ShriRamCharitManas
दोहा--जरउ सो संपति सदन सुखु सुहृद मातु पितु भाइ ।
सनमुख होत जो राम पद करै न सहस सहाइ ॥ १८५ ॥
ती संपत्ती, घर, सुख, मित्र, पाता-पिता, बंधू हे सर्व जर श्रीरामांच्या चरणीं जाण्यास अनेक
प्रकारे मदत करीत नसतील, तर ते जळून जावोत. ॥ १८५ ॥
घर घर साजहिं बाहन नाना । हरषु हृदयँ परभात पयाना
॥
भरत जाइ घर कीन्ह बिचारु । नगरु बाजि गज भवन
भँडारु ॥
घरोघरी लोक अनेक प्रकारची वाहने सज्ज करु लागले. सकाळी
निघायचे आहे, याचा मनात मोठा आनंद होता. भरताने घरी जाऊन विचार केला
की नगर, घोडे, हत्ती, महाल, खजिना इत्यादी ॥ १ ॥
संपति सब रघुपति कै आही । जौं बिनु जतन चलौं तजि
ताही ॥
तौं परिनाम न मोरि भलाई । पाप सिरोमनि साइँ दोहाई ॥
सारी संपत्ती श्रीरघुनाथांची आहे. तिच्या रक्षणाची व्यवस्था
न करता ती तशीच सोडून जाणे, हे परिणामी माझ्या हिताचे नाही. कारण स्वामींचा द्रोह
करणे, हे सर्व पापांचा शिरोमणी आहे. ॥ २ ॥
करइ स्वामि हित सेवकु सोई । दूषन कोटि देइ किन
कोई ॥
अस बिचारि सुचि सेवक बोले । जे सपनेहुँ निज धरम न
डोले ॥
कोणी कितीही वाईट म्हटले तरी जो स्वामीचे हित जपतो, तोच सेवक होय. असा
विचार करुन भरताने विश्र्वासासाठील सेवकांन बोलावले की, जे स्वप्नातसुद्धा
आपल्या कर्तव्यापासून कधी ढळले नव्हते. ॥ ३ ॥
कहि सबु मरमु धरमु भल भाषा । जो जेहि लायक सो
तेहिं राखा ॥
करि सबु जतनु राखि रखवारे । राम मातु पहिं भरतु
सिधारे ॥
भरताने त्यांना सर्व रहस्य सांगून खरे कर्तव्य काय ते
सांगितले. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे
कामावर नेमले. सर्व व्यवस्था करुन व रखवालदारांना
ठेवून भरत राममाता कौसल्येकडे गेला. ॥ ४ ॥
दोहा--आरत जननी जानि सब भरत सनेह सुजान ।
कहेउ बनावन पालकीं सजन सुखासन जान ॥ १८६ ॥
प्रेमाचे तत्त्व जाणणार्या भरताने सर्व माता दुःखी
असल्याचे पाहून त्यांच्यासाठी पालख्या व सुखदायक
वाहने सज्ज करण्यास सांगितले. ॥
१८६ ॥
चक्क चक्कि जिमि पुर नर नारी । चहत प्रात उर आरत
भारी ॥
जागत सब निसि भयउ बिहाना । भरत बोलाए सचिव
सुजाना ॥
नगरातील स्त्री-पुरुष चकवा-चकवीप्रमाणे मनात अत्यंत आतुर
होऊन प्रातःकाल होण्याची वाट पाहात होते. सर्व रात्र जागता जागता सकाळ झाली. मग
भरताने चतुर मंत्र्यंना बोलाविले, ॥ १ ॥
कहेउ लेहु सबु तिलक समाजू । बनहिं देब मुनि रामहि
राजू ॥
बेगि चलहु सुनि सचिव जोहारे । तुरत तुरग रथ नाग
सँवारे ॥
आणि म्हटले, ' राजतिलकाचे सर्व सामान घेऊन चला. वसिष्ठ मुनी वनातच
श्रीरामांना राज्य देतील. घाई करा. ' हे ऐकून मंत्र्यांनी वंदन केले आणि घोडे, रथ व हत्ती लगेच सज्ज
केले. ॥ २ ॥
अरुंधती अरु अगिनि समाऊ । रथ चढ़ि चले प्रथम
मुनिराऊ ॥
बिप्र बृंद चढ़ि बाहन नाना । चले सकल तप तेज निधाना
॥
सर्वप्रथम मुनिराज वसिष्ठ व अरुंधती अग्निहोत्राचे सर्व
सामान घेऊन रथात बसून निघाले. त्यानंतर जे सर्व तपस्या व तेजाचे भांडार होते, ते ब्राह्माणांचे समूह
अनेक वाहनांतून निघाले. ॥ ३ ॥
नगर लोग सब सजि सजि जाना । चित्रकूट कहँ कीन्ह
पयाना ॥
सिबिका सुभग न जाहिं बखानी । चढ़ि चढ़ि चलत भईं
सब रानी ॥
नगरातील सर्व लोक रथ सज्ज करुन चित्रकूटाला जाण्यासाठी
निघाले. ज्यांचे वर्णन करता येत नाही, अशा सुंदर पालख्यांमध्ये बसून सर्व राण्या निघाल्या. ॥ ४
॥
दोहा-सौंपि नगर सुचि सेवकनि सादर चलाइ ।
सुमिरि राम सिय चरन तब चले भरत दोउ भाइ ॥ १८७ ॥
विश्वासू सेवकांवर नगर-रक्षणाचे काम सोपवून आणि
सर्वांना आदराने रवाना केल्यावर मग श्रीसीतारामांच्या
चरणांचे स्मरण करीत भरत-शत्रुघ्न हे दोघे बंधू निघाले. ॥
१८७ ॥
राम दरस बस सब नर नारी । जनु करि करिनि चले तकि
बारी ॥
बन सिय रामु समुझि मन माहीं । सानुज भरत पयादेहिं
जाहीं ॥
श्रीरामांच्या दर्शनाच्या तीव्र लालसेमुळे सर्व
स्त्री-पुरुष असे निघाले की, जणू तहानलेले हत्ती हत्तीण पाणी पाहून मोठ्या वेगाने
वेडे झाल्यासारखे जावेत. श्रीसीताराम सर्व सुखांचा त्याग करुन वनात आहेत, या विचाराने
शत्रुघ्नासह भरत पायी जात होता. ॥ १ ॥
देखि सनेहु लोग अनुरागे । उतरि चले हय रथ त्यागे ॥
जाइ समीप राखि निज डोली । राम मातु मृदु बानी बोली
॥
त्यांचे ते राम प्रेम-पाहून सर्व लोक घोडे, हत्ती, रथ अशी वाहने सोडून
प्रेमाने पायी चालू लागले. तेव्हा कौसल्या माता भरताजवळ आपली पालखी थांबवून कोमल
वाणीने म्हणाली, ॥ २ ॥
तात चढ़हु रथ बलि महतारी । होइहि प्रिय परिवारु
दुखारी ॥
तुम्हरें चलत चलिहि सबु लोगू । सकल सोक कृस नहिं
मग जोगू ॥
बाळा ! ही माता तुझ्यावरुन जीव ओवाळते. तू रथात बैस, नाहीतर सर्व लोक आधीच
दुबळे झाले आहेत आणि वाटही पायी चालण्याजोगी नाही. ॥ ३ ॥
सिर धरि बचन चरन सिरु नाई । रथ चढ़ि चलत भए दोउ
भाई ॥
तमसा प्रथम दिवस करि बासू । दूसर गोमति तीर निवासू
॥
आईची आज्ञा शिरोधार्य मानून आणि तिच्या चरणी
मस्तक ठेवून दोघे बंधू रथांत बसून निघाले. पहिल्या
दिवशी तमसा नदीच्या तीरावर मुक्काम करुन दुसरा
मुक्काम गोमती नदीच्या तीरावर केला. ॥ ४ ॥
दोहा--पय आहार फल असन एक निसि भोजन एक लोग ।
करत राम हित नेम ब्रत परिहरि भूषन भोग ॥ १८८ ॥
कुणी फक्त दूधच पीत होते, कुणी फलाहार घेत होते
आणि काही लोक रात्री एकदाच भोजन घेत होते. भूषण व भोग-विलास यांचा त्याग करुन सर्व
लोक श्रीरामांच्यासाठी नियम व व्रत करीत होते. ॥ १८८ ॥
सई तीर बसि चले बिहाने । सृंगबेरपुर सब निअराने ॥
समाचार सब सुने निषादा । हृँदय बिचार करइ सबिषादा
॥
रात्रभर सई नदीच्या तटावर मुक्काम करुन सकाळी तेथून निघाले
आणि सर्वजण शृंगवेरपुराजवळ पोहोचले निषाद राजाला भरत सैन्यासह आला आहे, ही वार्ता कळली, तेव्हा तो दुःखी होऊन
मनांत विचार करुं लागला-- ॥ १ ॥
कारन कवन भरत बन जाहीं । है कछु कपट भाउ मन
माहीं ॥
जौं पै जियँ न होति कुटिलाई । तौं कत लीन्ह संग
कटकाई ॥
कशासाठी भरत वनात निघाला आहे ? त्याच्या मनात नक्की
काही कपट आहे. जर मनात दुष्टता नसती, तर मग बरोबर सेना घेऊन तो का निघाला असता ? ॥ २ ॥
जानहिं सानुज रामहि मारी । करउँ अकंटक राजु सुखारी
॥
भरत न राजनीति उर आनी । तब कलंकु अब जीवन
हानी ॥
लहान भाऊ लक्ष्मणासह श्रीरामांना मारुन सुखाने निष्कंटक
राज्य करावे, असे त्याला वाटत असेल. भरताने मनात राजनीतिचा काही विचार
केलेला नाही. पूर्वी कलंक लागला होता. आता जीवही गमवावा लागेल. ॥ ३ ॥
सकल सुरासुर जुरहिं जुझारा । रामहि समर न
जीतनिहारा ॥
का आचरजु भरतु अस करहीं । नहिं बिष बेलि अमिअ
फल फरहीं ॥
सर्व देव व दैत्यवीर जरी जमले, तरी श्रीरामांना
युद्धात कोणी जिंकू शकणार नाही. तसे पाहिले तर भरत जे करीत आहे, त्यात आश्चर्य काय ? विषाच्या वेलींना
अमृतफळे कधी लागत नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—अस बिचारि गुहँ
ग्याति सन कहेउ सजग होहु ।
हथवाँसहु बोरहु तरनि
कीजिअ घाटारोहु ॥ १८९ ॥
असा विचार करुन
गुहाने आपल्या समाजाला सांगितले की, ‘ सर्व लोक सावध व्हा. नावा ताब्यात घ्या आणि
बुडवून टाका. सर्व घाट अडवा. ॥ १८९ ॥
होहु सँजोइल रोकहु घाटा
। ठाटहु सकल मरै के ठाटा ॥
सनमुख लोह भरत सन लेऊँ ।
जिअत न सुरसरि उतरन देऊँ ॥
शस्त्रांनी सुसज्ज
होऊन घाट अडवा व सर्वजण युद्ध करण्यासाठी मरायला तयार व्हा. मी भरताशी समोरासमोर
युद्ध करीन आणि जिवात जीव असेपर्यंत त्याला गंगानदी पार करु देणार नाही. ॥ १ ॥
समर मरनु पुनि सुरसरि
तीरा । राम काजु छनभंगु सरीरा ॥
भरत भाइ नृपु मैं जन
नीचू । बड़ें भाग असि पाइअ मीचू ॥
युद्धात मरण, त्यात
गंगेचा तट, त्यातही श्रीरामांचे कार्य; आणि हे क्षणभंगुर शरीर नष्ट होणारच आहे.
भरत हा श्रीरामांचा भाऊ आणि राजा आहे आणि मी क्षुद्र सेवक आहे. त्याच्या हातून मरण
मिळणे हे तर मोठ्या भाग्याचे आहे. ॥ २ ॥
स्वामि काज करिहउँ रन रारी
। जस धवलिहउँ भुवन दस चारी ॥
तजउँ प्रान रघुनाथ
निहोरें । दुहूँ हाथ मुद मोदक मोरें ॥
मी स्वामींच्या
कार्यासाठी रणामध्ये युद्ध करीन आणि चौदा लोकांमध्ये आपली कीर्ती उज्ज्वल करीन.
श्रीरघुनाथांच्यासाठी प्राणांचा त्याग करीन. जिंकलो तर रामसेवक म्हणून कीर्ती मिळविन
आणि मारला गेलो तर श्रीरामांची नित्य सेवा मला मिळेल. दोन्हीकडून माझा लाभच आहे. ॥
३ ॥
साधु समाज न जाकर लेखा ।
राम भगत महुँ जासु न रेखा ॥
जायँ जिअत जग सो महिभारु
। जननी जौबन बिटप कुठारु ॥
साधूंच्या समाजात
ज्याची गणना होत नाही आणि श्रीरामांच्या भक्तांत ज्याला स्थान नाही, तो या जगात
पृथ्वीला भार बनून जगतो. तो म्हणजे मातेच्या यौवनरुपी वृक्षाला तोडणारी कुर्हाडच
आहे.' ॥ ४ ॥
दोहा—बिगत बिषाद
निषादपति सबहि बढ़ाइ उछाहु ॥
सुमिरि राम मागेउ तुरत
तरकस धनुष सनाहु ॥ १९० ॥
अशा प्रकारे
श्रीरामांसाठी प्राण अर्पण करण्याचा निश्र्चय केल्यावर निषादराजाचा विषाद
नाहीसा झाला आणि सर्वांना प्रोत्साहन देऊन व श्रीरामांचे स्मरण करुन त्यानें
बाणांचा भाता, धनुष्य आणि कवच मागविले. ॥ १९० ॥
बेगहु भाइहु सजहु सँजोऊ
। सुनि रजाइ कदराइ न कोऊ ॥
भलेहिं नाथ सब कहहिं
सहरषा । एकहिं एक बढ़ावइ करषा ॥
तो म्हणाला, ‘
बंधूनो, त्वरा करा आणि सर्व सामान घेऊन सज्ज व्हा. माझी आज्ञा ऐकून मनात घाबरु
नका. ‘ तेव्हा सर्वजण आनंदाने म्हणाले, ‘ हे नाथ ! फारच छान ! ‘ आणि ते एकमेकांना
उत्साह देऊ लागले. ॥ १ ॥
चले निषाद जोहारि जोहारी
। सूर सकल रन रुचइ रारी ।
सुमिरि राम पद पंकज
पनहीं । भाथीं बॉंधि चढ़ाइन्हि धनहीं ॥
निषादराजाला जोहार
करुन सर्व निषाद निघाले. सर्वजण शूर होते आणि युद्धाची त्यांना खुमखमी होती.
श्रीरामचंद्रांच्या चरण-कमलांच्या पादुकांचे स्मरण करुन त्यांनी भाते बांधले आणि
आपल्या लहान लहान धनुष्यांना दोर्या लावल्या. ॥ २ ॥
अँगरी पहिरि कूँड़ि सिर
धरहीं । फरसा बॉंस सेल सम करहीं ॥
एक कुसल अति ओड़न खॉंड़े ।
कूदहिं गगन मनहुँ छिति छॉंड़े ॥
त्यांनी चिलखते
घालून डोक्यावर पोलादी टोप घातले आणि परशू, भाले, बरछ्या व्यवस्थित करु लागले.
कोणी तलवारीचे वार थोपविण्यामध्ये अत्यंत कुशल होते. त्यांच्या मनांत असा उत्साह
भरला होता की जणू जमीन सोडून ते आकाशात झेपावत आहेत. ॥ ३ ॥
निज निज साजु समाजु बनाई
। गुह राउतहि जोहारे जाई ॥
देखि सुभट सब लायक
जाने । लै लै नाम सकल सनमाने ॥
आपापले सामान व दळे बनवून त्यांनी निषादराज गुह
याला जोहार केला. निषादराजाने सर्वजण सुयोग्य योद्धे
आहेत, असे पाहून त्यांची नावे घेऊन त्यांचा सन्मान
केला॥ ४ ॥
No comments:
Post a Comment