Wednesday, June 9, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 31श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३१

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 31
Doha 179 to 184 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३१ 
दोहा १७९ ते १८४

दोहा--कारन तें कारजु कठिन होइ दोसु नहिं मोर ।

कुलिस आस्थि तें उपल तें कराल कठोर ॥ १७९ ॥

कारणापेक्षां कार्य हे कठीण असते, यात माझा दोष नाही. हाडापेक्षा ( त्यापासून बनलेले ) वज्र व दगडापेक्षा लोखंड हे भयानक व कठोर असते. ॥ १७९ ॥

कैकेई भव तनु अनुरागे । पावँर प्रान अघाइ अभागे ॥

जौं प्रिय बिरहँ प्रान प्रिय लागे । देखब सुनब बहुत अब

 आगे ॥

कैकेयीपासून उत्पन्न झालेल्या देहाविषयी प्रेम बाळगणारे माझे हे पामर प्राण पूर्णपणे दुर्दैवी आहेत. प्रिय श्रीरामांच्या वियोगामध्येंही ज्याअर्थी मला माझे प्राण प्रिय वाटत आहेत, त्याअर्थी यापुढेही मला आणखी बरेच काही पाहात व ऐकत राहावे लागेल. ॥ १ ॥

लखन राम सिय कहुँ बनु दीन्हा । पठइ अमरपुर पति हित

 कीन्हा ॥

लिन्ह बिधवपन अपजसु आपू । दीन्हेउ प्रजहि सोकु

 संतापू ॥

लक्ष्मण, श्रीराम व सीता यांना तर वन दिले, पतीला स्वर्गाला पाठवून त्याचे कल्याण केले, स्वतः वैधव्य आणि अपकीर्ती पत्करली, प्रजेला शोक आणि त्रास दिला. ॥ २ ॥

मोहि दीन्ह सुखु सुजसु सुराजू । कीन्ह कैकईं सब कर

 काजू ॥

एहि तें मोर काह अब नीका । तेहि पर देन कहहु तुम्ह

 टीका ॥

आणि मला सुख, सुंदर कीर्ती आणि उत्तम राज्य दिले. कैकेयीने सर्वांचे काम पूर्ण केले. यापेक्षा चांगले आता माझ्यासाठी आणखी काय असणार ? त्यावरही तुम्ही सर्व लोक मला राजतिलक करायचा असे म्हणता ! ॥ ३ ॥

कैकइ जठर जनमि जग माहीं । यह मोहि कहँ कछु

 अनुचित नाहीं ॥

मोरि बात सब बिधिहिं बनाई । प्रजा पॉंच कत करहु

 सहाई ॥

या जगात कैकेयीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे मला आता काहीही अनुचित नाही. माझे सर्व कार्य विधात्याने पूर्ण करुन टाकले आहे. मग प्रजा व तुम्ही पंच लोक मला मदत का करीत आहात ? ॥ ४ ॥

दोहा--ग्रह ग्रहीत पुनि बात बस तेहि पुनि बीछी मार ।

तेहि पिआइअ बारुनी कहहु काह उपचार ॥ १८० ॥

ज्याला पिशाचाने झपाटले आहे, त्यात जो वायुरोगाने पछाडला आहे, त्यातच ज्याला विंचवाने दंश केला, आणि वरुन जर मद्य पाजले, तर हा कसला उपाय म्हणायचा ? ॥ १८० ॥

कैकइ सुअन जोगु जग जोई । चतुर बिरंचि दीन्ह मोहि

 सोई ॥

दसरथ तनय राम लघु भाई । दीन्हि मोहि बिधि बादि

 बड़ाई ॥

कैकयीचा मुलगा म्हणून जगाला जे काही योग्य होते, तेच चतुर विधात्याने मला दिले. परंतु ' दशरथांचा पुत्र ' ' श्रीरामांच लहान भाऊ ' होण्याचा मोठेपणा विधात्याने मल विनाकारणा दिला. ॥ १ ॥

तुम्ह सब कहहु कढ़ावन टीका । राय रजायसु सब कहँ

 नीका ॥

उतरु देउँ केहि बिधि केहि केही । कहहु सुखेन जथा रुचि

 जेही ॥

तुम्ही सर्वजण मला राजतिलकलावण्यास सांगत आहात. राजांची आज्ञा सर्वांनाच चांगली वाटते. मी कुणाकुणाला व कशाकशाप्रकारे उत्तर देऊ ?  ज्याला जे आवडते, तेच तुम्ही खुशाल सांगा. ॥ २ ॥

मोहि कुमातु समेत बिहाई । कहहु कहिहि के कीन्ह

 भलाई ॥

मो बिनु को सचराचर माहीं । जेहि सिय रामु प्रानप्रिय

 नाहीं ॥

माझी दुष्ट आई कैकेयी व मी यांना सोडून आणखी कोण असे म्हणेल की, हे काम मी चांगले केले आहे ? ज्याला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय नाहीत, असा या चराचर जगात माझ्याशिवाय आणखी कोण आहे ? ॥ ३ ॥

परम हानि सब कहँ बड़ लाहू । अदिनु मोर नहिं दूषन

 काहू ॥

संसय सील प्रेम बस अहहू । सबुइ उचित सब जो कछु

 कहहू ॥

ज्यामध्ये अत्यंत हानी आहे, त्यातच सर्वांना मोठा लाभ दिसत आहे. दिवस वाईट आहेत, यात दुसर्‍या कोणाचा दोष नाही. तुम्ही सर्व जे काही म्हणत आहात, ते सर्व योग्यच आहे. कारण तुम्ही संशय, शील व प्रेमाला वश झालेले आहात. ॥ ४ ॥

दोहा--राम मातु सुठि सरलचितो मो पर प्रेमु बिसेषि ।

कहइ सुभाय सनेह बस मोरि दीनता देखि ॥ १८१ ॥

कौसल्या माता फारच सरळ मनाची आहे आणि

 माझ्यावर तिचे खास प्रेम आहे. म्हणून माझी दैन्यावस्था

 पाहून ती स्वाभाविक प्रेमापोटीच असे म्हणत आहे. ॥ १८१

 ॥

गुर बिबेक सागर जगु जाना । जिन्हहि बिस्व कर बदर

 समाना ।

मो कहँ तिलक साज सज सोऊ । भएँ बिधि बिमुख बिमुख

 सबु कोऊ ॥

गुरुजी ज्ञानाचे सागर आहेत. सर्व जग जाणते की, विश्व हे त्यांच्या तळहातावर ठेवलेल्या बोराप्रमाणे प्रत्यक्ष आहे. तेसुद्धा माझ्यासाठी राजतिलकाचा थाट मांडत आहेत. दैव प्रतिकूल झाल्यावर सर्वजण प्रतिकूल होतात, हेच खरे. ॥ १ ॥

परिहरि रामु सीय जग माहीं । कोउ न कहिहि मोर मत

 नाहीं ॥

सो मैं सुनब सहब सुखु मानी । अंतहुँ कीच तहॉं जहँ पानी

 ॥

या अनर्थामध्ये माझी संमती नव्हती, असे श्रीराम व सीता यांना सोडून या जगात कोणीही म्हणणार नाही. मी अगदी सुखाने ते ऐकेन व सहन करीन. कारण जेथे पाणी असते, तेथे शेवटी चिखल हा असतोच. ॥ २ ॥

डरु न मोहि जग कहिहि कि पोचू । परलोकहु कर नाहिन

 सोचू ॥

एकइ उर बस दुसह दवारी । मोहि लगि भे सिय रामु

 दुखारी ॥

जग वाईट म्हणेल, याची मला भीती नाही किंवा परलोकाची मला काळजी नाही. माझ्यामुळे श्रीसीताराम दुःखी झाले, हाच एक दुःसह दावानल माझ्या हृदयात भडकलेला आहे. ॥ ३ ॥

जीवन लाहु लखन भल पावा । सबु तजि राम चरन मनु

 लावा ॥

मोर जनम रघुबर बन लागी । झूठ काह पछिताउँ अभागी

 ॥

ज्याने सर्व काही सोडून श्रीरामांच्या चरणी मन मग्न केले, त्या लक्ष्मणाने जीवनाचा उत्तम लाभ मिळविला. श्रीरामांना वनवास मिळावा, यासाठीच माझा जन्म झाला होता. दुर्दैवी अशा मी खोटा खोटा कशासाठी पश्चात्ताप करावा. ॥ ४ ॥

दोहा--आपनि दारुन दीनता कहउँ सबहि सिरु नाइ ।

देखें बिनु रघुनाथ पद जिय कै जरनि न जाइ ॥ १८२ ॥

 मी मस्तक नम्र करुन सर्वांना आपले दारुण दैन्य सांगत

 आहे. श्रीरामांच्या चरणांचे दर्शन घडल्याशिवाय माझ्या

 मनाची तगमग जाणार नाही. ॥ १८२ ॥

आन उपाउ मोहि नहिं सूझा । को जिय कै रघुबर बिनु

 बूझा ॥

एकहिं आँक इहइ मन माहीं । प्रातकाल चलिहउँ प्रभु

 पाहीं ॥

दुसरा कोणताही उपाय मला सुचत नाही. श्रीरामांच्याविना माझ्या मनातील गोष्ट कोण जाणू शकेल ? माझ्या मनात एकच निश्चय आहे की, उद्या सकाळी मी प्रभू रामचंद्राच्याकडे जाण्यासाठी निघेन. ॥ १ ॥ 

जद्यपि मैं अनभल अपराधी । भै मोहि कारन सकल

 उपाधी ॥

तदपि सरन सनमुख मोहि देखी । छमि सब करिहहिं कृपा

 बिसेषी ॥

जरी मी वाईट आहे आणि अपराधी आहे आणि माझ्यामुळेच हा सर्व उपद्रव घडला आहे, तरी श्रीरामांना शरण गेल्यावर ते माझे सर्व  क्षमा करुन माझ्यावर विशेष कृपा करतील. ॥ २ ॥

सील सकुच सुठि सरल सुभाऊ । कृपा सनेह सदन

 रघुराऊ ॥

अरिहुक अनभल कीन्ह न रामा । मैं सिसु सेवक जद्यपि

 बामा ॥

श्रीरघुनाथ हे सद्वर्तनी, संकोची, अत्यंत सरळ स्वभावाचे आणि कृपा व स्नेहाचे घर आहेत. श्रीरामांनी कधी शत्रूचेही अनिष्ट केलेले नाही. मग मी जरी कुटिल असलो, तरी त्यांचा बालक व दासच आहे. ॥ ३ ॥

तुम्ह पै पॉंच मोर भल मानी । आयसु आसिष देहु सुबानी

 ॥

जेहिं सुनि बिनय मोहि जनु जानी । आवहिं बहुरि रामु

 रजधानी ॥

माझी विनंती मान्य करुन व मला आपला दास मानून श्रीरामचंद्र राजधनीला परत येतील. यामध्येच माझे कल्याण आहे, असे समजून तुम्ही सर्व पंच लोकांनी मला सरळ मनाने आज्ञा व आशीर्वाद द्यावा. ॥ ४ ॥    

दोहा--जद्दपि जनमु कुमातु तें मैं सठु सदा सदोस ।

आपन जानि न त्यागिहहिं मोहि रघुबीर भरोस ॥ १८३ ॥

जरी माझा जन्म कुमातेापासून झालेला आहे आणि मी दुष्ट व सदा दोषीसुद्धा आहे. तरी श्रीराम मला आपला  मानून माझा त्याग करणार नाहींत, असा मला विश्वास आहे. ॥ १८३ ॥

भरत बचन सब कहँ प्रिय लागे । राम सनेह सुधॉं जनु पागे

 ॥

लोग बियोग बिषम बिष दागे । मंत्र सबीज सुनतु जनु जागे

 ॥

भरताचे बोलणे सर्वांना आवडले. जणू ते श्रीरामांच्या प्रेमरुपी अमृतामध्ये ओथंबलेले होते. श्रीरामवियोरुपी भीषण वीषामुळे सर्व लोक पोळून निघाले होते, ते जणू भरतवचनरुप सबीज मंत्र ऐकताच सावध झाले. ॥ १ ॥

मातु सचिव गुर पुर नर नारी । सकल सनेहँ बिकल भए

 भारी ।

भरतहि कहहिं सराहि सराही । राम प्रेम मूरति तनु आही

 ॥

माता, मंत्री, गुरु, नगरातील स्त्री-पुरुष सर्वजण श्रीरामांवरील स्नेहामुळे फारच व्याकुळ झाले. सर्वजण भरताची प्रशंसा करीत म्हणाले की, ' तुमचा देह म्हणजे श्रीरामप्रेमाची प्रत्यक्ष मूर्तीच होय. ॥ २ ॥

तात भरत अस काहे न कहहू । प्रान समान राम प्रिय

 अहहू ॥

जो पावँरु अपनी जड़ताईं । तुम्हहि सुगाइ मातु कुटिलाईं

 ॥

हे कुमार भरत, तुम्हीं असे का म्हणत नाही ? श्रीरामांना तुम्ही प्राण-प्रिय आहात. जो नीच माणूस स्वतःच्या मूर्खपणाने माता कैकेयीच्या दुष्टपणामुळे तुमच्यावर संशय घेईल. ॥ ३ ॥

सो सठु कोटिक पुरुष समेता । बसिहि कलप सत नरक

 निकेता ॥

अहि अघ अवगुन नहिं मनि गहई । हरइ गरल दुख

 दारिद दहई ॥

तो दुष्ट आपल्या कोट्यावधी पूर्वजांसह शंभर कल्पांपर्यंत नरकात पडेल. सापाचे विष व अवगुण हे मण्याला लागत नाहीत, उलट तो मणी विषाचे हरण करतो आणि दुःख व दारिद्र्य नष्ट करतो. ॥ ४ ॥

दोहा--अवसि चलिअ बन रामु जहँ भरत मंत्रु भल कीन्ह ।

सोक सिंधु बूड़त सबहि तुम्ह अवलंबनु दीन्ह ॥ १८४ ॥

हे भरता, जेथे श्रीराम आहेत, त्या वनात अवश्य जाऊन या. तुम्ही फार चांगला विचार मांडला. शोक-समुद्रात बुडणार्‍या सर्व लोकांना तुम्ही मोठा आधार दिला. '॥ १८४ ॥

भा सब कें मन मोदु न थोरा । जनु घन धुनि सुनि चातक

 मोरा ॥

चलत प्रात लखि निरनउ नीके । भरतु प्रानप्रिय भे सबही

 के ॥

सर्वांच्या मनाला खूप आनंद झाला. जणू मेघांची गर्जना ऐकून चातक व मोर आनंदून गेले, दुसर्‍या दिवशी सकाळी निघण्याचा चांगला निर्णय जाणून सर्वांना भरत प्राणप्रिय बनला. ॥ १ ॥

मुनिहि बंदि भरतहि सिरु नाई । चले सकल घर बिदा

 कराई ॥

धन्य भरत जीवनु जग माहीं । सीलु सनेहु सराहत जाहीं ॥

मुनी वसिष्ठांना वंदन करुन व भरतापुढे मस्तक नमवून सर्व लोक निरोप घेऊन आपापल्या घरी निघाले, ' जगामध्ये भरतााचे जीवन धन्य होय. 'असे म्हणत व त्याच्या स्वभावाची व स्नेहाची वाखाणणी करीत ते जात होते. ॥ २ ॥

कहहिं परसपर भा बड़ काजू । सकल चलै कर साजहिं

 साजू ॥

जेहि राखहिं रहु घर रखवारी । सो जानइ जनु गरदनि मारी ॥

' मोठे काम झाले ', असे ते एकमेकांना म्हणत होते. सर्वजण जाण्याची तयारी करु लागले. तू घरच्या रखवालीसाठी राहा, असे जर कुणाला म्हटले, तर त्याला वाटे की, जणू आपला गळाच कापला गेला. ॥ ३ ॥

कोउ कह रहन कहिअ नहिं काहू । को न चहइ जग

 जीवन लाहू ॥

काहीजण म्हणत होते की, घरात राहायला कुणालाही सांगू नका. जगात जीवनाचा लाभ कुणाला नको असतो ? ॥ ४ ॥



Custom Search

No comments: