SunderKanda Part 9
दोहा--- प्रनतपाल रघुनायक
करुना सिंधु खरारि ।
गएँ सरन प्रभु राखिहैं तव
अपराध बिसारि ॥ २२ ॥
श्रीरघुनाथ हे
शरणागतांचे रक्षक व दयेचे समुद्र आहेत. शरण गेल्यास ते तुझा अपराध विसरुन तुला
आपला आश्रय देतील. ॥ २२ ॥
राम चरन पंकज उर धरहू ।
लंका अचल राजु तुम्ह करहू ॥
रिषि पुलस्ति जसु बिमल
मयंका । तेहि ससि महुँ जनि होहु कलंका ॥
तू श्रीरामांचे चरण-कमल
हृदयात धारण कर व लंकेचे चिरकाळ राज्य कर. पुलस्त्य ऋषींची निर्मळ कीर्ती निर्मळ
चंद्रासारखी आहे. तू त्या चंद्राचा कलंक बनू नकोस. ॥ १ ॥
राम नाम बिनु गिरा न सोहा ।
देखु बिचारि त्यागि मद मोहा ॥
बसन हीन नहिं सोह सुरारी ।
सब भूषन भूषित बर नारी ॥
रामनामाविना वाणीला
शोभा नाही. मद-मोह सोड. विचार करुन बघ. हे देवांच्या शत्रू, सर्व दागिन्यांनी
नटलेली स्त्रीसुद्धा कपड्यांविना असेल तर शोभून दिसत नाही. ॥ २ ॥
राम बिमुख संपति प्रभुताई ।
जाइ रही पाई बिनु पाई ॥
सजल मूल जिन्ह सरितन्ह
नाहीं । बरषि गएँ पुनि तबहिं सुखाहीं ॥
रामविमुख पुरुषाची
तिन्ही काळातील संपत्ती आणि सत्ता व्यर्थ आहे. ज्या नद्यांच्या मुळाशी जलस्रोत
नसेल, त्या पावसाळा संपल्यावर लगेच कोरड्या पडतात. ॥ ३ ॥
सुनु दसकंठ कहउँ पन रोपी ।
बिमुख राम त्राता नहिं कोपी ॥
संकर सहस बिष्नु अज तोही । सकहिं
न राखि राम कर द्रोही ॥
हे रावणा, मी
प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, रामविन्मुखाचे रक्षण करणारा कोणीही नाही. हजारो शंकर,
विष्णू व ब्रह्मदेव हे सुद्धा श्रीरामांचा अपराध करणार्याला वाचवू शकत नाहीत. ॥ ४
॥
दोहा--- मोहमूल बहु सूल
प्रद त्यागहु तम अभिमान ।
भजहु राम रघुनायक
कृपा सिंधु भगवान ॥ २३ ॥
मोह हाच ज्याचे मूळ
आहे, असा फार पीडा देणारा तमोरुप अभिमान तू सोडून दे आणि रघुकुलाचे स्वामी, कृपेचे
समुद्र भगवान श्रीरामचंद्रांचे भजन कर. ‘ ॥ २३ ॥
जदपि कही कपि अति हित बानी
। भगति बिबेक बिरति नय सानी ॥
बोला बिहसि महा अभिमानी ।
मिला हमहि कपि गुर बड़ ग्यानी ॥
जरी हनुमानाने भक्ती,
ज्ञान, वैराग्य आणि नीती यांनी परिपूर्ण खूप हितकारक गोष्टी सांगितल्या, तरीही
महाअहंकारी रावण हसत टोचून म्हणाला, ‘ आम्हांला हा वानर मोठा ज्ञानी गुरु भेटला. ॥
१ ॥
मृत्यु निकट आई खल तोही ।
लागेसि अधम सिखावन मोही ॥
उलटा होइहि कह हनुमाना ।
मतिभ्रम तोर प्रगट मैं जाना ॥
अरे दुष्टा, तुझा
मृत्यू जवळ आला आहे. अधमा ! मला शिकवायला निघालास ! ‘ हनुमान म्हणाला, ‘ याच्या
उलट होणार आहे. तुझा मृत्यु जवळ आला आहे, माझा नव्हे. हा तुझ्या बुद्धीचा भ्रम
आहे, हे मी प्रत्यक्ष जाणले आहे. ॥ २ ॥
सुनि कपि बचन बहुत खिसिआना
। बेगि न हरहु मूढ़ कर प्राना ॥
सुनत निसाचर मारन धाए ।
सचिवन्ह सहित बिभीषनु आए ॥
हनुमानाचे बोलणे ऐकून
रावण फार चिडला आणि म्हणाला, अरे या मूर्खाचे प्राण लवकर का घेत नाही ? ‘ हे ऐकताच
राक्षस त्याला मारण्यासाठी धावले. त्याचवेळी मंत्र्यांच्या समवेत बिभीषण तेथे आला.
॥ ३ ॥
नाइ सीस करि बिनय बहूता ।
नीति बिरोध न मारिअ दूता ॥
आन दंड कछु करिअ गोसॉंई ।
सबहीं कहा मंत्र भल भाई ॥
त्याने नतमस्तक होऊन
विनयाने रावणाला सांगितले की, ‘ दूताला मारु नये. हे नीतीच्या विरुद्ध आहे, हे
राजन, दुसरी एखादी शिक्षा करावी. ‘ सर्व म्हणाले, ‘ हा सल्ला उत्तम आहे. ‘ ॥ ४ ॥
सुनत बिहसि बोल दसकंधर ।
अंग भंग करि पठइअ बंदर ॥
हे ऐकून रावण हसून
म्हणाला, ‘ ठीक आहे. वानराची हाडे मोडून त्याला पाठवून द्यावे. ॥ ५ ॥
दोहा--- कपि कें ममता पूँछ
पर सबहि कहउँ समुझाइ ।
तेल बोरि पट बॉंधि पुनि
पावक देहु लगाइ ॥ २४ ॥
मी सर्वांना समजावून
सांगतो की, वानराचे प्रेम त्याच्या शेपटीवर असते. म्हणून तेलात कपडे बुडवून ते याच्या
शेपटीला गुंडाळा आणि आग लावून द्या. ॥ २४ ॥
पूँछहीन बानर तहँ जाइहि । तब सठ निज नाथहि लइ आइहि ॥
जिन्ह कै कीन्हिसि बहुत
बड़ाई । देखउँ मैं तिन्ह कै प्रभुताई ॥
जेव्हा शेपटीविना हा
वानर आपल्या जाईल, तेव्हा हा मूर्ख
आपल्या मालकाला घेऊन. ज्याचा याने
फार मोठेपणा सांगितला
आहे, जरा त्याचे सामर्थ्य तर मला पाहू द्या. ‘ ॥ १ ॥
बचन सुनत कपि मन मुसुकाना ।
भइ सहाय सारद मैं जाना ॥
जातुधान सुनि रावन बचना ।
लागे रचैं मूढ़ सोइ रचना ॥
हे ऐकताच हनुमान मनात
हसला. तो मनात म्हणाला, ‘ सरस्वती ही अशी बुद्धी देण्यास साहाय्यक झाली आहे. ‘
रावणाचे ऐकून मूर्ख राक्षस शेपटीला आग लावण्याची तयारी करु लागले. ॥ २ ॥
रहा न नगर बसन घृत तेला ।
बाढ़ी पूँछ कीन्ह कपि खेला ॥
कौतुक कहँ आए पुरबासी ।
मारहिं चरन करहिं बहु हॉंसी ॥
शेपटाला गुंडाळण्यासाठी
इतके कपडे व तेल लागले की नगरामध्ये कापड, तूप आणि तेल उरले नाही. हनुमानाने अशी
गंमत केली की, शेपटी वाढत गेली. नगरवासी लोक मजा पाहू लागले.ते हनुमानाला लाथा
मारीत होते आणि त्याची चेष्टा करीत होते. ॥ ३ ॥
बाजहिं ढोल देहिं सब तारी ।
नगर फेरि पुनि पूँछ प्रजारी ॥
पावक जरत देखि हनुमंता ।
भयउ परम लघुरुप तुरंता ॥
ढोल वाजत होते, लोक
टाळ्या वाजवत होते. हनुमानाला तशा अवस्थेत नगरात फिरवून मग शेपटीला आग लावून दिली.
अग्नी पेटल्याचे पाहून हनुमानाने एकदम छोटे रुप घेतले. ॥ ४ ॥
निबुकि चढ़ेउ कपि कनक अटारीं
। भईं सभीत निसाचर नारीं ॥
बंधनातून मुक्त होऊन तो सोन्याच्या गच्च्यांवर चढला.
त्याला पाहून राक्षसांच्या स्त्रिया घाबरुन गेल्या. ॥
५ ॥
No comments:
Post a Comment