु भाई । बरत अनल घृत
आहुति पाई ॥
हुमगि लात तकि कूबर मारा । परि मुह भर महि करत
पुकारा ॥
तिला नटलेली पाहून लक्ष्मणाचा छोटा भाऊ शत्रुघ्न
भडकला. जणू जलत्या आगीत तुप
ची आहुती पडली. त्याने तिच्या कुबडावर जोराने लाथ
मारली. ती ओरडत जमिनीवर तोंडघशी पडली. ॥ २ ॥
कूबर टूटेउ फूट कपारु । दलित दसन मुख रुधिर प्रचारु
॥
आह दइअ मैं काह नसावा । करत नीक फलु अनइस
पावा ॥
तिच कुबड मोडले, कपाळ फुटले, दात तुटले आणि तोंडातून रक्त वाहू लागले. ती विव्हळत
म्हणाली, ' अरे दैवा, चांगले करता मला वाईट फळ मिळाले. मी काय वाईट केले ? ' ॥ ३ ॥
सुनि रिपुहन लखि नख सिख खोटी । लगे घसीटन धरि
धरि झोंटी ॥
भरत दयानिधि दीन्हि छड़ाई । कौसल्या पहिं गे दोउ
भाई ॥
तिचे बोलणे ऐकून आणि ती नखशिखांत दुष्ट आहे, असे पाहून शत्रुघ्न
तिच्या झिंज्या धरुन तिला फरफटत नेऊ लागला. तेव्हा दयाळू भरताने तिला सोडविले आणि
दोघे भाऊ कौसल्या मातेकडे गेले. ॥ ४ ॥
दोहा--मलिन बसन बिबरन बिकल कृस सरीर दुख भार ।
कनक कलप बर बेलि बन मानहुँ हनी तुसार ॥ १६३ ॥
कौसल्येने मळकट कपडे घातले होते. चेहरा उतरला होता, ती व्याकूळ झालेली होती
आणि दुःखाच्या भाराने तिचे शरीर सुकून गेले होते. जणू सोन्याच्या सुंदर कल्पलतेला
वनात हिमपाताने करपून टाकले असावे, अशी ती दिसत होती. ॥ १६३ ॥
भरतहि देखि मातु उठि धाई । मुरुछित अवनि परी झइँ
आई ॥
देखत भरतु बिकल भए भारी । परे चरन तन दसा
बिसारी ॥
भरताला पाहाताच माता कौसल्या उठून धावली. परंतु
मूर्छा येऊन जमिनीवर पडली. हे पाहाताच भरत फार
व्याकूळ झाला आणि देहभान विसरुन त्याने तिच्या
चरणी लोळण घेतली. ॥ १ ॥
मातु तात कहँ देहि देखाई । कहँ सिय रामु लखनु दोउ भाई ॥
कैकइ कत जनमी जग माझा । जौं जनमि त भइ काहे न बॉंझा ॥
तो म्हणाला, ' आई, बाबा कुठे आहेत ? मला दाखव. सीता व माझे
दोघे बंधू श्रीराम व लक्ष्मण कुठे आहेत ? कैकेयीने जगात जन्म
कशाला घेतला आणि जन्मली तर ती वांझ का नाही झाली ? ॥ २ ॥
कुल कलंकु जेहिं जनमेउ मोही । अपजस भाजन प्रियजन
द्रोही ॥
को तिभुवन मोहि सरिस अभागी । गति असि तोरि मातु
जेहि लागी ॥
तिने कुलाचा कलंक, अपकीर्तीचा पेटारा अणि
प्रियजनांचा द्रोही बनलेल्या माझ्यासारख्या पुत्राला जन्म का दिला ? त्रैलोक्यांत
माझ्यासारखा दुर्दैवी कोण आहे ? हे माते, तिच्यामुळे तुझी ही दशा झाली. ॥ ३ ॥
पितु सुरपुर बन रघुबर केतू । मैं केवल सब अनरथ हेतू ॥
धिग मोहि भयउँ बेनु बन आगी । दुसह दाह दुख दूषन
भागी ॥
वडील स्वर्गात आणि श्रीराम वनात गेले. केतूसारखा मीच या
सर्व अनर्थाचे कारण आहे. माझा धिक्कार असो. मी वेळूच्या वनात आगीसारखा उत्पन्न
झालो आणि भीषण दाह, दुःख व दोषांचा भागीदार ठरलो. ' ॥ ४ ॥
दोहा--मातु भरत के बचन मृदु सुनि पुनि उठी सँभारि ।
लिए उठाइ लगाइ उर लोचन मोचति बारि ॥ १६४ ॥
भरताचे ते दीनवाणे बोलणे ऐकून माता कौसल्या सावरुन उठली, तिने भरताला उठवून
छातीशी धरले आणि ती नेत्रांतून अश्रू ढाळू लागली. ॥ १६४ ॥
सरल सुभाय मायँ हियँ लाए । अति हित मनहुँ राम फिरि
आए ॥
भेंटेउ बहुरि लखन लघु भाई । सोकु सनेहु न हृदयँ समाई
॥
सरळ स्वभावी कौसल्या मातेने मोठ्या प्रेमाने भरताला
उराशी धरले. जणू श्रीरामच परत आले होते. नंतर
लक्ष्मणाचा छोटा भाऊ शत्रुघ्न याला तिने छातीशी धरले.
तिच्या हृदयांत शोक व प्रेम मावत नव्हते. ॥ १ ॥
देखि सुभाउ कहत सबु कोई । राम मातु अस काहे न
होई ॥
मातॉं भरतु गोद बैठारे । आँसु पोंछि मृदु बचन उचारे ॥
कौसल्येचा स्वभाव पाहून सर्वजण म्हणत होते की, ' श्रीरामाच्या मातेचा
स्वभाव असा का बरे असणार नाही ? ' कौसल्येने भरताला मांडीवर बसविले आणि अश्रू पुसून ती
मृदुपणाने म्हणाली, ॥ २ ॥
अजहुँ बच्छ बलि धीरज धरहु । कुसमउ समुझि सोक
परिहरहू ॥
जनि मानहु हियँ हानी गलानी । काल करम गति अघटित
जानी ॥
' हे वत्सा, मी तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. तू अजुनी धीर धर. वाईट
काळ लक्षात घेऊन शोक सोडून दे. काळ व कर्म यांची गती अटळ असते, असे मानून मनात दुःख व
ग्लानी येऊ देऊ नकोस. ॥ ३ ॥
काहुहि दोसु देहु जनि ताता । भा मोहि सब बिधि बाम
बिधाता ॥
जो एतेहुँ दुख मोहि जिआवा । अजहुँ को जानइ का तेहि
भावा ॥
बाळा ! कुणाला दोष देऊ नकोस, विधाता सर्व प्रकारे
मला प्रतिकूल झाला आहे, इतके दुःख देऊन त्याने मला जिवंत ठेवले आहे. कुणास ठाऊक, त्याला काय आवडत आहे ? ॥ ४ ॥
दोहा--पितु आयस भूषन बसन तात तजे रघुबीर ।
बिसमउ हरषु न हृदयँ कछु पहिरे बलकल चीर ॥ १६५
॥
हे तात, पित्याच्या आज्ञेने श्रीरघुवीराने वस्त्र व आभूषणे काढून
टाकली आणि वल्कले धारण केली. त्याच्या मनात जरासुद्धा विषाद किंवा हर्ष नव्हता.॥
१६५ ॥
मुख प्रसन्न मन रंग न रोषु । सब कर सब बिधि करि
परितोषू ॥
चले बिपिन सुनि सिय सँग लागी । रहइ न राम चरन
अनुरागी ॥
त्याचे मुख प्रसन्न होते. मनात आसक्ती नव्हती की द्वेष
नव्हता. सर्वांचे सर्व प्रकारे समाधान करुन तो वनात गेला. हे ऐकून सीतासुद्धा
त्याच्याबरोबर गेली. श्रीरामांच्या चरणांवर प्रेम असल्याने तीसुद्धा काही सांगितले
तरी राहिली नाही, ॥ १ ॥
सुनतहिं लखनु चले उठि साथ । रहहिं न जतन किए
रघुनाथा ॥
तब रघुपति सबही सिरु नाई । चले संग सिय अरु लघु
भाई ॥
ते ऐकून लक्ष्मणसुद्धा त्याच्याबरोबर निघाला. श्रीरामांनी
थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. मग श्रीरघुनाथ मस्तक नमवून सीता व
लक्ष्मण यांचेसह निघून गेले. ॥ २ ॥
रामु लखनु सिय बनहि सिधाए । गयउँ न संग न प्रान
पठाए ॥
यहु सबु भा इन्ह आँखिन्ह आगें । तउ न तजा तनु जीव
अभागें ॥
श्रीराम, लक्ष्मण व सीता वनास गेले. मी बरोबर गेले नाही आणि मी
आपले प्राणही त्यांच्यामागे पाठविले नाहीत. हे सर्व माझ्या या डोळ्यामसमोर घडले.
तरीही माझ्या दुर्दैवी जिवाने शरीराचा त्याग केला नाही. ॥ ३ ॥
मोहि न लाज निज नेहु निहारी । राम सरिस सुत मैं
महतारी ॥
जिऐ मरै भल भूपति जाना । मोर हृदय सत कुलिस
समाना ॥
रामासारख्या पुत्राची मी आई, पण स्वतःच्या प्रेमाची
मला लाजही वाटली नाही. जगणे व मरणे हे राजाला चांगले कळले, माझे हृदय शेकडो
वज्रांसारखे कठोर आहे. ॥ ४ ॥
दोहा--कौसल्या के बचन सुनि भरत सहित रनिवासु ।
ब्याकुल बिलपत राजगृह मानहुँ सोक नेवासु ॥ १६६ ॥
कौसल्येचे बोलणे ऐकून भरतासह सर्व अंतःपुर व्याकूळ
होऊन विलाप करु लागले. राजमहाल जणू शोकाचे
निवास-स्थान बनला. ॥ १६६ ॥
बिलपहिं बिकल भरत दोउ भाई । कौसल्याँ लिए हृदयँ
लगाई ॥
भॉंति अनेक भरतु समुझाए । कहि बिबेकमय बचन
सुनाए ॥
भरत, शत्रुघ्न हे दोघे भाऊ विव्हळ होऊन विलाप करु लागले.
तेव्हा कौसल्येने त्यांना हृदयाशी धरले. अनेक प्रकारे तिने भरताला समजावले आणि
पुष्कळशा विवेकपूर्ण गोष्टी त्याला सांगितल्या. ॥ १ ॥
भरतहुँ मातु सकल समुझाईं । कहि पुरान श्रुति कथा
सुहाईं ॥
छल बिहीन सुचि सरल सुबानी । बोले भरत जोरि जुग
पानी ॥
भरताने सर्व मातांची पुराण व वेदांचे दाखले देत समजूत
घातली. दोन्ही हात जोडून भरत निष्कपटपणे, निर्मळपणें आणि
साधेपणाने म्हणाल, ॥ २ ॥
जे अध मातु पिता सुत मारें । गाइ गोठ महिसुर पुर जारें
॥
जे अघ तिय बालक बध कीन्हें । मीत महीपति माहुर
दीन्हें ॥
' माता-पिता व पुत्र यांना मारण्यामुळे जे पाप लागते, जे गोशाला आणि
ब्राह्मणांचे नगर जाळण्याने लागते, जे पाप पत्नी व बालक यांची हत्या केल्याने लागते, आणि जे मित्र व राजाला
विष दिल्याने लागते, ॥ ३ ॥
जे पातक उपपातक अहहीं । करम बचन मन भव कबि
कहहीं ॥
ते पातक मोहि होहुँ बिधाता । जौं यहु होइ मोर मत माता
॥
कर्म, वचन आणि मन यांच्याद्वारे जितकी लहान-मोठी पापे लागतात, असे कवींनी सांगितले
आहे, हे विधात्या, जर या कृत्यामध्ये माझा हात असेल, तर हे माते ! ही पापे
मला लागोत. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment