SunderKanda Part 3
दोहा—तात स्वर्ग अपबर्ग सुख
धरिअ तुला एक अंग ।
तूल न ताहि सकल मिलि जो सुख
लव सतसंग ॥ ४ ॥
हे कपिराज, स्वर्ग व
मोक्ष यांचे सर्व सुख एका पारड्यात घातले, तरी ते सर्व मिळून दुसर्या पारड्यात
ठेवलेल्या क्षणभराच्या सत्संगाच्या सुखाची बरोबरी करु शकत नाही. ॥ ४ ॥
प्रबिसि नगर कीजे सब काजा ।
हृदयँ राखि कोसलपुर राजा ॥
गरल सुधा रिपु करहिं मिताई
। गोपद सिंधु अनल सितलाई ॥
तू अयोध्यापुरीचे राजा
श्रीरघुनाथ यांना हृदयात धारण करुन नगरामध्ये प्रवेश कर. श्रीरामांच्यामुळे विष
अमृत बनते, शत्रु मैत्री करु लागतो,समुद्र गाईच्या खुरामुळे पडलेल्या किंचित
खड्ड्याएवढा होतो आणि अग्नीमध्ये शीतलता येते. ‘ ॥ १ ॥
गरुड़ सुमेरु रेनु सम ताही ।
राम कृपा करि चितवा जाही ॥
अति लघु रुप धरेउ हनुमाना ।
पैठा नगर सुमिरि भगवाना ॥
काकभुशुंडी म्हणतात, ‘
हे गरुडा, ज्याला श्रीरामचंद्रांनी एकदा कृपा
दृष्टीने पाहिले,
त्याला सुमेरु पर्वत हा सुद्धा धुळीकणासारखा होतो.’ नंतर हनुमानाने छोटे रुप धारण
केलेआणि भगवंतांचे स्मरण करुन लंकेत प्रवेश केला. ॥ २ ॥
मंदिर मंदिर प्रति करि सोधा
। देखे जहँ तहँ अगनित जोधा ॥
गयउ दसानन मंदिर माहीं ।
अति बिचित्र कहि जात सो नाहीं ॥
त्याने तेथील प्रत्येक
महालाचा शोध घेतला. जिकडे तिकडे असंख्य योद्धे होते. नंतर तो रावणाच्या महालात गेला.
तो इतका विलक्षण होता की, त्याचे वर्णन करणे कठीण. ॥ ३ ॥
सयन किएँ देखा कपि तेही ।
मंदिर महुँ न दीखि बैदेही ॥
भवन एक पुनि दीख सुहावा ।
हरि मंदिर तहँ भिन्न बनावा ॥
हनुमानाने रावण झोपलेला
पाहिला. परंतु महालात जानकी दिसली नाही. नंतर एक सुंदर महाल दिसला. तेथे भगवंतांचे
एक स्वतंत्र मंदिर होते. ॥ ४ ॥
दोहा—रामायुध अंकित गृह
सोभा बरनि न जाइ ।
नव तुलसिका बृदं तहँ देखि
हरष कपिराइ ॥ ५ ॥
त्या महालावर
श्रीरामांच्या धनुष्य-बाणाची चिन्हे अंकित होती. त्याची शोभा अवर्णनीय होती. तेथे
तुळशीची नवनवीन झाडे पाहून कपिराज हनुमानाला हर्ष झाला. ॥ ५ ॥
लंका निसिचर निकर निवासा ।
इहॉं कहॉं सज्जन कर बासा ॥
मन महुँ तरक करैं कपि लागा
। तेहीं समय बिभीषनु जागा ॥
लंका ही राक्षसांच्या
समाजाचे निवासस्थान आहे. येथे साधु-पुरुषाचा निवास कसा ? हनुमान मनात असा विचार
करीत होता, त्याचवेळी बिभीषण जागा झाला. ॥ १ ॥
राम राम तेहिं सुमिरन
कीन्हा । हृदयँ हरष कपि सज्जन चीन्हा ॥
एहि सन हठि करिहउँ पहिचानी
। साधु ते होइ न कारज हानी ॥
त्याने राम-नाम घेतले.
हनुमानाला वाटले की, हा साधु आहे. त्याला मनापासून आनंद झाला. त्याने विचार केला
की, आपण याची मुद्दाम ओळख करुन घेऊया. साधुमुळे कार्याची हानी होत नाही. उलट
फायदाच होतो. ॥ २ ॥
बिप्र रुप धरि बचन सुनाए ।
सुनत बिभीषन उठि तहँ आए ॥
करि प्रनाम पूँछी कुसलाई ।
बिप्र कहहु निज कथा बुझाई ॥
ब्राह्मणाचे रुप धारण करुन हनुमानाने त्याला हाक मारली. ऐकताच बिभीषण उठून बाहेर आला. प्रणाम करुन त्याला क्षेमकुशल विचारले आणि म्हटले, ‘ हे ब्राह्मणदेव, आपली ओळख करुन द्या. ॥ ३ ॥
की तुम्ह हरि दासन्ह महँ
कोई । मोरें हृदय प्रीति अति होई ॥
की तुम्ह रामु दीन अनुरागी
। आयहु मोहि करन बड़भागी ॥
तुम्हीं हरिभक्तांपैकी
कोणी आहात का ? कारण तुम्हांला पाहून माझ्या मनात खूप प्रेम उसळत आहे. अथवा तुम्ही
दीनांवर प्रेम करणारे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रच असून मला घरबसल्या कृतार्थ
करण्यासाठी आला आहात काय ? ॥ ४ ॥
दोहा—तब हनुमंत कही सब राम
कथा निज नाम ।
सुनत जुगल तन पुलक मन मगन
सुमिरि गुन ग्राम ॥ ६ ॥
तेव्हा हनुमानाने
श्रीरामचंद्रांची सर्व हकिगत सांगून आपले नाव सांगितले. ऐकताच दोघांची शरीरे
रोमांचित झाली आणि श्रीरामांच्या गुण-समूहांचे स्मरण करुन दोघेही प्रेम व आनंदात
मग्न झाले. ॥ ६ ॥
सुनहु पवनसुत रहनि हमारी ।
जिमि दसनन्हि महुँ जीभ बिचारी ॥
तात कबहुँ मोहि जानि अनाथा
। करिहहिं कृपा भानुकुल नाथा ॥
बिभीषण म्हणाला, ‘ हे
पवनपुत्रा, माझी परिस्थिती ऐकून घे. ज्याप्रमाणे दातांमध्ये बिचारी जीभ दबून
राहाते, त्याप्रमाणें मी येथे राहातो. हे तात, मला अनाथ समजून सूर्यकुलाचे नाथ
श्रीरामचंद्र कधी माझ्यावरही कृपा करतील काय ? ॥ १ ॥
तामस तनु कछु साधन नाहीं । प्रीति
न पद सरोज मन माहीं ॥
अब मोहि भा भरोस हनुमंता ।
बिनु हरिकृपा मिलहिं नहिं संता ॥
माझे हे तामसी
राक्षसशरीर असल्यामुळे साधन तर काही जमत नाही आणि मनातही श्रीरामचंद्रांच्या
चरणकमलांविषयी प्रेमही नाही. परंतु हे हनुमंता, श्रीरामचंद्रांची माझ्यावर कृपा
आहे, असा मला आता विश्वास वाटत आहे. कारण हरीच्या कृपेविना संतांची भेट होत नाही.
॥ २ ॥
जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा
। तौं तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा ॥
सुनहु बिभीषन प्रभु कै रीती
। करहिं सदा सेवक पर प्रीती ॥
श्रीरघुवीरांनी कृपा
केली आहे, त्यामुळे तुम्ही आपणहून मला दर्शन दिले. ‘ हनुमान म्हणाला, ‘ हे
बिभीषणा, ऐकून घे की, सेवकावर सदा प्रेम करणे ही प्रभूंची रीतच आहे. ॥ ३ ॥
कहहु कवन मैं परम कुलीना ।
कपि चंचल सबहीं बिधि हीना ॥
प्रात लेइ जो नाम हमारा ।
तेहि दिन ताहि न मिलै अहारा ॥
सांग बरें ! मी कुठे मोठा कुलीन लागून गेलो आहे ? सर्व
दृष्टींनी तुच्छ असा मी चंचल वानर आहे. सकाळी
-सकाळी जो आम्हा वानरांचे नाव घेतो, त्याला त्या दिवशी
भोजनही मिळत नाही. (
असे म्हणतात ) ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment