SunderKanda Part 10
दोहा—हरि प्रेरित तेहि अवसर
चले मरुत उनचास ।
अट्टहास करि गर्जा कपि बढ़ि
लाग अकास ॥ २५ ॥
त्यावेळी भगवंतांच्या
प्रेरणेने एकोणपन्नासही वारे वाहू लागले. हनुमानाने खदखदा हसून गर्जना केली आणि
आकार वाढवून तो आकाशाला टेकला. ॥ २५ ॥
देह बिसाल परम हरुआई ।
मंदिर तें मंदिर चढ़ धाई ॥
जरइ नगर भा लोग बिहाला ।
झटपट लपट बहु कोटि कराला ॥
देह मोठा विशाल, पण
फारच चपळ होता. तो धावत-धावत एका महालावरुन दुसर्या महालावर चढत होता. नगर जळू
लागले, लोकांचे हाल होऊ लागले. आगीच्या कोट्यावधी भयंकर ज्वाळा अंगावर येऊ
लागल्या. ॥ १ ॥
तात मातु हा सुनिअ पुकारा ।
एहिं अवसर को हमहि उबारा ॥
हम जो कहा यह कपि नहिं होई
। बानर रुप धरें सुर कोई ॥
‘ अरे बाप रे, अग आई,
यावेळी आम्हांला कोण वाचवणार ?’ चोहीकडे असाच ओरडा ऐकू येत होता. ‘ आम्ही पूर्वीच सांगितले होते की हा वानर नसून
वानराचे रुप घेतलेला कुणी देव आहे. ॥ २ ॥
साधु अवग्या कर फलु ऐसा ।
जरइ नगर अनाथ कर जैसा ॥
जारा नगरु निमिष एक माहीं ।
एक बिभीषन कर गृह नाहीं ॥
साधूच्या अपमानाचे असेच
फळ असते. नगर अनाथांच्या नगराप्रमाणें जळत आहे. ‘ हनुमानाने एकाच क्षणात संपूर्ण
नगर जाळून टाकले. फक्त बिभीषणाचे घर जाळले
नाही. ॥ ३ ॥
ता कर दूत अनल जेहिं सिरिजा
। जरा न सो तेहि कारन गिरिजा ॥
उलटि पलटि लंका सब जारी ।
कूदि परा पुनि सिंधु मझारी ॥
शिव म्हणतात, ‘ हे
पार्वती, ज्यांनी अग्नी निर्माण केला, त्यांचाच दूत हनुमान आहे. म्हणून तो
अग्नीमुळे भाजला नाही. हनुमानाने आलटून-पालटून सर्व लंका जाळून टाकली. मग त्याने
समुद्रात उडी घेतली. ॥ ४ ॥ -
दोहा—पूँछ बुझाड खोइ श्रम
धरि लघु रुप बहोरि ।
जनकसुता कें आगें ठाढ़ भयउ
कर जोरि ॥ २६ ॥
शेपूट विझवून,
श्रमपरिहार करुन मग लहान रुप घेतले व हनुमान जानकीपुढे हात जोडून उभा राहिला. ॥ २६
॥
मातु मोहि दीजे कछु चीन्हा
। जैसें रघुनायक मोहि दीन्हा ॥
चूड़ामनि उतारि तब दयऊ । हरष
समेत पवनसुत लयऊ ॥
हनुमान म्हणाला, ‘ हे
माते, रघुनाथांनी जशी मला खूण दिली होती, तशी ओळखीची वस्तु मला दे.’ तेव्हा सीतेने
केसातून चूडामणी काढून दिला. हनुमानाने मोठ्या आनंदाने तो घेतला. ॥ १ ॥
कहेहु तात अस मोर प्रनामा ।
सब प्रकार प्रभु पूरनकामा ॥
दीन दयाल बिरिदु संभारी ।
हरहु नाथ मम संकट भारी ॥
जानकी म्हणाली, ‘ हे
वत्सा ! प्रभूंना माझा प्रणाम निवेदन कर व असे सांग की, हे प्रभू, जरी तुम्ही
सर्वप्रकारे पूर्णकाम आहात, तरी दीन-दुःखी लोकांवर दया करणे हे तुमचे ब्रीद आहे.
मी दीन आहे, म्हणून ते ब्रीद आठवून हे नाथ, माझ्यावरील हे मोठे संकट दूर करा. ॥ २
॥
तात सक्रसुत कथा सुनएहु ।
बान प्रताप प्रभुहि समुझाएहु ॥
मास दिवस महुँ नाथु न आवा ।
तौ पुनि मोहि जिअत नहिं पावा ॥
हनुमंता ! इंद्रपुत्र
जयंताची घटना सांगून प्रभूंना आपल्या बाणाच्या प्रतापाची आठवण करुन दे. जर
महिन्याभरात नाथ आले नाहीत, तर मग मी जिवंत सापडणार नाही. ॥ ३ ॥
कहु कपि केहि बिधि राखौं
प्राना । तुम्हहू तात कहत अब जाना ॥
तोहि देखि सीतलि भइ छाती ।
पुनि मो कहुँ सोइ दिनु सो राती ॥
हे हनुमाना, मी आपला
प्राण कसा ठेवू ? तूही आता जातो असे म्हणतोस. तुला पाहून मनाला शांतता लाभली होती.
मला आता तेच दुःखाचे दिवस व रात्र. ‘ ॥ ४ ॥
दोहा—जनकसुतहि समुझाइ करि
बहु बिधि धीरजु दीन्ह ।
चरन कमल सिरु नाइ कपि गवनु
राम पहिं कीन्ह ॥ २७ ॥
हनुमानाने जानकीला
समजावून धीर दिला आणि तिच्या चरणकमलांवर नतमस्तक होऊन तो श्रीरामांच्याकडे निघाला.
॥ २७ ॥
चलत महाधुनि गर्जेसि भारी ।
गर्भ स्रवहिं सुनि निसिचर नारी ॥
नाघि सिंधु एहि पारहि आवा ।
सबद किलिकिला कपिन्ह सुनावा ॥
जाताना त्याने प्रचंड
गर्जना केली, ती ऐकून राक्षसी गर्भगळित झाल्या. समुद्र ओलांडून तो पलीकडच्या
तीरावा पोहोचला. त्याने वानरांना हर्षध्वनी ऐकविला. ॥ १ ॥
हरषे सब बिलोकि हनुमाना ।
नूतन जन्म कपिन्ह तब जाना ॥
मुख प्रसन्न तन तेज बिराजा
। कीन्हेसि रामचंद्र कर काजा ॥
हनुमानाला पाहून सर्वजण
हर्षभरित झाले आणि तेव्हा वानरांना जणू नवा जन्म मिळाला. हनुमानाचे मुख प्रसन्न
होते आणि शरीर सतेज होते. त्यामुळे त्यांना समजले की, याने श्रीरामचंद्रांचे काम
पूर्ण केले आहे. ॥ २ ॥
मिले सकल अति भए सुखारी ।
तलफत मीन पाव जिमि बारी ॥
चले हरषि रघुनायक पासा ।
पूँछत कहत नवल इतिहासा ॥
सर्वजण हनुमानाला भेटले
आणि सर्वांना समाधान झाले, जणू तडफडणार्या माशांना पाणी मिळाले. सर्वजण नवीन
वृत्तांत विचारत-सांगत श्रीरघुनाथांच्या जवळ गेले. ॥ ३ ॥
तब मधुबन भीतर सब आए । अंगद
संमत मधु फल खाए ॥
रखवारे जब बरजन लागे ।
मुष्टि प्रहार हनत सब भागे ॥
मग सर्वजण मधुवनात गेले आणि अंगदाच्या अनुमतीने
त्या सर्वांनी मध व फळे खाल्ली. जेव्हा रखवालदार
त्यांना मनाई करु लागले, तेव्हा ठोसे मारताच ते पळून
गेले. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment