ShriRamCharitManas
दोहा--कहहु तात केहि भॉंति कोउ करिहि बड़ाई तासु
।
राम लखन तुम्ह सत्रुहन सरिस सुअन सुचि जासु ॥ १७३
॥
बाबा रे ! ज्यांचे श्रीराम, लक्ष्मण, तू व शत्रुघ्न यांच्यासारखे
पुत्र आहेत त्यांचा महिमा कोण व कसा सांगू शकेल ? ॥ १७३ ॥
सब प्रकार भूपति बड़भागी । बादि बिषादु करिअ तेहि
लागी ॥
यह सुनि समुझि सोचु परिहरहू । सिर धरि राज रजायसु
करहू ॥
महाराज सर्व प्रकारे मोठ्या भाग्याचे होते. त्यांच्याबद्दल
विषाद करणें व्यर्थ आहे, असे ऐकून व समजून घेऊन चिंता करणे सोडून दे आणि राजाची
आज्ञा शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे कर. ॥ १ ॥
रायँ राजपटु तुम्ह कहुँ दीन्हा । पिता बचनु फुर चाहिअ
कीन्हा ॥
तजे रामु जेहिं बचनहि लागी । तनु परिहरेउ राम
बिरहागी ॥
राजांनी तुला राजपद दिले आहे. पित्याचे वचन तुला
पाळले पाहिजे. राजांनी आपल्या वचनासाठी
श्रीरामचंद्रांचा त्याग केला आणि रामविरहाच्या अग्नीमध्ये
आपल्या देहाची आहुती दिली. ॥ २ ॥
नृपहि बचन प्रिय नहिंप्रिय प्राना । करहु तात पितु बचन
प्रवाना ॥
करहु सीस धरि भूप रजाई । हइ तुम्ह कहँ सब भॉंति
भलाई ॥
राजांना वचन प्रिय होते, प्राण प्रिय नव्हते.
म्हणून हे कुमार ! पित्याचे वचन सत्य कर. राजाची आज्ञा शिरोधार्ह मानून
त्याप्रमाणे वर्तन कर. त्यातच तुझे सर्व प्रकारे भले आहे. ॥ ३ ॥
परसुराम पितु अग्या राखी । मारी मातु लोक सब साखी
॥
तनय जजातिहि जौबनु दयऊ । पितु अग्याँ अघ अजसु न
भयऊ ॥
परशुरामानी पित्याची आज्ञा मानली व मातेला ठार मारले.
सर्वजण याचे साक्षीदार आहेत. राजा ययातीच्या पुत्राने
पित्याला आपले तारुण्य दिले. पित्याची आज्ञा पालन
केल्याने त्यांना पाप व अपकीर्ती मिळाली नाही. ॥ ४ ॥
दोहा--अनुचित उचित बिचारु तजि जे पालहिं पितु बैन ।
ते भाजन सुख सुजस के बसहिं अमरपति ऐन ॥ १७४ ॥
जे अनुचित व उचित यांचा विचार सोडून पित्याच्या वचनाचे पालन
करतात, ते इहलोकी सुख व सुकीर्तीस पात्र ठरतात आणि शेवटी स्वर्गात
निवास करतात. ॥ १७४ ॥
अवसि नरेस बचन फुर करहू । पालहु प्रजा सोकु
परिहरहू ॥
सुरपुर नृपु पाइहि परितोषू । तुम्ह कहुँ सुकृतु सुजसु नहिं
दोषु ॥
राजांच्या वचनाचे पालन निश्चितपणे कर. शोक सोडून दे
व प्रजेचे पालन कर. असे केल्याने राजांना स्वर्गात संतोष
होईल आणि तुला पुण्य व सुंदर कीर्ती लाभेल. दोष
लागणार नाही. ॥ १ ॥
बेद बिदित संमत सबही का । जेहि पितु देइ सो पावइ
टीका ॥
करहु राजु परिहरहु गलानी । मानहु मोर बचन हित जानी
॥
पिता ज्याला राजतिलक देतो, त्यालाच तो मिळतो, हे वेदांमध्ये प्रसिद्ध
आहे आणि स्मृतिपुराणादी सर्व शास्त्रांनी संमत केलेले आहे. म्हणून तू राज्य कर आणि
उदासपण सोडून दे. माझ्या बोलण्यात हित आहे, असे समजून ते मान्य कर.
॥ २ ॥
सुनि सुखु लहब राम बैदेहीं । अनुचित कहब न पंडित
केहीं ॥
कौसल्यादि सकल महतारीं । तेउ प्रजा सुख होहिं
सुखारीं ॥
ही गोष्ट ऐकल्यावर श्रीरामचंद्र व सीता यांना समाधान
मिळेल आणि कोणीही पंडित याला अयोग्य म्हणणार
नाही. कौसल्या इत्यादी तुझ्या सर्व मातासुद्धा प्रजेच्या
सुखामुळे सुखी होतील. ॥ ३ ॥
परम तुम्हार राम कर जानिहि । सो सब बिधि तुम्ह सन
भल मानिहि ॥
सौंपेहु राजु राम के आएँ । सेवा करेहु सनेह सुहाएँ ॥
तुझे श्रीरामांवर श्रेष्ठ प्रेम आहे, हे जो जाणतो, तो सर्व प्रकारे तुला
चांगलाच मानेल. श्रीराम परत आल्यावर त्यांना राज्य सोपवून मग त्यांची प्रेमाने
सेवा कर.' ॥ ४ ॥
दोहा--कीजिअ गुर आयसु अवसि कहहिं सचिव कर
जोरि ।
रघुपति आएँ उचित जस तस करब बहोरि ॥ १७५ ॥
हात जोडून मंत्री म्हणाले, ' गुरुजींच्या आज्ञेचे
अवश्य पालन करा. श्रीरघुनाथ परत आल्यावर मग जे योग्य असेल, त्याप्रमाणे करा. ॥ १७५
॥
कौसल्या धरि धीरजु कहई । पूत पथ्य गुर आयसु अहई
॥
सो आदरिअ करिअ हित मानी । तजिअ बिषादु काल
गति जानी ॥
कौसल्यासुद्धा धीर धरुन म्हणाली, ' हे पुत्रा, गुरुजींची आज्ञा ही
हिताची आहे. तिचा आदर केला पाहिजे आणि हित मानून तिचे पालन केले पाहिजे. काळाची
गती समजून घेऊन विषाद सोडला पाहिजे. ॥ १ ॥
बन रघुपति सुरपुर नरनाहू । तुम्ह एहि भॉंति तात कदराहू
॥
परिजन प्रजा सचिव सब अंबा । तुम्हही सुत सब कहँ
अवलंबा ॥
श्रीरघुनाथ वनात आहे, महाराज स्वर्गात गेले
आणि बाळा ! तू तर असा बावरुन गेला आहेस. हे पुत्रा, कुटुंब, प्रजा, मंत्री व सर्व माता या
सर्वांना तूच एक आधार आहेस. ॥ २ ॥
लखि बिधि बाम कालु कठिनाई । धीरजु धरहु मातु बलि
जाई ॥
सिर धरि गुर आयसु अनुसरहू । प्रजा पालि परिजन दुखु
हरहू ॥
विधाता हा प्रतिकूल आहे आणि काळ हा कठोर आहे, असे पाहून धीर धर. मी
तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. गुरुंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यानुसार कार्य कर व
प्रजेचे पालन करुन कुटुंबीयांचे दुःख दूर कर. ॥ ३ ॥
गुर के बचन सचिव अभिनंदनु । सुने भरत हिय हित जनु
चंदनु ॥
सुनी बहोरि मातु मृदु बानी । सील सनेह सरल रस सानी
॥
भरताने गुरुंचे वचन
आणि मंत्रांचे अनुमोदन ऐकले. ते त्याच्या तप्त हृदयात चंदनासारखे शीतल वाटले. नंतर
त्याने शील, स्नेह व सरळपणाने कौसल्या मातेची वाणी ऐकली. ॥ ४ ॥
छं०--सानी सरल रस मातु बानी सुनि भरतु ब्याकुल भए
।
लोचन सरोरुह स्त्रवत सींचत बिरह उर अंकुर नए ॥
सो दसा देखत समय तेहि बिसरी सबहि सुधि देह की ।
तुलसी सराहत सकल सादर सीवँ सहज सनेह की ॥
सरलपणाच्या रसाने भरलेली कौसल्या मातेची वाणी ऐकून भरत
व्याकूळ झाला. त्याचे नेत्रकमल अश्रू ढाळत हृदयातील विरहारुपी नवीन अंकुरांचे सिंचन करु लागले. त्याची ती दशा
पाहून त्यावेळी सर्वजण देहभान हरवून बसले. तुलसीदास म्हणतात, स्वाभाविक प्रेमाची
परिसीमा असलेल्या भरताची प्रशंसा सर्व लोक आदराने करु लागले.
सो०--भरतु कमल कर जोरि धीर धुरंधर धीर धरि ।
बचन अमिअँ जनु बोरि देत उचित उत्तर सबहि ॥ १७६ ॥
धैर्य-धुरीण भरत धीर धरुन कर-कमल जोडून आणि
आपले वचन जणू अमृतात बुडवून सर्वांना योग्य उत्तर
देऊ लागला. ॥ १७६ ॥
मासपारायण, अठरावा
विश्राम
मोहि उपदेसु दीन्ह गुरनीका । प्रजा सचिव संमत सबही
का ॥
मातु उचित धरि आयसुदीन्हा । अवसि सीस धरि चाहउँ
कीन्हा ॥
' गुरुजींनी मला सुंदर उपदेश केला. प्रजा, मंत्री इत्यादींना हेच
संमत आहे. मातेनेही जी योग्य आज्ञा दिली आहे, ती अवश्य शिरोधार्य
मानून तसेच मला करायला हवे. ॥ १ ॥
गुर पितु मातु स्वामि हित बानी । सुनि मन मुदित करिअ
भलि जानी ॥
उचितकि अनुचित किएँ बिचारु । धरमु जाइ सिर पातक
भारु ॥
कारण गुरु, पिता, माता, स्वामी आणि सुहृद यांचे सांगणे प्रसन्न मनाने योग्य
मानून ते केले पाहिजे. उचित-अनुचित याचा विचार केल्यास धर्म बुडतो आणि डोक्यावर
पापांचा भार वाढतो. ॥ २ ॥
तुम्ह तौ देहु सरल सिख सोई । जो आचरत मोर भल होई
॥
जद्यपि यह समुझत हउँ नीकें । तदपि होत परितोषु न जी
कें ॥
ज्या वागण्यामध्ये माझे भले होणर आहे, तोच सरळ उपदेश तुम्ही
मला केला आहे. जरी मी ही गोष्ट योग्य प्रकारे समजत असलो, तरी माझ्या मनाचे
समाधान होत नाही. ॥ ३ ॥
अब तुम्ह बिनय मोरि सुनि लेहू । मोहि अनुहरत सिखावनु
देहू ॥
ऊतरु देउँ छमब अपराधू । दुखित दोष गुन गनहिं न
साधू ॥
आता तुम्ही सर्वजण माझी विनंती ऐकून घ्या आणि माझ्या
पात्रतेप्रमाणे मला शिकवण द्या. मी उलट उत्तर देत आहे, या अपराधाबद्दल क्षमा
करा. सज्जन लोक दुःखी मनुष्याच्या दोष-गुणांचा विचार करीत नाहीत. ॥ ४ ॥
दोहा--पितु सुरपुर सिय रामु बन करन कहहु मोहि राजु ।
एहि तें जानहु मोर हित कै आपन बड़ काजु ॥ १७७ ॥
वडील स्वर्गात गेले आहेत. श्रीसीताराम वनात आहेत आणि तुम्ही
मला राज्य करण्यासाठी सांगत आहात, यामध्ये तुम्ही माझे कल्याण समजता की, आपले एखादे मोठे कार्य
होण्याची आशा करता ? ॥ १७७ ॥
हित हमार सियापति सेवकाईं । सो हरि लीन्ह मातु
कुटिलाईं ॥
मैं अनुमानि दीख मन माहीं । आन उपायँ मोर हित नाहीं
॥
माझे कल्याण हे तर सितापति श्रीरामांच्या सेवेमध्ये आहे, ते माझ्या मातेने
दुष्टपणाने हिरावून घेतले. मी आपल्या मनाने खूप विचार करुन पाहिला की, श्रीरामांच्या
सेवेखेरीज इतर कोणत्याही उपायाने माझे कल्याण होणार नाही. ॥ १ ॥
सोक समाजु राजु केहि लेखें । लखन राम सिय बिनु पद
देखें ॥
बादि बसन बिनु भूषन भारु । बादि बिरति बिनु
ब्रह्मबिचारु ॥
ज्याप्रमाणे वस्त्रांविना दागिन्यांचे ओझे व्यर्थ आहे.
वैराग्याविना ब्रह्मविचार व्यर्थ आहे. त्याप्रमाणे हे शोकाचा
समूह असलेले राज्य श्रीरामचंद्र आणि सीता यांच्या
चरणांच्या दर्शनाविना व्यर्थ होय. ॥ २ ॥
सरुर सरीर बादि बहु भोगा । बिनु हरिभगति जायँ जप
जोगा ॥
जायँ जीव बिनु देह सुहाई । बादि मोर सबु बिनु रघुराई ॥
रोगट शरीराला नाना प्रकारचे भोग व्यर्थ आहेत.
श्रीहरीच्या भक्तीविना जप व योग व्यर्थ आहे. जीवाविना
सुंदर देह व्यर्थ आहे. तसेच श्रीरघुनाथांच्या विना माझे
सर्व जीवन व्यर्थ आहे. ॥ ३ ॥
जाउँ राम पहिं आयसु देहू । एकहिं आँक मोर हित एहू ॥
मोहि नृप करि भल आपन चहहू । सोउ सनेह जड़ता बस
कहहू ॥
श्रीरामांच्याजवळ जाण्याची आज्ञा मला द्या. निश्चितपणे माझे
हित यातच आहे, आणि मला राजा बनवून आपले कल्याण होईल, असे तुम्हाला जे वाटते, तेसुद्धा तुम्ही
प्रेमाच्या मोहामुळे म्हणत आहात. ॥ ४ ॥
दोहा--कैकेई सुअ कुटिलमति राम बिमुख गतलाज ।
तुम्ह चाहत सुखु मोहबस मोहि से अधम कें राज ॥ १७८
॥
कैकेयीचा मुलगा, कुटिल बुद्धीचा, श्रीराम-विन्मुख झालेला
आणि निर्लज्ज अशा माझ्यासारख्या अधम व्यक्तीच्या राज्यापासून तुम्ही सुख मिळण्याची
इच्छा करता, तीसुद्धा मोहामुळेच. ॥ १७८ ॥
कहहुँ साँचु सब सुनि पतिआहू । चाहिअ धरमसील
नरनाहू ॥
मोहि राजु हठि देइहहु जबहीं । रसा रसातल जाइहि
तबहीं ॥
तुम्ही सर्वजण हे ऐकून विश्वास ठेवा की, मी सत्य सांगत आहे.
धर्मशील असलेल्यनेच राजा व्हायला हवे. तुम्ही हट्टाने मला राज्य द्याल, तर त्या क्षणी ही
पृथ्वी पाताळात दबली जाईल. ॥ १ ॥
मोहि समान को पापनिवासू । जेहि लगि सीय राम
बनबासू ॥
रायँ राम कहुँ काननु दीन्हा । बिछुरत गमनु अमरपुर
कीन्हा ॥
ज्याच्यामुळे श्रीराम व सीता यांना वनवास भोगावा लागला, तो माझ्यासारखा पापांचे
घर कोण असेल ? राजांनी रामांना वन दिले आणि त्यांच्यापासून ताटातूट
होताच स्वतः स्वर्गात गेले. ॥ २ ॥
मैं सठु सब अनरथ कर हेतू । बैठ बात सब सुनउँ सचेतू
॥
बिनु रघुबीर बिलोकि अबासू । रहे प्रान सहि जग उपहासू
॥
आणि सर्व अनर्थांचे कारण असलेला मी दुष्ट मात्र
शुद्धीवर असून या गोष्टी ऐकत आहे. श्रीरघुनाथांच्याविना
हा प्रासाद पाहूनही आणि जगाचा उपहास
सहन करीतही माझे हे प्राण अजून उरले आहेत. ॥ ३ ॥
राम पुनीत बिषय रस रुखे । लोलुप भूमि भोग के भूखे ॥
कहँ लगि कहौं हृदय कठिनाई । निदरि कुलिसु जेहिं
लही बड़ाई ॥
याचे हेच कारण असावे की, हे प्राण श्रीरामरुपी
पवित्र प्रेमरसामध्ये आसक्त झालेले नाहीत. हे हावरट प्राण राज्य व भागांचे भुकेले
आहेत. माझे हृदय किती कठोर आहे, हे मी किती सांगू ? त्याने वज्रालाही
कठोरपणात लाजवून मोठेपणा मिळविला आहे. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment